२०२६ युद्धाचा धोका? India-Pakistan टकराव ?गुजरात का केंद्र?
Operation Sindhur नंतर पाकिस्तान शांत बसेल हे एक दिवास्वप्नच आहे. आणि म्हणुनच २०२६ च्या शेवटीपर्यंत India-Pakistan मध्ये एक मोठं युद्ध होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यावेळी याचं केंद्र कश्मिर नसुन गुजरात बॉर्डर असणार आहे. भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या एका वक्तव्याने याने दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाच्या जाणकारांना असं का वाटतयं.
पाकिस्तानची अंतर्गत अवस्था — का भारताकडे लक्ष्य?
आपल्यापैकी बऱ्याचजनांना असं वाटतं की India-Pakistan हा संघर्ष फक्त कश्मिरसाठी आहे. मुळात आपण जो नकाशा लहानपणापासून बघतो त्यामुधल्या कश्मिरचा मोठा भाग हा फाळणीनंतर पासून पाकिस्तानमध्ये आहे. ज्याला आपण पिओके म्हणजेच पाक ऑक्युपाईड कश्मिर म्हणतो. पाकिस्तानसोबत हा कश्मिरचा मुद्धा निकाली निघला तर शांती प्रस्थापित होईल असं अनेक लोकांना ज्यांना देशाची प्रगती, गरीबी हे मुद्धे महत्वाचे वाटतात. त्यांना वाटतं. परंतु निट विषय समजुन घेतला तर लक्षात येईल की भारतासोबत सतत युद्धजन्य परिस्थिती राहणं. किंवा भारताला आपलं कट्टर शत्रु माननं. याच्यावरचं पाकिस्तान हा देश सध्या टिकुन आहे.
माझं हे बोलण कदाचीत तुम्हाला अतिशोक्ती वाटतं असेल म्हणूण काही उदाहरण देतो. तुम्ही पाहिलं नेपाळमध्ये लोकांनी काय केलं. ते झालं तिथं वाढलेल्या कमालीच्या बेरोजगारीमुळे, अमाप भ्रष्टाचारामुळे लोकं रस्त्यावर आली आणि त्यांनी संसद, राष्ट्रपती भवन पेटवून दिली. बांग्लादेशमध्ये सुद्धा तरुणांनी केलेल्या आंदोलनामागे हीच कारणं होती. त्यांच्या पंतप्रधानांना देश सोडावा लागला. आपण खाली श्रीलंकेत काय झालं पाहिलं असेल.
तर अर्थकारण बिघडलं. लोकांना पेट्रोल घ्यायला लाईनीत थांबावं लागलं. तिथंही पंतप्रधान देश सोडून गेला. सगळीकडे एक गोष्ट कॉमन दिसेल. राजकारण्यांचा भ्रष्टाचार, प्रचंड गरीबी, बेरोजगारी हे असलं की अराजकता माजते आणि लोकं सरकार आणि आर्मीला सुद्धा जुमानत नाहीत. पण हे पाकिस्तान मध्ये का होत नाही? जो पाकिस्तान कितीतरी दशकापासून फक्त विदेशी कर्जावर अवलंबून आहे. बेरोजगारी विचारु नका. भ्रष्टाचाराला माप नाही.
त्याच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाने त्याची पाच वर्षाची कारकिर्द पुर्ण केलेली नाही. पाकिस्थान मध्ये जितकी राज्य आहेत. त्यामध्ये पाकिस्तान मध्ये असणारं पंजाब राज्य सोडून इतर सर्व राज्यांवर अन्याय होतो. बलुचीस्थान त्याचच उदाहरण. तरीही लोकं सत्ताधारी किंवा तिथल्या आर्मीच्या विरोधात रस्त्यावर का येत नाहीत. तर त्याला कारण आहे भारत. हो तुम्ही बरोबर ऐकलयं.
ऑपरेशन सिंदुर — काय आहे आणि त्याचा प्रभाव काय?
संपुर्ण पाकिस्तान सरकार आणि तिथली आर्मी कधीही लोकांच्या मनात तिथल्या व्यवस्थेबद्दल राग वाढू लागला की मुद्धाम भारतासोबत युद्ध करते. ते छोटसं युद्ध झालं आणि त्यात त्यांचं नुकसान जरी झालं तरी लोकांचं लक्ष त्यांच्या मुलभुत प्रश्नांवर सोडून भारतावर जातं. आणि आपला देश संकटात आहे. भारत आपला शत्रु आहे त्यामुळे आपण सरकार आणि आर्मीच्या मागे उभं रहायला हवं ही भावना काही काळासाठी का असेना त्यांच्यात येते. आणि ही कुठलीही मनगडंत कथा नसुन पाकिस्तानचं वास्तव आहे.
नाहीतर तुम्हीच विचार करा जो देश तेला मिठाला महाग असेल तो हजारोकोटी रुपये आंतकवादासाठी आर्मीसाठी का खर्च करेल. आत्ता झालेल्या ऑपरेशन सिंदुरनंतर तिथल्या सैन्यावर खर्च केला जाणारा निधी दुपटीने वाढवण्यात आला. लोकांचं लक्ष मुलभुत प्रश्नांवरुन भटकवण्यासाठी असा मोठा शत्रु उभा करण्याचं कारस्थान जगात अनेक ठिकाणी सुरु असतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर सध्या मराठवाड्यातली परिस्थीती आहे. एवढ्या पुरातही आणि अडचणीतही हिंदु-मुस्लिम किंवा मराठा-ओबीसी कीती जोरात सुरु आहे याच्यावरुनच तुम्ही अंदाज लावा. असो.
आपल्या मुळ विषयावर येऊ. हे सगळं सांगण्याचं कारण, की भारताने कीतीही नरमाई घेतली किंवा कितीही आक्रमक भुमिका घेतली तरी पाकिस्तान काही दिवसानी कशानाकशा मार्गाने भारताची खोडं काढत राहणार हे नक्की. त्याचाच भाग म्हणून आता त्याने गुजरातच्या सिमेवर असणारा काही भाग आपला असल्याचं दावा करायला सुरवात केली आहे. सोबतच त्या भागात त्याची सैन्य ताकत वाढवायला सुरुवात केली आहे.
२०२६ मध्ये युद्ध होण्याचा अंदाज ?
दसऱ्याच्या मुहुर्तावर भारताचे संरक्षण मंत्री यांनी यावर स्पष्टपणे बोलताना सांगितलं, “पाकिस्तानने गुजरातच्या सर क्रिक या सिमावर्ती भागात काही करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात असुद्या १९६५ मध्ये भारतीय सैन्य कराचीपर्यंत पोहोचलं होतं. आता २०२५ मध्ये असं काही झालं तर कराचीच्या सस्त्यातच सर क्रिक पडतं. सगळा इतिहास आणि भुगोल बदलुन टाकू.” अर्थात अशी भाषा दोन्ही बाजूने सुरु असतेच पण इथे गुजरातच्या सिमेवर आता पाकिस्तान काही कुरापती करायला लागलयं हे दिसुन येत. त्यामध्ये ऑपरेशन सिंदुरनंतर भारताने जी काही मोठमोठी शस्त्रखरेदी केली आहे किंवा आपल्या संरक्षण क्षेतात जी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते आहे. ते बघुन ही मोठ्या युद्धाची पुर्वतयारी असल्याचं आपल्याला दिसतय. सोबत भारताने हे स्पष्टपणे सांगीतलयं की ऑपरेशन सिंदुर अजुन संपलेलं नाही.
पाकिस्तान काही कुरापती करतयं हे पाहुन भारत योग्य वेळ साधून एखादा मोठा झटका पाकिस्तानला देऊ शकतं. जसा १९७१ च्या युद्धात दिला होता. तर त्यात नवल वाटायला नको. कारण युद्ध हे आपल्या वेळेनुसार खेळायचं असतं. २०२६ मध्ये India-Pakistan मध्ये मोठं युद्ध होऊ शकतं याचं मोठा आधार हा २०२१ मध्ये अमेरिकेतल्या एका थिंक टॅंकने वर्तवलेल्या अंदाजात आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक घटनांचे जाणकार यामध्ये वर्तवण्यात आलेल्या शक्यतेला खुप गंभिरतेने बघतायत आणि विश्वासार्ह्य मानत आहे.
त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पुढच्या पाच वर्षात मोठं युद्ध India-Pakistan यांच्यात होऊ शकतं. आणि ऑपरेशन सिंदुर त्याची फक्त झलक असल्याचं बोललं जातय. सध्या भारतासमोर अनेक मोठे प्रश्न असले तरी पाकिस्तानचा तोडगा काढल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकणार नाही हे एव्हाणा भारताच्या लक्षात आलं आहे.
Jyoti Waghmare Viral Video : ज्योती वाघमारे बरोबर की सोलापुरचे कलेक्टर Kumar Ashirwad



Post Comment