×

Samir Patil प्रकरण: धंगेकरांचा चंद्रकांत पाटीलवर नवा आरोप

Samir Patil case:

Samir Patil प्रकरण: धंगेकरांचा चंद्रकांत पाटीलवर नवा आरोप

Spread the love
  • एका पोटनिवडणूकीतल्या विजयानंतर मात्र ना त्यांना लोकसभा जिकंता आली ना विधानसभा. मात्र दंगेकरांची या निवडणूकांमध्ये भलतीच हवा झाली. त्यांच्या बोलण्याच्या स्टाईलने मिडीयावर ते कायम असतात.अशात आता गौतमी पाटीलच्या गाडीच्या Accident प्रकरणात त्यांनी पिडीत कुटुंबासोबत जाऊन पोलीस ठाणचं गाठलं. त्यावेळी निलेश घायवळवर प्रश्न विचारल्यावर मात्र त्यांनी एक नविनच नाव समोर आणलं ते म्हणजे Sameer Patil यांचं. समीर पाटिल हा व्यक्ती कोथरुचे आमदार Chandrakant Patil आणि निलेश घायवळ यांचा मध्यस्थी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Samir Patil case:
Samir Patil case: Chandrakant Dhangekar’s patil
  • पुणे शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अलिकडच्या काळात खुपच गंभिर झाल्याचं चित्र पुणेकरांना दिसत आहे. विद्येच माहेरघर आणि आपल्या सांस्कृतीक वारशासाठी प्रसिद्ध असलेलं पुणे आता टोळीयुद्दासाठी आणि त्यांच्या म्होरक्यांसाठी गाजत आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावर खुन होण्याची घटना किंवा कोयता गॅंगच्या नावाखाली कायदासुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा. अशात ज्यावेळी एखाद्या नेत्याचा आशिर्वाद या गुंडांना आहे असं कोणी सांगतं तेव्हा याबद्दल प्रश्न विचारले जातात. सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले रविंद्र धंगेकर यांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर घायवळ टोळीला सपोर्ट करत असल्याचा आरोप केला आहे. एक समीर पाटील नावाचा व्यक्ती सतत चंद्रकांत पाटलांच्या ऑफीसमध्ये बसलेला असतो आणि तो त्यांचा निरोप Nilesh Ghaywal यांच्यापर्यंत पोहचवत असल्याचं धंगेकरांनी म्हटलं आहे.

समीर पाटील कोण आहेत?

Sameer Patil कोण आहे याचा तपास मिडियाने केला आणि त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते कोथरुडमध्ये राहणारे आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय चालवणारे व्यक्ती असल्याचं समोर आलं. कोथरुडमध्ये ते चंद्रकांत पाटलांशी संबंधित असले तरी ते भाजपचे सदस्य देखील नाहीत. शिवाय मी असं काही करत असल्यास त्याचे पुरावे धंगेकरांनी द्यावेत असं त्यांनी न्युज मिडियाशी बोलताना सांगितलं. माझ्यावर साधी एसी सुद्धा मागच्या २५ वर्षात दाखल नाही असं ते यावेळी म्हणाले. शिवाय यासंबंधी अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

धंगेकर विरुद्ध भाजप नेते

या सगळ्यात विशेष बाब म्हणजे धंगेकर आता महायुतीत आहेत. मात्र तरिही त्यांनी भाजपनेत्यांना टार्गेट करायचं सोडलेलं नाही. who is धंगेकर? या चंद्रकांत दादांच्या वाक्याने त्यांना चांगलाच फायदा झाला होता. महायुतीत येऊनही धंगेकर काय Chandrakant Patil चा पिच्छा सोडत नाही असं दिसतय. असं असलं तरिही शिंदेंच्या शिवसेनेत राहून जे धंगेकर निलेश घायवळ सोबतच्या संबंधांवरुन दुसऱ्या पक्षातील नेत्यांना धारेवर धरत असताना तिकडे रोहीत पवारांनी मात्र शिंदें गटाच्या दोन आमदारांचाही निलेश घायवळला पळवून लावण्यात हात असल्याचं म्हटलं आहे.

विरोधकांचा आरोप आणि सत्ताधाऱ्यांची अडचण

त्यामध्ये कळमुनरीचे आमदार संतोष बांगर आणि भूम-परांड्याचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांचा सहभाग असल्याचं रोहीत पवार म्हणाले. आणि याच्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे खुद्द राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनीच निलेश घायवळच्या भावाला रिवॉल्वर ठेवण्याचा परवाना दिला आहे याच्यावरुनही शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय.

दरम्यान Sameer Patil यांच्या अब्रुनुकसानीचा दावा करण्याच्या वक्तव्याला उत्तर देताना धंगेकर म्हणाले की “माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असं समीर पाटील म्हणाले, ते १०० कोटींचा मालक आहे असा दावा करतात. त्यानंतर समीर पाटील कोण हे तपासल्यावर चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे फोटो दिसले. १०० कोटींचा मालक असेल आणि राजकारणाचा काही संबंध नसेल तर हा तिथे काय करतो? मी समीर पाटीलचे फोटो ट्विट केलेत.

नव्या समीकरणांची चाहूल

समीर पाटीलला पहिला मोक्का लागला होता. २० वर्षापूर्वी पुण्यात आलेला समीर पाटील १०० कोटींचा मालक कसा झाला? चंद्रकांत पाटील कदाचित आत्मचिंतन करत असतील त्यामुळे या प्रकरणावर बोलत नसतील. संशयाची सुई त्यांच्यावर आहे त्यांनी बोललं पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. चंद्रकांत पाटील यांच्याकडे बेरोजगार युवकांना पाठवले पाहिजे. १०० कोटी कसे कमवायचे हे कळेल. चंद्रकांत पाटलांचा मानस पुत्र असल्यासारखे फोटो समीर पाटील लावतो.

समीर पाटलांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे म्हणजे मला अजून माहिती मिळेल. घायवाळ टोळी संपवली पाहिजे. पोलिसांनी फडकं टाकून गोळ्या पुसल्या पाहिजेत. समीर पाटील आणि निलेश घायवाळचे अनेक फोटो आहे. लोकशाहीत तुम्ही केलेले पाप कधीतरी उघड होते. जे राजकारण सुरू आहे ते थांबवले पाहिजे. समीर पाटील यांच्या व्यवहाराची चौकशी केली सर्व धागेदोरे उघड होतील असं धंगेकर यांनी म्हटलं आहे.

Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?

Post Comment

You May Have Missed