Aurangabad Kidnapping,
Crime Trending

Aurangabad Kidnapping -विद्यार्थिनीवर जडला जिव, मदतनीसाचं अपहरण प्रकरण!

Spread the love

Aurangabad Kidnapping -Police Academy भरतीसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर संचालकाचा जीव जडला. कॉन्टक्ट कसं करायचं म्हणून एका 20 वर्षीय विद्यार्थ्याला त्याने हाताशी धरलं आणि कॉन्टॅक्ट सुरु झालं. थोड्या दिवसात त्याच विद्यार्थ्यासोबत संचालकाचा वाद झाला. आता हा पोरगा आपलं सिक्रेट ओपन करणारं म्हणून त्यालाच किडन्याप करण्याचा प्लॅन संचालकाने आखला. मात्र Chhatrapati Sambhajinagar च्या सिल्लोड मधील पोलींसांनी हा प्लॅन उधळून लावला.

Aurangabad Kidnapping -Police Academy case
Aurangabad Kidnapping -Police Academy case

घटनेची पार्श्वभूमी
Chhatrapati Sambhajinagar च्या सिल्लोड मधल्या केळगावंचा Amol Makhala नावाचा २० वर्षीय तरुण. साधारण वर्षभरापुर्वी तो पोलीस भरतीच्या तयारीसाठी हिंदवी करिअर ॲकॅडमीत जॉईन झाला. त्याच ॲकॅडमीचा संचालक असलेल्या दशरथ विठ्ठल जाधव याला एका विद्यार्थिनीवर प्रेम झालं. संचालकाने त्याचं जुळवून देण्यासाठी Amol Makhala हाताशी धरला.

वादातून उभं राहिलं संकट

अमोलनेही दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांना चांगलीच मदत केली. पण काही दिवसातचं त्याचं आणि संचालक असणाऱ्या Dasharath Jadhav याचं काही कारणावरुन भांडण झालं. दशरथ जाधवने अमोलला ॲकॅडमीतून बाहेर काढलं. पण त्याच्या काही ऑडीओ रेकॉर्डींग या अमोलकडं होत्या. जर त्या अमोलने ह्या रेकॉर्डींग किंवा त्याच्याकडं असणारे पुरावे व्हायरल केले तर आपली मोठी बदनामी होईल म्हणून संचालक असणाऱ्या दशरथ जाधवने अमोलला तंबी देण्याचा आणि Kidnapping करायचा प्लॅन आखला.

Kidnapping थरारक प्लॅन

Dasharath Jadhav त्याच्या ॲकॅडमीत शिकणाऱ्या दोन मुलांना अमोलच्या गावी केळगावला पाठवलं. त्यानंतर अमोलला त्या पोरांसोबत घाटात बोलावलं. तो त्या पोरांसोबत घाटात पोचला तेव्हा Dasharath Jadhav सोबत त्याचा साथीदार गणेश जगतापही होता. गणेश जगताप आणि ॲकॅडमीत शिकणारे कोहळा तांडा गावचे दोन मुलं गणेश सोनूसिंग चव्हाण आणि प्रविण लालचंद राठोड यांनी अमोल मखला दांड्याने मारायला सुरवात केली. तुझ्याकडं असणारे पुरावे आम्हाला दे अशी मागणी त्याच्याकडं केली.

अमोल मखने ती रेकॉर्डींग द्यायला नकार दिला. अमोलला बेदम मारहाण करुन त्या चौघांनी त्याला फोरव्हिलर टाकलं आणि अज्ञातस्थळी घेऊन चालले. पण या गाडीतून घेऊन जाताना अमोलच्या एका मित्राने त्याला पाहिलं आणि हिंदवी ॲकॅडमीचा संचालक असणाऱ्या दशरथ जाधवला ओळखलं. अमोलच्या मित्राने ही माहीती त्याच्या घरच्यांना दिली आणि अमोलच्या घरच्यांनी ही माहिती सिल्लोडच्या पोलीसांना दिली.

पोलिसांची फिल्मी कारवाई

सिल्लोड पोलीसांना Kidnapping माहिती मिळताच. त्यांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ यंत्रणा कामाला लावली आणि दशरथ जाधव तसेच त्याच्या साथिदाराच्या तावडीतून अमोलची सुटका केली. पोलीसांनी ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी दशरथ जाधवसह, त्याचा साथिदार गणेश जगताप आणि हिंदवी करिअर अॅकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणारे गणेश चव्हाण आणि प्रविण राठोड यांना न्यायालयात हजर केलं आहे.

स्थानिक प्रतिक्रिया

न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक लहू घोडे, कर्मचारी विश्वनाथ तायडे,यतीन कुलकर्णी, विठ्ठल नागरगोत, रामेश्वर जाधव, रमेश व्यवहारे, अनंत जोशी यांनी भराडी जवळ फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक केली होती.

वाचा अजून संबंधित बातम्या-

Jalgaon Crime – Mayuri Thosar Case : हुंडाबळीची आणखी एक घटना जळगावच्या नवविवाहीतेसोबत घडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *