×

Shefali Verma Creates History: फायनल गाजवणाऱ्या २१ वर्षीय Shefali Verma वर्माचा आणि जिवनप्रवास क्रिकेट विश्वातील नवा तारा!

Shafali Verma breaks record

Shefali Verma Creates History: फायनल गाजवणाऱ्या २१ वर्षीय Shefali Verma वर्माचा आणि जिवनप्रवास क्रिकेट विश्वातील नवा तारा!

Spread the love


लहानपणी केस कापून मुलांमध्ये क्रिकेट खेळण्यापासून सुरुवात करणाऱ्या Shefali Verma च्या जगातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये समावेश होण्यापर्यंतच्या प्रवास. भारताच्या महिला क्रिकेट संघाने सेमीफायनल जिंकली तेव्हाच फायनल जिकंल्याचा आनंद देशभर होता. अशात फायनल जिंकण्याच प्रेशर भारतीय महीला क्रिकेट संघावर होतं.

Shefali Verma Creates History
Shefali Verma Creates History

रोहतक मधल्या एका दागिणे तयार करणाऱ्या संजीव यांची मुलगी Shefali Verma. त्यांनीच अगदी लहानपणीच मुलीला क्रिकेट खेळायला प्रोत्साहन दिलं. तेव्हा मुलींना क्रिकेटचं प्रशिक्षण दिलं जात नव्हतं. त्यामुळं वयाच्या सहाव्या वर्षी शेफालीच्या वडिलांनी मुलासारखी दिसावी म्हणून शेफालीचे केस कापले. यानंतर मुलांच्या क्रिकेट सामन्यांमध्ये शेफाळी क्रिकेट खेळू लागली.

यामुळे पहिल्यापासून तिची स्पर्धा ही मुलांसोबतच झाली. तिच्या फलंदाजीतला आक्रमकपणा इथुनच आला असावा असं अनेकजण म्हणतात. मुलगा म्हणून खेळताना ती कुणालाच ओळखू येत नव्हती. तीचा भाऊ क्रिकेट क्रिकेट खेळायचा. तिथल्या सामन्यांमध्ये तो सहभागी असायचा. एकदा ऐन सामन्याच्या वेळी भाऊ आजारी पडल्यानंतर शेफाली त्याच्या जागी खेळायला गेली होती.

ज्या रोहतकमध्ये Shefali Verma लहानाची मोठी झाली त्या रोहतक च्या मैदानात सचिन तेंडुलकर शेवटचा रणजी सामना खेळत होता. तो सामना पाहण्यासाठी शेफालीचे वडील तिला घेऊन गेले होते. त्यावेळी सचिनला खेळताना पाहून नऊ वर्षांच्या शेफालीने क्रिकेटमध्येच करिअर करायचं हे स्वप्न पाहिलं.

Shefali Verma
Shefali Verma

त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलं नाही. पुढं जाऊन शेफालीनं वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 सामन्यात सचिनचाच विक्रम मोडला होता. Shefali Verma ने त्यावेळी 49 चेंडूंत 73 धावा केल्या. तेव्हा तिचं वय 15 वर्षे 285 दिवस होतं. त्यामुळे भारताकडून अर्धशतक नोंदवणारी सर्वांत कमी वयाची खेळाडू शेफाली बनली. यापूर्वी सचिन तेंडुलकरने 1989मध्ये पाकिस्तानविरुद्ध 59 धावांची नोंद केली होती.

शेफाली सुरवातीपासूनच तिच्या अटॅकींग बॅटींगसाठी ओळखळी जाते. त्यामुळं चाहते तिला महिला क्रिकेट संघाची सेहवाग किंवा लेडी सेहवाग असंही म्हणतात. पहिल्या बॉलपासून फटकेबाजी करणाऱ्या मोजक्या बॅटर्समध्ये शेफालीचा समावेश होतो.

काही कारणांमुळं या वर्ल्डकपमध्ये निवड समितीने Shefali Verma ला पर्यायी सलामीवीर म्हणूनही स्थान दिलं नाही. पण तिच्या नशिबात काही तरी खास लिहिलेलं होतं. प्रतिका रावल जखमी झाल्यानं सेमी फायनलसाठी निवड समितीनं सलामीचा पर्याय म्हणून शेफालीला निवडलं. सेमीफायनल मध्ये तिला फारशी कामगिरी करता आलेली नाही. पण फायनवलमध्ये तिचं, “भगवानने मुझे कुछ ना कुछ अच्छा करने के लिए भेजा है”, हे वाक्य अगदी तंतोतंत खरं ठरलं.

तिने ७८ चेंडूत ८७ धावा केल्या त्यामुळे् भारताला विशाल लक्ष्य देता आलं म्हणून दक्षीण आफ्रिकेविरुद्ध ही फायनल ५२ धावांनी जिंकली. त्यामुळं अवघ्या 21 वर्षांच्या शेफालीसाठी नशिबामुळं मिळालेली ही संधी करिअरचा टर्निंग पॉइंट ठरणार आहे.

Hanumant Pawar Podcast : भाजपाचे मुद्दे सडेतोडपणे खोडणारा काँग्रेसचा प्रवक्ता १० वी नापास होता?

फायनलनंतर संपूर्ण भारतात आनंदाचा जल्लोष झाला; पण या यशामागे फक्त २१ वर्षांची शेफाली नव्हती — तर तिच्या मागे होता तिच्या कुटुंबाचा, तिच्या वडिलांचा आणि तिच्या लढाऊ स्वभावाचा प्रवास. क्रिकेटच्या मैदानावर तिचं यश जितकं मोठं आहे, तितकाच संघर्ष तिच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर होता.

लहानपणी तिला मैदानावर “मुलगी आहेस का तू?” असे प्रश्न ऐकावे लागले. पण शेफालीने कधीही हार मानली नाही. तिने फक्त एकच उत्तर दिलं — “मी खेळून दाखवेन!” रोहतकसारख्या छोट्या गावात मुलींसाठी क्रिकेट म्हणजे स्वप्नासारखं होतं, पण तिने ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं. तिच्या वडिलांनीही या स्वप्नाला पाठबळ दिलं — स्वतःचे दागिने गहाण ठेवून मुलीला बॅट, किट आणि ट्रेनिंग मिळवून दिलं. आज तीच मुलगी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या गौरवशिखरावर उभी आहे.

शेफालीने वर्ल्ड क्रिकेटमध्ये आपले पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेट २०१९ साली केलं होतं. एकदम पहिल्या मालिकेत तिच्या बॅटमधून झळकलेली ऊर्जा, निडर खेळ सगळे आश्चर्यचकित करून गेले. तिच्या बॅटिंग स्टाईलमधला आक्रमकपणा चाहत्यांना वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा ठरला, आणि त्यानंतरच तिचं टोपणनाव पडलं — “लेडी सेहवाग”.

तिच्या छोट्याशा वयातच ती अनेक विक्रमांच्या यादीत पोहोचली. वयाच्या १५व्या वर्षी ती भारतासाठी सर्वात तरुण फलंदाज ठरली जिने अर्धशतक केलं. त्यानंतर २०२०च्या महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये तिने भारताला फायनलपर्यंत नेण्यात मोठी भूमिका बजावली होती

या वर्ल्डकपमध्ये मात्र तिचं स्थान सुरुवातीला निश्चित झालं नव्हतं. अनेकांनी तीला विसरलेलं होतं. पण नशिबाने पुन्हा एकदा तिच्या बाजूने हात पुढे केला. प्रतिका रावल जखमी झाल्यामुळे शेफालीला पुन्हा एक संधी मिळाली – आणि हीच संधी तिच्या आयुष्याचा वळणबिंदू ठरली. फायनलमध्ये तिने जे ८७ धावांचे धडाकेबाज इनिंग खेळले, त्याने संपूर्ण जग थक्क झालं. तिच्या बॅटिंगमुळे भारताने ऐतिहासिक विजय मिळवला आणि भारताच्या महिला क्रिकेट इतिहासात नवं सुवर्णपान लिहिलं गेलं.

फायनलनंतर शेफाली म्हणाली — “भगवानने मुझे कुछ अच्छा करने के लिए भेजा है।” तिच्या या शब्दांमागे तिच्या मेहनतीचा आणि संघर्षाचा सार दडलेला आहे.

आज शेफाली फक्त क्रिकेटपटू नाही, ती एक प्रेरणा आहे — त्या सर्व मुलींसाठी ज्या समाजाच्या चौकटी मोडून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढत आहेत.

रोहतकच्या एका छोट्याशा गल्लीपासून ते विश्वचषकाच्या मैदानापर्यंतचा प्रवास शेफालीने आपल्या जिद्दीने आणि चिकाटीने पूर्ण केला आहे. तिच्या वडिलांचं एक वाक्य लक्षात ठेवावं लागतं — “तू मुलगी नाही, तू माझा अभिमान आहेस.”

आज खरोखरच शेफाली वर्मा संपूर्ण भारताचा अभिमान बनली आहे.

Post Comment

You May Have Missed