Aurangabad Kidnapping -Police Academy भरतीसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीवर संचालकाचा जीव जडला. कॉन्टक्ट कसं करायचं म्हणून एका 20 वर्षीय विद्यार्थ्याला त्याने हाताशी धरलं आणि कॉन्टॅक्ट सुरु झालं. थोड्या दिवसात त्याच विद्यार्थ्यासोबत संचालकाचा वाद झाला. आता हा पोरगा आपलं सिक्रेट ओपन करणारं म्हणून त्यालाच किडन्याप करण्याचा प्लॅन संचालकाने आखला. मात्र Chhatrapati Sambhajinagar च्या सिल्लोड मधील पोलींसांनी हा प्लॅन उधळून लावला. घटनेची पार्श्वभूमीChhatrapati Sambhajinagar च्या सिल्लोड मधल्या केळगावंचा Amol Makhala नावाचा २० वर्षीय तरुण. साधारण वर्षभरापुर्वी तो पोलीस भरतीच्या तयारीसाठी हिंदवी करिअर ॲकॅडमीत जॉईन झाला. त्याच ॲकॅडमीचा संचालक असलेल्या दशरथ विठ्ठल जाधव याला एका विद्यार्थिनीवर प्रेम झालं. संचालकाने त्याचं जुळवून देण्यासाठी Amol Makhala हाताशी धरला. वादातून उभं राहिलं संकट अमोलनेही दोघांमध्ये मध्यस्थी करत त्यांना चांगलीच मदत केली. पण काही दिवसातचं त्याचं आणि संचालक असणाऱ्या Dasharath Jadhav याचं काही कारणावरुन भांडण झालं. दशरथ जाधवने अमोलला ॲकॅडमीतून बाहेर काढलं. पण त्याच्या काही ऑडीओ रेकॉर्डींग या अमोलकडं होत्या. जर त्या अमोलने ह्या रेकॉर्डींग किंवा त्याच्याकडं असणारे पुरावे व्हायरल केले तर आपली मोठी बदनामी होईल म्हणून संचालक असणाऱ्या दशरथ जाधवने अमोलला तंबी देण्याचा आणि Kidnapping करायचा प्लॅन आखला. Kidnapping थरारक प्लॅन Dasharath Jadhav त्याच्या ॲकॅडमीत शिकणाऱ्या दोन मुलांना अमोलच्या गावी केळगावला पाठवलं. त्यानंतर अमोलला त्या पोरांसोबत घाटात बोलावलं. तो त्या पोरांसोबत घाटात पोचला तेव्हा Dasharath Jadhav सोबत त्याचा साथीदार गणेश जगतापही होता. गणेश जगताप आणि ॲकॅडमीत शिकणारे कोहळा तांडा गावचे दोन मुलं गणेश सोनूसिंग चव्हाण आणि प्रविण लालचंद राठोड यांनी अमोल मखला दांड्याने मारायला सुरवात केली. तुझ्याकडं असणारे पुरावे आम्हाला दे अशी मागणी त्याच्याकडं केली. अमोल मखने ती रेकॉर्डींग द्यायला नकार दिला. अमोलला बेदम मारहाण करुन त्या चौघांनी त्याला फोरव्हिलर टाकलं आणि अज्ञातस्थळी घेऊन चालले. पण या गाडीतून घेऊन जाताना अमोलच्या एका मित्राने त्याला पाहिलं आणि हिंदवी ॲकॅडमीचा संचालक असणाऱ्या दशरथ जाधवला ओळखलं. अमोलच्या मित्राने ही माहीती त्याच्या घरच्यांना दिली आणि अमोलच्या घरच्यांनी ही माहिती सिल्लोडच्या पोलीसांना दिली. पोलिसांची फिल्मी कारवाई सिल्लोड पोलीसांना Kidnapping माहिती मिळताच. त्यांनी घटनेचं गांभिर्य लक्षात घेऊन तात्काळ यंत्रणा कामाला लावली आणि दशरथ जाधव तसेच त्याच्या साथिदाराच्या तावडीतून अमोलची सुटका केली. पोलीसांनी ताब्यात घेतलेला मुख्य आरोपी दशरथ जाधवसह, त्याचा साथिदार गणेश जगताप आणि हिंदवी करिअर अॅकॅडमीत पोलीस भरतीची तयारी करणारे गणेश चव्हाण आणि प्रविण राठोड यांना न्यायालयात हजर केलं आहे. स्थानिक प्रतिक्रिया न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे, उपनिरीक्षक लहू घोडे, कर्मचारी विश्वनाथ तायडे,यतीन कुलकर्णी, विठ्ठल नागरगोत, रामेश्वर जाधव, रमेश व्यवहारे, अनंत जोशी यांनी भराडी जवळ फिल्मी स्टाईलने आरोपींना अटक केली होती. वाचा अजून संबंधित बातम्या- Jalgaon Crime – Mayuri Thosar Case : हुंडाबळीची आणखी एक घटना जळगावच्या नवविवाहीतेसोबत घडली.
Trending
Prashant Kishor on Raj Thackeray टीका, उद्धव ठाकरेंची स्तुती
महाराष्ट्राच्या राजकाणातला अविभाज्य घटक म्हणून राज ठाकरे किंवा ठाकरे बंधुंकडे पाहिलं जात. परप्रांतियांच्या विषयात रोकठोक आणि आक्रमक भुमिका घेणाऱ्या Raj Thackeray वर आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात Prashant Kishor यांनी एक वक्तव्य केलं आहे. देशातील सर्वात मोठे राजकीय रणणीतीकार म्हणून ज्या प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं जातं. Raj Thackeray यांच्यावर दोन आरोप सतत होतात. पहिला म्हणजे त्यांना स्वतःचे दोन आमदारही निवडून आणता येत नाहीत. दुसरा म्हणजे ते सतत आपली भुमिका बदलत असतात. यातल्या पहिल्या आरोपावर येऊयात. जरी हे खरं असलं की २०१९ मध्ये मनसेचा १ आमदार आणि २०२४ मध्ये शुन्य आमदार निवडून आले. तरिही राज ठाकरेंची महाराष्ट्राच्या आणि विशेषकरुन शहरी भागाच्या राजकारणावर पकड असल्याचं आणि त्यांच्यामुळे राजकीय गणितं बदलतात हे राजकिय जाणकारांना चांगल माहीत आहे. Raj Thackeray फक्त मिडियासाठीचा मुद्धा नसुन महाराष्ट्रातल्या एका मोठ्या लोकसंख्येचा आवाज आहे हे कुणीही नाकारू शकत नाही. दुसरा विषय येतो की ते नेहमी भुमिका बदलतात. राज ठाकरेंच याच्यावर अनेकवेळा स्पष्टिकरण आलेलं असलं किंवा त्यांच त्याच्यावर काहीही म्हणणं असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात असा कोणताच पक्ष शिल्लक राहिलेला नाही ज्याने आपल्या विरोधी विचार असणाऱ्या पक्षासोबत युत्या आघाड्या केल्या नाहीत. भाजप अजित दादांसोबत जाऊ शकतं, कॉंग्रेस Raj Thackeray सोबत जाऊ शकतं. तरिही त्यांना मतात काही फरक पडत नसेल तर महाराष्ट्र हितासाठी म्हणून राज ठाकरे भाजपसोबत गेले काय किंवा राष्ट्रवादी सोबत गेले काय. याचा परिणाम त्यांच्या एकूण राजकारणावर पडता कामा नये. पण हा विषय आपण आत्ता का बोलत आहोत तर बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन एका हिंदी वाहिणीनीला मुलाखत देताना प्रशांत किशोर यांनी राज ठाकरेंचं नाव घेत त्यांना लंपन इलेमेंट असल्याचं म्हटलं आहे. या वक्तव्याचा अर्थ आपण समजून घेऊयात. लंपन इलेमेंट म्हणजेच जास्त महत्वाचा नसलेला घटक. प्रशांत किशोर राजकीय रणणीनीतीकार ज्यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींचं पॉलीटीकल कॅंम्पेन केलं. पंजाब मध्ये कॉंग्रेसचा मुख्यमंत्री बनवण्याचं काम केलं. ममता बॅनर्जीचं कॅंम्पेन पश्चिम बंगाल मध्ये केला. एका निवडणूकीत उद्धव ठाकरेंसोबतही काम केलं. तमिळनाडूच्या स्टलीनसाठी सुद्धा पॉलीटीकल कॅम्पेनींग सांभाळलं. भारताच्या राजकारणाला आपल्या पॉलीटीकल मार्केटिंग किंवा ज्याला कॅंम्पेन म्हणतात त्याच्या जोरावर दिशा देण्याचं काम केलं. त्यांना राज ठाकरेंचा एवढा राग कशामुळे? तर सध्या ते स्वतःच निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. आणि एक पार्टी काढून बिहारच्या राजकारणात स्वतःचं नशिब आजमावत आहेत. याच जनस्वराजचा प्रचार करण्यासाठी किंवा त्याच्याविषयी बोलण्यासाठी त्यांनी एका हिंदी चॅनलला मुलाखत दिली. त्यामध्ये महिला पत्रकाराने त्यांना बिहारी लोकांवर महाराष्ट्रात अन्याय होतो. राज ठाकरे, उद्धव ठाकरे याच्यावर बोलतात. असं सांगत त्यांच्याविषयी तुम्ही काय म्हणाल हा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना प्रशांत किशोर यांनी म्हटलं. “राज ठाकरे हे लंपन इलेमेंट आहे. तिथे महानगरपालिकेची निडणूक आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी काम केलेलं आहे. त्यावेळी बिहारी लोकांवर हल्ले करु नका हिच माझी फी असेल असं त्यांना सांगितलं होतं. त्यामुळे Raj Thackeray च्या शिवसेनेने २०१९ नंतर बिहारी लोकांवर एकही हल्ला केल्याचं उदाहरण दाखवा” असं त्यांनी ठाम पणाने सांगितलं. मुळात काय तर आपलं राजकारण चमकवण्यासाठी बिहारच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन प्रशांत किशोर हे महाराष्ट्रातील नेत्यांवर बोलत आहेत. किंवा मी उद्धव ठाकरेंना सांगून कसं उत्तरेतल्या लोकांवर होणारे हल्ले थांबवले हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःचं राजकारण चमकवताना ज्यांनी अजुन स्वतःचा एकही आमदार निवडून आणलेला नाही. त्या प्रशांत किशोर यांनी महाराष्ट्रातल्या एका अशा नेत्याला नावं ठेवणं म्हणजे स्वतःची उंची वाढवण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्यासारखं काम आहे. त्यांनी अनेकांना राजकीय यश मिळवून देण्यासाठी कॅंम्पेनींगच काम केलेलं असलं तरीही स्वतः लोकात जाऊन निवडणूका लढणं वेगळी गोष्ट आहे. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना राजकीय यश मिळालेलं नसलं तरीही हा चळवळींचा महाराष्ट्र आहे. इथे प्रत्येकजण आपला विचार घेऊन पुढे येत असतो. आणि त्याचा धोरणांवर परिणाम झालेला आहे. राज ठाकरेंच्या माध्यमातून मराठीच्या हितासाठी लढण्याची चळवळ ही सुद्धा त्याचाच एक भाग आहे. आणि महाराष्ट्रातील लोकांना त्याची जाणीवही आहे. हेच त्यांनी समजून घ्यायला हवं. Farmers Income Tax : महाराष्ट्रातला शेतकरी किती टॅक्स भरतो? बघा पूर्णच गणित…
Santosh Khade: ऊसतोडीचे पोऱ्यापासून पोलिस अधिकारी बनले
Santosh Khade: उसतोडी कुटुंबातून पोलीस अधिकारी झाला ज्या बीडला गुन्हेगारीसाठी, ज्या मराठवाड्याला सद्या शेतकऱ्यांच्या अडचणींसाठी, उसतोडणी कामगारांसाठी ओळखला जाणारा हा भाग आणि बीड जिल्हा.जसे की संघर्षाच्या गोष्टी सर्वांनी ऐकल्या. पण हेच पोरगं जेव्हा कामावर रुजु झालं आणि त्याने आपल्या कामाची झलक दाखवली तेव्हा महाराष्ट्रातील एक जिल्हा शॉक झाला होता. लोकं मात्र त्याच्या कामाचं कौतुक करत होते. अजुन त्याचं ट्रेनींग सुद्धा पुर्ण झालं नव्हतं. तो पोरगा होता Santosh Khade अहिल्यानगर जिल्हा त्यांच्या बेकारदेशीर कामांवर केलेल्या धाडींमुळे खुप गाजला. आई-वडीलांनी आयुष्यभर ऊसतोडला. ह्याची जाणीव असलेला त्यांचा मुलगा संतोष खाडे. २०२१ च्या आपल्या पहिल्या प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत मुलाखतीपर्यंत जाऊनही मिरिटमध्ये बसला नाही. वडलांना फोन केला. काय झालं ते सांगीतलं. ते म्हणाले, भावड्या ३० वर्ष उस तोडलाय. तुझ्यासाठी अजून ५ वर्ष ऊस तोडू पण तू मागं हटू नको. पुढच्या प्रयत्नातचं त्यांचं पोरगं MPSC खुल्या गटात १६ वं आणि एनटी-डी प्रवर्गात पहिलं आलं. गावात झालेली जबरदस्त एन्ट्री, त्याच्या झालेल्या बातम्या. सगळ, सगळं काही गाजलं. मिडिया आली, मुलाखती झाल्या. आजपासून आई-बापाच्या हातचा कोयता सुटला हे त्या नव्याने अधिकारी झालेल्या पोराच्या वाक्याने सगळे भावनिक झाले. असे अनेक कोयते मला सोडवायचे आहेत असंही तो म्हणाला. पण आजवर मोठा साहेब झालेल्या व्यक्तीची कहानी इथपर्यंतच ऐकायची आपल्याला सवय आहे. या सामान्य कुटुंबातून आलेल्या पोराने जो नुकताच भरती झालाय. अजूनपर्यंत पोस्टींगपण झालेली नाही. ज्याला म्हणतात परिवेक्षाधिन पोलीस अधिकारी. लक्षात ठेवा कारण अहिल्यानर जिल्हाला हा शब्द चांगला पाठ झालाय. परिविक्षाधीन म्हणजेच ट्रेनींग मध्ये असताना असा धुमकुळ घातला की संपुर्ण जिल्हा, जे पत्रकार कायम पोलीस प्रशासनाला धारेवर धरतात. ते कौतुकाचा वर्षाव करायला थकत नव्हते. सलग सहा महिने एकच नाव धुमाकुळ घालत होतं. परिविक्षाधिन अधिकारी Santosh Khade. ४ ऑक्टोबर २०२५ ला Santosh Khade चं प्रशिक्षण पुर्ण झालं. त्यांच्या या सोशल मिडीया पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. फक्त अहिल्यानगरच नाही तर राज्यभरातून. याच वर्षाच्या सुरवातीला त्यांच्या ट्रेनींगचा भाग म्हणून त्यांना नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा कार्यभार देण्यात आला. गुन्हेगारांची पुरती तारांबळ उडाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या भागात गावगुंडांकडून अवैध वाळूउपसा जोरात चालतो. अचानक वेशांतर करुन हा नविनच रुजु झालेला साहेब धुमाकुळ घालू लागला. वाळूच्या बोटीच्या बोटी उडवून देण्यात आल्या. नेवाशातले अवैध धंदे विशेषकरुन गुटखा विकणाऱ्यांना त्यांच्या मुद्धेमालासहीत जप्प करण्यात आलं. काय करायचं. कुणाकडं जायचय. कुणाला लाज द्यावी. कुठल्या राजकीय नेत्याला फोन लावावा का? दोन नंबर वाल्यांना काहीच सुचत नव्हतं. अशात लवकरच तिथलं काम संपलं. डुब्लीकेट दारु, गुटखा, गुन्हेगारी घटकाला वाटलं की आपण वाचलो. पण यानंतर मिळाला अहिल्यानगर जिल्हाचा चार्ज. ट्रेनींगचाच हा भाग होता. डिवायएसपी साहेबांना ट्रेनींग संपेपर्यंत सगळ्या चुका माफ आहेत. त्यामुळे ते कुणालाच घाबरत नाहीत. अशी चर्चा मागच्या काही महिन्यात जिल्हाच्या चौकाचौकात होती. एकदा वेषांतर करुन त्यांनी समृद्धी महामार्गावर गुटखा घेऊन जाणारा ट्रक पडकला. त्यात ६६ लाख रुपये किमतीचा माल जप्प झाला. आणि ही काही फक्त एक कारवाई नव्हती अशा कारवाया विविध अवैध धंद्यांवर, वाळू माफीयांवर, गुन्हेगारांवर, दारुविक्रेत्यांवर होत होती. एका बातमीत त्यांनी ३३ दिवसात ५४ धडक कारवाया केल्याचं सांगण्यात आलं होतं. यातूनच सुरु झाला Santosh Khade पॅटर्न. Gold Prices : दिवाळीच्या मुहुर्तावर सोनेखरेदी करावी का? सोन्याचे भाव गगनाला का भिडले? Santosh Khade हा बीड जिल्ह्यातील एक सामान्य उसतोडी कुटुंबातून आलेला तरुण आहे. आई-वडीलांनी आयुष्यभर ऊसतोड काम करून जीवन कट्टर केले, पण संतोषला नेहमीच उच्च शिक्षण आणि समाजात चांगले स्थान मिळावे, ही इच्छा होती. २०२१ मध्ये प्रथम प्रयत्नात राज्यसेवा परिक्षेत मुलाखतीपर्यंत पोहचूनही तो यशस्वी झाला नाही. पण त्याने मागं हटण्याचा विचार केला नाही. वडील म्हणाले, “तुझ्यासाठी अजून पाच वर्ष ऊस तोडू, पण तू मागं हटू नको.” या प्रेरणेने संतोषाने पुढील प्रयत्न केला आणि MPSC खुल्या गटात १६ वा आणि एनटी-डी प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवला. संतोषच्या गावात आणि जिल्ह्यात याची जबरदस्त चर्चा झाली. मात्र त्याच्या खरी क्षमता नंतर दिसून आली, जेव्हा त्याला नेवासा तालुक्यात पोलीस स्टेशनचा चार्ज मिळाला. ट्रेनींग पूर्ण केल्यानंतर संतोषने अवैध वाळू, दारु, गुटखा विक्रीसह विविध गुन्हेगारी कारवाया करून जिल्ह्यातील गुन्हेगारीवर आघात केला. फक्त ३३ दिवसात ५४ कारवाया करून त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडली. संतोष खाडे हा उदाहरण आहे की कुटुंबाची साधेपणा, कठोर मेहनत आणि इच्छाशक्ती यांच्यासह कोणताही सामान्य युवक समाजात उच्च स्थान मिळवू शकतो. बीडसारख्या जिल्ह्यातून आलेला हा तरुण आता महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनात आदर्श म्हणून ओळखला जातो.
Gautami Patil Car Accident : हिट ऍंड रन प्रकरणात नविन अपडेस
सेलीब्रीटी त्यांच्या गाड्या आणि त्या गाडीचा अपघात. हे काही जिवाभावाचं नात झालयं की काय माहीती. Gautami Patil च्या गाडीने एका रिक्षाचालकाला ठोकल्याची बातमी मागच्या काही दिवसापासून येत आहेत. अशात काही नविन माहीती यात समोर आलेली आहे. Gautami Patil चे कॉल रेकॉर्डही मागवण्यात आले आहेत. Sangram Jagtap Statment : हिंदुत्ववादी बनलेले संग्राम जगताप Ajit Pawar यांच्या नोटीसीला जुमानतील का?
Maharashtra – अतिवृष्टीत उद्ध्वस्त शेतकरी आणि मनरेगाची लूट
Maharashtra : अतिवृष्टीने ग्रस्त शेतकऱ्याला मिळणार प्रतिहेक्टरी साडेतीन लाख रुपये. ह्या ठळक बातम्या म्हणजेच न्युज हेडलाईन्स वाचून, ऐकून कीती भारी वाटतं. असं वाटतं अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला सरकार कीती मोठी मदत देतय. पण सरकारं नेहमीच शब्दांचा, अटींचा, आकड्यांचा, योजनांचा फसवा डाव टाकत असतात. शेतकऱ्याला या पुर आणि अतिवृष्टीच्या संकटातून सावरताना आपली साख राखण्यासाठी सरकारने खरडून गेलेल्या जमीनींसाठी देऊ केलेली प्रतिहेक्टरी साडेतीन लाख रुपयाची मदत कशी मोठी करुन सांगीतली आहे. सोबतच मनगेराच्या माध्यमातून यातली ८० टक्यापेक्षा जास्त रक्कम भेटत असताना. MGNREGA काय आहे? आणि या योजनेला संपवण्याचा विडा उचललेल्या केंद्र सरकारने त्यासाठी शेतकऱ्याला कसं त्याचं प्यादं बनवलं आहे. शेतकऱ्याच्या नजरेतून कर्जमाफीची खरी कहाणी | ३ कर्जमाफ्या, ३ गोष्टी
Google चा 27वा वाढदिवस! जाणून घ्या सुरुवात आणि खास गोष्टी
गूगल चा 27वा वाढदिवस! आज जगातील सर्वात मोठी इंटरनेट सर्च कंपनी Google आपला 27वा वाढदिवस साजरा करत आहे. जगातील जवळजवळ प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं हे सर्च इंजिन आज फक्त एक वेबसाईट नाही, तर अब्जावधी लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देणारी सर्वात मोठी माहितीची खाण आहे. गूगलची सुरुवात कशी झाली? Larry Page आणि Sergey Brin हे स्टॅनफोर्ड विद्यापीठात पीएचडी करत असताना त्यांनी इंटरनेटवरील माहिती व्यवस्थित शोधता यावी यासाठी एक सर्च इंजिन तयार करण्याचा निर्णय घेतला. 4 सप्टेंबर 1998 रोजी गूगलला एका प्रायव्हेट कंपनी म्हणून नोंदवण्यात आलं. मात्र, अधिकृतपणे 27 सप्टेंबर 1998 हा गूगलचा बर्थडे मानला जातो. गॅरेजमधून Googleplex पर्यंतचा प्रवास गूगलचं पहिलं ऑफिस हे अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील एका छोट्याशा गॅरेजमध्ये होतं. पण आज त्याचं मुख्यालय Mountain View, California मध्ये असून त्याला Googleplex म्हणून जगभर ओळखलं जातं. गूगलचे पहिले दिवस सुरुवातीला फक्त सर्च इंजिन म्हणून काम करणाऱ्या गूगलने हळूहळू स्वतःला इतर अनेक सेवांमध्ये विस्तारलं. गूगलमधील अनोख्या गोष्टी गूगलची आजची ताकद आज गूगल हे फक्त सर्च इंजिन नाही तर जगातील सर्वात मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक आहे. भारत आणि गूगल भारतामध्ये गूगलची लोकप्रियता प्रचंड आहे. गूगल सर्च, यूट्यूब, Gmail, Android मोबाईल – हे सर्व भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग झाले आहेत. 27 वर्षांच्या या प्रवासात गूगलने जगातील प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्याला जोडून ठेवलं आहे. लहानशा गॅरेजमधून सुरू झालेलं हे सर्च इंजिन आज Artificial Intelligence च्या युगात नवी दिशा दाखवत आहे. Navratri : घटस्थापना आणि शेतीचा शोध लावणारी ‘ती’ यांच्यातला दुवा सांगणारा इतिहास
Katrina Kaif Pregnancy: विकी-कतरिनाची ‘गुड न्यूज
Katrina Kaif-Vicky Kaushal ची ‘गुड न्यूज’ Katrina Kaif Pregnancy : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री Katrina Kaif आणि तिचा पती, अभिनेता Vicky Kaushal यांनी अखेर आपल्या चाहत्यांसोबत मोठी बातमी शेअर केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या प्रेग्नन्सीच्या चर्चांना पूर्णविराम देत त्यांनी ‘गुड न्यूज’ अधिकृतपणे जाहीर केली आहे. इन्स्टाग्रामवर एक सुंदर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत कतरिनाने आपल्या बेबी बंपचं दर्शन घडवलं. विकी कौशल तिच्या शेजारी उभा असून, दोघेही प्रेमाने बेबी बंपकडे पाहताना दिसत आहेत. “On our way to start the best chapter of our lives with hearts full of joy and gratitude 🙏” अशा कॅप्शनसह ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चाहत्यांचा आनंद आणि प्रतिक्रिया ही पोस्ट शेअर झाल्यानंतर काही मिनिटांतच लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला. Bollywood News मध्ये ही बातमी ट्रेंडिंग झाली आहे. चाहत्यांनी आणि मित्रपरिवाराने या जोडप्याला शुभेच्छांचा वर्षाव केला. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून Katrina Kaif Pregnancy बद्दल अफवा पसरल्या होत्या. मात्र दोघांनीही या अफवांवर मौन राखलं होतं. आज त्यांनीच सर्व चाहत्यांना ही आनंदवार्ता दिली आहे. विकी-कतरिनाचं लग्न आणि नातं Vicky Kaushal आणि Katrina Kaif यांचं लग्न 2021 मध्ये झालं. राजस्थानातील सिक्स सेंसेस रिसॉर्टमध्ये झालेलं हे राजेशाही लग्न बॉलिवूडमध्ये खूप गाजलं. लग्नानंतर दोघेही कामात व्यस्त होते, पण त्यांच्या नात्याची गोडी कायम सोशल मीडियावर झळकत होती. दोघंही नेहमीच एकमेकांच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसतात. आता या नात्याला एका नव्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. करिअरवर थोडं ब्रेक Katrina Kaif ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ‘एक था टायगर’, ‘जब तक है जान’, ‘जीरो’, ‘टायगर 3’ अशा हिट चित्रपटांत तिने काम केलं आहे. लग्नानंतरही तिने काही महत्त्वाचे प्रोजेक्ट केले, मात्र आता ती कुटुंबाला प्राधान्य देणार असल्याचं दिसतंय. Vicky Kaushal मात्र आपल्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ‘सॅम बहादुर’नंतर तो आणखी काही मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. पण या गुड न्यूजमुळे आता विकी देखील कुटुंबासोबत वेळ घालवणार आहे. कतरिनाचा बेबी बंप फोटो कतरिनाने शेअर केलेला बेबी बंप फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोत विकी-कतरिनाचा आनंद स्पष्ट दिसत आहे. हा फोटो त्यांच्या जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात दर्शवतो. रेडिटवर आधी व्हायरल झालेला लालसर गाऊनमधला कतरिनाचा फोटो खरा ठरला. त्यातही तिचा बेबी बंप दिसत होता. चाहते उत्साहित या बातमीमुळे फक्त चाहत्यांचाच नाही तर संपूर्ण बॉलिवूड उद्योगात आनंदाची लहर पसरली आहे. विकी-कतरिनाच्या या नव्या प्रवासासाठी सर्वजण शुभेच्छा देत आहेत. काहींनी तर त्यांचा येणारा बेबी “स्टार किड” म्हणून आधीच सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे. Kantara Chapter 1 : पंजूर्ली देवाची गूढ कहाणी Dashavatar Movie REVIEW : दशावतार गाजला! विकेंडनंतरही शो हाऊसफुल ; ही आहेत कारणं..!
