×

Prashant Kishor on Raj Thackeray टीका, उद्धव ठाकरेंची स्तुती

Prashant Kishor on Raj Thackeray Commentary, Uddhav Thackeray

Prashant Kishor on Raj Thackeray टीका, उद्धव ठाकरेंची स्तुती

Spread the love

महाराष्ट्राच्या राजकाणातला अविभाज्य घटक म्हणून राज ठाकरे किंवा ठाकरे बंधुंकडे पाहिलं जात. परप्रांतियांच्या विषयात रोकठोक आणि आक्रमक भुमिका घेणाऱ्या Raj Thackeray वर आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात Prashant Kishor यांनी एक वक्तव्य केलं आहे. देशातील सर्वात मोठे राजकीय रणणीतीकार म्हणून ज्या प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं.

Prashant Kishor on Raj Thackeray Commentary, Uddhav Thackeray Praise
Prashant Kishor on Raj Thackeray Commentary, Uddhav Thackeray

Raj Thackeray यांच्यावर दोन आरोप सतत होतात. पहिला म्हणजे त्यांना स्वतःचे दोन आमदारही निवडून आणता येत नाहीत. दुसरा म्हणजे ते सतत आपली भुमिका बदलत असतात. यातल्या पहिल्या आरोपावर येऊयात. जरी हे खरं असलं की २०१९ मध्ये मनसेचा १ आमदार आणि २०२४ मध्ये शुन्य आमदार निवडून आले. तरिही राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या आणि विशेषकरुन शहरी भागाच्या राजकारणावर पकड असल्याचं आणि त्यांच्यामुळे राजकीय गणितं बदलतात हे राजकिय जाणकारांना चांगल माहीत आहे.

Raj Thackeray फक्त मिडियासाठीचा मुद्धा नसुन महाराष्ट्रातल्या एका मोठ्या लोकसंख्येचा आवाज आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरा विषय येतो की ते नेहमी भुमिका बदलतात. राज ठाकरेंच याच्यावर अनेकवेळा स्पष्टिकरण आलेलं असलं किंवा त्यांच त्याच्यावर काहीही म्हणणं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा कोणताच पक्ष शिल्लक राहिलेला नाही ज्याने आपल्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत युत्या आघाड्या केल्या नाहीत.

भाजप अजित दादांसोबत जाऊ शकतं, कॉंग्रेस Raj Thackeray सोबत जाऊ शकतं. तरिही त्यांना मतात काही फरक पडत नसेल तर महाराष्ट्र हितासाठी म्हणून राज ठाकरे भाजपसोबत गेले काय किंवा राष्ट्रवादी सोबत गेले काय. याचा परिणाम त्यांच्या एकूण राजकारणावर पडता कामा नये. पण हा विषय आपण आत्ता का बोलत आहोत तर बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एका हिंदी वाहिणीनीला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी राज ठाकरेंचं नाव घेत त्यांना लंपन इलेमेंट असल्याचं म्हटलं आहे.

या वक्तव्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. लंपन इलेमेंट म्हणजेच जास्त महत्वाचा नसलेला घटक. प्रशांत किशोर राजकीय रणणीनीतीकार ज्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचं पॉलीटीकल कॅंम्पेन केलं. पंजाब मध्ये कॉंग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं. ममता बॅनर्जीचं कॅंम्पेन पश्चिम बंगाल मध्ये केला. एका निवडणूकीत उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं. तमिळनाडूच्या स्टलीनसाठी सुद्धा पॉलीटीकल कॅम्पेनींग सांभाळलं.

भारताच्या राजकारणाला आपल्या पॉलीटीकल मार्केटिंग किंवा ज्याला कॅंम्पेन म्हणतात त्याच्या जोरावर दिशा देण्याचं काम केलं. त्यांना राज ठाकरेंचा एवढा राग कशामुळे? तर सध्या ते स्वतःच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि एक पार्टी काढून बिहारच्या राजकारणात स्वतःचं नशिब आजमावत आहेत. याच जनस्वराजचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी बोलण्यासाठी त्यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली.

त्यामध्ये महिला पत्रकाराने त्यांना बिहारी लोकांवर महाराष्ट्रात अन्याय होतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे याच्यावर बोलतात. असं सांगत त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल हा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं. “राज ठाकरे हे लंपन इलेमेंट आहे. तिथे महानगरपालिकेची निडणूक आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी काम केलेलं आहे. त्यावेळी बिहारी लोकांवर हल्ले करु नका हिच माझी फी असेल असं त्यांना सांगितलं होतं.

त्यामुळे Raj Thackeray च्या शिवसेनेने २०१९ नंतर बिहारी लोकांवर एकही हल्ला केल्याचं उदाहरण दाखवा” असं त्यांनी ठाम पणाने सांगितलं. मुळात काय तर आपलं राजकारण चमकवण्यासाठी बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातील नेत्यांवर बोलत आहेत. किंवा मी उद्धव ठाकरेंना सांगून कसं उत्तरेतल्या लोकांवर होणारे हल्ले थांबवले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्वतःचं राजकारण चमकवताना ज्यांनी अजुन स्वतःचा एकही आमदार निवडून आणलेला नाही. त्या प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातल्या एका अशा नेत्याला नावं ठेवणं म्हणजे स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासारखं काम आहे. त्यांनी अनेकांना राजकीय यश मिळवून देण्यासाठी कॅंम्पेनींगच काम केलेलं असलं तरीही स्वतः लोकात जाऊन निवडणूका लढणं वेगळी गोष्ट आहे.

महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राजकीय यश मिळालेलं नसलं तरीही हा चळवळींचा महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येकजण आपला विचार घेऊन पुढे येत असतो. आणि त्याचा धोरणांवर परिणाम झालेला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठीच्या हितासाठी लढण्याची चळवळ ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना त्याची जाणीवही आहे. हेच त्यांनी समजून घ्यायला हवं.

Farmers Income Tax : महाराष्ट्रातला शेतकरी किती टॅक्स भरतो? बघा पूर्णच गणित…

Post Comment

You May Have Missed