छावा’ सिनेमामुळे वाद वाढले, नागपूर हिंसाचाराचा विकी कौशलला जबाबदार धरलं जातं? नुकताच नागपूरच्या महाल परिसरात उसळलेल्या दंगलीनंतर पुन्हा एकदा अभिनेता Vicky Kaushal च्या ‘छावा’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. औरंगजेब आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक संघर्षावर आधारित या सिनेमानं महाराष्ट्रात मोठा प्रभाव टाकला. मात्र, आता हा चित्रपट हिंसाचाराला कारणीभूत ठरत असल्याचा आरोप केला जात आहे. विवाद कशामुळे उफाळला? फेब्रुवारीमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ चित्रपटात औरंगजेबाच्या क्रौर्याचे प्रसंग दाखवण्यात आले. त्यानंतर काही राजकीय नेत्यांनी औरंगजेबाचं समर्थन केल्यामुळे वाद आणखी चिघळला. नागपूरमध्ये झालेल्या दंगलीनंतर काही लोकांनी सोशल मीडियावर विकी कौशल आणि ‘छावा’ चित्रपटाला जबाबदार ठरवायला सुरुवात केली. चाहत्यांची प्रतिक्रिया – “सिनेमाला दोष देणं योग्य नाही!” सोशल मीडियावर विकी कौशलवर टीका होत असतानाच त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याचा समर्थनार्थ आवाज उठवला. ‘छावा’ सिनेमाचा प्रभाव आणि राजकीय वातावरण ‘छावा’ सिनेमाने प्रेक्षकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी अभिमान जागवला असला तरी त्यावरून समाजात दोन गट पडताना दिसत आहेत. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापले आहे. तुमच्या मते, ऐतिहासिक चित्रपट समाजावर परिणाम करतात का? ‘छावा’ सिनेमाला जबाबदार धरणं योग्य आहे का? तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा!