गोवा आंदोलन का पेटलं? Rama Kankolkar प्रकरणाने माजवली खळबळ Goa Protest :गोव्यात लोकांचा रोष आता पोलीस मुख्यालय. भाजप कार्यालय. मुख्यमंत्री कार्यालयावर निघत आहे. काय आहे हे प्रकरण ज्यामुळे Goa लोक रस्त्यावर उतरलेत? भुमिपुत्रांसाठी लढणाऱ्या एका सामाजीक कार्यकर्त्यावर झालेल्या जिवघेण्या हल्यामुळे गोवा का पेटलं आहे? काय घडलं होतं १८ सप्टेंबरला? भुमिपुत्रांच्या हक्कांसाठी लढणारा Rama Kankolkar याच्यावर अज्ञात लोकांनी मागच्या महिन्यात हल्ला केला होता. सायकलच्या चैनने मारून तोंडात गाईचं शेण घालून चार जणांनी हा जिवघेणा हल्ला केला होता. १८ सप्टेंबरला ही घटना झाली. लोकांची मागणी आहे की याच्यातले सर्व आरोपी पकडा आणि याचा मास्टरमाईंड कोण आहे? आणि हल्याचं कारण काय आहे हे सांगा. पोलीसांनी अद्यापपर्यंत काहींना अटक केली असली तरीही. हल्याचा हेतू काय होता. आणि कुणी करायला सांगीतला याची माहीती दिलेली नाही. आता प्रश्न पडतो की जर हल्लेखोरांना पोलीस ताब्यात घेत असतील. तरीसुद्धा गोव्यातील लोकांमध्ये येवढा रोष पोलीस आणि सरकार बद्दल का आहे? गोव्यातील सामान्य नागरीक रस्त्यावर उतरुन पोलीस आणि सरकार विरोधात विशेषकरुन भाजप विरोधात आक्रमक का आहेत. तर पत्रकार सांगतात की Rama Kankolkar हा भुमिपुत्रांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. लोक रस्त्यावर का उतरले? स्थानिकांच्या जमीनी हाडपून Goa त असणारी दिल्ली लॉबी आणि मोठे व्यावसाईक स्वतःचा फायदा करुन घेतात. सरकारी यंत्रनाही त्यांच्याच फायद्यासाठी काम करतात असं आंदोलकांचं म्हणणं आहे. अशात त्यांच्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यावर जिवघेणा हल्ला होतो. त्यामध्ये सायकलच्या चैनने आणि तोंडात शेण घालून ते पसार होतात. हा हल्ला दुसरा-तीसरा कोणी नाही तर याच दिल्ली लॉबी आणि सरकारचा आशिर्वाद असलेल्या उद्योगपतींनीच घडवून आणल्याचं त्यांचं मत आहे. इतके दिवस होऊनही पोलीसांना अजुन यामागे कोण आहे? हे का समजलं नाही. याचा मास्टरमाईंड कोण आणि त्याचा हेतू काय होता? हे समोर आलं पाहिजे यासाठीच त्यांनी गोव्यातल्या पोलीस आयुक्तालयासमोर, भाजप कार्यालयात, मुख्यमंत्री कार्यालयात आक्रमक आंदोलन केलं आहे. सरकार आणि पोलीसांविरुद्ध संताप हा झाला माहीतीचा विषय पण संपुर्ण देशात हाच पॅटर्न पहायला मिळतोय का? लदाख मध्ये सुद्दा स्थानिक प्रश्न म्हणत लोक रस्त्यावर उतरले. भाजप कार्यालय पेटवून दिलं. पोलीसांच्या गाड्या पेटवून दिल्या. Goa तही त्याच दिशेने आंदोलन सुरु आहे का? अनेकांना यावर शंका येत आहेत. कारण लोकांमधला रोष मंग तो कुठल्याही प्रश्नांवर असो. हिंसक आणि अधिक आक्रमकपणे बाहेर येत आहे. यासाठी कुणी बाहेरची शक्ती काम तर करत नाही ना? असा प्रश्न पडत आहे. आंदोलनाचं स्वरूप आणि इशारा भारताच्या विरोधात चिन, पाकिस्तान सोबत आता अमेरिकेसारखा देश सुद्धा आपले प्रयत्न करत असताना. एखाद्या देशात अराजक माजवून सत्ता उलथवून लावण्याचा त्या देशाचा मोठा इतिहास आहे. त्यासाठी अब्जावधी रुपये खर्चुन, मोठी यंत्रणा ही जगभर काम करत असते. सध्यातरी भारत अनेक आघाड्यांवर लढत असताना गृहयुद्धाचा धोका त्याला न परवडणारा आहे. इथला सामान्य माणूस तसा कमालीचा संयंमी आणि हुशार आहे. पण चुकीची माहीती त्याच्यापर्यंत पोहचवून. सरकार आणि व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात रोष तयार करण्यासाठी काही गोष्टी मुद्धाम त्याच्यापर्यंत पोहोचवल्या तर जात नाहीत ना. असाही प्रश्न पडत आहे. वाचा अजून संबंधित बातम्या- TCS layoffs : आयटी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणणारी कार्पोरेट संस्कृती
आजच्या बातम्या
RSS शिबिरात लैंगिक शोषण? IT Engineer तरुणाची आत्महत्या
RSS Camp Kerala News : IT काम करणारा. 26 वर्षाचा तरुण. आत्महत्या करतो आणि त्याआधि एक सोशल मिडिया पोस्ट करतो. माझ्या आत्महत्येचं कारण प्रेम, कर्ज किंवा दुसरं काही नाही. तर माझ्यावर संघाच्या शाखेत झालेल्या लैगींक झळामुळे झालेल्या मनोविकारा आहे असं तो सांगतो. काय आहे हे सगळ प्रकरण आणि RSS च्या शिबीरांवर यामुळे काय आरोप होत आहे. यावर्षी म्हणजेच २०२५ मध्ये RSS या संघटनेला १०० वर्ष पुर्ण झाली. आधि सावरकरांमुळे नंतर गांधिजींच्या हत्तेमुळे, ३ वेळा लागलेल्या बंदिमुळे, हिंदुराष्ट्राच्या RSS च्या धोरणामुळे, शिवाय देशाचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि आत्ताचे Narendra Modi हे संघ स्वयंसेवक असल्यामुळे नेहमीच RSS देशाच्या केंद्रस्थानीचा मुद्धा राहिला. भाजपातील बहुतेक नेते हे संघातून आलेले असतात. जसेकी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्रातील भाजपचे मोठे नेते नितीन गडकरी. सत्तेत भाजप असली तरी RSS ला डावलून त्याला राजकारण करता येत नाही. असं म्हटलं जातं. भाजप आपली विचारधारा तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी संघ प्रचारकांचा किंवा थेट संघाचा उपयोग करतं. केरळमध्ये सुद्धा आरएसएसचा प्रभाव वाढत आहे. अशात संघाच्या शाखेत आणि शिबीरात लैंगीक छळ झाल्याची बातमी समोर आली आहे. केरळच्या एका IT कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणाने यामुळे आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलीसांनी याची दखल घेत शवविच्छेदनासाठी पार्थिव पाठवलं आहे. आनंदु आजू हा २६ वर्षीय IT Engineer लहानपणी घरच्यांमुळे आरएसएसच्या शाखेत जात होता. त्याच्या वडिलांनीच त्याला शाखेत पाठवल्याचं कळतय. तिथे त्याचा शेजारी