अमरावती येथील मोझरी गावात चालू असलेलं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष Bacchu Kadu यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर सातव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी मानधन वाढवण्याच्या मागण्या घेऊन Bacchu Kadu यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं.

या आंदोलनात त्यांच्यासह ५० पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपोषणाची ७ दिवसे सुरू असताना Bacchu Kadu यांची प्रकृती खालावली. रक्ताच्या उलट्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी नकार दिला.
सरकारद्वारे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नंतरच्या मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन आश्वासन दिले. उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी पाणी पिऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या पत्रात सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे.
मात्र Bacchu Kadu यांनी स्पष्ट केलं की आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेलं नसून, ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. जर तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल. “उदय सामंतजी, जर विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत होता. मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाचं समर्थन केलं होतं. नायना कडू या पत्नीनेही भावनिक समर्थन दिलं होतं.
या पार्श्वभूमीवर,Bacchu Kaduनी उद्या 15 जून रोजी राज्यभर नियोजित असलेलं रास्ता रोको आंदोलन देखील मागे घेण्याची घोषणा केली. “रास्ता रोको होणार नाही, पण सरकारने धोका दिल्यास रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
आता सरकारने पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठीच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय आंदोलनांची हवा तयार झाली आहे.