Goa protest Rama Kankolkar attack
आजच्या बातम्या

Goa पेटलं! भुमिपुत्र कार्यकर्त्यावर हल्ल्यानंतर रोष

Spread the love

गोवा आंदोलन का पेटलं? Rama Kankolkar प्रकरणाने माजवली खळबळ

Goa Protest :गोव्यात लोकांचा रोष आता पोलीस मुख्यालय. भाजप कार्यालय. मुख्यमंत्री कार्यालयावर निघत आहे. काय आहे हे प्रकरण ज्यामुळे Goa लोक रस्त्यावर उतरलेत? भुमिपुत्रांसाठी लढणाऱ्या एका सामाजीक कार्यकर्त्यावर झालेल्या जिवघेण्या हल्यामुळे गोवा का पेटलं आहे?

Goa protest Rama Kankolkar attack
Goa protest Rama Kankolkar attack

काय घडलं होतं १८ सप्टेंबरला?

भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारा Rama Kankolkar याच्यावर अज्ञात लोकांनी मागच्या महिन्यात हल्ला केला होता. सायकलच्या चैनने मारून तोंडात गाईचं शेण घालून चार जणांनी हा जिवघेणा हल्ला केला होता. १८ सप्टेंबरला ही घटना झाली. लोकांची मागणी आहे की याच्यातले सर्व आरोपी पकडा आणि याचा मास्टरमाईंड कोण आहे? आणि हल्याचं कारण काय आहे हे सांगा. पोलीसांनी अद्यापपर्यंत काहींना अटक केली असली तरीही. हल्याचा हेतू काय होता. आणि कुणी करायला सांगीतला याची माहीती दिलेली नाही.

आता प्रश्न पडतो की जर हल्लेखोरांना पोलीस ताब्यात घेत असतील. तरीसुद्धा गोव्यातील लोकांमध्ये येवढा रोष पोलीस आणि सरकार बद्दल का आहे? गोव्यातील सामान्य नागरीक रस्त्यावर उतरुन पोलीस आणि सरकार विरोधात विशेषकरुन भाजप विरोधात आक्रमक का आहेत. तर पत्रकार सांगतात की Rama Kankolkar हा भुमिपुत्रांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे.

लोक रस्त्यावर का उतरले?

स्थानिकांच्या जमीनी हाडपून Goa त असणारी दिल्ली लॉबी आणि मोठे व्यावसाईक स्वतःचा फायदा करुन घेतात. सरकारी यंत्रनाही त्यांच्याच फायद्यासाठी काम करतात असं आंदोलकांचं म्हणणं आहे. अशात त्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर जिवघेणा हल्ला होतो. त्यामध्ये सायकलच्या चैनने आणि तोंडात शेण घालून ते पसार होतात.

हा हल्ला दुसरा-तीसरा कोणी नाही तर याच दिल्ली लॉबी आणि सरकारचा आशिर्वाद असलेल्या उद्योगपतींनीच घडवून आणल्याचं त्यांचं मत आहे. इतके दिवस होऊनही पोलीसांना अजुन यामागे कोण आहे? हे का समजलं नाही. याचा मास्टरमाईंड कोण आणि त्याचा हेतू काय होता? हे समोर आलं पाहिजे यासाठीच त्यांनी गोव्यातल्या पोलीस आयुक्तालयासमोर, भाजप कार्यालयात, मुख्यमंत्री कार्यालयात आक्रमक आंदोलन केलं आहे.

सरकार आणि पोलीसांविरुद्ध संताप

हा झाला माहीतीचा विषय पण संपुर्ण देशात हाच पॅटर्न पहायला मिळतोय का? लदाख मध्ये सुद्दा स्थानिक प्रश्न म्हणत लोक रस्त्यावर उतरले. भाजप कार्यालय पेटवून दिलं. पोलीसांच्या गाड्या पेटवून दिल्या. Goa तही त्याच दिशेने आंदोलन सुरु आहे का? अनेकांना यावर शंका येत आहेत. कारण लोकांमधला रोष मंग तो कुठल्याही प्रश्नांवर असो. हिंसक आणि अधिक आक्रमकपणे बाहेर येत आहे. यासाठी कुणी बाहेरची शक्ती काम तर करत नाही ना? असा प्रश्न पडत आहे.

आंदोलनाचं स्वरूप आणि इशारा

भारताच्या विरोधात चिन, पाकिस्तान सोबत आता अमेरिकेसारखा देश सुद्धा आपले प्रयत्न करत असताना. एखाद्या देशात अराजक माजवून सत्ता उलथवून लावण्याचा त्या देशाचा मोठा इतिहास आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्चुन, मोठी यंत्रणा ही जगभर काम करत असते.

सध्यातरी भारत अनेक आघाड्यांवर लढत असताना गृहयुद्धाचा धोका त्याला न परवडणारा आहे. इथला सामान्य माणूस तसा कमालीचा संयंमी आणि हुशार आहे. पण चुकीची माहीती त्याच्यापर्यंत पोहचवून. सरकार आणि व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात रोष तयार करण्यासाठी काही गोष्टी मुद्धाम त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर जात नाहीत ना. असाही प्रश्न पडत आहे.

वाचा अजून संबंधित बातम्या-

TCS layoffs : आयटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणणारी कार्पोरेट संस्कृती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *