×

RSS शिबिरात लैंगिक शोषण? IT Engineer तरुणाची आत्महत्या

RSS camp Kerala News IT Engineer Suicide Case

RSS शिबिरात लैंगिक शोषण? IT Engineer तरुणाची आत्महत्या

Spread the love

RSS Camp Kerala News : IT काम करणारा. 26 वर्षाचा तरुण. आत्महत्या करतो आणि त्याआधि एक सोशल मिडिया पोस्ट करतो. माझ्या आत्महत्येचं कारण प्रेम, कर्ज किंवा दुसरं काही नाही. तर माझ्यावर संघाच्या शाखेत झालेल्या लैगींक झळामुळे झालेल्या मनोविकारा आहे असं तो सांगतो. काय आहे हे सगळ प्रकरण आणि RSS च्या शिबीरांवर यामुळे काय आरोप होत आहे.

Kerala News RSS camp
RSS camp

यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये RSS या संघटनेला १०० वर्ष पुर्ण झाली. आधि सावरकरांमुळे नंतर गांधिजींच्या हत्तेमुळे, ३ वेळा लागलेल्या बंदिमुळे, हिंदुराष्ट्राच्या RSS च्या धोरणामुळे, शिवाय देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आत्ताचे Narendra Modi हे संघ स्वयंसेवक असल्यामुळे नेहमीच RSS देशाच्या केंद्रस्थानीचा मुद्धा राहिला. भाजपातील बहुतेक नेते हे संघातून आलेले असतात. जसेकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातील भाजपचे मोठे नेते नितीन गडकरी.

सत्तेत भाजप असली तरी RSS ला डावलून त्याला राजकारण करता येत नाही. असं म्हटलं जातं. भाजप आपली विचारधारा तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी संघ प्रचारकांचा किंवा थेट संघाचा उपयोग करतं. केरळमध्ये सुद्धा आरएसएसचा प्रभाव वाढत आहे. अशात संघाच्या शाखेत आणि शिबीरात लैंगीक छळ झाल्याची बातमी समोर आली आहे. केरळच्या एका IT कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने यामुळे आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलीसांनी याची दखल घेत शवविच्छेदनासाठी पार्थिव पाठवलं आहे.

आनंदु आजू हा २६ वर्षीय IT Engineer लहानपणी घरच्यांमुळे आरएसएसच्या शाखेत जात होता. त्याच्या वडिलांनीच त्याला शाखेत पाठवल्याचं कळतय. तिथे त्याचा शेजारी असणाऱ्या एनएम नावाच्या व्यक्तीने त्याचं लैगींक शोषण केलं. हा एनएम सध्या भाजपचा एक्टीव कार्यकर्ता असल्याचं त्याने व्हिडिओत सांगितलं. आनंदुच्या कुटुंबियांशी सुद्धा त्याचे चांगले संबंध होते. तो ही गोष्ट घरच्यांनाही सांगू शकला नाही. त्याच्या लहानपणी झालेल्या या लैगींक शोषणामुळे त्याला अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागला. त्यामध्ये डिप्रेशन आणि सिओडी म्हणजेच ऑब्सेसीव्हि कम्पल्सिव डिसॉर्डर हे होते. त्याने सांगितलं की इतरही अनेक संघाच्या सदस्यांकडून त्याचा लैंगीक झळ झाला पण त्यांची नावं त्याला आठवत नाहीत.

पण अगदी शिबीरांमध्ये सुद्धा या घटना झाल्या. त्याने सर्वांना सल्ला दिला की संघापासून लांब रहा. अगदी घरचे असतील तरीही. त्याच्या म्हणण्यानुसार अशा घटना इतरही अनेकांसोबत घडल्या आहेत. वडिलांनाही मुलांसोबत वेळ घालवत जा असा सल्ला त्याने दिला आहे. थिरुवअनंतपुरम मधिल थंतापूर भागात एका लॉजवर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या या व्हिडिओमुले अनेक राजकीय पक्षांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या पोस्टमध्ये तो म्हटला की आरएसएसकडून आयुष्यभराच्या वेदना मिळाल्या.

मी कुणावरही नाराज नाही, फक्त एक व्यक्ती आणि संघटनेवर नाराजी आहे. एनएम हा RSS चा सक्रीय सदस्य होता आणि तो सतत लैंगिक शोषण करत होता. कॅम्पमध्ये लैंगिक शोषण करताना त्यानं काठीनं मारहाणही केली. आरएसएससारख्या दुसऱ्या कोणत्या संस्थेबाबत इतका द्वेष नाही. आरएसएसवाल्यांसोबत मैत्री करू नका, वडील, भाऊ किंवा मुलगा जरी असले तरी दूर ठेवा. कँपमध्ये खूप शोषण होतं, बाहेर पडल्यानं मी बोलू शकलो. पुरावे नाही म्हणून कोणी मान्य करणार नाही पण माझं आयुष्यच पुरावा आहे.

  • वाचा अजून संबंधित बातम्या-

Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?

Post Comment

You May Have Missed