Gautami Patil Car Accident case
Trending आजच्या बातम्या

Gautami Patil Car Accident : हिट ऍंड रन प्रकरणात नविन अपडेस

Spread the love

सेलीब्रीटी त्यांच्या गाड्या आणि त्या गाडीचा अपघात. हे काही जिवाभावाचं नात झालयं की काय माहीती. Gautami Patil च्या गाडीने एका रिक्षाचालकाला ठोकल्याची बातमी मागच्या काही दिवसापासून येत आहेत. अशात काही नविन माहीती यात समोर आलेली आहे. Gautami Patil चे कॉल रेकॉर्डही मागवण्यात आले आहेत.


Gautami Patil Car Accident:
Gautami Patil Car Accident:
 ३० सप्टेंबरला पहाटे ५ वाजता. पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागात सर्विसरोडला जागेवर उभ्या असलेल्या रिक्षाला मागून येऊन किआ गाडीने ठोकलं. ४४ वर्षीय सामाजी मरगळे हे रिक्षाचालक यामध्ये जखमी गंभिर जखमी झाले. त्यांचे मित्र युवराज साळवे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. मात्र पोलीस कारवाईवर जखमी मरगळे यांच्या कन्येला भलतीच शंका वाटत असून तिने तसं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलून दाखवलं आहे. 

"पंचनामा न होता गौतमी पाटीलची गाडी त्या जागेवरुन कशी हलवली? कोणी हलवली ती गाडी? टोईंग करुन ती गाडी कोण घेऊन गेलं? आमच्या फिर्यादीही बदलले आहेत. त्यांचे जबाबही बदलले गेले आहेत. ते कोणी बदलले? कोणाच्या दबावाखाली बदलले? त्यांनी आरोपीची ओळख पटवली तेव्हा आमचं तिथे कोणीच नव्हतं. आम्हाला आरोपी दाखवलेला नाही. आम्हाला सीसीटीव्ही मिळालेलं नाही. आम्ही गौतमी पाटीलच्या कॉलचा सीडीआर मागवला होता. तिच्या चालकाच्या मोबाईलचा सीडीआर मागावला होता.

 लोकेशन, गाडी भोरपासून निघाली तेव्हापासून ठिकठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज ज्यात त्यांनी पकडलेला चालक आणि  Gautami Patil दिसेल ते द्यावं असं निवेदन केलं होतं पोलीस निरिक्षकांना. मात्र त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही," असं रिक्षाचालकाच्या मुलीने मिडीयाशी बोलताना म्हटलं आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या चारचाकी वाहणाची नंबरप्लेट रिक्षापाशीच पडली होती. त्यामुळे ही गाडी कुणाची हे लक्षात आलं होतं. असंही त्यांनी सांगीतलं. गौतमी पाटील मोठी सेलेब्रीटी आहे म्हणून हे प्रकरण दाबलं जातयं आणि आरोपी दुरसा दाखवला जातोय असाही संशय पिडीतांच्या घरच्यांना आहे. 

 अशात रिक्षाचालक व्हेंटीलेटर वर असल्याचं सांगितलं जातय. त्यांचे कुटुंबीय हे प्रकरण घेऊन थेट चंद्रकांत पाटलांकडं पोहोचले आहेत. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी त्या रिक्षाचालकाच्या कुटुंबासमोरच डीएसपींना फोन लावून, ते गौतमी पाटीलला उचलायचय की नाही. असं म्हणाले. समोररुन डीएसपींनी काहीतरी उत्तर दिल्यावर मात्र ती गाडी कुणाचीतरी आहे की नाही? असा सवाल चंद्रकात पाटलांनी केला म्हणजेच गौतमी पाटीलवर खटला भरण्यासाठी किंवा तीला उचलण्यासाठी पोलीस तयार नसल्याचं कळतयं. पण मंग त्याच्यावर काय कारवाई करायची असा प्रश्न विचारला जातोय. 

यावेळी बोलताना त्यांची गाडी जप्त करुन टाका आणि  Gautami Patil ला नोटीस पाठवा. समोरचा व्यक्ती खुप सिरिअस आहे. तुम्ही तीला सांगून कमीत-कमी त्यांचा खर्च तरी करा असं चंद्रकात पाटील म्हणाले. म्हणजेच काय तर पोलीस  Gautami Patil वर सध्या तरी नोटीस सोडून कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार नसल्याचं दिसतय. रिक्षाचालक सध्या व्हेंटीलेटर वर असुन गौतमी पाटीलला लोकांची इतकी सहानुभुती मिळते पण साधं तीने फोन करुन चौकशी सुद्धा केली नाही असं त्या कुटुंबाचं म्हणणं आहे. कदाचीत कुणालातरी किंवा स्वतःलाच वाचवण्यासाठी ती असं करतेय का हा ही प्रश्न विचारला जातोय. शिवाय आमचा बाप इथं व्हेंडीलेटर वर असताना तीचे शो कसकाय सुरु आहेत. अशी प्रतिक्रीय अपघात झालेल्या रिक्षाचालकाच्या मुलीने दिली आहे. 

Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *