बाबासाहेबांनी Reservation फक्त १० वर्षांसाठी दिलं होतं का? गरजवंत मराठ्यांचा लढा घेऊन जरांगे पाटील मुंबईत पोहोचले आणि पुन्हा एकदा मेन स्ट्रिम मिडीयापासून ते सोशल मिडीयापर्यंत सगळीकडे Babasaheb Reservation सुरु झाली. सोशल मिडियावरील चर्चेत काही ठिकाणी Dr. Babasaheb Ambedkar यांनी संविधानात Reservation फक्त दहा वर्षासाठी दिलं होतं. अशा प्रतिक्रीया येऊ लागल्या. आरक्षण म्हणजे काय आणि कोणाला दिलं गेलं? Reservation मुद्यावर चर्चा करण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेच आहे. भारतात आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या घटकांमध्ये तीन मुख्य घटक आहेत. अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती आणि इतर मागासवर्ग. अनुसुचीत जाती म्हणजे SC यामध्ये ज्या जातींना अस्पृशांची वागणूक दिली गेली होती आणि त्यांच अनेक वर्षांपासून सामाजीक तसेच आर्थिक शोषण झालं त्यांना पुढं येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून संधी दिली गेली. ओबीसी आणि सध्याची स्थिती अनुसुचीत जमाती म्हणजे एसटी या अशा जमाती आहेत ज्यांचा मुख्य समाजाशी जास्त संबंध येत नाही. ज्यांच्या चालीरीती, भाषा, या वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ आदिवासी लोकं. त्यांनाही पुढं येण्यासाठी Reservation माध्यमातून संधी दिली गेली. तीसरा आहे इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसी या अशा जाती आहेत ज्या एसी किंवा एसटीमध्ये मोडत नाहीत तरिही त्यांच्यात कोणतातरी प्रकारचा सामाजीक किंवा शैक्षणीक मागासलेपणा दिसतो. या जाती येतात ओबीसी मध्ये. महाराष्ट्रात याच उदाहरण द्यांयचं झालं तर. प्रामुख्याने बारा बलुतेदार यामध्ये येतात. इथे परत लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही की एससी आणि एसटी Reservation हे संविधान लागू झाल्यापासूनच मिळालं पण ओबीसी आरक्षण हे ९० च्या दशकात मिळालं. म्हणजे आत्तापासून जवळपास ३० वर्ष आधि. आता हे आरक्षण दिलं जातं तीन ठिकाणी. पहिलं राजकीय प्रतिनिधित्व म्हणजे निवडणूकीत. दुसरं शिक्षणात आणि तिसरं आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये. फक्त १० वर्षांसाठी आरक्षण का? आता येऊ आपल्या मुळं प्रश्नावर. सुरवातीला आरक्षण फक्त दहा वर्षासाठी दिलं होत का? तर याच उत्तर आहे. हो. हे खरं आहे. सुरवातीला म्हणजे संविधान अस्तित्वात आल्यानंतर पहिल्या दहा वर्षांसाठी आरक्षण दिलं गेलं होतं. याला १९६०-१९७०-१९८० आणि नंतर २०३० पर्यंत संविधानात बदल करुन वाढवण्यात आलं. परंतु हे अर्धसत्य आहे. जे आरक्षण स्वतः बाबासाहेब आंबेकरांच्या संमतीने फक्त पहिल्या दहा वर्षांसाठी दिलं गेलं ते राजकीय आरक्षण होतं. शिक्षणात आणि सरकारी नोकरीमध्ये असणाऱ्या Reservation कोणतीही कालमर्यादा घातली गेली नव्हती. जेव्हा बाबासाहेबांकडे १९४९ मध्ये सभागृहातील एका सदस्याने मागणी केली की राजकीय आरक्षण हे १५० वर्षांसाठी ठेवावं किंवा इथल्या अनुसुचीत जाती किंवा जमाती या प्रगत जातींच्या बरोबरीला जोवर पोचत नाहीत तोपर्यंत ठेवाव. त्यावर उत्तर देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ‘व्यक्तीश: मला Reservation जास्त काळ ठेवावे लागेल असे वाटत होते. या सभागृहाने अनुसुचित जातींच्या या आरक्षणाला दीर्घकालीन मुदत द्यायला हवी होती. परंतु मी आधी सांगितल्यप्रमाणे या सभागृहाने 10 वर्षांच्या मुदतीचा निर्णय घेतला. पण जर या दहा वर्षांत अनुसुचित जातींची पुरेशी प्रगती झाली नाही, तर ही मुदत वाढवण्याची तरतूद मी संविधानात करून ठेवलेली आहे.” आणी नेमकं तसचं झालं. ही मुदत अनुक्रमे १९६०-१९७०-१९८० आणि नंतर २०३० पर्यंत संविधानात बदल करुन वाढवण्यात आली. परंतु या राजकीय आरक्षणाच्या मुदतीचा आणि आत्ता अनुसुचीत जाती तसेच अनुसुचीत जमाती यांना शैक्षणीक तसेच सरकारी नोकरीत मिळणाऱ्या आरक्षणाचा काहीही संबंध नाही. परंतु जेव्हा-जेव्हा आरक्षणाचा विषय चर्चेत येतो तेव्हा १० वर्षाच्या कालमर्यादेचं असणारं हे मिथक आपल्याला ऐकायला मिळत. पुणे करार आणि आरक्षणाचा इतिहास याच राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी आंबेडकर आणि गांधि यांच्यात मतभेद होऊन शेवटी पुणे करार झाला होता. बाबासाहेबांचं मत होतं की एससी-एसटी साठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र्य मतदारसंघ असावेत. ज्यामध्ये मतदार आणि प्रतिनीधी दोन्ही अनुसुचीत जाती किंवा अनुसुचीत जमातीतील लोकं असतील. परंतु गांधींनी याला विरोध करत आमरण उपोषण सुरु केलं आणि पुणे करारात शेवटी स्वतंत्र्य मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघावर बाबासाहेब तयार झाले. त्यामुळे आज जे लोकसभेत आणि विधानभेत आपण राखीव मतदारसंघ पाहतो ते या राजकीय आरक्षणातून येतात. इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ओबीसींना राजकीय Reservation अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळतं. लोकसभा किंवा विधानसभेत नाही. Supriya Sule On Reservation : आरक्षण जातीच्या आधारावर की आर्थिक निकषांवर यावरुन राजकारण तापलं.
Blog
Gold Rate: दिवाळीला सोनं खरेदी करावं का? की धोका?
या दिवाळीत Gold खरेदी करणं योग्य का धोकादायक? Gold Prices : सोन्याचे दिवस आले का हे माहीत नाही. पण सोन्याला दिवस आले हे नक्की. सोन्याने ऐन सनासुदिला घेतलेली भरारी. त्यामुळे आता ते प्रतितोळा ३ लाखापर्यंतही जाऊ शकतं किंवा पुन्हा घसरुन ८० हजारावरही येऊ शकतं. असे दोन्ही अंदाज वर्तेवले जात आहेत. सोनं प्रतितोळा ₹3 लाखांपर्यंत जाण्याची चर्चा आहे, तर काही तज्ज्ञ 80 हजारांपर्यंत घसरण्याचं भाकीत करत आहेत. मग प्रश्न असा — या दिवाळीत सोनं खरेदी करणं योग्य का धोकादायक? आता Gold Rate किती चाललाय हे काही मी तुम्हाला सांगत नाही. एव्हाणा तुमच्यापर्यंत त्याची चर्चा पोहचलीच असेल. पण आता कुणी म्हणतय की प्रतितोळा भाव ३ लाखापर्यंत जाऊ शकतो. कुणी म्हणतयं ते पुन्हा ८० हजारावर पण येऊ शकतं. हे सगळं कशाच्या आधारावर बोललं जातयं. कोणत्या गोष्टी सोन्याच्या भावावर परिणाम करत आहेत. आणि त्यामुळे दिवाळीत आपण सोनं खरेदी करावी का? याची माहीती आपण घेऊया. भारतीयांनी तर सोन्यात गुंतवणूक करण्याला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. पण जागतीक पातळीवर पाहता चांगला परतावा म्हणून बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक झालेली पहायला मिळते. जसेकी अमेरिकन डॉलर. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे त्याचा परिणाम डॉलरवर झाल्याचं पहायला मिळतं. डॉलरचं मुल्य घसरु लागल्याने जगातील गुंतवणूकदारांनी आता सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली आहे. अमेरिकेमुळे, russia ukraine संघर्षामुळे आमि अनेक इतर कारणांमुळे सध्या जगावर आर्थिक मंदिचं संकट आहे. अशात सेफ इन्वेस्टमेंट म्हणून अशा काळात सोन्याला प्राधान्य दिलं जातं. अमेरिकेच्या धोरणांना भिवूनच किंवा सावधपणाची भुमिका म्हणून आपला देश भारत आणि चिन हे दोन्ही देश सोन्यात खुप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अमेरिका त्यांच्या डॉलर या चलणाचा कधिही चुकिचा वापर करुन आपल्याला अडचणीत आणू शकतो. अगदी तसच तुर्की देश सुद्धा करत आहे. आता ऐवढे मोठे श्रीमंत देश ही खरेदी करत असतील तर मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे Gold Rate गगनाला भिडले आहेत. हे मंदिचं संकट असच मोठं होत राहिलं किंवा अमेरिका आणि चीन किंवा भारत हा संघर्ष वाढत गेला तर हे भाव असेच वाढत राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच सोनं प्रतिग्रॅम ३ लाखापर्यंतही जाऊ शकतं असं म्हटलं जातय. पण हे सावट कमी झालं. या जगातल्या मोठ्या राष्ट्रांतील वाद निवळला तर गुंतवणूकदार पुन्हा आपल्या सोन्यातल्या गुंतवणुकी डॉलरमध्ये किंवा मार्केटमध्ये आणतील. तेव्हा मात्र हे Gold Rate पुन्हा एकदा कोसळतली. मग ते लाखावर थांबतील का ८० हजारावर सांगता येत नाही. आता हे जगावरचं जागतीक मंदिचं संकट कधी दुर होईल? त्याची भविष्यवाणी कुणीच नाही करु शकत. मंग प्रश्न पडतो की दिवाळीला सोनं खरेदी करावं का? अशात वातावरणात गुंतवणूक म्हणूण कोणत्याही गोष्टीकडे सावध पद्धतीने पाहावं. जे जितक्या लवकर वरती जातं. खालीही तितक्याच वेगाने येण्याची शक्यता असते. असं असलं तरिही सोन्याकडे एक सुरुक्षीत गुंतवणूक म्हणूनच पाहिलं जातं. हजारो वर्षांपासून ते एक महत्वाचं चलन राहिलं आहे. अशात ज्याला कुणाला आपल्या आर्थिक सुरक्षीततेसाठी गुंतवणूक करायची असले. तर सोन्यातील गुंतवणूक चांगला पर्याय आहे. इतक्या वाढलेल्या बाजारभावातही. पहा अजून संबंधित बातम्या- INDIA vs PAK WAR भारतीय सिमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या; Operation Sindoor 2.0 होण्याची शक्यता
Amit Thackeray Pune: ABVP कार्यालयाला टाळं, मनसेला नवसंजीवनी!
Amit Thackeray Pune : पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाला टाळं ठोकलं मनसेचे नेते Raj Thackeray यांचे सुपुत्र Amit Thackeray यांनी आज पुण्याच्या पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्हा संदर्भात त्यांनी ही भेट घेतली आहे. कोणत्या प्रकरणात ही भेट झाली. त्यानंतर मिडीयाशी बोलताना Amit Thackeray काय म्हणाले. आणि या एका प्रकरणामुळे पुण्यात मनसेचा पुनरुज्जीवन करण्याचा कसा प्रयत्न सुरु आहे. काल पुण्याच्या वाडीया कॉलेचमध्ये महाराष्ट्र नवनिर्मान विद्यार्थी सेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं. त्यावेळी काहीजणांनी बायकॉट मनविसे जॉईन ABVP असे पोस्टर लावण्यात आले. यामुले आक्रमक झालेल्या मनविसेच्या कार्यकर्त्यांनी थेट एबीव्हिपीचे सदाशिव पेठेतील कार्यालय गाठलं आणी त्याला टाळं ठोकलं. जोरदार घोषणाबाजीनंतर पोलीसांनी संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. यानंतर ABVP ने म्हणजचे अखील भारतीय विद्यार्थी परिषदेने जी भाजपची स्टुडंट विंग आहे त्यांनी सदाशिव पेठेतील त्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. काल दिवसभर हा सगळा राडा सुरु होता. आज मनसेचे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र Amit Thackeray यांनी यासंदर्भात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेतली. यानंतर मिडियाशी बोलताना त्यांनी त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, “आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची नाही. कायदा हा सगळ्यांसाठी समान असला पाहिजे. दुसऱ्यांच्या कामात येण्यापेक्षा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. काल एका कार्यालयाला टाळं ठोकलं आहे. त्यांनी लावलेल्या पोस्टरबाबत मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आहे. यातील ती मुलं त्या संघटनेची निघाली तर त्यांची सर्व कार्यालयं बंद करावी लागतील. यापुढं जर आम्ही पोस्टर लावले आणि बॉयकॉट अभाविप लिहिलं तर चालेल का? तसंच या पुढं आमची अशीच ॲक्शनला रिएक्शन मिळणार.” एका पत्रकाराने विचारलं की एबीव्हीपीचं म्हणणं आहे की हे पोस्टर आम्ही लावले नाहीत. त्यावर अमित ठाकरे म्हणाले उद्या तुमच्या कार्यक्रमात आम्ही असेच पोस्टर लावले तर चालतील का? मुळात त्यांचं अस्तित्वच पुण्यात राहिलेलं नाही. अशी खोड काढणं दोनदा झालं आहे. असं बोट घालायचं काम केलं तर आम्ही हात घालू. ते सत्तेत असले तरी कितीही प्रेशर टाकलं तरी फरक पडणार नाही हे दाखवायला मी इथं आलो आहे. मी आमच्या पोरांच्या मागे उभाय कारण ते उत्तम काम करतायत. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या आंदोनलामुळे मनसेला पुण्यात नवसंजीवणी मिळण्याची आशा आहे. त्यामुळेच अमित ठाकरे स्वतः पुण्यात आले. गेल्या काही काळापासून वसंत मोरे हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत गेल्यानंतर तर पुण्यात मनसेला संथपणा आला होता. आता या प्रकणामुळे ऐन महानगरपालीकेच्या तोंडावर मनसेला नव्याने जोशाने काम करायला संधि मिळाली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ही आयती संधी मनसेला दिली आहे. तसं पहायला गेलं तर मनसे हा पक्षचं अश्या आंदोलनातून उभा राहिलेला आहे. त्याचे कार्यकर्ते सुद्धा अशा आंदोलनासाठी ओळखले जातात. ते कुणालाही अंगावर घ्यायला भित नाहीत. मगं तो सत्ताधारी भाजप का असेना. मागील काळात टोलसाठी राज ठाकरेंचं झालेलं आक्रमक आंदोलन असो नाहीतर अजुन काही. त्यामुळे पुन्हा एकदा २८ नगरसेवक ज्या पुण्याने मनसेचे निवडून दिले होते तशी आशा पुन्हा एकदा असल्याने हे प्रकरण त्याच्यासाठी पुरक ठरु शकतो. वाचा अजून संबंधित बातम्या- Nilesh Ghayval Controversy : कर्जत-जामखेड मध्ये Rohit Pawar आणि Ram Shinde यांचे एकमेकांवर आरोप.
Dhanteras 2025 Tips: या वस्तूंनी वाढवा धन, आरोग्य आणि भाग्य!
भारताचा हर सण हा श्रद्धा, परंपरा आणि उत्साहाने केला जातो. यामध्ये धनत्रयोदशी म्हणजेच Dhanteras 2025 हा सण विशेष समाजात मानला जातो. दिवाळीचा उत्सव याच दिवशी चालू होता आणि या दिवशी ह्याचे संपत्ती, आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या काळात श्री धन्वंतरि अमृत घेऊन प्रकट झाले होते. म्हणूनच Dhanteras हा दिवस आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्तीचा दिवस मानला जातो. त्याचवेळी भगवान कुबेर व आराध्य देवी लक्ष्मीची उपासना करून वर्षभरासाठी धनलाभाची कामना केली जाते. भारतीय कुटुंबांमध्ये या दिवशी घर साफसफाई केली जाते, तिजोरीला व व्यापारातील गल्ल्याला हळद-कुंकू लावून पूजा केली जाते. आणि संध्याकाळी दिवे लावून लक्ष्मीचे स्वागत केले जाते.धनत्रयोदशी म्हणजे सोनं आणि चांदीची खरेदी ही अपरिहार्य परंपरा असताना या दिवशी घरात वर्षभर धनलाभ होतो असं मानलं जातं. सोनं आणि चांदी हे स्थैर्य, सौंदर्य आणि लक्ष्मीचं प्रतीक असणार्याने घरात वर्षभर राहणारं धनलाभ होतो ही बात मानावी लागेल. Dhanteras हा सण कुबेर देव आणि धन्वंतरि भगवान यांच्या पूजनासाठी प्रसिद्ध आहे. असे मानले जाते की या दिवशी योग्य वस्तूंची खरेदी केल्यास घरात लक्ष्मीचा वास होतो तर वर्षभर भरभराट होते. धनत्रयोदशीचे धार्मिक महत्त्व हिंदू पंचांगानुसार, कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी हा दिवस धनत्रयोदशी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरि समुद्रमंथनातून अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे या दिवशी आरोग्य आणि संपत्ती दोन्ही मिळावीत, अशी प्रार्थना केली