Fadnavis serious allegations:
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Fadnavis गंभीर आरोप: Jaykumar Gore प्रकरण, सुप्रिया-रोहित पवार

Jaykumar Gore प्रकरणात आजवर अनेकांनी आरोप प्रत्यारोप केले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तर या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरीचं चालतं होत्या. पण आज स्वतः मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर भाष्य करत, या प्रकरणाशी संबंध असल्याचं म्हणत Supriya Sule and Rohit Pawar यांचा या सगळ्याशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तर याप्रकरणी पुढील चौकशी होणार असल्याचं देखील स्पष्ट केलय. म्हणूनच देवेंद्र फडणवीस विधानभवनात काय म्हणाले? त्यांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर कोणते गंभीर आरोप केले आहेत? काही दिवसांपूर्वी अचानक २०१६ सालाच जयकुमार गोरे यांचं प्रकरण समोर आलं होत. त्यानंतर हळू हळू या प्रकरणाने जोर पकडला आणि रोज नवनवीन माहिती आणि खुलासे या प्रकरणात होत होते. ज्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती. याकाळात अनेक आरोप करण्यात आले, अश्यातच जयकुमार गोरे यांना धमकी देणाऱ्या महिलेला खंडणी घेताना रंगेहाथ पकडल्यामुळे या प्रकरणाला एक नवीनच वळण लागले. त्यामुळे या प्रकरणात आता पुढे काय होणार? याकडे अनेकांचं लक्ष्य लागले होते. अश्यातच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयकुमार गोरे प्रकरणावर सभागृहात भाष्य करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री जयकुमार गोरे यांच्यासंदर्भात घडलेली घटना दुदैवी आहे. कोणाला जीवनातून उठवण्याच्या उद्देशाने राजकारण होत असेल तर ते चुकीचे आहे. त्यांच्यासंदर्भातील केस 2016 मध्ये घडली, 2019 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता देखील झाली होती. ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. त्यानंतर अचानक हे प्रकरण उकरून काढले गेले. अशा प्रकरणांमध्ये कुटुंबात, समाजात अपमान होईल या भीतीपोटी प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मी जयकुमार गोरे यांच्या हिमतीची दाद देतो. त्यांना ज्यावेळी लाजेची मागणी झाली त्यावेळी त्यांनी पोलिसात तक्रार केली. तेव्हा ट्रॅप लावण्यात आला. सगळी मागणी, संवाद टेप झाला. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर सापळा रचून कॅश देताना आरोपीला पकडण्यात आले. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.” असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी यांनी विधानभवनात केलं. या वेळी सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे यांच्या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात काय समोर आलं आहे, याबद्दल देखील माहिती दिली आहे. ही महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील आहे असा खोटा प्रचार करण्यात आला. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणारी महिला, युट्युबर व पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदारसह काही लोकांचा हा नेक्सस असल्याचं आढळलं आहे. हे सर्व एकमेकांशी संबंधित आहेत. या लोकांनी जो कट रचला त्याचे सगळे पुरावे सापडले आहेत. त्यांचे त्यांचे दीडशे फोन झालेले आहेत, ते सगळे सापडले आहेत. दुदैवाची गोष्ट म्हणजे या सर्वांशी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते थेट संपर्कात दिसत आहेत. प्रभाकरराव देशमुख यांच्याशी आरोपी बोलत होते. त्याहीपेक्षा वाईट वाटतं की सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरातसोबत झाले आहेत. तसेच आरोपींनी तयार केलेले व्हिडीओ देखील त्यांना पाठवण्यात आले आहेत. अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असून, आता या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे, हे देखील त्यांनी स्प्ष्ट केलं आहे. तर “शेवटी त्यांच्याही घरी 22 वर्षांची मुलगी आहे. त्या मुलीवर काय परिणाम होत असेल? याचा विचार आपण करायला हवा. आपण राजकीय शत्रू नाही, राजकीय विरोधक आहोत, अशाप्रकारे कोणाला जीवनातून उठवणे चुकीचे आहे” असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे कान देखील टोचले आहेत

आजच्या बातम्या Bollywood महाराष्ट्र

संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य; महाविकास आघाडीत फूट?

