सेलीब्रीटी त्यांच्या गाड्या आणि त्या गाडीचा अपघात. हे काही जिवाभावाचं नात झालयं की काय माहीती. Gautami Patil च्या गाडीने एका रिक्षाचालकाला ठोकल्याची बातमी मागच्या काही दिवसापासून येत आहेत. अशात काही नविन माहीती यात समोर आलेली आहे. Gautami Patil चे कॉल रेकॉर्डही मागवण्यात आले आहेत.
Gautami Patil Car Accident:
३० सप्टेंबरला पहाटे ५ वाजता. पुण्याच्या वडगाव बुद्रुक भागात सर्विसरोडला जागेवर उभ्या असलेल्या रिक्षाला मागून येऊन किआ गाडीने ठोकलं. ४४ वर्षीय सामाजी मरगळे हे रिक्षाचालक यामध्ये जखमी गंभिर जखमी झाले. त्यांचे मित्र युवराज साळवे यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चारचाकी चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. मात्र पोलीस कारवाईवर जखमी मरगळे यांच्या कन्येला भलतीच शंका वाटत असून तिने तसं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बोलून दाखवलं आहे.
"पंचनामा न होता गौतमी पाटीलची गाडी त्या जागेवरुन कशी हलवली? कोणी हलवली ती गाडी? टोईंग करुन ती गाडी कोण घेऊन गेलं? आमच्या फिर्यादीही बदलले आहेत. त्यांचे जबाबही बदलले गेले आहेत. ते कोणी बदलले? कोणाच्या दबावाखाली बदलले? त्यांनी आरोपीची ओळख पटवली तेव्हा आमचं तिथे कोणीच नव्हतं. आम्हाला आरोपी दाखवलेला नाही. आम्हाला सीसीटीव्ही मिळालेलं नाही. आम्ही गौतमी पाटीलच्या कॉलचा सीडीआर मागवला होता. तिच्या चालकाच्या मोबाईलचा सीडीआर मागावला होता.
लोकेशन, गाडी भोरपासून निघाली तेव्हापासून ठिकठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज ज्यात त्यांनी पकडलेला चालक आणि Gautami Patil दिसेल ते द्यावं असं निवेदन केलं होतं पोलीस निरिक्षकांना. मात्र त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं नाही," असं रिक्षाचालकाच्या मुलीने मिडीयाशी बोलताना म्हटलं आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या चारचाकी वाहणाची नंबरप्लेट रिक्षापाशीच पडली होती. त्यामुळे ही गाडी कुणाची हे लक्षात आलं होतं. असंही त्यांनी सांगीतलं. गौतमी पाटील मोठी सेलेब्रीटी आहे म्हणून हे प्रकरण दाबलं जातयं आणि आरोपी दुरसा दाखवला जातोय असाही संशय पिडीतांच्या घरच्यांना आहे.
अशात रिक्षाचालक व्हेंटीलेटर वर असल्याचं सांगितलं जातय. त्यांचे कुटुंबीय हे प्रकरण घेऊन थेट चंद्रकांत पाटलांकडं पोहोचले आहेत. याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चंद्रकांत पाटलांनी त्या रिक्षाचालकाच्या कुटुंबासमोरच डीएसपींना फोन लावून, ते गौतमी पाटीलला उचलायचय की नाही. असं म्हणाले. समोररुन डीएसपींनी काहीतरी उत्तर दिल्यावर मात्र ती गाडी कुणाचीतरी आहे की नाही? असा सवाल चंद्रकात पाटलांनी केला म्हणजेच गौतमी पाटीलवर खटला भरण्यासाठी किंवा तीला उचलण्यासाठी पोलीस तयार नसल्याचं कळतयं. पण मंग त्याच्यावर काय कारवाई करायची असा प्रश्न विचारला जातोय.
यावेळी बोलताना त्यांची गाडी जप्त करुन टाका आणि Gautami Patil ला नोटीस पाठवा. समोरचा व्यक्ती खुप सिरिअस आहे. तुम्ही तीला सांगून कमीत-कमी त्यांचा खर्च तरी करा असं चंद्रकात पाटील म्हणाले. म्हणजेच काय तर पोलीस Gautami Patil वर सध्या तरी नोटीस सोडून कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार नसल्याचं दिसतय. रिक्षाचालक सध्या व्हेंटीलेटर वर असुन गौतमी पाटीलला लोकांची इतकी सहानुभुती मिळते पण साधं तीने फोन करुन चौकशी सुद्धा केली नाही असं त्या कुटुंबाचं म्हणणं आहे. कदाचीत कुणालातरी किंवा स्वतःलाच वाचवण्यासाठी ती असं करतेय का हा ही प्रश्न विचारला जातोय. शिवाय आमचा बाप इथं व्हेंडीलेटर वर असताना तीचे शो कसकाय सुरु आहेत. अशी प्रतिक्रीय अपघात झालेल्या रिक्षाचालकाच्या मुलीने दिली आहे.
Spread the lovePune स्वारगेट बलात्कार प्रकरणात नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. आरोपी Dattatray Gade याने पीडितेचा गळा दाबून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती. भीतीने ग्रासलेल्या पीडितेने “काय करायचं ते कर, पण मला जिवंत ठेव…” अशी याचना केल्याचे समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. अत्याचाराचा दुहेरी धक्का तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, आरोपीने फक्त एकदाच नव्हे, तर दोन वेळा पीडितेवर अत्याचार केला. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात, एसटी बसमध्ये ही घटना घडली. हा अमानुष प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोर्टातील नाट्यमय दावे आरोपीच्या वकिलांनी कोर्टात वेगळाच युक्तिवाद मांडत सांगितले की, “दोघांमध्ये संमतीने शारीरिक संबंध झाले होते. पीडिता स्वतःहून बसमध्ये गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट आहे. कुठेही जबरदस्ती किंवा धक्काबुक्की झाल्याचे दिसून येत नाही.” मात्र, पोलिस तपास आणि पीडितेच्या जबाबानंतर परिस्थिती वेगळी असल्याचे संकेत मिळत आहेत. आता पुढे काय? 🔹 12 मार्चपर्यंत आरोपी पोलीस कोठडीत – पोलिसांकडून सखोल चौकशी🔹 सीसीटीव्ही आणि मेडिकल रिपोर्ट तपासले जातील – सत्य बाहेर येणार?🔹 पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची – आरोपीला कठोर शिक्षा होणार का? समाजाने आवाज उठवण्याची गरज! या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सार्वजनिक ठिकाणीही महिलांना धोका वाटत असेल, तर आपण समाज म्हणून कुठे कमी पडतोय? याचा विचार करण्याची गरज आहे.
Spread the love‘छावा’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे, आणि त्याने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. या ट्रेलरमध्ये दमदार संवाद, मराठा साम्राज्याची ऐतिहासिक कथा, आणि श्रींच्या राज्याच्या भविष्याबद्दलच्या महत्त्वाकांक्षांची झलक दिसून येते. चित्रपटाच्या कथानकाने आणि संवादांनी प्रेक्षकांना खूपच थरारक अनुभव दिला आहे. ‘छावा’ ट्रेलरमध्ये असलेले रोमांचक आणि प्रेरणादायक घटक: ‘छावा’च्या ट्रेलरमध्ये आपण पाहू शकतो की, एका ध्येयाच्या प्राप्तीसाठी कसं एक व्यक्ती आपला संपूर्ण जीवन समर्पित करते. श्रींच्या महत्त्वाकांक्षेच्या माध्यमातून राज्याच्या भवितव्याचा मार्ग दाखवला जातो. त्याचबरोबर, मराठा साम्राज्याच्या उंच शिखरांवर चढण्याची तीव्र इच्छाशक्ती देखील दृश्यात जिवंत केली गेली आहे. मराठा साम्राज्य आणि ऐतिहासिक दृषटिकोन: ‘छावा’ ट्रेलर मराठा साम्राज्याच्या किल्ल्यांमधून एक ऐतिहासिक गाथा उलगडते. त्यातील दृश्यं आणि संवाद मराठा शौर्याची आणि त्याच्या युद्धांच्या दृषटिकोनाची चांगलीच आठवण करून देतात. त्याच्या ऐतिहासिक परंपरेला प्रगतीच्या दृष्टिकोनातून घेऊन जाऊन, ट्रेलर प्रेक्षकांना त्या काळाच्या शक्ती आणि वीरतेची जाणीव करून देतो. श्रींची महत्त्वाकांक्षा आणि संघर्ष: या ट्रेलरमध्ये, श्रींची महत्त्वाकांक्षा आणि त्याची त्या दिशेने केलेली कष्टाची पराकाष्ठा प्रभावीपणे दर्शवली गेली आहे. त्यांच्या राज्य स्थापनेसाठीच्या धडपड आणि प्रामाणिक प्रयत्न या ट्रेलरच्या मध्यवर्ती विषयांचा भाग आहेत. यातून त्याच्या मानसिकतेचा आणि त्याच्या नेतृत्वक्षमतेचा एक अद्भुत अनुभव मिळतो.
Spread the loveभारतीय इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज (Ch. Shivaji Maharaj) हे पराक्रम आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहेत. पण त्याच महाराष्ट्रात, जिथे त्यांचा वारसा अभिमानाने जपला जातो, तिथेच त्यांच्या मंदिरासाठी सरकारकडून तुटपुंजा निधी दिला जातो. उलट, छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) थडग्याच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला जात असल्याने वाद निर्माण झाला आहे. ⏳ औरंगजेबाच्या थडग्यासाठी लाखोंचा निधी, शिवरायांच्या मंदिरासाठी मात्र ₹250? 👉 केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्त्व खात्याने (ASI) औरंगजेबाच्या थडग्यासाठी 2021-22 मध्ये ₹2,55,160 तर 2022-23 मध्ये ₹2,00,626 इतका निधी खर्च केला. गेल्या 10 वर्षांत 2022 मध्ये सर्वाधिक निधी दिला गेला. 👉 विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या अभिमानाचे प्रतीक असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर (Sindhudurg Fort) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी केवळ ₹250 इतकाच निधी मंजूर करण्यात आला. 💥 हिंदू जनजागृती समितीचा संताप – ‘औरंगजेबाच्या थडग्याचा निधी तात्काळ थांबवा!’ 👉 हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सरकारवर जोरदार टीका करत औरंगजेबाच्या कबरीवरील सरकारी खर्च तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी भरघोस निधी जाहीर करण्याचे आवाहन केले आहे. 🤔 सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेचा विचार करणार का? सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. ज्यांनी महाराष्ट्रासाठी आयुष्य वेचले, त्या शिवरायांच्या मंदिरासाठी एवढा तुटपुंजा निधी आणि औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखोंचा निधी, हे योग्य आहे का?