असणाऱ्या एनएम नावाच्या व्यक्तीने त्याचं लैगींक शोषण केलं. हा एनएम सध्या भाजपचा एक्टीव कार्यकर्ता असल्याचं त्याने व्हिडिओत सांगितलं. आनंदुच्या कुटुंबियांशी सुद्धा त्याचे चांगले संबंध होते. तो ही गोष्ट घरच्यांनाही सांगू शकला नाही. त्याच्या लहानपणी झालेल्या या लैगींक शोषणामुळे त्याला अनेक मानसिक आजारांचा सामना करावा लागला. त्यामध्ये डिप्रेशन आणि सिओडी म्हणजेच ऑब्सेसीव्हि कम्पल्सिव डिसॉर्डर हे होते. त्याने सांगितलं की इतरही अनेक संघाच्या सदस्यांकडून त्याचा लैंगीक झळ झाला पण त्यांची नावं त्याला आठवत नाहीत. पण अगदी शिबीरांमध्ये सुद्धा या घटना झाल्या. त्याने सर्वांना सल्ला दिला की संघापासून लांब रहा. अगदी घरचे असतील तरीही. त्याच्या म्हणण्यानुसार अशा घटना इतरही अनेकांसोबत घडल्या आहेत. वडिलांनाही मुलांसोबत वेळ घालवत जा असा सल्ला त्याने दिला आहे. थिरुवअनंतपुरम मधिल थंतापूर भागात एका लॉजवर त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या या व्हिडिओमुले अनेक राजकीय पक्षांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या पोस्टमध्ये तो म्हटला की आरएसएसकडून आयुष्यभराच्या वेदना मिळाल्या. मी कुणावरही नाराज नाही, फक्त एक व्यक्ती आणि संघटनेवर नाराजी आहे. एनएम हा RSS चा सक्रीय सदस्य होता आणि तो सतत लैंगिक शोषण करत होता. कॅम्पमध्ये लैंगिक शोषण करताना त्यानं काठीनं मारहाणही केली. आरएसएससारख्या दुसऱ्या कोणत्या संस्थेबाबत इतका द्वेष नाही. आरएसएसवाल्यांसोबत मैत्री करू नका, वडील, भाऊ किंवा मुलगा जरी असले तरी दूर ठेवा. कँपमध्ये खूप शोषण होतं, बाहेर पडल्यानं मी बोलू शकलो. पुरावे नाही म्हणून कोणी मान्य करणार नाही पण माझं आयुष्यच पुरावा आहे. Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?
Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis साठी कुणाकुणाचा राजकीय बळी?
Devendra Fadnavis शी वाकडं म्हणजे मसनात लाकडं. एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा. पण भाजप म्हणजे सबकुछ Devendra Fadnavis. हे तर सगळ्यांना माहीतचं आहे. सध्या भाजपमधला एक नावं असंच अज्ञातवासात टाकलं जाातयं. त्याचं नाव आहे Sudhir Mungantiwar. काही महिन्यांपुर्वी भाजपाचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो, या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या Sudhir Mungantiwar यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं. आणि मंग सुरू होतं ते कार्यक्रमाच राजकारण. तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती. चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्या दरम्यानची ही घटना. पण प्रश्न फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पहायला मिळालंय म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का ? डावललं तर कोणी डावललं. जोरगेवारांनी कि भाजपने की फडणवीसांनी. पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, लोकसभेवेळी Sudhir Mungantiwar नी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं, त्यावेळी Sudhir Mungantiwar राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अश्यातच मुंडेंना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आणि आता हा कार्यक्रम. त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपवू पाहतेय अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकत ते पाहूया. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम हॊईल का नाही याचा देखील विचार करत नव्हते. खास करून 2019 मध्ये भाजपा-सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत आणू शकतो म्हणून पक्षाकडून येथूनच त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं बोललं जात. दरम्यानच्या काही काळात Sudhir Mungantiwar हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याच पाहायला मिळालं. तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आल नव्हत. आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर Sudhir Mungantiwar हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं, ज्या मागे हेतू एकच होता तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रात Devendra Fadnavis ना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचीत दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाहीये. यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं. या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातली घरवापसीही कायमची रद्द झाली. पंकजा मुंडे इतक्या दिवस शांत बसुन कमबॅक करण्याची वाट पाहत होत्या. त्यात विधानसभेतील पराभव, लोकसभेतील पराभव तरीही मंत्रीमंडळातील संधी यामुळे बॅकफुटवर गेलेल्या मंत्रीमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरस्थावर झाल्या. मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्यातरी नाहीये. यानंतर येतं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंच नाव. भावी मुख्यमंत्री म्हणून बघीतलं गेलेल्या या नेत्याचा अक्षरशः बाजार उठवला गेला. जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली. कारण एकचं देवेंद्र फडणवीस. वाचा अजून संबंधित बातम्या-Narendra Modi यांच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत : Chandrababu Naydu यांच्या नावाची चर्चा
OBC च्या १६ टक्के आरक्षणवाढीचा १९९४ चा GR काय आहे?
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलननांतर काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. छगन भुजबळ याविरोधात कोर्टातही जाणार आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलात, तर OBC आरक्षणात १९९४ साली घुसखोरी केलेल्या १६ टक्केवाल्यांच्या विरोधात आम्ही जाऊ. सन १९७९ मध्ये मोरारजी देसाई सरकारच्या काळात बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली. त्यालाच मंडल आयोग म्हणतात. १९८० साली या आयोगाने दिलेल्या अहवालात देशात ३ हजार ७४३ जाती ओबींसींमध्ये असल्याचा आणि त्यांचं लोकसंख्येतली प्रमाण हे ५२ टक्के असल्याचा अहवाल दिला. ज्यामध्ये या इतर मागास वर्ग घटकाला २७ टक्के आरक्षण द्यावे ही शिफारस केली. १९८० ते १९९० या दहा वर्षात कॉंग्रेस सरकारने या शिफारसी लागू करण्यास टाळाटाळ केली. परंतु १९९० साली सत्तेवर आलेल्या जनता दलाचे पंतप्रधान व्ही.पी.सिंह आयोगाची अंमलबजावणी केली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांनी याला विरोध केला. मात्र हळूहळू सर्वांचा विरोध मावळला. शेवटी सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणावर मोहोर लावली. देशातीली सर्व राज्यांना मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने दिले. महाराष्ट्र हे पहिले राज्य होते ज्याने मंडळ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली. आता येऊया २३ मार्च १९९४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने काढलेल्या जीआर वर. त्यावेळी मुख्यमंत्री होते Sharad Pawar. या GR मध्ये राज्यात असलेलं एकूण ३४ टक्के आरक्षण १६ टक्क्याने वाढवण्यात आल्याचा निर्णय होता. यामुळे राज्यात असलेल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पुर्ण झाली. आता टिकणारं आरक्षण मराठा समजाला द्यायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे अनेकजण तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांवर मराठा समाजाचा विचार न करता त्यांनी आरक्षण १६ टक्क्यांनी वाढवलं अशी टिका करतात. भाजपही Sharad Pawar, वर टिका करताना याचाच आधार घेतं. “पण प्रत्यक्षात पवारांनी २७ टक्के असणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या हातात अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता” असं मत Chhagan Bhujbal यांनी एका मुलाखतीत मांडलं. आता हा GR लागू होण्यापुर्वी राज्यात असणारं आरक्षण किती होतं? आणि नंतर किती झालं? यावर एक नजर टाकूया. २३ मार्च १९९४ चा हा जीआर लागू होण्यापुर्वी राज्यात अनुसुचीत जाती म्हणजे एससीसाठी होतं. 13 टक्के आरक्षण. अनुसुचीत जमाती म्हणजे एसटीसाठी होतं ७ टक्के आरक्षण. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना होतं ४ टक्के आरक्षण आणि इतर मागास वर्ग म्हणजेचं ओबीसींना होतं १० टक्के आरक्षण. म्हणजेचं एकूण ३४ टक्के. हा २३ मार्च १९९४ चा GR लागू झाल्यानंतर एससी आणि एसटीचं असणारं १३ आणि ७ टक्के आरक्षण तसचं राहिलं. पण भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि ओबीसी यांचं मिळून असणारं १४ टक्के आरक्षण वाढून झालं ३० टक्के. म्हणजेच १६ टक्के आरक्षणात वाढ करण्यात आली. यामुळेच एकूण ३४ टक्के असणारं आरक्षण आता झालं ५० टक्के. मनोज जरांगे पाटील यांच्यामते १९९४ सालच्या या वाढलेल्या जीआर मुळेच मराठ्यांवर अन्याय झाला. तथापी त्यांनी भाजप किंवा इतरांसारखी शरद पवारांवर टिका नाही केली. पण जर कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलं तर ह्या ओबीसी आरक्षणात वाढवलेल्या १६ टक्के आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या इशारा त्यांनी दिला. दरम्यान मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्यात मंडल यात्रा काढल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपचा डीएनए हा ओबसी आहे असं सांगणाऱ्या भाजपला किंबहुना त्याच्या ओबीसी वोटरला चुचकारण्याचा प्रयत्न यावेळी शरद पवारांनी केला होता. या यात्रेत त्यांनी कशाप्रकारे मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रात लागू केल्या. आणि ओबसींना एकूण ३० टक्के आरक्षण मिळवून दिल्याने त्यांना शिक्षणात आणि नोकरीत कसा फायदा झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. सोबतच जेव्हा मंडळ आयोगासाठी आंदोलन होत होतं त्याच्या विरोधात भाजप कमंडल यात्रा काढत होतं. आणि OBC आरक्षण तसेच मंडळ आयोगाला विरोध करत होतं. हे ही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या यात्रेतुन केला होता. मराठा आरक्षणाच्या मुंबई आंदोलनात यावेळी त्यांच्या या मंडल यात्रेवरही सोशल मिडियावर टिका होताना पहायला मिळाली. कारण होतं त्यांच्या मुख्यंमंत्रीपदाच्या कार्यकाळात निघालेला हा OBC च्या १६ टक्के आरक्षण वाढीचा जीआर. Maharashtra Flood Relief : ३१ हजार कोटींची मदत ; पण पदरात पडणार किती? ___
Prashant Kishor on Raj Thackeray टीका, उद्धव ठाकरेंची स्तुती
महाराष्ट्राच्या राजकाणातला अविभाज्य घटक म्हणून राज ठाकरे किंवा ठाकरे बंधुंकडे पाहिलं जात. परप्रांतियांच्या विषयात रोकठोक आणि आक्रमक भुमिका घेणाऱ्या Raj Thackeray वर आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात Prashant Kishor यांनी एक वक्तव्य केलं आहे. देशातील सर्वात मोठे राजकीय रणणीतीकार म्हणून ज्या प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं. Raj Thackeray यांच्यावर दोन आरोप सतत होतात. पहिला म्हणजे त्यांना स्वतःचे दोन आमदारही निवडून आणता येत नाहीत. दुसरा म्हणजे ते सतत आपली भुमिका बदलत असतात. यातल्या पहिल्या आरोपावर येऊयात. जरी हे खरं असलं की २०१९ मध्ये मनसेचा १ आमदार आणि २०२४ मध्ये शुन्य आमदार निवडून आले. तरिही राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या आणि विशेषकरुन शहरी भागाच्या राजकारणावर पकड असल्याचं आणि त्यांच्यामुळे राजकीय गणितं बदलतात हे राजकिय जाणकारांना चांगल माहीत आहे. Raj Thackeray फक्त मिडियासाठीचा मुद्धा नसुन महाराष्ट्रातल्या एका मोठ्या लोकसंख्येचा आवाज आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरा विषय येतो की ते नेहमी भुमिका बदलतात. राज ठाकरेंच याच्यावर अनेकवेळा स्पष्टिकरण आलेलं असलं किंवा त्यांच त्याच्यावर काहीही म्हणणं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा कोणताच पक्ष शिल्लक राहिलेला नाही ज्याने आपल्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत युत्या आघाड्या केल्या नाहीत. भाजप अजित दादांसोबत जाऊ शकतं, कॉंग्रेस Raj Thackeray सोबत जाऊ शकतं. तरिही त्यांना मतात काही फरक पडत नसेल तर महाराष्ट्र हितासाठी म्हणून राज ठाकरे भाजपसोबत गेले काय किंवा राष्ट्रवादी सोबत गेले काय. याचा परिणाम त्यांच्या एकूण राजकारणावर पडता कामा नये. पण हा विषय आपण आत्ता का बोलत आहोत तर बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एका हिंदी वाहिणीनीला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी राज ठाकरेंचं नाव घेत त्यांना लंपन इलेमेंट असल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. लंपन इलेमेंट म्हणजेच जास्त महत्वाचा नसलेला घटक. प्रशांत किशोर राजकीय रणणीनीतीकार ज्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचं पॉलीटीकल कॅंम्पेन केलं. पंजाब मध्ये कॉंग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं. ममता बॅनर्जीचं कॅंम्पेन पश्चिम बंगाल मध्ये केला. एका निवडणूकीत उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं. तमिळनाडूच्या स्टलीनसाठी सुद्धा पॉलीटीकल कॅम्पेनींग सांभाळलं. भारताच्या राजकारणाला आपल्या पॉलीटीकल मार्केटिंग किंवा ज्याला कॅंम्पेन म्हणतात त्याच्या जोरावर दिशा देण्याचं काम केलं. त्यांना राज ठाकरेंचा एवढा राग कशामुळे? तर सध्या ते स्वतःच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि एक पार्टी काढून बिहारच्या राजकारणात स्वतःचं नशिब आजमावत आहेत. याच जनस्वराजचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी बोलण्यासाठी त्यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये महिला पत्रकाराने त्यांना बिहारी लोकांवर महाराष्ट्रात अन्याय होतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे याच्यावर बोलतात. असं सांगत त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल हा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं. “राज ठाकरे हे लंपन इलेमेंट आहे. तिथे महानगरपालिकेची निडणूक आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी काम केलेलं आहे. त्यावेळी बिहारी लोकांवर हल्ले करु नका हिच माझी फी असेल असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे Raj Thackeray च्या शिवसेनेने २०१९ नंतर बिहारी लोकांवर एकही हल्ला केल्याचं उदाहरण दाखवा” असं त्यांनी ठाम पणाने सांगितलं. मुळात काय तर आपलं राजकारण चमकवण्यासाठी बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातील नेत्यांवर बोलत आहेत. किंवा मी उद्धव ठाकरेंना सांगून कसं उत्तरेतल्या लोकांवर होणारे हल्ले थांबवले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचं राजकारण चमकवताना ज्यांनी अजुन स्वतःचा एकही आमदार निवडून आणलेला नाही. त्या प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातल्या एका अशा नेत्याला नावं ठेवणं म्हणजे स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासारखं काम आहे. त्यांनी अनेकांना राजकीय यश मिळवून देण्यासाठी कॅंम्पेनींगच काम केलेलं असलं तरीही स्वतः लोकात जाऊन निवडणूका लढणं वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राजकीय यश मिळालेलं नसलं तरीही हा चळवळींचा महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येकजण आपला विचार घेऊन पुढे येत असतो. आणि त्याचा धोरणांवर परिणाम झालेला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठीच्या हितासाठी लढण्याची चळवळ ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना त्याची जाणीवही आहे. हेच त्यांनी समजून घ्यायला हवं. Farmers Income Tax : महाराष्ट्रातला शेतकरी किती टॅक्स भरतो? बघा पूर्णच गणित…
Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो
Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रोतुळशीबागेत फिरायला जाणारा पुणेकर आता सहज फेरफटका मारायला पुण्याच्या मेट्रोत जाऊ लागलाय. पण अजुनही फिरायच्या ठिकाणी किंवा त्याच्या कामावर त्याला मेट्रोने काही पोहचता येईना. त्यामुळे आता सगळेजण पुण्याच्या हा भागात असती ना Metro . तिथे असती ना Metro . असं बोलायला लागले आहेत. आपल्याला माहीतीये स्वारगेट वरुन निघालेली Metro थेट सरळ जाती पीसीएमसी पर्यंत आणि वनाज वरुन निघालेली मेट्रो थेट सरळ जाती रामवाडी पर्यंत मधी एकदा जिल्हा न्यायालय म्हणेजेच सिव्हिल कोर्टला एकमेकांना ह्या दोन लाईनी भेटतात. तुम्हाला हा भाग सोडून पुण्याच्या अनेक भागात मेट्रोचं काम सुरु असल्याचं दिसत आसल पण ती लाईन कोणती आणि त्याचं काम पुर्ण कधी होणार यासाठीच आपण दोन टप्यात या विस्तारीत मेट्रो प्रक्लपाची माहीती घेऊयात. पहिल म्हणजे पुढच्या तीन वर्षात कुठवर्यंत मेट्रो पोहचेल आणि नंतर ५ वर्षात कुठं पोहचेल ते ही पाहुयात. सगळ्यात महत्वाची मेट्रो लाईन म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर याला लाईन-३ म्हटलं गेलय. मार्च २०२६ मध्ये ही लाईन सुरु होईल. २३ किलोमीटरची ही लाईन आहे आणि २३ स्टेशन यामद्ये आहेत. आयटीपार्कमध्ये काम करणार्यांसाठी आणि तिथुन लांबच्या अंतरावर राहणाऱ्यांसाठी ही खुप महत्वाची लाईन आहे. हिंजवडी आयटीपार्कची वाहतुक कोंडी फोडण्यासाठी याची खुप मदत होणार आहे. याच काम ९० टक्क्यापेक्षा जास्त पुर्ण झालेलं आहे. फक्त ट्रायल सुरु आहेत. यातले सर्व स्टेशन हे पुढच्या ३ वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत पुर्णपणे सुरु झालेले असतील. तिकडे पीसीएमसी पर्यंत सरु असलेली Metro पुढे चार स्टेशन जाऊन चिंचवड, आकुर्डी, निगडी ते भक्ती-शक्तीपर्यंत जाईल. २०२८ पर्यंतच वनाज पासून ते चांदणी चौकापर्यंत मेट्रोचा विस्तार झालेला असेल. आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला रामवाडीपासून ते वाघोली आणि विठ्ठलवाडीपर्यंत ही मेट्रो पोहचलेली असेल. यावर्षी जून मध्येच याला मंजूरी आणि निधीची पुर्तता करण्यात आली आहे. आता पाहुया २०३० पर्यंत सुरु होणाऱ्या मेट्रोलाईन. लाईन-१ म्हणजे PMC ते Swarget याचच एस्कटेंशन म्हणजेच वाढीव भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज हा कॉरीडॉर २०२९ पर्यंत पुर्ण होणार आहे. ५.४६ किलोमीटर अंतरात ३ ते ५ मेट्रोस्टेशन असणार आहेत. हे सर्व मेट्रोस्टेशन्स अंडरग्राऊंडच असतील. आता आणखीन एक मार्ग २०३० पर्यंत पुर्ण होऊ शकतो ज्याला राज्य सरकारनेतर मंजूरी दिली आहे. त्याचा डीपीआर सुद्धा तयार आहे फक्त केंद्र सरकारची मंजुरी आणि निधी मिळणं बाकी आहे. तो आहे खडकवासला ते हडपसर आणि खराडी बायपास हा मार्ग यामद्ये खडकवासला, नांदेड सिटी, धायरी फाटा, राजाराम पूल, दांडेकर पुल, स्वारगेट,रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल. तुळशीबागेत फिरायला जाणारा पुणेकर आता सहज फेरफटका मारायला पुण्याच्या मेट्रोत जाऊ लागलाय. पण अजुनही फिरायच्या ठिकाणी किंवा त्याच्या कामावर त्याला मेट्रोने काही पोहचता येईना. त्यामुळे आता सगळेजण पुण्याच्या हा भागात असती ना मेट्रो. तिथे असती ना Metro . असं बोलायला लागले आहेत. आयटी हब असणाऱ्या Pune ची वाहतुक कोंडी ही पुणे मेट्रो सोडवेल का? तुमच्या या प्रश्नाचं उत्तरही आपण यामध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. सगळ्यात महत्वाची मेट्रो लाईन म्हणजे हिंजवडी ते शिवाजीनगर याला लाईन-३ म्हटलं गेलय. मार्च २०२६ मध्ये ही लाईन सुरु होईल. २३ किलोमीटरची ही लाईन आहे आणि २३ स्टेशन यामद्ये आहेत. आयटीपार्कमध्ये काम करणार्यांसाठी आणि तिथुन लांबच्या अंतरावर राहणाऱ्यांसाठी ही खुप महत्वाची लाईन आहे. हिंजवडी आयटीपार्कची वाहतुक कोंडी फोडण्यासाठी याची खुप मदत होणार आहे. याच काम ९० टक्क्यापेक्षा जास्त पुर्ण झालेलं आहे. फक्त ट्रायल सुरु आहेत. यातले सर्व स्टेशन हे पुढच्या ३ वर्षात म्हणजे २०२८ पर्यंत पुर्णपणे सुरु झालेले असतील. तिकडे PMC पर्यंत सरु असलेली Metro पुढे चार स्टेशन जाऊन चिंचवड, आकुर्डी, निगडी ते भक्ती-शक्तीपर्यंत जाईल. २०२८ पर्यंतच वनाज पासून ते चांदणी चौकापर्यंत मेट्रोचा विस्तार झालेला असेल. आणि त्याच्या दुसऱ्या टोकाला रामवाडीपासून ते वाघोली आणि विठ्ठलवाडीपर्यंत ही मेट्रो पोहचलेली असेल. यावर्षी जून मध्येच याला मंजूरी आणि निधीची पुर्तता करण्यात आली आहे. आता पाहुया २०३० पर्यंत सुरु होणाऱ्या मेट्रोलाईन. लाईन-१ म्हणजे पीसीएमसी ते स्वारगेट याचच एस्कटेंशन म्हणजेच वाढीव भाग म्हणून स्वारगेट ते कात्रज हा कॉरीडॉर २०२९ पर्यंत पुर्ण होणार आहे. ५.४६ किलोमीटर अंतरात ३ ते ५ मेट्रोस्टेशन असणार आहेत. हे सर्व मेट्रोस्टेशन्स अंडरग्राऊंडच असतील. आता आणखीन एक मार्ग २०३० पर्यंत पुर्ण होऊ शकतो ज्याला राज्य सरकारनेतर मंजूरी दिली आहे. त्याचा डीपीआर सुद्धा तयार आहे फक्त केंद्र सरकारची मंजुरी आणि निधी मिळणं बाकी आहे. तो आहे खडकवासला ते हडपसर आणि खराडी बायपास हा मार्ग यामद्ये खडकवासला, नांदेड सिटी, धायरी फाटा, राजाराम पूल, दांडेकर पुल, स्वारगेट, रेस कोर्स, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल. हे काम सुद्धा २०३० पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. एकदा का फेज १ चे काम पुर्ण झाले मंग हे फेज २ चं काम सुरु होईल. या फेज २ ला आधिच्या मेट्रो लाईनसोबत आणखी एका ठिकाणी जोडंल जाईल ज्यामध्ये असणार आहे. नळ स्टॉप – कर्वेनगर – वारजे ब्रीज – दौलत नगर आणि माणिकबाग. मेट्रोचं महत्व लक्षात आल्यामुळे हडपसर ते लोणी काळभोर आणि हडपसर ते सासवड सोबतच पुण्याच्या देहू मध्ये आणि चाकण भागातही मेट्रोची मागणी जोर पकडत आहे. राजकीय नेते किंवा याच्यावर मत मांडणारे याच्यावर बोलत असले तरी जेव्हा याचे प्रस्ताव मंजूर होतील. त्यानंतरच याच्या कामाची आणि मार्गाची शाश्वती मिळू शकेल. पण येवढं नक्की. याच्यामुळे पुढच्या ५ ते दहा वर्षात पुण्याच्या वाहतुक व्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी हे मेट्रोचं जाळं जे चांदणी चौकात, स्वारगेट मध्ये, पिंपरीचिंचवड, खराडी बायपास, नवले ब्रिज, हिंजवडी अशा शहराची हर्टबीट बंद करणार्या ठिकाणांना श्वास घ्यायला संधी देणार आहे. रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास असा मार्ग जो पुन्हा आत्ताच्या मेट्रो लाईनला जोडला जाईल. हे काम सुद्धा २०३० पर्यंत पुर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. एकदा का फेज १ चे काम पुर्ण झाले मंग हे फेज २ चं काम सुरु होईल. या फेज २ ला आधिच्या Metro लाईनसोबत आणखी एका ठिकाणी जोडंल जाईल ज्यामध्ये असणार आहे. नळ स्टॉप – कर्वेनगर – वारजे ब्रीज – दौलत नगर आणि माणिकबाग. INDIA vs PAK WAR भारतीय सिमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या; Operation Sindoor 2.0 होण्याची शक्यता
