Nagraj Manjule Jhund Actor Murder : शेवट एवढा भयानक का झाला?
लहान वयातच गुन्हेगारीत शिरलेला बाबू नावाचा पोरगा. त्याच्यावर अनेक केसेस असूनही Nagraj Manjule त्यांच्या Jhund चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आधिचं जब्याला, परशाला, आर्चीला ह्या मोठ्या पडद्यावर घेऊन आलेले नागराज अण्णा या बाबूलाही संधी देतात. पण पुन्हा त्याच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि व्यसनांचा पिच्छा न सोडलेल्या बाबू छत्री उर्फ प्रियांशु क्षत्रीय याचा त्याच्याच मित्राने चाकू आणि दडगाने ठेचून खून केला.

नागराज मंजुळे – झोपडपट्टीतून उगवलेले तारे
आयुष्य संधि देतं. त्या संधिचं सोनं करायचं की माती. हा ज्याचा त्याचा प्रश्न. किंवा काही जण म्हणतात तसं हे ज्याचं त्याचं नशिब. हिरोचे फॅन अनेक असतात. पण महाराष्ट्रात एक असा डायरेक्टर आहे. ज्याचं नाव वाचून लोकं चित्रपट पहायला जातात. त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. त्यांच्या अनेक गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना आश्चर्यचकित करते. ती म्हणजे कलाकार निवडतानाची पद्धत. फक्त कुठल्यातरी पिच्चरमध्ये या आधि काम केलयं म्हणून नाही तर चित्रपटातील एखाद्या पात्राला न्याय देऊ शकेल अशी माणसं नागराज शोधून आणतो. फाटकं आयुष्य जगलेल्या नागराच्या चित्रपटातील पात्रही तशीच गरीब, वंचीत, झोपडपट्टीत राहणारी.
“झुंड” – अमिताभ बच्चनसोबत झोपडपट्टीतील पोरं
त्यामुळे त्याला जब्या कुठं मिळाला? करमाळ्यात एका गावात नागराज मंजुळेचा सत्कार होत होता तेव्हा हलगी वाजवताना दिसलेलं पोगरं त्याने घेतलं आणि त्याला पिच्चरचा हिरो बनवला. असा ओरीजनल रंगाने काळा असलेला हिरो कुणी अजुन पाहिलाच नव्हता. फॅंन्ड्री हा सिनेमा त्याच्या आयुष्यातली आजवरची सगळ्यात छान कलाकृती ठरली. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. तोच पॅटर्न त्याने सैराटमध्ये वापरला.
वास्तव डोळ्यासमोर ठेवणारा सैराट हा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. गावातून आलेल्या परशाला, आर्चिला लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर योग आला Amitabh Bachchan सोबत काम करण्याचा पण स्टोरी आपली झोपडपट्टीतल्या पोरांचीच. नागपुरच्या झोपडपट्टी भागात राहणारी पोरं यामध्ये घेण्यात आली. त्यातलाच एक प्रियांशु क्षत्रीय म्हणजेच बाबू छत्री.
गुन्हेगारीतून पडद्यावरचा प्रवास
ज्याने Jhund पाहिला असेल त्याला माहीतीये की हा सिनेमा एक बायोग्राफी होता. ज्यांच्या आयुष्यावर बनला त्या व्यक्तीने नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पोरांना एकत्र करुन त्यांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगण्याचा चांगला पर्याय निवडण्याची संधि दिली होती. यावेळी खऱ्या आयुष्यात स्वतःवर ५ गुन्हेगारी केसेसे असलेला एक तरुण नागराजच्या टिमच्या हाताला लागला. ज्याला पिच्चरमध्ये काम करण्याचा विचार स्वप्नातही येणार नाही अशा बाबू छत्रीला घेतलं गेलं.
त्याला वाटत होतं की मला घेऊन जातील आणि किडण्या विकतील. पण शुटींग संपली. पिच्चर रिलिज झाला आणि मुख्य कलाकारांसोबत हा बाबू सुद्धा तेवढाच गाजला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राजीव खांडेकर यांनी या बाबूला विचारलं. आयुष्यात काय करायचं होतं. तेव्हा हा म्हणाला. मेरे को तो डॉन बननेका था.
आता काय काम करणार विचारल्यावर तो म्हणाला. जे काही भेटेल ते काम करेल. फक्त एक्टींगच नाही. सगळ्यांनी या गोष्टीचं कौतूक केलं. आणि सिनेमाप्रमाने खऱ्या आयुष्यातही कोणीतरी या गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या दृष्टचक्रातून बाहेर पडलं. याचा आनंद अनेकांना होता. पण शेवटी तो प्रसंग फक्त सिनेमापुरताच खरा ठरला.
पुन्हा गुन्हेगारी आणि व्यसनांच्या जाळ्यात
Jhund सिनेमा हिट झाल्यानंतरही हा प्रसिद्धी मिळालेला बाबू काही गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर गेला नाही. त्याला एकदा मोबाईल्स चोरीमध्ये अटक झाली होती. त्याच्यावर एकून १५ गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येतय. त्याचा मित्र साहू आणि तो रात्री घराबाहेर पडला एका ठिकाणी त्यांनी पार्टी केली. दारूच्या नशेत दोघांचं कशावरुन तरी भांडण सरु झालं.
बाबू छत्रीने त्याच्याकडचा चाकू काढून त्याच्या मित्रावर उगारला. त्याने तो वार हुकवत बाबूच्याच हातातला चाकू हिसकावला आणि बाबू छत्रीचा म्हणजेच प्रियांशू क्षत्रीय याचा गळाच चिरला. तेवढ्यानेही तो मेला नाही म्हणून त्याला दगडाने ठेचून मारला. आणि तिथून पळाला. पोलीसांना घटनेची माहीती मिळताच आरोपीला ६ तासाच्या आत अटक केली.
वाचा अजून संबंधित बातम्या-



Post Comment