×

Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis साठी कुणाकुणाचा राजकीय बळी?

Sudhir Mungantiwar political news

Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis साठी कुणाकुणाचा राजकीय बळी?

Spread the love

Devendra Fadnavis शी वाकडं म्हणजे मसनात लाकडं. एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा. पण भाजप म्हणजे सबकुछ Devendra Fadnavis. हे तर सगळ्यांना माहीतचं आहे. सध्या भाजपमधला एक नावं असंच अज्ञातवासात टाकलं जाातयं. त्याचं नाव आहे Sudhir Mungantiwar.

Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis
Sudhir Mungantiwar -Devendra Fadnavis

काही महिन्यांपुर्वी भाजपाचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो, या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या Sudhir Mungantiwar यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं. आणि मंग सुरू होतं ते कार्यक्रमाच राजकारण. तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती. चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्या दरम्यानची ही घटना. पण प्रश्न फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पहायला मिळालंय म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का ? डावललं तर कोणी डावललं. जोरगेवारांनी कि भाजपने की फडणवीसांनी. पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, लोकसभेवेळी Sudhir Mungantiwar नी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं, त्यावेळी Sudhir Mungantiwar राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अश्यातच मुंडेंना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आणि आता हा कार्यक्रम. त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपवू पाहतेय अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकत ते पाहूया.

सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम हॊईल का नाही याचा देखील विचार करत नव्हते. खास करून 2019 मध्ये भाजपा-सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत आणू शकतो म्हणून पक्षाकडून येथूनच त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं बोललं जात.

दरम्यानच्या काही काळात Sudhir Mungantiwar हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याच पाहायला मिळालं. तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आल नव्हत. आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर Sudhir Mungantiwar हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं, ज्या मागे हेतू एकच होता तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे.

एकंदरीत काय तर महाराष्ट्रात Devendra Fadnavis ना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचीत दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाहीये. यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं. या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातली घरवापसीही कायमची रद्द झाली. पंकजा मुंडे इतक्या दिवस शांत बसुन कमबॅक करण्याची वाट पाहत होत्या. त्यात विधानसभेतील पराभव, लोकसभेतील पराभव तरीही मंत्रीमंडळातील संधी यामुळे बॅकफुटवर गेलेल्या मंत्रीमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरस्थावर झाल्या. मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्यातरी नाहीये. यानंतर येतं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंच नाव. भावी मुख्यमंत्री म्हणून बघीतलं गेलेल्या या नेत्याचा अक्षरशः बाजार उठवला गेला. जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली. कारण एकचं देवेंद्र फडणवीस.

वाचा अजून संबंधित बातम्या-
Narendra Modi यांच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत : Chandrababu Naydu यांच्या नावाची चर्चा

Post Comment

You May Have Missed