जाते. १. सोनं-चांदीची खरेदी Dhanteras म्हटली की सोनं आणि चांदीचं नाव आलंच. या दिवशी सोनं, चांदी किंवा त्याच्या नाण्यांची खरेदी करणे शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी खरेदी केलेले सोनं घरात लक्ष्मी स्थिर करते. आपल्या ऐपतीनुसार सोन्याचं दागिनं, चांदीचं नाणं किंवा छोटे बिस्किट विकत घेणं अत्यंत शुभ असतं. २. कुबेर यंत्राची स्थापना धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्र खरेदी आणि स्थापना करणं अत्यंत शुभ असतं. कुबेर हे धनाचे अधिपती मानले जातात. हे यंत्र दुकानातील गल्ला, घरातील तिजोरी किंवा ऑफिसमध्ये ठेवले जाते. त्यासमोर बसून खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा – “ॐ यक्षाय कुबेराय वैश्रवणाय, धनधान्याधिपतये धनधान्यसमृद्धिं मे देहि दापय स्वाहा” असं केल्याने धनलाभ, आर्थिक स्थैर्य आणि व्यावसायिक वाढ होते. ३. तांबे आणि पितळी वस्तू Dhanteras च्या दिवसावर तांबे आणि पितळी वस्तू खरेदी करण्याला धार्मिकदृष्ट्या किती महत्त्व आहे. तांबे आरोग्यदायी धातू आहे, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवसावर तांब्याची भांडी, ताटं किंवा पूजेसाठी तांब्याचा कलश घेणं शुभ ठरतं. पितळीसुद्धा समृद्धीचं प्रतीक आहे. घरात पितळी दिवा किंवा पूजेचा सेट ठेवला तर घरात शांती आणि स्थैर्य वाढतं. ४. झाडू खरेदीचा शुभ योग Dhanteras च्या दिवसावर झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. भारतीय परंपरेनुसार झाडू म्हणजे ‘दारिद्र्य दूर करणारे’ साधन असते. या दिवशी जुनी झाडू टाकून नवीन झाडू घेतल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि लक्ष्मीचा वास होतो. ज्या अनेक गृहिणी या दिवशी झाडू खरेदी करून संध्याकाळी लक्ष्मीपूजनापूर्वी घर झाडतात — याला धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ मानलं जातं. ५. शंख आणि रूद्राक्ष खरेदी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रानुसार, शंख हे लक्ष्मीचे प्रतीक आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी शंख विकत घेऊन घरात ठेवला तर संपत्ती आणि शांती वाढते. तसेच सातमुखी रूद्राक्ष आणून घरात ठेवला तर सर्व अडथळे आणि नकारात्मकता दूर होते. ६. दिवे व पूजेच्या वस्तू धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा सुरुवातीचा दिवस असल्याने दिवे, वाती, सुगंधी अगरबत्त्या व पूजेची सामग्री किंवा अन्नधान्य खरेदी करतांना मोठं महत्त्व येतं. घरात उजेड होणं, प्रकाशाचा प्रभाव वाढणं म्हणजेच लक्ष्मीचं स्वागत करणं. या दिवशी पूजेसाठी विशेष सुवासिक तेल व देवदारू स्तंभाची पितळी दिवे वापरणं अत्यंत शुभ होतं. ७. अन्नधान्य व धान्याची खरेदी Dhanteras च्या दिवशी घरात अन्नधान्य साठवणं, नवीन धान्य विकत घेणं शुभ मानलं जातं. यामुळे घरात वर्षभर अन्नसंपत्ती टिकून राहते. अन्न हेच परमेश्वर” ह्या विचाराच्या या परंपरेचं महत्त्व पाहता येतं. धनत्रयोदशीचे आधुनिक अर्थ आजच्या काळातही या परंपरा आपल्याला समृद्धी आणि सकारात्मकता देतात.धनत्रयोदशीचा मूळ अर्थ सोन्या-चांदी खरेदी नव्हे, तर स्वच्छता, आरोग्य आणि समृद्ध जीवन यासाठी प्रयत्न करणं हाच आहे.या दिवशी आपण फक्त सोनं-चांदी नव्हे, तर विश्वास, श्रद्धा आणि आनंद ही संपत्ती मिळवायला हवी. या वस्तूंची पूजा केल्याने मानसिक शांती आणि स्थैर्य मिळतं.धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरि पूजन करण्याचीदेखील परंपरा आहे.हा दिवस केवळ धनप्राप्तीचा नाही तर आरोग्याच्या देवतेची कृपा मिळवण्याचा दिवस आहे.त्यामुळे या दिवशी आरोग्यदायी आहार घेणं, व्यसनांपासून दूर राहणं आणि आरोग्यविषयक संकल्प करणं हे देखील धनत्रयोदशीचं आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करतं. वाचा अजून संबंधित बातम्या- Beed Yogeshvari Devi : आंबाजोगाईची देवी योगेश्वरी कोकणस्थांची कुलदैवत कशी झाली? संपुर्ण इतिहास
Aurangabad Kidnapping -विद्यार्थिनीवर जडला जिव, मदतनीसाचं अपहरण प्रकरण!
Aurangabad Kidnapping -Police Academy भरतीसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर संचालकाचा जीव जडला. कॉन्टक्ट कसं करायचं म्हणून एका 20 वर्षीय विद्यार्थ्याला त्याने हाताशी धरलं आणि कॉन्टॅक्ट सुरु झालं. थोड्या दिवसात त्याच विद्यार्थ्यासोबत संचालकाचा वाद झाला. आता हा पोरगा आपलं सिक्रेट ओपन करणारं म्हणून त्यालाच किडन्याप करण्याचा प्लॅन संचालकाने आखला. मात्र Chhatrapati Sambhajinagar च्या सिल्लोड मधील पोलींसांनी हा प्लॅन उधळून लावला. घटनेची पार्श्वभूमीChhatrapati Sambhajinagar च्या सिल्लोड मधल्या केळगावंचा Amol Makhala नावाचा २० वर्षीय तरुण. साधारण वर्षभरापुर्वी तो पोलीस भरतीच्या तयारीसाठी हिंदवी करिअर ॲकॅडमीत जॉईन झाला. त्याच ॲकॅडमीचा संचालक असलेल्या दशरथ विठ्ठल जाधव याला एका विद्यार्थिनीवर प्रेम झालं. संचालकाने त्याचं जुळवून देण्यासाठी Amol Makhala हाताशी धरला. वादातून उभं राहिलं संकट अमोलनेही दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांना चांगलीच मदत केली. पण काही दिवसातचं त्याचं आणि संचालक असणाऱ्या Dasharath Jadhav याचं काही कारणावरुन भांडण झालं. दशरथ जाधवने अमोलला ॲकॅडमीतून बाहेर काढलं. पण त्याच्या काही ऑडीओ रेकॉर्डींग या अमोलकडं होत्या. जर त्या अमोलने ह्या रेकॉर्डींग किंवा त्याच्याकडं असणारे पुरावे व्हायरल केले तर आपली मोठी बदनामी होईल म्हणून संचालक असणाऱ्या दशरथ जाधवने अमोलला तंबी देण्याचा आणि Kidnapping करायचा प्लॅन आखला. Kidnapping थरारक प्लॅन Dasharath Jadhav त्याच्या ॲकॅडमीत शिकणाऱ्या दोन मुलांना अमोलच्या गावी केळगावला पाठवलं. त्यानंतर अमोलला त्या पोरांसोबत घाटात बोलावलं. तो त्या पोरांसोबत घाटात पोचला तेव्हा Dasharath Jadhav सोबत त्याचा साथीदार गणेश जगतापही होता. गणेश जगताप आणि ॲकॅडमीत शिकणारे कोहळा तांडा गावचे दोन मुलं गणेश सोनूसिंग चव्हाण आणि प्रविण लालचंद राठोड यांनी अमोल मखला दांड्याने मारायला सुरवात केली. तुझ्याकडं असणारे पुरावे आम्हाला दे अशी मागणी त्याच्याकडं केली. अमोल मखने ती रेकॉर्डींग द्यायला नकार दिला. अमोलला बेदम मारहाण करुन त्या चौघांनी त्याला फोरव्हिलर टाकलं आणि अज्ञातस्थळी घेऊन चालले. पण या गाडीतून घेऊन जाताना अमोलच्या एका मित्राने त्याला पाहिलं आणि हिंदवी ॲकॅडमीचा संचालक असणाऱ्या दशरथ जाधवला ओळखलं. अमोलच्या मित्राने ही माहीती त्याच्या घरच्यांना दिली आणि अमोलच्या घरच्यांनी ही माहिती सिल्लोडच्या पोलीसांना दिली. पोलिसांची फिल्मी कारवाई सिल्लोड पोलीसांना Kidnapping माहिती मिळताच. त्यांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ यंत्रणा कामाला लावली आणि दशरथ जाधव तसेच त्याच्या साथिदाराच्या तावडीतून अमोलची सुटका केली. पोलीसांनी ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी दशरथ जाधवसह, त्याचा साथिदार गणेश जगताप आणि हिंदवी करिअर अॅकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणारे गणेश चव्हाण आणि प्रविण राठोड यांना न्यायालयात हजर केलं आहे. स्थानिक प्रतिक्रिया न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक लहू घोडे, कर्मचारी विश्वनाथ तायडे,यतीन कुलकर्णी, विठ्ठल नागरगोत, रामेश्वर जाधव, रमेश व्यवहारे, अनंत जोशी यांनी भराडी जवळ फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक केली होती. वाचा अजून संबंधित बातम्या- Jalgaon Crime – Mayuri Thosar Case : हुंडाबळीची आणखी एक घटना जळगावच्या नवविवाहीतेसोबत घडली.
Nilesh Ghayval Case: रोहीत पवार विरुद्ध राम शिंदे संघर्ष
Nilesh Ghayval या एका नावामुळं पुण्यासहीत राज्याचं राजकारण ढवळून निघालं. एक-एक करत सगळ्या पक्षांच्या नेत्यांचा त्याच्याशी कसा संबंध होता. हे आता सगळेजण समोर आणत आहेत. अशात हा विषय पोहचला Rohit Pawar विरुद्ध Ram Shinde आणि या दोघांचा Nilesh Ghayval शी कसा संबंध होता इथपर्यंत. निलेश घायवळ कोण? पुण्यात गोळीबार झाला. सगळ्या मिडीयाने विषय लावून धरल्यावर घायवळ टोळीतील हे गोळीबार करणारे गुंड असल्यामुळे Nilesh Ghayval वर कायरवाईची मागणी वाढली. अशात तो दुसऱ्या देशात गेला तेव्हा त्याला पासपोर्ट कुणी दिला हा प्रश्न समोर आला. रोहीत पवारांनी महायुतीततल्या अनेक नेत्यांचं नाव निलेश घायवळ सोबत जोडलं. सोबतच त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचाराला निलेश घायवळ आला होता. असं वक्तव्य केलं. रोहीत पवारांचे आरोप यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातल्या निवडणूकांमध्ये Nilesh Ghayval रोहीत पवारांच्या विरोधात प्रचार करताना आणि राम शिंदे सोबत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये घायवळ भाषण देत रोहीत पवारला निवडून देऊ नका हे सांगत होता. त्यामुळे आधिच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप झालेला असताना. पुन्हा भाजपच्या सभापतींवर पासपोर्टसाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आला. आजकाल पत्रकारपरिषदा घेऊन सरकारचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या रोहीत पवारांनी या प्रकरणावरुनही चांगलंच रान उठवलं. आणि यावेळी टप्यात घेतलं त्यांचे मतदारसंघातील प्रतिस्पर्धी राम शिंदेंना. याच्यावर राम शिंदेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. पण त्याआधी एक व्हिडिओ आणि एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेने या संपुर्ण घटनेला वेगळ वळण मिळालं. सुनंदाताई पवारांचा व्हिडिओ समोर कर्जत-जामखेड मध्ये रोहीत पवार यांच्या आई सुनंदाताई पवार एका कार्यक्रमात निलेश घायवळ यांचं कौतुक करतानाचा हा व्हिडिओ होता. कोरोनामध्ये एका कार्यक्रमात निलेश घायवळकडून शाळेसाठी दिलेल्या वस्तूंच वाटप करताना सुनंदाताई पवार यांनी Nilesh Ghayval चं कौतुक केल्याचा हा व्हिडिओ होता. कर्जत-जामखेडचा राजकीय तणाव यासोबत एक पोस्ट सुद्धा फिरवण्यात आली. ज्यामध्ये सांगण्यात आलं की २०१९ मध्ये रोहीत पवार यांनी त्यांच्या प्रचारासाठी कर्जत-जामखेडच्या बाहेर राहणारे पण कर्जत जामखेडचेच असलेले,अशा सर्वांना आपल्या प्रचारासाठी वापरुन घेतलं. त्यापैकीच एक मुळचा जामखेड तालुक्यातील खर्ड्याच्या जवळच्या गावात राहणारा निलेश घायवळ. यानंतर मिडीयाला Nilesh Ghayval यांचा मामा यांनी प्रतिक्रीया देताना सांगितलं की, २०२० सालीच महाविकास आघाडीचं सरकार असताना निलेश घायवळला पासपोर्ट देण्यासाठी त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना रोहीत पवारांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुनच अनिल देशमुखांनी २०२० मध्ये निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला. या व्हिडिओ आणि निलेश घायवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रियेनंतर राम शिंदे सुद्धा समोर आले आणि या प्रकरणावर त्यांनी त्यांची बाजू मांडली. राम शिंदेंची प्रतिक्रियाराम शिंदे म्हणाले की, निलेश घायवळने २०१९ मध्ये रोहीत पवारांचा प्रचार केला. जामखेडच्या लोकांना पहिल्यांदा कळालं की निलेश घायवळ हा आपल्या भागातला आहे आणि तो पुण्यात राहतो. यांच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या. तेव्हा तो यांना सामाजिक कार्यकर्ता वाटत होता. पण नंतर यांचं कशावरुनतरी बिनसलं मंग ते देवाणघेवाणात बिनसलं, का रिअल इस्टेटमध्ये बिनसलं हे त्यांनाच माहीती. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणामत्यांचे कौटुंबीक संबंधही होते. त्यांचे वडीलही त्यांच्या घरी जाऊन आले. त्यांचं बिनसल्यावर मात्र Nilesh Ghayval रोहीत पवारांना विरोध करण्यासाठी माझ्याबरोबर आले. पण ते ना भाजपचे सदस्य आहेत. ते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. महायुती म्हणून ते २०२४ ला रोहीत पवारांच्या विरोधात प्रचार करत होते. त्यांना पासपोर्ट द्यायला रोहीत पवारांनीच मदत केली होती. याची चौकशी लागली आहे. वाचा अजून संबंधित बातम्या- Sunil Anna Shelke news : मावळातल्या राजकारणाचा रक्तरंजीत इतिहास आणि आमदारांच्या हत्येचा कट
Goa पेटलं! भुमिपुत्र कार्यकर्त्यावर हल्ल्यानंतर रोष
गोवा आंदोलन का पेटलं? Rama Kankolkar प्रकरणाने माजवली खळबळ Goa Protest :गोव्यात लोकांचा रोष आता पोलीस मुख्यालय. भाजप कार्यालय. मुख्यमंत्री कार्यालयावर निघत आहे. काय आहे हे प्रकरण ज्यामुळे Goa लोक रस्त्यावर उतरलेत? भुमिपुत्रांसाठी लढणाऱ्या एका सामाजीक कार्यकर्त्यावर झालेल्या जिवघेण्या हल्यामुळे गोवा का पेटलं आहे? काय घडलं होतं १८ सप्टेंबरला? भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारा Rama Kankolkar याच्यावर अज्ञात लोकांनी मागच्या महिन्यात हल्ला केला होता. सायकलच्या चैनने मारून तोंडात गाईचं शेण घालून चार जणांनी हा जिवघेणा हल्ला केला होता. १८ सप्टेंबरला ही घटना झाली. लोकांची मागणी आहे की याच्यातले सर्व आरोपी पकडा आणि याचा मास्टरमाईंड कोण आहे? आणि हल्याचं कारण काय आहे हे सांगा. पोलीसांनी अद्यापपर्यंत काहींना अटक केली असली तरीही. हल्याचा हेतू काय होता. आणि कुणी करायला सांगीतला याची माहीती दिलेली नाही. आता प्रश्न पडतो की जर हल्लेखोरांना पोलीस ताब्यात घेत असतील. तरीसुद्धा गोव्यातील लोकांमध्ये येवढा रोष पोलीस आणि सरकार बद्दल का आहे? गोव्यातील सामान्य नागरीक रस्त्यावर उतरुन पोलीस आणि सरकार विरोधात विशेषकरुन भाजप विरोधात आक्रमक का आहेत. तर पत्रकार सांगतात की Rama Kankolkar हा भुमिपुत्रांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. लोक रस्त्यावर का उतरले? स्थानिकांच्या जमीनी हाडपून Goa त असणारी दिल्ली लॉबी आणि मोठे व्यावसाईक स्वतःचा फायदा करुन घेतात. सरकारी यंत्रनाही त्यांच्याच फायद्यासाठी काम करतात असं आंदोलकांचं म्हणणं आहे. अशात त्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर जिवघेणा हल्ला होतो. त्यामध्ये सायकलच्या चैनने आणि तोंडात शेण घालून ते पसार होतात. हा हल्ला दुसरा-तीसरा कोणी नाही तर याच दिल्ली लॉबी आणि सरकारचा आशिर्वाद असलेल्या उद्योगपतींनीच घडवून आणल्याचं त्यांचं मत आहे. इतके दिवस होऊनही पोलीसांना अजुन यामागे कोण आहे? हे का समजलं नाही. याचा मास्टरमाईंड कोण आणि त्याचा हेतू काय होता? हे समोर आलं पाहिजे यासाठीच त्यांनी गोव्यातल्या पोलीस आयुक्तालयासमोर, भाजप कार्यालयात, मुख्यमंत्री कार्यालयात आक्रमक आंदोलन केलं आहे. सरकार आणि पोलीसांविरुद्ध संताप हा झाला माहीतीचा विषय पण संपुर्ण देशात हाच पॅटर्न पहायला मिळतोय का? लदाख मध्ये सुद्दा स्थानिक प्रश्न म्हणत लोक रस्त्यावर उतरले. भाजप कार्यालय पेटवून दिलं. पोलीसांच्या गाड्या पेटवून दिल्या. Goa तही त्याच दिशेने आंदोलन सुरु आहे का? अनेकांना यावर शंका येत आहेत. कारण लोकांमधला रोष मंग तो कुठल्याही प्रश्नांवर असो. हिंसक आणि अधिक आक्रमकपणे बाहेर येत आहे. यासाठी कुणी बाहेरची शक्ती काम तर करत नाही ना? असा प्रश्न पडत आहे. आंदोलनाचं स्वरूप आणि इशारा भारताच्या विरोधात चिन, पाकिस्तान सोबत आता अमेरिकेसारखा देश सुद्धा आपले प्रयत्न करत असताना. एखाद्या देशात अराजक माजवून सत्ता उलथवून लावण्याचा त्या देशाचा मोठा इतिहास आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्चुन, मोठी यंत्रणा ही जगभर काम करत असते. सध्यातरी भारत अनेक आघाड्यांवर लढत असताना गृहयुद्धाचा धोका त्याला न परवडणारा आहे. इथला सामान्य माणूस तसा कमालीचा संयंमी आणि हुशार आहे. पण चुकीची माहीती त्याच्यापर्यंत पोहचवून. सरकार आणि व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात रोष तयार करण्यासाठी काही गोष्टी मुद्धाम त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर जात नाहीत ना. असाही प्रश्न पडत आहे. वाचा अजून संबंधित बातम्या- TCS layoffs : आयटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणणारी कार्पोरेट संस्कृती
RSS शिबिरात लैंगिक शोषण? IT Engineer तरुणाची आत्महत्या
RSS Camp Kerala News : IT काम करणारा. 26 वर्षाचा तरुण. आत्महत्या करतो आणि त्याआधि एक सोशल मिडिया पोस्ट करतो. माझ्या आत्महत्येचं कारण प्रेम, कर्ज किंवा दुसरं काही नाही. तर माझ्यावर संघाच्या शाखेत झालेल्या लैगींक झळामुळे झालेल्या मनोविकारा आहे असं तो सांगतो. काय आहे हे सगळ प्रकरण आणि RSS च्या शिबीरांवर यामुळे काय आरोप होत आहे. यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये RSS या संघटनेला १०० वर्ष पुर्ण झाली. आधि सावरकरांमुळे नंतर गांधिजींच्या हत्तेमुळे, ३ वेळा लागलेल्या बंदिमुळे, हिंदुराष्ट्राच्या RSS च्या धोरणामुळे, शिवाय देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आत्ताचे Narendra Modi हे संघ स्वयंसेवक असल्यामुळे नेहमीच RSS देशाच्या केंद्रस्थानीचा मुद्धा राहिला. भाजपातील बहुतेक नेते हे संघातून आलेले असतात. जसेकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातील भाजपचे मोठे नेते नितीन गडकरी. सत्तेत भाजप असली तरी RSS ला डावलून त्याला राजकारण करता येत नाही. असं म्हटलं जातं. भाजप आपली विचारधारा तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी संघ प्रचारकांचा किंवा थेट संघाचा उपयोग करतं. केरळमध्ये सुद्धा आरएसएसचा प्रभाव वाढत आहे. अशात संघाच्या शाखेत आणि शिबीरात लैंगीक छळ झाल्याची बातमी समोर आली आहे. केरळच्या एका IT कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने यामुळे आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलीसांनी याची दखल घेत शवविच्छेदनासाठी पार्थिव पाठवलं आहे. आनंदु आजू हा २६ वर्षीय IT Engineer लहानपणी घरच्यांमुळे आरएसएसच्या शाखेत जात होता. त्याच्या वडिलांनीच त्याला शाखेत पाठवल्याचं कळतय. तिथे त्याचा शेजारी असणाऱ्या एनएम नावाच्या व्यक्तीने त्याचं लैगींक शोषण केलं. हा एनएम सध्या भाजपचा एक्टीव कार्यकर्ता असल्याचं त्याने व्हिडिओत सांगितलं. आनंदुच्या कुटुंबियांशी सुद्धा त्याचे चांगले संबंध होते. तो ही गोष्ट घरच्यांनाही सांगू शकला नाही. त्याच्या लहानपणी झालेल्या या लैगींक शोषणामुळे त्याला अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागला. त्यामध्ये डिप्रेशन आणि सिओडी म्हणजेच ऑब्सेसीव्हि कम्पल्सिव डिसॉर्डर हे होते. त्याने सांगितलं की इतरही अनेक संघाच्या सदस्यांकडून त्याचा लैंगीक झळ झाला पण त्यांची नावं त्याला आठवत नाहीत. पण अगदी शिबीरांमध्ये सुद्धा या घटना झाल्या. त्याने सर्वांना सल्ला दिला की संघापासून लांब रहा. अगदी घरचे असतील तरीही. त्याच्या म्हणण्यानुसार अशा घटना इतरही अनेकांसोबत घडल्या आहेत. वडिलांनाही मुलांसोबत वेळ घालवत जा असा सल्ला त्याने दिला आहे. थिरुवअनंतपुरम मधिल थंतापूर भागात एका लॉजवर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या या व्हिडिओमुले अनेक राजकीय पक्षांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या पोस्टमध्ये तो म्हटला की आरएसएसकडून आयुष्यभराच्या वेदना मिळाल्या. मी कुणावरही नाराज नाही, फक्त एक व्यक्ती आणि संघटनेवर नाराजी आहे. एनएम हा RSS चा सक्रीय सदस्य होता आणि तो सतत लैंगिक शोषण करत होता. कॅम्पमध्ये लैंगिक शोषण करताना त्यानं काठीनं मारहाणही केली. आरएसएससारख्या दुसऱ्या कोणत्या संस्थेबाबत इतका द्वेष नाही. आरएसएसवाल्यांसोबत मैत्री करू नका, वडील, भाऊ किंवा मुलगा जरी असले तरी दूर ठेवा. कँपमध्ये खूप शोषण होतं, बाहेर पडल्यानं मी बोलू शकलो. पुरावे नाही म्हणून कोणी मान्य करणार नाही पण माझं आयुष्यच पुरावा आहे. Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?
Nagraj Manjule Jhund Actor Murder : शेवट एवढा भयानक का झाला?
लहान वयातच गुन्हेगारीत शिरलेला बाबू नावाचा पोरगा. त्याच्यावर अनेक केसेस असूनही Nagraj Manjule त्यांच्या Jhund चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आधिचं जब्याला, परशाला, आर्चीला ह्या मोठ्या पडद्यावर घेऊन आलेले नागराज अण्णा या बाबूलाही संधी देतात. पण पुन्हा त्याच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि व्यसनांचा पिच्छा न सोडलेल्या बाबू छत्री उर्फ प्रियांशु क्षत्रीय याचा त्याच्याच मित्राने चाकू आणि दडगाने ठेचून खून केला. नागराज मंजुळे – झोपडपट्टीतून उगवलेले तारे आयुष्य संधि देतं. त्या संधिचं सोनं करायचं की माती. हा ज्याचा त्याचा प्रश्न. किंवा काही जण म्हणतात तसं हे ज्याचं त्याचं नशिब. हिरोचे फॅन अनेक असतात. पण महाराष्ट्रात एक असा डायरेक्टर आहे. ज्याचं नाव वाचून लोकं चित्रपट पहायला जातात. त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. त्यांच्या अनेक गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना आश्चर्यचकित करते. ती म्हणजे कलाकार निवडतानाची पद्धत. फक्त कुठल्यातरी पिच्चरमध्ये या आधि काम केलयं म्हणून नाही तर चित्रपटातील एखाद्या पात्राला न्याय देऊ शकेल अशी माणसं नागराज शोधून आणतो. फाटकं आयुष्य जगलेल्या नागराच्या चित्रपटातील पात्रही तशीच गरीब, वंचीत, झोपडपट्टीत राहणारी. “झुंड” – अमिताभ बच्चनसोबत झोपडपट्टीतील पोरं त्यामुळे त्याला जब्या कुठं मिळाला? करमाळ्यात एका गावात नागराज मंजुळेचा सत्कार होत होता तेव्हा हलगी वाजवताना दिसलेलं पोगरं त्याने घेतलं आणि त्याला पिच्चरचा हिरो बनवला. असा ओरीजनल रंगाने काळा असलेला हिरो कुणी अजुन पाहिलाच नव्हता. फॅंन्ड्री हा सिनेमा त्याच्या आयुष्यातली आजवरची सगळ्यात छान कलाकृती ठरली. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. तोच पॅटर्न त्याने सैराटमध्ये वापरला. वास्तव डोळ्यासमोर ठेवणारा सैराट हा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. गावातून आलेल्या परशाला, आर्चिला लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर योग आला Amitabh Bachchan सोबत काम करण्याचा पण स्टोरी आपली झोपडपट्टीतल्या पोरांचीच. नागपुरच्या झोपडपट्टी भागात राहणारी पोरं यामध्ये घेण्यात आली. त्यातलाच एक प्रियांशु क्षत्रीय म्हणजेच बाबू छत्री. गुन्हेगारीतून पडद्यावरचा प्रवास ज्याने Jhund पाहिला असेल त्याला माहीतीये की हा सिनेमा एक बायोग्राफी होता. ज्यांच्या आयुष्यावर बनला त्या व्यक्तीने नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पोरांना एकत्र करुन त्यांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगण्याचा चांगला पर्याय निवडण्याची संधि दिली होती. यावेळी खऱ्या आयुष्यात स्वतःवर ५ गुन्हेगारी केसेसे असलेला एक तरुण नागराजच्या टिमच्या हाताला लागला. ज्याला पिच्चरमध्ये काम करण्याचा विचार स्वप्नातही येणार नाही अशा बाबू छत्रीला घेतलं गेलं. त्याला वाटत होतं की मला घेऊन जातील आणि किडण्या विकतील. पण शुटींग संपली. पिच्चर रिलिज झाला आणि मुख्य कलाकारांसोबत हा बाबू सुद्धा तेवढाच गाजला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राजीव खांडेकर यांनी या बाबूला विचारलं. आयुष्यात काय करायचं होतं. तेव्हा हा म्हणाला. मेरे को तो डॉन बननेका था. आता काय काम करणार विचारल्यावर तो म्हणाला. जे काही भेटेल ते काम करेल. फक्त एक्टींगच नाही. सगळ्यांनी या गोष्टीचं कौतूक केलं. आणि सिनेमाप्रमाने खऱ्या आयुष्यातही कोणीतरी या गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या दृष्टचक्रातून बाहेर पडलं. याचा आनंद अनेकांना होता. पण शेवटी तो प्रसंग फक्त सिनेमापुरताच खरा ठरला. पुन्हा गुन्हेगारी आणि व्यसनांच्या जाळ्यात Jhund सिनेमा हिट झाल्यानंतरही हा प्रसिद्धी मिळालेला बाबू काही गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर गेला नाही. त्याला एकदा मोबाईल्स चोरीमध्ये अटक झाली होती. त्याच्यावर एकून १५ गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येतय. त्याचा मित्र साहू आणि तो रात्री घराबाहेर पडला एका ठिकाणी त्यांनी पार्टी केली. दारूच्या नशेत दोघांचं कशावरुन तरी भांडण सरु झालं. बाबू छत्रीने त्याच्याकडचा चाकू काढून त्याच्या मित्रावर उगारला. त्याने तो वार हुकवत बाबूच्याच हातातला चाकू हिसकावला आणि बाबू छत्रीचा म्हणजेच प्रियांशू क्षत्रीय याचा गळाच चिरला. तेवढ्यानेही तो मेला नाही म्हणून त्याला दगडाने ठेचून मारला. आणि तिथून पळाला. पोलीसांना घटनेची माहीती मिळताच आरोपीला ६ तासाच्या आत अटक केली. वाचा अजून संबंधित बातम्या- Kerala IT professional found dead; सोशल मिडीयावर पोस्ट करत आयटी इंजीनीअरची माहीती. RSS वर गंभिर आरोप
Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis साठी कुणाकुणाचा राजकीय बळी?
Devendra Fadnavis शी वाकडं म्हणजे मसनात लाकडं. एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा. पण भाजप म्हणजे सबकुछ Devendra Fadnavis. हे तर सगळ्यांना माहीतचं आहे. सध्या भाजपमधला एक नावं असंच अज्ञातवासात टाकलं जाातयं. त्याचं नाव आहे Sudhir Mungantiwar. काही महिन्यांपुर्वी भाजपाचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो, या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या Sudhir Mungantiwar यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं. आणि मंग सुरू होतं ते कार्यक्रमाच राजकारण. तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती. चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्या दरम्यानची ही घटना. पण प्रश्न फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पहायला मिळालंय म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का ? डावललं तर कोणी डावललं. जोरगेवारांनी कि भाजपने की फडणवीसांनी. पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, लोकसभेवेळी Sudhir Mungantiwar नी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं, त्यावेळी Sudhir Mungantiwar राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अश्यातच मुंडेंना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आणि आता हा कार्यक्रम. त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपवू पाहतेय अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकत ते पाहूया. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम हॊईल का नाही याचा देखील विचार करत नव्हते. खास करून 2019 मध्ये भाजपा-सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत आणू शकतो म्हणून पक्षाकडून येथूनच त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं बोललं जात. दरम्यानच्या काही काळात Sudhir Mungantiwar हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याच पाहायला मिळालं. तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आल नव्हत. आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर Sudhir Mungantiwar हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं, ज्या मागे हेतू एकच होता तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रात Devendra Fadnavis ना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचीत दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाहीये. यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं. या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातली घरवापसीही कायमची रद्द झाली. पंकजा मुंडे इतक्या दिवस शांत बसुन कमबॅक करण्याची वाट पाहत होत्या. त्यात विधानसभेतील पराभव, लोकसभेतील पराभव तरीही मंत्रीमंडळातील संधी यामुळे बॅकफुटवर गेलेल्या मंत्रीमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरस्थावर झाल्या. मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्यातरी नाहीये. यानंतर येतं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंच नाव. भावी मुख्यमंत्री म्हणून बघीतलं गेलेल्या या नेत्याचा अक्षरशः बाजार उठवला गेला. जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली. कारण एकचं देवेंद्र फडणवीस. वाचा अजून संबंधित बातम्या-Narendra Modi यांच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत : Chandrababu Naydu यांच्या नावाची चर्चा