Santosh Khade: ऊसतोडीचे पोऱ्यापासून पोलिस अधिकारी बनले
Santosh Khade: उसतोडी कुटुंबातून पोलीस अधिकारी झाला ज्या बीडला गुन्हेगारीसाठी, ज्या मराठवाड्याला सद्या शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी, उसतोडणी कामगारांसाठी ओळखला जाणारा हा भाग आणि बीड जिल्हा.जसे की संघर्षाच्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या. पण हेच पोरगं जेव्हा कामावर रुजु झालं आणि त्याने आपल्या कामाची झलक दाखवली तेव्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा शॉक झाला होता. लोकं मात्र त्याच्या कामाचं कौतुक करत होते. अजुन त्याचं ट्रेनींग सुद्धा पुर्ण झालं नव्हतं. तो पोरगा होता Santosh Khade अहिल्यानगर जिल्हा त्यांच्या बेकारदेशीर कामांवर केलेल्या धाडींमुळे खुप गाजला. आई-वडीलांनी आयुष्यभर ऊसतोडला. ह्याची जाणीव असलेला त्यांचा मुलगा संतोष खाडे. २०२१ च्या आपल्या पहिल्या प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत मुलाखतीपर्यंत जाऊनही मिरिटमध्ये बसला नाही. वडलांना फोन केला. काय झालं ते सांगीतलं. ते म्हणाले, भावड्या ३० वर्ष उस तोडलाय. तुझ्यासाठी अजून ५ वर्ष ऊस तोडू पण तू मागं हटू नको. पुढच्या प्रयत्नातचं त्यांचं पोरगं MPSC खुल्या गटात १६ वं आणि एनटी-डी प्रवर्गात पहिलं आलं. गावात झालेली जबरदस्त एन्ट्री, त्याच्या झालेल्या बातम्या. सगळ, सगळं काही गाजलं. मिडिया आली, मुलाखती झाल्या. आजपासून आई-बापाच्या हातचा कोयता सुटला हे त्या नव्याने अधिकारी झालेल्या पोराच्या वाक्याने सगळे भावनिक झाले. असे अनेक कोयते मला सोडवायचे आहेत असंही तो म्हणाला. पण आजवर मोठा साहेब झालेल्या व्यक्तीची कहानी इथपर्यंतच ऐकायची आपल्याला सवय आहे. या सामान्य कुटुंबातून आलेल्या पोराने जो नुकताच भरती झालाय. अजूनपर्यंत पोस्टींगपण झालेली नाही. ज्याला म्हणतात परिवेक्षाधिन पोलीस अधिकारी. लक्षात ठेवा कारण अहिल्यानर जिल्हाला हा शब्द चांगला पाठ झालाय. परिविक्षाधीन म्हणजेच ट्रेनींग मध्ये असताना असा धुमकुळ घातला की संपुर्ण जिल्हा, जे पत्रकार कायम पोलीस प्रशासनाला धारेवर धरतात. ते कौतुकाचा वर्षाव करायला थकत नव्हते. सलग सहा महिने एकच नाव धुमाकुळ घालत होतं. परिविक्षाधिन अधिकारी Santosh Khade. ४ ऑक्टोबर २०२५ ला Santosh Khade चं प्रशिक्षण पुर्ण झालं. त्यांच्या या सोशल मिडीया पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. फक्त अहिल्यानगरच नाही तर राज्यभरातून. याच वर्षाच्या सुरवातीला त्यांच्या ट्रेनींगचा भाग म्हणून त्यांना नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला. गुन्हेगारांची पुरती तारांबळ उडाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या भागात गावगुंडांकडून अवैध वाळूउपसा जोरात चालतो. अचानक वेशांतर करुन हा नविनच रुजु झालेला साहेब धुमाकुळ घालू लागला. वाळूच्या बोटीच्या बोटी उडवून देण्यात आल्या. नेवाशातले अवैध धंदे विशेषकरुन गुटखा विकणाऱ्यांना त्यांच्या मुद्धेमालासहीत जप्प करण्यात आलं. काय करायचं. कुणाकडं जायचय. कुणाला लाज द्यावी. कुठल्या राजकीय नेत्याला फोन लावावा का? दोन नंबर वाल्यांना काहीच सुचत नव्हतं. अशात लवकरच तिथलं काम संपलं. डुब्लीकेट दारु, गुटखा, गुन्हेगारी घटकाला वाटलं की आपण वाचलो. पण यानंतर मिळाला अहिल्यानगर जिल्हाचा चार्ज. ट्रेनींगचाच हा भाग होता. डिवायएसपी साहेबांना ट्रेनींग संपेपर्यंत सगळ्या चुका माफ आहेत. त्यामुळे ते कुणालाच घाबरत नाहीत. अशी चर्चा मागच्या काही महिन्यात जिल्हाच्या चौकाचौकात होती. एकदा वेषांतर करुन त्यांनी समृद्धी महामार्गावर गुटखा घेऊन जाणारा ट्रक पडकला. त्यात ६६ लाख रुपये किमतीचा माल जप्प झाला. आणि ही काही फक्त एक कारवाई नव्हती अशा कारवाया विविध अवैध धंद्यांवर, वाळू माफीयांवर, गुन्हेगारांवर, दारुविक्रेत्यांवर होत होती. एका बातमीत त्यांनी ३३ दिवसात ५४ धडक कारवाया केल्याचं सांगण्यात आलं होतं. यातूनच सुरु झाला Santosh Khade पॅटर्न. Gold Prices : दिवाळीच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करावी का? सोन्याचे भाव गगनाला का भिडले? Santosh Khade हा बीड जिल्ह्यातील एक सामान्य उसतोडी कुटुंबातून आलेला तरुण आहे. आई-वडीलांनी आयुष्यभर ऊसतोड काम करून जीवन कट्टर केले, पण संतोषला नेहमीच उच्च शिक्षण आणि समाजात चांगले स्थान मिळावे, ही इच्छा होती. २०२१ मध्ये प्रथम प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत मुलाखतीपर्यंत पोहचूनही तो यशस्वी झाला नाही. पण त्याने मागं हटण्याचा विचार केला नाही. वडील म्हणाले, “तुझ्यासाठी अजून पाच वर्ष ऊस तोडू, पण तू मागं हटू नको.” या प्रेरणेने संतोषाने पुढील प्रयत्न केला आणि MPSC खुल्या गटात १६ वा आणि एनटी-डी प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला. संतोषच्या गावात आणि जिल्ह्यात याची जबरदस्त चर्चा झाली. मात्र त्याच्या खरी क्षमता नंतर दिसून आली, जेव्हा त्याला नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा चार्ज मिळाला. ट्रेनींग पूर्ण केल्यानंतर संतोषने अवैध वाळू, दारु, गुटखा विक्रीसह विविध गुन्हेगारी कारवाया करून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आघात केला. फक्त ३३ दिवसात ५४ कारवाया करून त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. संतोष खाडे हा उदाहरण आहे की कुटुंबाची साधेपणा, कठोर मेहनत आणि इच्छाशक्ती यांच्यासह कोणताही सामान्य युवक समाजात उच्च स्थान मिळवू शकतो. बीडसारख्या जिल्ह्यातून आलेला हा तरुण आता महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनात आदर्श म्हणून ओळखला जातो.
Maharashtra farmers: टॅक्स देतात, अनुदान मिळणे कठीण!
Maharashtra farmers : farmers tax भरत नाहीत. भरला तर थोडेच भरत असतील. यांना फक्त अनुदान पाहिजेत. शेती न केलेल्या शहरी मध्यमवर्गीयांची हिच समजूत असते. आज जेव्हा महाराष्ट्र सरकार ३१ हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करतयं. तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असतील. पण त्यातली त्या शेतकऱ्यापर्यंत खरी मदत कीती पोहचणार हा मोठा प्रश्न आहे. त्याबदल्यात सरकारची मदत किती तुटपुंजी आहे. दुष्काळ पडला, शेतकऱ्याला मदत. गारपीट झाली मदत, अतिवृष्टी झाली मदत. रोगराई पसरली मदत. लाईट बील माफ, वेगवेगळी अुनदानं, कर्जमाफ्या. अरे बापरे सरकार शेतकऱ्यांसाठी कीती करतं. तुम्हाला पण असचं वाटतं का? विलास शिंदे हे समुह शेतीच्या माध्यमातून नाशिक मध्ये सह्याद्री फार्म नावाची कंपनी चावलतात. त्यांनी आकडेवारीसहीत सरकार कसं शेतकऱ्याकडून tax च्या स्वरुपात ४ रुपये घेतं आणि त्यातलाच १ रुपया. टुकड्या-टुकड्यात देतं असं सांगितलं. त्यांनी सांगितलेलं हे गणित आपले डोळे उडणारं आहे. एकट्या सह्याद्री फार्मने जी जवळपास १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा समुह आहे. मागच्या १४ वर्षात सरकारला टॅक्सच्या माध्यमातून २१८ कोटी रुपये दिले आहेत. त्यात वेगवेगळ्या अनुदान योजनांमधुन त्यांना ५४ कोटी मिळाले. म्हणूनच ते म्हणतात की farmers कर भरत नाही असं कोण म्हणतं? Goverment आम्हाला त्यांना आम्ही दिलेल्या ४ रुपयातला १ रुपया देतं. बऱ्याचजनांना वाटेल समुह शेतीमुळे आणि दुसऱ्या देशात विकलेल्या शेतीमालामुळे ही शेतकऱ्यांची कंपनी पैसा कमवत असेल. त्यामध्ये काही प्रणामात तथ्य पण आहे. पण सामान्य farmers सुद्धा Goverment च्या तिजोरीत किती पैसा वर्षाला जमा करतो याचं त्यांनी एक उदाहरण दिलं. एक एकर द्राक्षबागेला लागणाऱ्या गोष्टी. जसंकी तार, स्टिल अजूनही इतर गोष्टी याला जो खर्च येतो. त्यातला ३६ हजार रुपये नुसता टॅक्सच जातो. आणि हा दरवर्षी जोतो. महाराष्ट्रातलं एकूण द्राक्ष पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा विचार केला तर जीएसटीतून तो १२ हजार कोटी रुपये भरतो. बरं हे फक्त द्राक्ष वाल्यांचं. सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात शेतकरी करत असलेल्या शेतीमालाची उलाढाल आहे ४ लाख कोटी रुपये. त्यातला सर्वसाधारण जीएसटीचा स्लॅब आजवर लागत होता त्या हिशोबाने विचार केला तर वर्षाला याच्यातून सरकारला मिळणारा tax आहे ७० ते ८० हजार कोटी. जे म्हणतात की शेतकरी agricultural tax भरत नाही. त्यांना हा आकडा दाखवा. Vilas Shinde नी साध्या पद्धतीने सांगीतलं. शेतीला तुम्ही व्यवसाय म्हणून बघा. आता सरकार काय करतं. एखादा उद्योग राज्यात आणण्यासाठी त्याच्यात एकप्रकारे गुंतवणूकच करत असतं. त्या उद्योगांना कवडीमोल भावाने जमीनी उपलब्ध करुन दिल्या जातात. तुम्ही ऐकलं असेल १ रुपया एकर या भावाने जमीनी उद्योगासाठी दिली. त्या उद्योगासाठी पाण्याची सोय करतं. एमआयडीसीत २४ तास विज असते. सुरवातीला tax मद्ये त्याला स्थिरस्थावर होईपर्यंत सुट दिली जाते. अनेक सबसीडीज असतात. हे सरकार का करतं. तर भविष्यात त्यांना त्यातून चांगला परतावा मिळणार असतो. जर ७० हजार कोटी पेक्षा जास्त शेतीसाठी लागणाऱ्या आणि शेतीमालामुळे सरकारला मिळत असतील तर त्याच्या भविष्यासाठी सरकारने त्याला जमीनीची सोडा. पण मुबलक पाण्याची. २४ तास विजेची. वेगवेगळ्या सबसीडीजची सोय करायला नको. सरकार काय करतं. ठिबकवर सबसीडी. ते पैसै कुणाला? ठिबक कंपनीला. थेट मदत का करत नाही. थेट मदत कीती करतं. वर्षाला १२ हजार रुपये. किसान सन्मान योजनेचे. अहो खतावर लागणार tax कमी करा. त्याला सगळं कळतयं. हा पैसा कुठं जातोय ते. असं तुकड्यातुकड्यात का देता. वर्षााल ७० हजार कोटीचा tax देणाऱ्या शेतकऱ्याला ३१ हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा झाल्यावर ते सगळ्यांना जास्त वाटतं असतील. पण ते सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी खुप मोठा संघर्ष आहे. Goa Protest : गोव्यातले लोकं रस्तावर का उतरले? CM, पोलीस आणि भाजप यांच्या कार्यालयावरही मोर्चा
२०२६ युद्धाचा धोका? India-Pakistan टकराव ?गुजरात का केंद्र?
Operation Sindhur नंतर पाकिस्तान शांत बसेल हे एक दिवास्वप्नच आहे. आणि म्हणुनच २०२६ च्या शेवटीपर्यंत India-Pakistan मध्ये एक मोठं युद्ध होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. यावेळी याचं केंद्र कश्मिर नसुन गुजरात बॉर्डर असणार आहे. भारताच्या संरक्षण मंत्र्यांच्या एका वक्तव्याने याने दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा विषयाच्या जाणकारांना असं का वाटतयं. पाकिस्तानची अंतर्गत अवस्था — का भारताकडे लक्ष्य?