संजय राऊत यांनी जागा वाटप प्रक्रियेमध्ये झालेल्या उशिरावर आणि त्याच्या परिणामांवर भाष्य केले. त्यांनी स्पष्ट केले की, किशोर जोरगेवार यांना राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठी आग्रह होता. मात्र, जागा मिळाली नाही, आणि जोरगेवार भाजपात जाऊन विजयी झाले. “जागा वाटपाची प्रक्रिया लांबली गेल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या. कार्यकर्त्यांना कामासाठी वेळ मिळाला नाही, अस्वस्थता पसरली,” असे राऊत म्हणाले. त्यांनी महायुतीचे उदाहरण देत सांगितले की, त्यांच्याकडे जागा वाटप दोन महिने आधीच झाले होते. राऊत यांनी विजय वडेट्टीवार यांच्या विधानांवरही प्रतिक्रिया दिली. “जागा वाटपात झालेला विलंब आणि त्याचे दुष्परिणाम टाळता आले असते. काँग्रेसच्या जास्त जागा मिळाव्यात, हा आग्रह होता. मात्र, सर्वात कमी जागा काँग्रेसनेच जिंकल्या,” असे ते म्हणाले. त्यांनी चंद्रपूरची जागा उदाहरण म्हणून मांडली. “किशोर जोरगेवार विजयी होणार असल्याचे वारंवार सांगण्यात आले होते. मात्र, ती जागा 17 दिवस वादात राहिली आणि शेवटी भाजपाच्या हातात गेली,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव आणि प्रत्येक पक्षाची स्वतःची भूमिका यामुळे झालेल्या चुका त्यांनी कबूल केल्या. त्यांनी सांगितले की, लोकसभेनंतरही योग्य समन्वय राखला नाही तर भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागेल. “महाविकास आघाडीची जागा वाटप प्रक्रिया योग्य पद्धतीने हाताळली असती तर परिस्थिती वेगळी असती,” असे राऊत यांनी ठामपणे सांगितले.

आजच्या बातम्या ताज्या बातम्या महाराष्ट्र

Chhgan Bhujbal NCP सोडून जाणार?

आता छगन भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांनीच केलेल्या अजून एका वक्तव्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या नाही तर भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेतच्या बैठकीनंतर “आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते” असं म्हटलं आहे त्यांच्या याच वक्तव्यातून छगन भुजबळ महायुतीवर नाही तर राष्ट्रवादी पक्षावर त्यातही खास करून अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळे राष्ट्रवादीवर नाराज असलेले छगन भुजबळ हे आता महायुतीतील भाजपामध्ये जाऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशासाठी भाजपा देखील आग्रही राहू शकते. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख नेते होते. एक म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्याकडचा ओबीसी नेता गमावला, त्यामुळे भाजपला त्यांच्या पक्षात एका ओबीसी नेत्याची गरज आहे. खास करून तेव्हा, जेव्हा राहून गांधी सातत्याने संसदेत जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. आणि भाजपाची हि गरज छगन भुजबळ यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते, त्यामुळे भाजप छगन भुजबळ यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात आग्रही राहू शकते.

RSS ताज्या बातम्या

RSS चे बौद्धिक काय असत? NCP चे MLA व Ajit Pawar Mahayuti Boudhik ला का उपस्थित नव्हते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक: नेमकं काय आणि का? महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यालयात बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी या सत्राला हजेरी लावली, तर अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. यामुळे या बौद्धिक सत्राची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बौद्धिक म्हणजे काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती विकासाद्वारे राष्ट्र विकासावर भर देतो. यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास हा त्रिस्तरीय दृष्टिकोन अवलंबला जातो. शाखांमध्ये शारीरिक व मानसिक कसरतींवर लक्ष केंद्रित केले जाते, तर बौद्धिक सत्रांद्वारे संघाचे विचार, राष्ट्रनिर्मितीचे योगदान आणि हिंदू विचारसरणीवर भाष्य केले जाते. बौद्धिक सत्रातील प्रमुख मुद्दे अजित पवारांचा अनुपस्थितीचा निर्णय राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी या सत्राला जाण्याचे टाळले कारण त्यांच्या मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लक्षात घेता, संघाच्या विचारधारेशी भिन्न असलेल्या मतदारांचा रोष ओढवण्याची शक्यता असल्याने पवार गटाने बौद्धिक सत्राला दांडी मारली. निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक सत्र हे विचारमंथनासाठीचे व्यासपीठ आहे, जे महायुतीतील काही आमदारांसाठी महत्त्वाचे वाटले, तर काहींनी राजकीय धोरण म्हणून दूर राहणे पसंत केले. तुमचे यावर काय मत आहे? कंमेंट करून नक्की सांगा!