Samir Patil case:
Pune आजच्या बातम्या

Samir Patil प्रकरण: धंगेकरांचा चंद्रकांत पाटीलवर नवा आरोप

समीर पाटील कोण आहेत? Sameer Patil कोण आहे याचा तपास मिडियाने केला आणि त्यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते कोथरुडमध्ये राहणारे आणि स्वतःचा उद्योग व्यवसाय चालवणारे व्यक्ती असल्याचं समोर आलं. कोथरुडमध्ये ते चंद्रकांत पाटलांशी संबंधित असले तरी ते भाजपचे सदस्य देखील नाहीत. शिवाय मी असं काही करत असल्यास त्याचे पुरावे धंगेकरांनी द्यावेत असं त्यांनी न्युज मिडियाशी बोलताना सांगितलं. माझ्यावर साधी एसी सुद्धा मागच्या २५ वर्षात दाखल नाही असं ते यावेळी म्हणाले. शिवाय यासंबंधी अब्रुनुकसानीचा दावा कोर्टात करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. धंगेकर विरुद्ध भाजप नेते या सगळ्यात विशेष बाब म्हणजे धंगेकर आता महायुतीत आहेत. मात्र तरिही त्यांनी भाजपनेत्यांना टार्गेट करायचं सोडलेलं नाही. who is धंगेकर? या चंद्रकांत दादांच्या वाक्याने त्यांना चांगलाच फायदा झाला होता. महायुतीत येऊनही धंगेकर काय Chandrakant Patil चा पिच्छा सोडत नाही असं दिसतय. असं असलं तरिही शिंदेंच्या शिवसेनेत राहून जे धंगेकर निलेश घायवळ सोबतच्या संबंधांवरुन दुसऱ्या पक्षातील नेत्यांना धारेवर धरत असताना तिकडे रोहीत पवारांनी मात्र शिंदें गटाच्या दोन आमदारांचाही निलेश घायवळला पळवून लावण्यात हात असल्याचं म्हटलं आहे. विरोधकांचा आरोप आणि सत्ताधाऱ्यांची अडचण त्यामध्ये कळमुनरीचे आमदार संतोष बांगर आणि भूम-परांड्याचे आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांचा सहभाग असल्याचं रोहीत पवार म्हणाले. आणि याच्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे खुद्द राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते योगेश कदम यांनीच निलेश घायवळच्या भावाला रिवॉल्वर ठेवण्याचा परवाना दिला आहे याच्यावरुनही शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. दरम्यान Sameer Patil यांच्या अब्रुनुकसानीचा दावा करण्याच्या वक्तव्याला उत्तर देताना धंगेकर म्हणाले की “माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा करणार असं समीर पाटील म्हणाले, ते १०० कोटींचा मालक आहे असा दावा करतात. त्यानंतर समीर पाटील कोण हे तपासल्यावर चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला असणारे त्यांचे फोटो दिसले. १०० कोटींचा मालक असेल आणि राजकारणाचा काही संबंध नसेल तर हा तिथे काय करतो? मी समीर पाटीलचे फोटो ट्विट केलेत. नव्या समीकरणांची चाहूल समीर पाटीलला पहिला मोक्का लागला होता. २० वर्षापूर्वी पुण्यात आलेला समीर पाटील १०० कोटींचा मालक कसा झाला? चंद्रकांत पाटील कदाचित आत्मचिंतन करत असतील त्यामुळे या प्रकरणावर बोलत नसतील. संशयाची सुई त्यांच्यावर आहे त्यांनी बोललं पाहिजे अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली. चंद्रकांत पाटील यांच्याकडे बेरोजगार युवकांना पाठवले पाहिजे. १०० कोटी कसे कमवायचे हे कळेल. चंद्रकांत पाटलांचा मानस पुत्र असल्यासारखे फोटो समीर पाटील लावतो. समीर पाटलांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला पाहिजे म्हणजे मला अजून माहिती मिळेल. घायवाळ टोळी संपवली पाहिजे. पोलिसांनी फडकं टाकून गोळ्या पुसल्या पाहिजेत. समीर पाटील आणि निलेश घायवाळचे अनेक फोटो आहे. लोकशाहीत तुम्ही केलेले पाप कधीतरी उघड होते. जे राजकारण सुरू आहे ते थांबवले पाहिजे. समीर पाटील यांच्या व्यवहाराची चौकशी केली सर्व धागेदोरे उघड होतील असं धंगेकर यांनी म्हटलं आहे. Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?

Maharashtra Farmer Aid
Trending आजच्या बातम्या

Maharashtra – अतिवृष्टीत उद्ध्वस्त शेतकरी आणि मनरेगाची लूट

Maharashtra : अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्याला मिळणार प्रतिहेक्टरी साडेतीन लाख रुपये. ह्या ठळक बातम्या म्हणजेच न्युज हेडलाईन्स वाचून, ऐकून कीती भारी वाटतं. असं वाटतं अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार कीती मोठी मदत देतय. पण सरकारं नेहमीच शब्दांचा, अटींचा, आकड्यांचा, योजनांचा फसवा डाव टाकत असतात. शेतकऱ्याला या पुर आणि अतिवृष्टीच्या संकटातून सावरताना आपली साख राखण्यासाठी सरकारने खरडून गेलेल्या जमीनींसाठी देऊ केलेली प्रतिहेक्टरी साडेतीन लाख रुपयाची मदत कशी मोठी करुन सांगीतली आहे. सोबतच मनगेराच्या माध्यमातून यातली ८० टक्यापेक्षा जास्त रक्कम भेटत असताना. MGNREGA काय आहे? आणि या योजनेला संपवण्याचा विडा उचललेल्या केंद्र सरकारने त्यासाठी शेतकऱ्याला कसं त्याचं प्यादं बनवलं आहे. शेतकऱ्याच्या नजरेतून कर्जमाफीची खरी कहाणी | ३ कर्जमाफ्या, ३ गोष्टी

Solapur Collector Kumar Ashirwad
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Who is Kumar Ashirwad? : शिंदे-पवारांना न जुमानणारा कलेक्टर

सोलापुरच्या पुरग्रस्थ गावात जाऊन चमकोगीरीचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंना चांगलाच भोवला. Solapur Collector Kumar Ashirwad यांनी वाघमारेंना चांगलचं धारेवरं धरलं. त्याचा व्हिडिओ व्हायरलं झाला. आणि नेटकर्यांनी त्यांच्यावर तोंडसुखही घेतलं. शिंदे गटाच्या प्रवक्त्या असणाऱ्या आणि सभा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना नडणारे आणि उलट सवाल करणारे जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याविषयीची माहीती आपण घेणार आहोत. हे तेच कलेक्टर आहेत ज्यांनी अजित दादा आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सोलापुर जिल्हात झालेल्या कॉलनंतर मुरुम उपसा करणाऱ्या गावकऱ्यांवर खटला दाखल केला होता. इतकचं नाही तर विरोधी पक्षाला सुद्धा त्यांनी थेट नडायला मागेपुढे पाहिलं नाही. कुमार आशिर्वाद. ३७ वर्ष वयाचा तरुण अधिकारी गेल्या २ वर्षांपासून सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतोय. मुळचे झारखंडचे असणारे Kumar Ashirwad यांचं शालेय शिक्षण दार्जीलींग आणि जमशेदपुरला त्यांचं शालेय शिक्षण पुर्ण केलं. त्यांचं गाव इतक्या दुर्गम भागात होतं की चुकुन एखाद्या घरी लाईटची सोय होती. अशात टिव्ही, इंटरनेट लांबची गोष्ट. पुढे जाऊन आयआयटी खरगपुर मधून त्यांनी बीटेक इंजीनीअरींग पुर्ण केली. २०११ पासून प्रशासकीय सेवेत रुजु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरवातील सलग ४ वेळा युपीएसी मध्ये अपयश आलं. अखेर २०१६ मध्ये संपुर्ण देशात ३५ वी रॅंक मिळवत कलेक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं. सोलापूर मद्ये ते २०२३ मध्ये कलेक्टर म्हणून रुजु झाले आहेत. पण त्यापूर्वी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हात त्यांच पोस्टींग होतं. जिल्हा परिषदेचे सिईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं. सोलापुरचे कलेक्टर झाल्यापासून अनेक कामांमुळे त्यांचं कौतूक झालं. त्यामद्ये पर्यटनाला चालणा देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत नाहीतर मंग सोलापूर मध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक झालं आहे. आत्ता सध्या ज्यावेळी इतिहासात पहिल्यांदा सोलापुरमध्ये नदीला पुर आलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच लोकांचा जीव वाचू शकला असं सर्वांचं मत आहे. त्यांच्या कार्यापद्धतीचं सगळीकडेच कौतुक होतं आहे. पण या सगळ्यात राजकीय नेत्यांचा अडसर नाही झाला किंवा अधिकारी असुन नेत्यांनी दमदाटी नाही केली तर नवलच. त्यामुळेच त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. एक नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे नडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. काय आहेत हे दोन्ही विषय चला समजून घेऊया. मागच्या काही दिवसात उपमुख्यमंत्री Ajit Pawar नी केलेला महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल चांगलाच व्हायरलं झाला होता. त्यामध्ये अवैध मुरुमउपशावरची कारवाई थांबवण्याची सुचना अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला दिली होती. मिडीयाने हा विषय लावून धरल्यावर त्याचा तपास जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याकडे गेला. आएएस अंजली कृष्णा यांनी दादांच्या फोन नंतर कारवाई थांबवलीही होती. मात्र यानंतर तपासात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हा मुरुम उपसा अवैध असल्याचच सांगीतलं. आणि याच्यामुळेच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकप्रकारे दादांनी केलेला फोन आणि कारवाई थांबवण्याच्या सुचना गैर असल्याचं यातून समोर येत होतं. म्हणजे आपल्या प्रशासकीय ताकदीचा वापर करुन इथे अजित दादांना अप्रत्यक्षपणे नडण्याचाच प्रयत्न याठिकाणी त्यांनी केला होता. अशात आता सोलापूर मद्ये पुराने थैमान घातल्यानंतर परिस्थिती हाताळताना त्यांना राजकीय नेंत्यांच्या दबावालाही सामोरं जावं लागत होतं. अशात जिल्हाचे पालकमंत्री भरणे मामांनीही उंदरगावच्या लोकांना सुविधा कसकाय पोहोचल्या नाहीत म्हणून मिडीयासमोर कॉल करुन त्यांना झापलं. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका पुरग्रस्त गावात २०० किटचं वाटप करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यांनी कलेक्टर कुमार आशिर्वाद यांना सर्वांसमोर फोन लावला, तो स्पिकर वर ठेवला आणि त्याची व्हिडिओही रेकॉर्डींग सुरु होती. तुम्ही लोकांना जास्त पैशाची मदत द्या. लगेच जेवण पोहोच करा. असं सांगणाऱ्या वाघमारेंना तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत का करत नाही. आम्ही इथं काम करत आहोत. तुमचं राजकारण मध्ये आणु नका. २०० किटने काय होतं. तिथं लोकं किती आहेत. असा प्रतिसवालच त्यांनी केला. सहसा कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशी भाषा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांसाठी वापरली जात नाही. मात्र मी कलेक्टर आहे माझं तुम्ही ऐकुन घ्या म्हणत कुमार आशिर्वाद यांनी ज्याोती वाघमारेंची बोलतीच बंद केल्याचं व्हिडिओत दिसुन येत आहे. या व्हिडिओमुळे त्या इतक्या ट्रोल झाल्या की त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ बनवून त्यांना पोस्ट करावा लागला. माध्यमांनी चमकोगीरी करणाऱ्या वाघमारेंना कलेक्टरांचे खडेबोल अशा मथळ्याच्या बातम्या पोस्ट केल्या. थोडक्यात काय तर अजित दादांची राष्ट्ववादी असो नाहीतर शिंदेंची शिवसेना या कलेक्टर साहेबांनी कुणालाच सुट्टी दिली नाही. एवढंच काय विधानसभेनंतर ज्या मारकडवाडीचं प्रकरण मतचोरी झाली म्हणून विरोधीपक्षाने उचलुन धरलं होतं. तेव्हा कलेक्टर असणाऱ्या Kumar Ashirwad यांनी पत्रकार परिषद घेऊन. तुम्हाला आक्षेप होता तर तुमचे निवडणून प्रतिनिधी मतदान केंद्रावर मोजणीच्या वेळी असताना तुम्ही का नाही घेतला. शिवाय तुम्हाला मोजणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे पण बॅलेट पेपर किंवा कशीही निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. असं स्पष्टपणे सुनावत, तुमच्याकडे पुरावे असले तर आणा. असा दावाही त्यांनी केला होता. Jyoti Waghmare Viral Video : ज्योती वाघमारे बरोबर की सोलापुरचे कलेक्टर Kumar Ashirwad

Supriya Sule
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Supriya Sule On Reservation : जातीय की आर्थिक आरक्षण?

आर्थिक निषकावर आधारीत जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. हे वक्तव्य आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं. गोपीनाथ मुंडेंसमोर त्यांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहे. अशात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिलेला असताना बारामतीच्या खासदार Supriya Sule च्या एका इंग्रीज मुलाखती मुळे पुन्हा एकदा चर्चांना पेव फुटलं आहे. आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या घटकाचं काय मत आहे आणि संविधानात यासाठी काय तरतुद आहे. Reservation : १० वर्षांच्या आरक्षणाची खरी गोष्ट

Maharashtra Weather cloud Burst
Mumbai Weather Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

What is Cloud Burst ढगफुटी की अतिवृष्टी? पुराची खरी कारणं

cloud Burst की अतिवृष्टी? महाराष्ट्रातील पुरामागचं खरं कारण जगात १ मिनिटात ३६ मिमी, ५ मिनिटात ६६ मिमी, १५ मिनिटात २०० मिमी, १ तासात ४०० मिमी, १ दिवसात ११०० मिमी आणि दोन दिवसात १८०० मिमी पावसाचे रेकॉर्ड आहेत. मुंबईचा २६ जुलैचा दिवसभरात पडलेला १००० मिमी पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता. अशा परिस्थितीत १५ किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात. आणि ते इतक्या कमी वेळात कोसळतात की दरड कोसळणे आणि भयंकर पुर येणे या घटना त्यातून घडतात. आता विषय असा आहे की महाराष्ट्राच्या अनेक भागात जो पुर येतोय तो आधिच धरणं ही भरलेली आहेत. अशात पाण्याचा साठा आणि जमीनीची धारण करण्याची क्षमता संपल्यामुळे होतोय. ते दिवसभरात ५०-६० मिलीमीटर पाऊस झाला तरी होत आहे. खडकवासला सारखं धरण ज्याची क्षमता बाकी धरणांच्या तुलनेत कमी आहेत. शिवाय डोंगरमाथ्याला झालेला पाऊस लगेच धरणात पोहोचतो. त्यामुळे ते लगेच भरत. पण म्हणून त्यातून झालेल्या विसर्गाला ढगफुटी कारणीभुत नसते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .

Beed Train Updates
Beed Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

Beed Railway धावणार! अमोल गलधरांच्या संघर्षाला सलाम

१७ सप्टेंबरला Beed Railway रेल्वे धावणार. देशाचे पंतप्रधान मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिवशी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत या बीडकरांच्या स्वप्नांना हिरवा कंदिल दाखवणार. पण बीडमध्ये रेल्वे येणार म्हटल्यावर अनेक राजकीय नावांसोबत एक नाव जोमाने पुढे येत. ते म्हणजे Amol Galdhar यांचं. बीड मधल्या प्रत्येकाला हे नाव परिचित आहे. Beed रेल्वेसाठी संघर्ष बीड मधल्या प्रत्येकानेच केला. अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत प्रत्येक लोकप्रतिनीधी यासाठी प्रयत्नशील राहीला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याचं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. अशात एका नावाचा उल्लेख सर्वजण करत आहेत. ते म्हणजे स्व. अमोल गलधर ज्यांचं २०१० मध्ये एका अपघातात निधन झालं. बीड च्या कानाकोपऱ्यातून त्यांनी लोकांना रेल्वेच्या प्रश्नासाठी एकत्र केलं होतं. त्यांना रेल्वेप्रवासाचं महत्व पटवून दिलं. इतकच नाही तर लोकांना आंदोलनासाठी सुद्धा त्यांनी एकत्र केलं. महाराष्ट्रभरातून बीडच्या तरुणांना एकत्र करुन त्यांनी रेल्वे मिळण्यासाठीच्या आंदोलनाला एकत्र आणलं. शेतकरी कुटुंबातला तरुण तडफदार नेता ज्याने त्या काळातील रेल्वे मंत्र्यांनाही सोडलं नाही. प्रत्येकाला भेटून त्यांनी याचं निवेदन दिलं होतं. मगं त्या ममता बॅनर्जी असुद्या नाहीतर मगं लालूप्रसाद यादव. अतिशय आक्रमक आंदोलनासाठी अमोल गलधर हे ओळखले जाऊ लागले होते. एकदा तर त्यांनी ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांचा पुतळा जाळून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवली होती. Beed मधल्या आधार प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. तरीही त्यांच्या रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत एकत्र यायचे. एका आंदोलनादरम्यान अशी परिस्थिती तयार झाली होती की, त्यावेळचे पोलीस अधिक्षख सुवेझ हक यांनी अमोल गलधर यांना अटक केली. त्यांची लोकप्रियता इतकी झाली होती की, अटकेची बातमी ऐकून Beed मध्ये परिस्थीती हाताबाहेर जाऊ लागली होती. त्यांचे कार्यकर्ते सार्वजनीक ठिकाणी दगडफेक करु लागले होते. संपुर्ण बीड बंद होण्याची परिस्थीती झाल्यामुळे शेवटी पोलीसांना अमोल गलधर यांना सगळ्यांसमोर आणावं लागलं. तेव्हा कुठे जाऊन सर्वजण शांत झाले होते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .

Russia oil export ban
International News आजच्या बातम्या

Russia oil export ban, भारताला बसणार झटका?

Russia oil export ban, निर्यातीवर बंदी, भारताला बसणार झटका? जगभरात तेल बाजारपेठेत मोठा धक्का बसला आहे. कारण, जगातील सर्वात मोठा तेल निर्यातदार असलेल्या Russia ने डिझेल आणि पेट्रोल निर्यातीवर तात्पुरती बंदी घालण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खळबळ उडाली असून भारतासह अनेक देशांवर याचा संभाव्य परिणाम होऊ शकतो. डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक भूमिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी भारतासह चीनवर रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यासाठी दबाव आणला आहे. रशियाचा निर्णय नेमका का? Russia चे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोवाक यांनी सांगितले की – जागतिक पातळीवरील खळबळ या बंदीमुळे आधीच अस्थिर असलेल्या जागतिक इंधन बाजारपेठेत आणखी तणाव निर्माण झाला आहे. भारतावर काय परिणाम होईल? भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात कच्चं तेल आयात करतो. अमेरिकेचा दबाव आणि भारताची भूमिका अमेरिका रशियाच्या अर्थव्यवस्थेला कमकुवत करण्यासाठी रशियन तेलावरील जागतिक मागणी कमी करू इच्छिते. रशियाचा आत्मविश्वास Russia ने सांगितलं आहे की – Russia ने तेल निर्यातीवर घातलेली बंदी ही जगभरातील ऊर्जा बाजारासाठी मोठा धक्का आहे. अमेरिकेच्या दबावामुळे भारतावर राजकीय आणि आर्थिक संकटं निर्माण होऊ शकतात, मात्र भारताने अद्याप रशियन तेल खरेदी थांबवलेली नाही. आगामी काळात रशिया-युक्रेन संघर्ष, अमेरिकेची भूमिका आणि भारताची ऊर्जा धोरणं यावर संपूर्ण समीकरण अवलंबून असेल. जगाच्या अर्थव्यवस्थेला हादरा देणाऱ्या या निर्णयामुळे भारत कसा मार्ग काढतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. H1B Visa : Meleniya Donald Trump चं नाव चर्चेत येण्याचं कारण आणि भारत-अमेरिका संघर्षाची पार्श्वभुमी

Pimpri Chinchwad Share Market Scam:
Sport Sports आजच्या बातम्या

पिंपरी चिंचवड Share Market घोटाळा : IT प्रोफेशनल ठगला

Pimpri Chinchwad शहरात एक मोठा Share Market Fraud घोटाळा उघडकीस आला आहे. कमी वेळेत जास्त परतावा मिळवून देण्याच्या आमिषाखाली तब्बल 150 हून अधिक नागरिकांची 20 ते 25 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाने केवळ शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे. नेमकं काय घडलं? या प्रकरणाची सुरुवात एका आयटी प्रोफेशनलच्या तक्रारीनंतर झाली. त्या अभियंत्याला कमी वेळेत मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलं. त्याने 90 लाख रुपयांची गुंतवणूक केली. सायबर पोलिसांचा तपास तक्रार मिळताच पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी गोपनीय पद्धतीने तपास सुरू केला. डिजिटल पुरावे, बँक व्यवहार आणि मोबाइल कम्युनिकेशनच्या आधारे आरोपींचा मागोवा घेण्यात आला. टोळीची कार्यपद्धती ही टोळी सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲप ग्रुप्सच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढायची. फसवणुकीचं जाळं किती मोठं? सायबर पोलिसांच्या मते, ही टोळी केवळ या प्रकरणापुरती मर्यादित नाही. नागरिकांसाठी इशारा पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचा संदेश दिला आहे: पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आलेला हा Share Market फसवणुकीचा प्रकार तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबर येणाऱ्या धोक्याची जाणीव करून देतो. फसवणूक करणारे आज डिजिटल माध्यमांचा गैरवापर करून नागरिकांना लाखोंनी लुटत आहेत. सायबर पोलिसांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे आरोपींना पकडता आलं, मात्र अजूनही या प्रकरणात अनेक धागेदोरे शिल्लक आहेत. तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे या घोटाळ्याचे नवे पैलू समोर येतील. Sanjay Gaikwad : बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या निवडणूक खर्चाच्या दाव्यात किती तथ्य?

Sameer Wankhede Accuses Shah Rukh Khan Of Defamation
Bollywood आजच्या बातम्या

Sameer Wankhede Vs शाहरुख खान : ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वाद

Sameer Wankhede Vs Shah Rukh Khan : ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वाद बॉलिवूड सुपरस्टार Shah Rukh Khan यांचा मुलगा आर्यन खान दिग्दर्शित ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ ही वेब सिरीज नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. सिरीज प्रदर्शित झाल्यानंतर काही दिवसांतच ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. कारण, माजी एनसीबी (NCB) अधिकारी Sameer Wankhede यांनी या सिरीजविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. वानखेडेंनी केलेले आरोप, त्यांचे म्हणणे आणि या खटल्याचे कायदेशीर परिणाम काय असतील, याचा सविस्तर आढावा घेऊया. मानहानीचा खटला नेमका कोणाविरुद्ध? Sameer Wankhede नी दाखल केलेला खटला थेट Shah Rukh Khan आणि त्यांची पत्नी गौरी खान यांच्या कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स विरुद्ध आहे. Sameer Wankhede यांच्या मते, या सिरीजमधून त्यांच्या प्रतिमेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर परिणाम करणाऱ्या गोष्टी दाखवल्या गेल्या आहेत. वानखेडेंचे आरोप नुकसानभरपाईची मागणी समीर वानखेडेंनी 2 कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली आहे. मात्र, ही रक्कम स्वतःकडे न ठेवता ती टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला दान करण्याचा प्रस्ताव त्यांनी न्यायालयात मांडला आहे. पुन्हा चर्चेत आलेलं आर्यन खान प्रकरण आर्यन खान आणि ड्रग्ज प्रकरण हा विषय आधीच देशभर चर्चेत होता. त्या काळात समीर वानखेडेंनी कारवाई केली होती. आता आर्यन खान दिग्दर्शित सिरीजमुळे पुन्हा एकदा वानखेडे-खान परिवार वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. कायदेशीर गुंतागुंत या खटल्यात अनेक कायदे गुंतलेले आहेत: जर न्यायालय वानखेडेंच्या बाजूने निर्णय दिला, तर रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि नेटफ्लिक्सला मोठा फटका बसू शकतो. सिरीजचं भविष्य काय? न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सिरीजवर बंदी घालावी लागेल का, किंवा त्यातील काही भाग हटवले जातील का, हा प्रश्न उपस्थित होतो. नेटफ्लिक्स आणि रेड चिलीजने अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. Wet Drought : ओला दुष्काळ म्हणजे काय? महाराष्ट्र सरकार तो का लागू करत नाही? सविस्तर माहिती.

Marathwada Flood: Eknath Khadse-Devendra Fadnavis
Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

Marathwada Flood: शेतकऱ्यांसाठी एकनाथ खडसेंची मागणी

मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे Marathwada Flood परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री Eknath Khadse यांनी तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांचे आदेश एकनाथ खडसे म्हणतात की, निवडणूक काळात ज्या पद्धतीने ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत शासकीय मदत दिली गेली, त्याच पद्धतीने आता पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही कोणतेही निकष लावले न जाता, पंचनामे न करता त्वरित Farmer Assistance दिली जावी. शेतकऱ्यांना विविध निकषांखाली त्रास दिला जात असल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणले. राज्यातील अनेक भागांमध्ये ओले दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे, असेही खडसे म्हणाले. आर्थिक संकटामुळे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पुरेशी मदत उपलब्ध नाही, त्यामुळे केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन मदत करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. Marathwada Flood शासकीय दुर्बलता आणि पाहणी खडसे म्हणाले, “सध्याचे सरकार संवेदनाहीन असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सूचना द्यावी लागतात. यावरून शेतकऱ्यांसाठी सरकारची खरी चिंता काय आहे हे स्पष्ट होते.” शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर त्यांचे कर्ज भरण्याची क्षमता राहणार नाही. म्हणून राज्य सरकारने त्वरित कर्जमाफीसाठी घोषणा करावी अशी मागणी खडसे यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. काही महिलांकडून निवेदन स्वीकारण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की कोणतेही अतिरिक्त निकष लावले जाणार नाहीत आणि आवश्यक असल्यास निकष शिथील करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंगोलीतील पीक नुकसान आणि विमा समस्या हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पीक अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर निर्माण झाला असून शेतातील पीक वाहून गेल्याची नोंद आहे. या परिस्थितीत पीक विमा कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला. विमाधारकांनी कार्यालयात जाब विचारण्यासाठी भेट दिली, परंतु तिथे आक्रमक होऊन कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्याची तोडफोड केली गेली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. सरकारकडे मागणी एकनाथ खडसे यांनी सरकारकडे तातडीने पुढाकार घेण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे निकष लावू नये असे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्हींकडून त्वरित पावले उचलली जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने स्पष्ट धोरण तयार करावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी पुढील उपाय शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी तातडीने योजना राबविणे आवश्यक आहे. पीक विमा कंपन्यांनीही या परिस्थितीत सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांच्या कर्जावर ताबडतोब सवलत मिळावी, हाच सरकारचा प्राथमिक हेतू असावा. या सर्व घटनांवरून स्पष्ट होते की राज्य आणि केंद्र सरकारला Government Relief, Farmer Assistance, आणि Flood Relief योजना त्वरित अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी Farmer Help मिळाल्यासच आर्थिक नुकसान कमी होऊ शकते. What is Cloud Burst? महाराष्ट्रात आलेल्या पुराला ढगफुटी कारणीभुत आहे का? सविस्तर माहीत..