आपल्यापैकी बऱ्याचजनांना असं वाटतं की India-Pakistan हा संघर्ष फक्त कश्मिरसाठी आहे. मुळात आपण जो नकाशा लहानपणापासून बघतो त्यामुधल्या कश्मिरचा मोठा भाग हा फाळणीनंतर पासून पाकिस्तानमध्ये आहे. ज्याला आपण पिओके म्हणजेच पाक ऑक्युपाईड कश्मिर म्हणतो. पाकिस्तानसोबत हा कश्मिरचा मुद्धा निकाली निघला तर शांती प्रस्थापित होईल असं अनेक लोकांना ज्यांना देशाची प्रगती, गरीबी हे मुद्धे महत्वाचे वाटतात. त्यांना वाटतं. परंतु निट विषय समजुन घेतला तर लक्षात येईल की भारतासोबत सतत युद्धजन्य परिस्थिती राहणं. किंवा भारताला आपलं कट्टर शत्रु माननं. याच्यावरचं पाकिस्तान हा देश सध्या टिकुन आहे. माझं हे बोलण कदाचीत तुम्हाला अतिशोक्ती वाटतं असेल म्हणूण काही उदाहरण देतो. तुम्ही पाहिलं नेपाळमध्ये लोकांनी काय केलं. ते झालं तिथं वाढलेल्या कमालीच्या बेरोजगारीमुळे, अमाप भ्रष्टाचारामुळे लोकं रस्त्यावर आली आणि त्यांनी संसद, राष्ट्रपती भवन पेटवून दिली. बांग्लादेशमध्ये सुद्धा तरुणांनी केलेल्या आंदोलनामागे हीच कारणं होती. त्यांच्या पंतप्रधानांना देश सोडावा लागला. आपण खाली श्रीलंकेत काय झालं पाहिलं असेल. तर अर्थकारण बिघडलं. लोकांना पेट्रोल घ्यायला लाईनीत थांबावं लागलं. तिथंही पंतप्रधान देश सोडून गेला. सगळीकडे एक गोष्ट कॉमन दिसेल. राजकारण्यांचा भ्रष्टाचार, प्रचंड गरीबी, बेरोजगारी हे असलं की अराजकता माजते आणि लोकं सरकार आणि आर्मीला सुद्धा जुमानत नाहीत. पण हे पाकिस्तान मध्ये का होत नाही? जो पाकिस्तान कितीतरी दशकापासून फक्त विदेशी कर्जावर अवलंबून आहे. बेरोजगारी विचारु नका. भ्रष्टाचाराला माप नाही. त्याच्या इतिहासात एकाही पंतप्रधानाने त्याची पाच वर्षाची कारकिर्द पुर्ण केलेली नाही. पाकिस्थान मध्ये जितकी राज्य आहेत. त्यामध्ये पाकिस्तान मध्ये असणारं पंजाब राज्य सोडून इतर सर्व राज्यांवर अन्याय होतो. बलुचीस्थान त्याचच उदाहरण. तरीही लोकं सत्ताधारी किंवा तिथल्या आर्मीच्या विरोधात रस्त्यावर का येत नाहीत. तर त्याला कारण आहे भारत. हो तुम्ही बरोबर ऐकलयं. ऑपरेशन सिंदुर — काय आहे आणि त्याचा प्रभाव काय?संपुर्ण पाकिस्तान सरकार आणि तिथली आर्मी कधीही लोकांच्या मनात तिथल्या व्यवस्थेबद्दल राग वाढू लागला की मुद्धाम भारतासोबत युद्ध करते. ते छोटसं युद्ध झालं आणि त्यात त्यांचं नुकसान जरी झालं तरी लोकांचं लक्ष त्यांच्या मुलभुत प्रश्नांवर सोडून भारतावर जातं. आणि आपला देश संकटात आहे. भारत आपला शत्रु आहे त्यामुळे आपण सरकार आणि आर्मीच्या मागे उभं रहायला हवं ही भावना काही काळासाठी का असेना त्यांच्यात येते. आणि ही कुठलीही मनगडंत कथा नसुन पाकिस्तानचं वास्तव आहे. नाहीतर तुम्हीच विचार करा जो देश तेला मिठाला महाग असेल तो हजारोकोटी रुपये आंतकवादासाठी आर्मीसाठी का खर्च करेल. आत्ता झालेल्या ऑपरेशन सिंदुरनंतर तिथल्या सैन्यावर खर्च केला जाणारा निधी दुपटीने वाढवण्यात आला. लोकांचं लक्ष मुलभुत प्रश्नांवरुन भटकवण्यासाठी असा मोठा शत्रु उभा करण्याचं कारस्थान जगात अनेक ठिकाणी सुरु असतं. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण तर सध्या मराठवाड्यातली परिस्थीती आहे. एवढ्या पुरातही आणि अडचणीतही हिंदु-मुस्लिम किंवा मराठा-ओबीसी कीती जोरात सुरु आहे याच्यावरुनच तुम्ही अंदाज लावा. असो. आपल्या मुळ विषयावर येऊ. हे सगळं सांगण्याचं कारण, की भारताने कीतीही नरमाई घेतली किंवा कितीही आक्रमक भुमिका घेतली तरी पाकिस्तान काही दिवसानी कशानाकशा मार्गाने भारताची खोडं काढत राहणार हे नक्की. त्याचाच भाग म्हणून आता त्याने गुजरातच्या सिमेवर असणारा काही भाग आपला असल्याचं दावा करायला सुरवात केली आहे. सोबतच त्या भागात त्याची सैन्य ताकत वाढवायला सुरुवात केली आहे. २०२६ मध्ये युद्ध होण्याचा अंदाज ?दसऱ्याच्या मुहुर्तावर भारताचे संरक्षण मंत्री यांनी यावर स्पष्टपणे बोलताना सांगितलं, “पाकिस्तानने गुजरातच्या सर क्रिक या सिमावर्ती भागात काही करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात असुद्या १९६५ मध्ये भारतीय सैन्य कराचीपर्यंत पोहोचलं होतं. आता २०२५ मध्ये असं काही झालं तर कराचीच्या सस्त्यातच सर क्रिक पडतं. सगळा इतिहास आणि भुगोल बदलुन टाकू.” अर्थात अशी भाषा दोन्ही बाजूने सुरु असतेच पण इथे गुजरातच्या सिमेवर आता पाकिस्तान काही कुरापती करायला लागलयं हे दिसुन येत. त्यामध्ये ऑपरेशन सिंदुरनंतर भारताने जी काही मोठमोठी शस्त्रखरेदी केली आहे किंवा आपल्या संरक्षण क्षेतात जी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होते आहे. ते बघुन ही मोठ्या युद्धाची पुर्वतयारी असल्याचं आपल्याला दिसतय. सोबत भारताने हे स्पष्टपणे सांगीतलयं की ऑपरेशन सिंदुर अजुन संपलेलं नाही. पाकिस्तान काही कुरापती करतयं हे पाहुन भारत योग्य वेळ साधून एखादा मोठा झटका पाकिस्तानला देऊ शकतं. जसा १९७१ च्या युद्धात दिला होता. तर त्यात नवल वाटायला नको. कारण युद्ध हे आपल्या वेळेनुसार खेळायचं असतं. २०२६ मध्ये India-Pakistan मध्ये मोठं युद्ध होऊ शकतं याचं मोठा आधार हा २०२१ मध्ये अमेरिकेतल्या एका थिंक टॅंकने वर्तवलेल्या अंदाजात आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषयक घटनांचे जाणकार यामध्ये वर्तवण्यात आलेल्या शक्यतेला खुप गंभिरतेने बघतायत आणि विश्वासार्ह्य मानत आहे. त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पुढच्या पाच वर्षात मोठं युद्ध India-Pakistan यांच्यात होऊ शकतं. आणि ऑपरेशन सिंदुर त्याची फक्त झलक असल्याचं बोललं जातय. सध्या भारतासमोर अनेक मोठे प्रश्न असले तरी पाकिस्तानचा तोडगा काढल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकणार नाही हे एव्हाणा भारताच्या लक्षात आलं आहे. Jyoti Waghmare Viral Video : ज्योती वाघमारे बरोबर की सोलापुरचे कलेक्टर Kumar Ashirwad
Gautami Patil Car Accident : हिट ऍंड रन प्रकरणात नविन अपडेस
सेलीब्रीटी त्यांच्या गाड्या आणि त्या गाडीचा अपघात. हे काही जिवाभावाचं नात झालयं की काय माहीती. Gautami Patil च्या गाडीने एका रिक्षाचालकाला ठोकल्याची बातमी मागच्या काही दिवसापासून येत आहेत. अशात काही नविन माहीती यात समोर आलेली आहे. Gautami Patil चे कॉल रेकॉर्डही मागवण्यात आले आहेत. Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?