akola mangalsutra chor news
Akola Crime महाराष्ट्र

मंगळसूत्र चोराने पतीचा घेतला बळी! अकोल्यातील धक्कादायक घटना

Spread the love

मंगळसूत्र न्यायचं, पण नवऱ्याला का मारलं? अकोल्यातील घटना हादरवणारी!

अकोला रेल्वे स्थानक परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. मंगळसूत्र चोरीच्या घटनेत नवऱ्याचा जीव गमवावा लागला. चोरट्याचा पाठलाग करत असताना त्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

16 मार्च रोजी रात्री 9 वाजता हेमंत गावंडे आणि त्यांची पत्नी अकोल्याकडे रेल्वेने प्रवास करत होते. रात्री पावणेदहा वाजता अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक 4 वर उतरल्यावर, एका चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावलं आणि पळ काढला.

हे पाहून हेमंत गावंडे यांनी चोराचा पाठलाग सुरू केला. सुमारे 800-900 मीटरपर्यंत पाठलाग केल्यानंतर त्यांनी त्या चोरट्याला पकडलं. मात्र, चोरट्याने हातात सापडेल त्या वस्तूने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर बेदम हल्ला केला.

रक्ताच्या थारोळ्यात पती, पत्नीचा आक्रोश

या भयंकर हल्ल्यानंतर हेमंत गावंडे रक्ताच्या थारोळ्यात पडले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केलं, पण गंभीर जखमेमुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ही दुर्दैवी घटना पाहून त्यांची पत्नी अश्रूंनी गहिवरली आणि म्हणाली – “मंगळसूत्र न्यायचं होतं, पण नवऱ्याला का मारलं?”

अरोपीला 24 तासांत अटक

अकोला पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि CCTV फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. मारेकऱ्याचं नाव परमार असून तो मूळचा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे.

24 तासांच्या आत अकोला एमआयडीसी भागातून आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रेल्वे स्थानकावरील सुरक्षेचा प्रश्न

या घटनेनंतर अकोला रेल्वे स्थानकावर सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

  • प्लॅटफार्म 1, 2, 3 वर CCTV कॅमेरे आहेत, पण 4, 5, आणि 6 वर नाहीत!
  • ही चोरी आणि हल्ला प्लॅटफार्म क्रमांक 4 वर घडला.
  • जर तिथे CCTV असते, तर आरोपी लवकर सापडला असता आणि कदाचित ही दुर्दैवी घटना टळली असती.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला

ही घटना रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. हेमंत गावंडे यांनी फक्त आपल्या पत्नीचं मंगळसूत्र वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र याचा परिणाम त्यांच्या मृत्यूपर्यंत झाला.

या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षेच्या उपाययोजनांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात अशा आणखी दुर्दैवी घटना घडू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *