I am so happy, my dear friend, so absorbed in the exquisite sense of mere tranquil existence, that I neglect my talents. I should be incapable of drawing a single stroke at the present moment

Spread the loveमेघालय हत्याकांड: सोनमच्या प्रेमातील कटामुळे पती राजा रघुवंशीचा खून!Meghalaya Murder Case: संपूर्ण देशाला हादरवणारा आणि प्रेमाच्या आड आलेल्या विवाहित नात्याला कलंकित करणारा एक भयंकर गुन्हा उघडकीस आला आहे. मेघालयमध्ये हनीमूनसाठी गेलेल्या Indor च्या नवविवाहित दांपत्यात असा काही कट रचला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. पण पोलिसांनी केलेल्या तपासात जे काही समोर आलं, ते अंगावर शहारे आणणारं आहे. सोनम रघुवंशीनेच आपल्या पती राजा रघुवंशीचा खून करण्याची सुपारी दिल्याचं स्पष्ट झालं आहे. हनीमूनचं निमित्त, पण मनात खूनाची योजना!राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी हे दोघं इंदौरचे रहिवासी. त्यांच्या लग्नाला काही आठवडेच झाले होते. त्यांनी मेघालयला हनीमूनसाठी जाण्याचे नियोजन केले. 23 मे रोजी त्यांना शेवटचं जिवंत पाहिलं गेलं. त्यानंतर त्यांचा काहीही संपर्क झाला नाही. अखेर 2 जून रोजी मेघालयच्या चेरापूंजीवरील सोहरारिम भागात एका दरीतून राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला. सोनमचं षड्यंत्र उघडकीसपोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आणि सोनमवर संशयाची सुई वळली. मेघालय पोलिसांनी आणि इंदौर क्राइम ब्रांचने मिळून सोनमची चौकशी केली. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली – सोनमचं राज कुशवाहा नावाच्या तरुणाशी अफेयर चालू होतं आणि त्याच्यासोबत मिळून तिने पतीच्या हत्येचा कट रचला. सुपारी देऊन खूनपोलिस तपासात सामने आलं की सोनम आणि राज कुशवाहाने मिळून मध्य प्रदेशातील तीन तरुणांना – विक्की ठाकूर, आनंद आणि आकाश यांना सुपारी देऊन राजा रघुवंशीचा खून घडवून आणला. हे तीनजण हनीमूनच्या बहाण्याने मेघालयला पोहोचले आणि योग्य क्षणाची वाट पाहून राजाचा खून केला. आरोपींना अटकहत्येनंतर सोनम आणि राज दोघे एकत्र पळून गेले. उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये त्यांच्याकडे पोलिसांनी अटक केली. याव्यतिरिक्त खून करणाऱ्या तिघांनाही मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत आणि प्रकरणाच्या पुढील तपासासाठी मेघालयला हलवण्यात आले आहेत. प्रेम, फसवणूक आणि हत्या – समाजाला धक्का देणारी गोष्टया entire incident म्हणजे प्रेमाच्या आड आलेलं विवाहित नातं व त्यातून जन्मलेलं हिंसक षड्यंत्र आहे. एका महिन्याच्या आतच सोनमने आपल्या पतीचा विश्वासघात केला व त्याच्या जीवाशी खेळ केला. प्रेम व खुनाचा संगम घडवणाऱ्या या incident ने समाजात अस्वस्थता व संतापाची लाट उसळवली आहे. पोलिसांची तात्काळ कृती व तपासमेघालय पोलिसांनी तत्परतेने हे प्रकरण लवकर उघडकीस आले. इंदौर क्राइम ब्रांच आणि मेघालय पोलिसांनी संयुक्तरित्या या प्रकरणाचा तपासताना आरोपींना अटक केली. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने सुरुवातीला आत्मसमर्पण केल्याचे वृत्त पसरले होते, पण नंतर स्पष्ट झालं की तिला अटकच करण्यात आली होती. सोनमला वन स्टॉप सेंटरमध्ये हलवलंसोनमलाला अटक केल्यानंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन येताच नि वहि मेहुलाला ‘सखी वन स्टॉप सेंटर’ मध्ये हलवण्यात आलं. हे केंद्र महिलांसाठी असुरक्षिततेच्या परिस्थितीत सुरक्षित ठिकाण म्हणून कार्यरत आहे. सामाजिक प्रतिक्रियाही घटना उघड झाल्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. लोकांनी सोनम आणि राज कुशवाहा या दोघांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. “प्रेमासाठी पतीचा खून” ही कल्पनाच समाजासाठी धोकादायक आहे, असं अनेकांनी मत व्यक्त केलं आहे. काय शिकलं पाहिजे?ही एक शिकवण आहे की नातेसंबंधांमध्ये प्रामाणिकपणा, विश्वास आणि संवाद किती गरजेचे आहे. सोशल मीडिया किंवा बाह्य आकर्षणांमुळे लग्नासारख्या नात्यांमध्ये फुट पडू नये, याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. Meghalaya Murder Case हे प्रकरण म्हणजे एक क्रुर गुन्हेगारी आणि मानवी भावनांचा भयंकर संगम. नव्याने संसार सुरू केलेला एक तरुण असतो तेव्हा त्याच्यावर आपल्या पत्नीनेच सुपारी दिली आणि खून करवून घेतला. यामागे प्रेम, असंतोष, लोभ, आणि बिनधास्तपणा यांचे गहिरे जाळं आहे. Kolhapur Viral Murder: लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीची हत्या! | Love Story की क्राइम स्टोरी? Nalasopara Murder Mistry: अज्ञात बॉडी, बाजूला कंडोम आणि रडणारी मुलं, हृदय हेलावून टाकणारा शेवट
Spread the loveआता छगन भुजबळांनी केलेल्या या सूचक वक्तव्यानंतर त्यांनीच केलेल्या अजून एका वक्तव्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी सोडून इतर कोणत्या नाही तर भाजपामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेतच्या बैठकीनंतर “आपल्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही होते” असं म्हटलं आहे त्यांच्या याच वक्तव्यातून छगन भुजबळ महायुतीवर नाही तर राष्ट्रवादी पक्षावर त्यातही खास करून अजित पवार व सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्यामुळे राष्ट्रवादीवर नाराज असलेले छगन भुजबळ हे आता महायुतीतील भाजपामध्ये जाऊ शकतात अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशासाठी भाजपा देखील आग्रही राहू शकते. ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख नेते होते. एक म्हणजे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दुसरे म्हणजे छगन भुजबळ. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपने त्यांच्याकडचा ओबीसी नेता गमावला, त्यामुळे भाजपला त्यांच्या पक्षात एका ओबीसी नेत्याची गरज आहे. खास करून तेव्हा, जेव्हा राहून गांधी सातत्याने संसदेत जातनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत. आणि भाजपाची हि गरज छगन भुजबळ यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते, त्यामुळे भाजप छगन भुजबळ यांच्या पक्षप्रवेशा संदर्भात आग्रही राहू शकते.
Spread the loveSantosh Deshmukh Murder Case: The Dark Side of Crime in Beed Bheed मधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या हत्येची क्रूरता पाहून कोणीही सुन्न होईल. हत्येचा घटनाक्रम दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत, जे आरोपींच्या अमानुषतेचे चित्र स्पष्ट करतात. क्रूर हत्येची अमानुष कहाणी पहिल्या फोटोत दिसते की जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट जबरदस्तीने काढतो, तर दुसऱ्या फोटोत महेश केदार निर्घृणपणे हसत सेल्फी घेत आहे. तिसऱ्या फोटोत प्रतिक घुले, देशमुख अर्धमेल्या अवस्थेत असताना, त्यांच्या चेहऱ्यावर लघुशंका करत आहे. यासोबतच, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी निर्दयपणे संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण करताना स्पष्ट दिसत आहेत. पाईप, वायर आणि लाथा-बुक्क्यांनी झालेली मारहाण एवढी निर्दय होती की त्यांच्या शरीरातील रक्त तळपायापर्यंत वाहू लागले. Murderers Who Crossed the Limits of Cruelty या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: बीडमध्ये तणावपूर्ण परिस्थिती Santosh Deshmukh यांच्या हत्येचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर Beed शहरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. Beed Police’s Appeal to the Public या फोटो आणि व्हिडिओंमुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे. Beed चे SP नवनीत कॉवत यांनी जनतेला शांत राहण्याचे आणि कायदा हातात न घेण्याचे आवाहन केले आहे. “हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे, त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,” असे त्यांनी सांगितले. Photos ही घटना महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करते. हत्येच्या या क्रौर्याला कधीच माफी नाही. न्याय मिळावा, अशीच अपेक्षा