Santosh Khade: उसतोडी कुटुंबातून पोलीस अधिकारी झाला
ज्या बीडला गुन्हेगारीसाठी, ज्या मराठवाड्याला सद्या शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी, उसतोडणी कामगारांसाठी ओळखला जाणारा हा भाग आणि बीड जिल्हा.जसे की संघर्षाच्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या. पण हेच पोरगं जेव्हा कामावर रुजु झालं आणि त्याने आपल्या कामाची झलक दाखवली तेव्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा शॉक झाला होता. लोकं मात्र त्याच्या कामाचं कौतुक करत होते.
अजुन त्याचं ट्रेनींग सुद्धा पुर्ण झालं नव्हतं. तो पोरगा होता Santosh Khade अहिल्यानगर जिल्हा त्यांच्या बेकारदेशीर कामांवर केलेल्या धाडींमुळे खुप गाजला.

आई-वडीलांनी आयुष्यभर ऊसतोडला. ह्याची जाणीव असलेला त्यांचा मुलगा संतोष खाडे. २०२१ च्या आपल्या पहिल्या प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत मुलाखतीपर्यंत जाऊनही मिरिटमध्ये बसला नाही. वडलांना फोन केला. काय झालं ते सांगीतलं. ते म्हणाले, भावड्या ३० वर्ष उस तोडलाय. तुझ्यासाठी अजून ५ वर्ष ऊस तोडू पण तू मागं हटू नको. पुढच्या प्रयत्नातचं त्यांचं पोरगं MPSC खुल्या गटात १६ वं आणि एनटी-डी प्रवर्गात पहिलं आलं.
गावात झालेली जबरदस्त एन्ट्री, त्याच्या झालेल्या बातम्या. सगळ, सगळं काही गाजलं. मिडिया आली, मुलाखती झाल्या. आजपासून आई-बापाच्या हातचा कोयता सुटला हे त्या नव्याने अधिकारी झालेल्या पोराच्या वाक्याने सगळे भावनिक झाले. असे अनेक कोयते मला सोडवायचे आहेत असंही तो म्हणाला. पण आजवर मोठा साहेब झालेल्या व्यक्तीची कहानी इथपर्यंतच ऐकायची आपल्याला सवय आहे. या सामान्य कुटुंबातून आलेल्या पोराने जो नुकताच भरती झालाय. अजूनपर्यंत पोस्टींगपण झालेली नाही.
ज्याला म्हणतात परिवेक्षाधिन पोलीस अधिकारी. लक्षात ठेवा कारण अहिल्यानर जिल्हाला हा शब्द चांगला पाठ झालाय. परिविक्षाधीन म्हणजेच ट्रेनींग मध्ये असताना असा धुमकुळ घातला की संपुर्ण जिल्हा, जे पत्रकार कायम पोलीस प्रशासनाला धारेवर धरतात. ते कौतुकाचा वर्षाव करायला थकत नव्हते. सलग सहा महिने एकच नाव धुमाकुळ घालत होतं. परिविक्षाधिन अधिकारी Santosh Khade.
४ ऑक्टोबर २०२५ ला Santosh Khade चं प्रशिक्षण पुर्ण झालं. त्यांच्या या सोशल मिडीया पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. फक्त अहिल्यानगरच नाही तर राज्यभरातून. याच वर्षाच्या सुरवातीला त्यांच्या ट्रेनींगचा भाग म्हणून त्यांना नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला. गुन्हेगारांची पुरती तारांबळ उडाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या भागात गावगुंडांकडून अवैध वाळूउपसा जोरात चालतो.
अचानक वेशांतर करुन हा नविनच रुजु झालेला साहेब धुमाकुळ घालू लागला. वाळूच्या बोटीच्या बोटी उडवून देण्यात आल्या. नेवाशातले अवैध धंदे विशेषकरुन गुटखा विकणाऱ्यांना त्यांच्या मुद्धेमालासहीत जप्प करण्यात आलं. काय करायचं. कुणाकडं जायचय. कुणाला लाज द्यावी. कुठल्या राजकीय नेत्याला फोन लावावा का? दोन नंबर वाल्यांना काहीच सुचत नव्हतं. अशात लवकरच तिथलं काम संपलं. डुब्लीकेट दारु, गुटखा, गुन्हेगारी घटकाला वाटलं की आपण वाचलो. पण यानंतर मिळाला अहिल्यानगर जिल्हाचा चार्ज. ट्रेनींगचाच हा भाग होता.
डिवायएसपी साहेबांना ट्रेनींग संपेपर्यंत सगळ्या चुका माफ आहेत. त्यामुळे ते कुणालाच घाबरत नाहीत. अशी चर्चा मागच्या काही महिन्यात जिल्हाच्या चौकाचौकात होती. एकदा वेषांतर करुन त्यांनी समृद्धी महामार्गावर गुटखा घेऊन जाणारा ट्रक पडकला. त्यात ६६ लाख रुपये किमतीचा माल जप्प झाला. आणि ही काही फक्त एक कारवाई नव्हती अशा कारवाया विविध अवैध धंद्यांवर, वाळू माफीयांवर, गुन्हेगारांवर, दारुविक्रेत्यांवर होत होती. एका बातमीत त्यांनी ३३ दिवसात ५४ धडक कारवाया केल्याचं सांगण्यात आलं होतं. यातूनच सुरु झाला Santosh Khade पॅटर्न.
Gold Prices : दिवाळीच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करावी का? सोन्याचे भाव गगनाला का भिडले?
Santosh Khade हा बीड जिल्ह्यातील एक सामान्य उसतोडी कुटुंबातून आलेला तरुण आहे. आई-वडीलांनी आयुष्यभर ऊसतोड काम करून जीवन कट्टर केले, पण संतोषला नेहमीच उच्च शिक्षण आणि समाजात चांगले स्थान मिळावे, ही इच्छा होती. २०२१ मध्ये प्रथम प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत मुलाखतीपर्यंत पोहचूनही तो यशस्वी झाला नाही. पण त्याने मागं हटण्याचा विचार केला नाही. वडील म्हणाले, “तुझ्यासाठी अजून पाच वर्ष ऊस तोडू, पण तू मागं हटू नको.” या प्रेरणेने संतोषाने पुढील प्रयत्न केला आणि MPSC खुल्या गटात १६ वा आणि एनटी-डी प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला.
संतोषच्या गावात आणि जिल्ह्यात याची जबरदस्त चर्चा झाली. मात्र त्याच्या खरी क्षमता नंतर दिसून आली, जेव्हा त्याला नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा चार्ज मिळाला. ट्रेनींग पूर्ण केल्यानंतर संतोषने अवैध वाळू, दारु, गुटखा विक्रीसह विविध गुन्हेगारी कारवाया करून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आघात केला. फक्त ३३ दिवसात ५४ कारवाया करून त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली.
संतोष खाडे हा उदाहरण आहे की कुटुंबाची साधेपणा, कठोर मेहनत आणि इच्छाशक्ती यांच्यासह कोणताही सामान्य युवक समाजात उच्च स्थान मिळवू शकतो. बीडसारख्या जिल्ह्यातून आलेला हा तरुण आता महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनात आदर्श म्हणून ओळखला जातो.