×

Nilesh Ghayval Case: रोहीत पवार विरुद्ध राम शिंदे संघर्ष

Nilesh Ghayval controversy,

Nilesh Ghayval Case: रोहीत पवार विरुद्ध राम शिंदे संघर्ष

Spread the love

Nilesh Ghayval या एका नावामुळं पुण्यासहीत राज्याचं राजकारण ढवळून निघालं. एक-एक करत सगळ्या पक्षांच्या नेत्यांचा त्याच्याशी कसा संबंध होता. हे आता सगळेजण समोर आणत आहेत. अशात हा विषय पोहचला Rohit Pawar विरुद्ध Ram Shinde आणि या दोघांचा Nilesh Ghayval शी कसा संबंध होता इथपर्यंत.

Nilesh Ghayval controversy, Rohit Pawar, Ram Shinde
Nilesh Ghayval controversy- Rohit Pawar and Ram Shinde

निलेश घायवळ कोण?

पुण्यात गोळीबार झाला. सगळ्या मिडीयाने विषय लावून धरल्यावर घायवळ टोळीतील हे गोळीबार करणारे गुंड असल्यामुळे Nilesh Ghayval वर कायरवाईची मागणी वाढली. अशात तो दुसऱ्या देशात गेला तेव्हा त्याला पासपोर्ट कुणी दिला हा प्रश्न समोर आला. रोहीत पवारांनी महायुतीततल्या अनेक नेत्यांचं नाव निलेश घायवळ सोबत जोडलं. सोबतच त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचाराला निलेश घायवळ आला होता. असं वक्तव्य केलं.

रोहीत पवारांचे आरोप

यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातल्या निवडणूकांमध्ये Nilesh Ghayval रोहीत पवारांच्या विरोधात प्रचार करताना आणि राम शिंदे सोबत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये घायवळ भाषण देत रोहीत पवारला निवडून देऊ नका हे सांगत होता. त्यामुळे आधिच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप झालेला असताना. पुन्हा भाजपच्या सभापतींवर पासपोर्टसाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आला.


आजकाल पत्रकारपरिषदा घेऊन सरकारचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या रोहीत पवारांनी या प्रकरणावरुनही चांगलंच रान उठवलं. आणि यावेळी टप्यात घेतलं त्यांचे मतदारसंघातील प्रतिस्पर्धी राम शिंदेंना. याच्यावर राम शिंदेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. पण त्याआधी एक व्हिडिओ आणि एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेने या संपुर्ण घटनेला वेगळ वळण मिळालं.

सुनंदाताई पवारांचा व्हिडिओ समोर

कर्जत-जामखेड मध्ये रोहीत पवार यांच्या आई सुनंदाताई पवार एका कार्यक्रमात निलेश घायवळ यांचं कौतुक करतानाचा हा व्हिडिओ होता. कोरोनामध्ये एका कार्यक्रमात निलेश घायवळकडून शाळेसाठी दिलेल्या वस्तूंच वाटप करताना सुनंदाताई पवार यांनी Nilesh Ghayval चं कौतुक केल्याचा हा व्हिडिओ होता.

कर्जत-जामखेडचा राजकीय तणाव

यासोबत एक पोस्ट सुद्धा फिरवण्यात आली. ज्यामध्ये सांगण्यात आलं की २०१९ मध्ये रोहीत पवार यांनी त्यांच्या प्रचारासाठी कर्जत-जामखेडच्या बाहेर राहणारे पण कर्जत जामखेडचेच असलेले,अशा सर्वांना आपल्या प्रचारासाठी वापरुन घेतलं. त्यापैकीच एक मुळचा जामखेड तालुक्यातील खर्ड्याच्या जवळच्या गावात राहणारा निलेश घायवळ.

यानंतर मिडीयाला Nilesh Ghayval यांचा मामा यांनी प्रतिक्रीया देताना सांगितलं की, २०२० सालीच महाविकास आघाडीचं सरकार असताना निलेश घायवळला पासपोर्ट देण्यासाठी त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना रोहीत पवारांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुनच अनिल देशमुखांनी २०२० मध्ये निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला. या व्हिडिओ आणि निलेश घायवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रियेनंतर राम शिंदे सुद्धा समोर आले आणि या प्रकरणावर त्यांनी त्यांची बाजू मांडली.

राम शिंदेंची प्रतिक्रिया
राम शिंदे
म्हणाले की, निलेश घायवळने २०१९ मध्ये रोहीत पवारांचा प्रचार केला. जामखेडच्या लोकांना पहिल्यांदा कळालं की निलेश घायवळ हा आपल्या भागातला आहे आणि तो पुण्यात राहतो. यांच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या. तेव्हा तो यांना सामाजिक कार्यकर्ता वाटत होता. पण नंतर यांचं कशावरुनतरी बिनसलं मंग ते देवाणघेवाणात बिनसलं, का रिअल इस्टेटमध्ये बिनसलं हे त्यांनाच माहीती.

महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम

त्यांचे कौटुंबीक संबंधही होते. त्यांचे वडीलही त्यांच्या घरी जाऊन आले. त्यांचं बिनसल्यावर मात्र Nilesh Ghayval रोहीत पवारांना विरोध करण्यासाठी माझ्याबरोबर आले. पण ते ना भाजपचे सदस्य आहेत. ते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. महायुती म्हणून ते २०२४ ला रोहीत पवारांच्या विरोधात प्रचार करत होते. त्यांना पासपोर्ट द्यायला रोहीत पवारांनीच मदत केली होती. याची चौकशी लागली आहे.

वाचा अजून संबंधित बातम्या-

Sunil Anna Shelke news : मावळातल्या राजकारणाचा रक्तरंजीत इतिहास आणि आमदारांच्या हत्येचा कट

Post Comment

You May Have Missed