Ind vs Pak : साहिबजादा फरहानच्या Gun Celebration वर वाद
Sahibzada Farhan Gun Celebration : क्रिकेट हा खेळ नेहमीच सज्जनांचा मानला जातो. मात्र कधी कधी खेळाडूंच्या मैदानावरील कृतीमुळे वाद निर्माण होतात. आशिया कप 2025 च्या Ind vs Pak सुपर-4 सामन्यात असाच प्रकार घडला. पाकिस्तानचा सलामीवीर Sahibzada Farhan याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर केलेल्या Gun Celebration मुळे सोशल मीडियावर प्रचंड खळबळ उडाली. IND vs PAK Asia Cup 2025: काय घडलं? 21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या आशिया कप सुपर-4 सामन्यात भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात खेळापेक्षा पाकिस्तान खेळाडूंच्या नापाक हरकतींनी अधिक मथळे मिळवले. पहिल्या डावात 50 धावा पूर्ण करताच साहिबजादा फरहाननं बॅट उचलून AK 47 सारखी गोळीबाराची ॲक्शन केली. ही कृती पाहून भारतीय चाहत्यांचा संताप अनावर झाला. व्हिडीओ क्षणात व्हायरल झाला आणि ICC action on Sahibzada Farhan अशी मागणी सुरू झाली. साहिबजादा फरहानची पहिली प्रतिक्रिया वाद वाढताच Sahibzada Farhan On Celebration याने आपली बाजू मांडली. “मी जे Gun Celebration केलं, ते पूर्णपणे तात्कालिक होतं. साधारण मी अर्धशतकानंतर फारसं सेलिब्रेशन करत नाही. पण अचानक माझ्या डोक्यात आलं आणि मी ते केलं. लोक काय म्हणतात, याची मला पर्वा नाही,” असं फरहाननं सांगितलं. म्हणजेच झालेल्या वादानंतरही फरहानने माफी मागण्याऐवजी आपला माजोरडेपणा कायम ठेवला. सोशल मीडियावरील संताप कोण आहे साहिबजादा फरहान? (Who is Sahibzada Farhan?) Sahibzada Farhan Biography : साहिबजादा फरहानची क्रिकेट कारकीर्द Domestic Cricket मध्ये सतत चांगली कामगिरी करून फरहानला आंतरराष्ट्रीय संधी मिळाली. यातून स्पष्ट होतं की, फरहान पाकिस्तान संघासाठी महत्त्वाचा सलामीवीर आहे. मात्र त्याच्या वादग्रस्त कृतीमुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम झाला आहे. Gun Celebration वादाचं गांभीर्य क्रिकेट हा फक्त खेळ नाही, तर तो क्रीडा संस्कृतीचं प्रतीक आहे. खेळाडूंनी आपली कृती विचारपूर्वक करायला हवी. ICC ची संभाव्य कारवाई सध्या ICC Code of Conduct नुसार खेळाडूंनी शिस्तभंग केल्यास दंड किंवा निलंबन होऊ शकतं. भारतीय चाहत्यांची नाराजी Ind vs Pak यांच्यातील सामने हे नेहमीच हाय व्होल्टेज ड्रामा असतात. मात्र फरहानच्या कृतीनं भारतीय प्रेक्षकांची भावना दुखावली. Gun Celebration by Sahibzada Farhan ही कृती केवळ खेळाडूविरोधात नाही, तर खेळाविरोधातही आहे. चाहत्यांनी सांगितलं की क्रिकेट हा खेळ आहे, रणांगण नाही. H1B Visa : Meleniya Donald Trump चं नाव चर्चेत येण्याचं कारण आणि भारत-अमेरिका संघर्षाची पार्श्वभुमी
Nupur Bora Case: कोट्यवधी संपत्ती आणि कायदेशीर प्रश्न
Nupur Bora Case :असममधील एका सिव्हिल सेवक अधिकाऱ्यावर झालेल्या संशयास्पद कारवाईने राज्यात चांगली धक्कादायक घटना निर्माण केली आहे. २०१९ बॅचची ACS अधिकारी Nupur Bora, जिने हालचाल अनेक जिल्ह्यात केली आहे, ती आता भरीव संपत्ती, अवैध जमीन हस्तांतरण, आणि भ्रामक सम्पत्तीचा प्रश्न येथे उभा आहे. हा लेख त्या प्रकरणाचा तपशीलवार आढावा आहे. घटना काय आहे? Nupur Bora ही अधिकारी असून तिला राज्याच्या विशेष तपास विभागाच्या पहाऱ्यात ठेवण्यात आलं आहे. तिच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला, ज्या ठिकाणी सुमारे ₹90 लाख रोख, ₹1 कोटींपेक्षा जास्त मूल्याचे सोन्याचे व दागिन्याचे सामान, आणि इतर संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या संपत्त्या एका सामान्य अधिकाऱ्याच्या उत्पन्नाशी सुसंगत नसल्याचा अंदाज आहे. तिला अनेक ठिकाणी तपासले गेलेली आहे — तिच्या निवासस्थानी, अधिष्ठापकी कार्यालयात आणि जमीन नोंदींशी संबंधित ठिकाणी छापामार कारवाया झाला आहे. हा छापा मुंबई, गुवाहाटी आणि तिच्या गावठी ठिकाणांवर एकाच वेळी सुरू झाला. आरोप काय आहेत? प्राथमिक तपासात समोर आले आहे की, Nupur Bora या अधिकार्याचं उत्पन्न ज्या स्त्रोतांमधून आहे ती माहिती अस्पष्ट आहे, आणि तिच्या मालकीतील जमीन काही जमिनींच्या नकाशांसाठी विक्षिप्त नोंदींमध्ये समाविष्ट असल्याचा आरोप आहे.तसेच आरोप आहे की काही लोकांना जमीन नकाशा मिळवण्यासाठी, किंवा त्यांचे नाव जमीन रेकॉर्डमध्ये बदलण्यासाठी लाचखोरीची मागणी करण्यात आली होती. “रेट कार्ड” नावाच्या दस्तऐवजात विविध सेवा करण्यासाठी “फुल्या” रक्कम सांगितलेली होती असे तक्रारीत म्हटलं जातं. संपत्तीचा हा प्रकार सामान्य सिव्हिल सेवकाच्या आयुष्यापेक्षा खूपच जास्त असल्यामुळे “disproportionate assets” चा आरोप नार्कट केला जात आहे — म्हणजे उत्पन्नाच्या तुलनेत संपत्तीचा फरक खूप मोठा आहे. तपास सुरू गेल्या काही काळापासून या अधिकाऱ्यावर नजर ठेवण्यात आली आहे. विशेष तपास युनिटने तिचे आर्थिक व्यवहार, जमीन हस्तांतरण, जमीन नोंदी, आणि रेकॉर्ड तपासले आहेत. छापे टाकल्यानंतर रोख रक्कम, सोनं-दागिने जप्त करण्यात आले आहेत. तसेच काही सरकारी दस्तऐवज, जमीन नकाशा दस्तऐवज, भेटलेल्या “रेट कार्ड” खदाखदा तपासले जात आहेत ज्यात जमिनी-संबंधित कामांसाठी दिलेल्या रकमांची नोंद आहे. मंत्रिपरिषदीनं देखील लक्ष दिलं आहे की अशा प्रकरणात दोषी मिळाले तर कडक कारवाई होईल. सामाजिक व राजकीय प्रतिक्रिया हे प्रकरण सर्वसाधारण जनता आणि मीडिया घेऊन चर्चेत आहे. लोक म्हणतात की सार्वजनिक सेवक पदावर असताना जर एखाद्या अधिकाऱ्याच्या खाजगी संपत्त्या अशा पद्धतीने वाढत असतील, तर ती सार्वजनिक विश्वासाला धक्का आहे. राजकीय विरोधी पक्ष हे प्रकरण सरकारवर दबाव वाढवण्यासाठी वापरत आहेत. काही समाज संघटना आणि अधिकार्यांनी नागरिकांचे मनोबल टिकवण्याचे आवाहन केले आहे, की सत्य माहिती समोर यावी. सरकारचा बचाव सरकारने सांगितले आहे की तपास सुरू आहे आणि कोणत्याही दोषी अधिकाऱ्याला सवलत नाही. त्यांनी आश्वासन दिले आहे की transparency सुनिश्चित केली जाईल. नेतृत्त्वाने म्हटलं आहे की जप्त संपत्ती आणि दस्तऐवज तपासले जात आहेत आणि पुढील कारवाई न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे होईल. काय शिकायला मिळतं? Nupur Bora प्रकरण हे भ्रष्टाचार आणि जवाबदारी यांच्यातील संघर्षाचे प्रतीक आहे. जर दोषी धरण्यात आलेत, तर हे इतर सार्वजनिक सेवकांसाठी चेतावणी ठरू शकते. पारदर्शकता, न्यायप्रक्रिया आणि नागरिकांचा विश्वास हे सार्वजनिक व्यवहारात अत्यावश्यक घटक आहेत. महाराष्ट्राला हादरवणाऱ्या गेवराईच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येचे संपूर्ण प्रकरण…
अजितदादांवर बोललात तर जीभ हासडू -Sanjay Raut
इद्रिस नायकवाडींचा Sanjay Raut यांना इशाराIdris Naikwadi यांचा संतप्त इशारा : “अजितदादांवर पुन्हा बोलाल तर जीभ हासडू” महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भडका उडाला आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार Sanjay Raut यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या ‘अर्धे पाकिस्तानी’ वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. 🔥 नेमकं काय म्हणाले संजय राऊत? आशिया कप 2025 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावरून बोलताना अजित पवार यांनी “खेळ हा खेळ म्हणून बघावा” असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना Sanjay Raut म्हणाले: “ते मूर्ख राजकारणी आहेत. ते अर्धे पाकिस्तानी आहेत. ते पाकड्या आहेत. 26/11 च्या हल्ल्यात जर त्यांच्या घरातील कोणी गेले असते, तर त्यांनी असं बोललं नसतं.” हे वक्तव्य सार्वजनिक होताच राज्यात राजकीय खळबळ उडाली. ⚔️Idris Naikwadi यांची कडक प्रतिक्रिया Sanjay Raut यांच्या या वक्तव्यावर इद्रिस नायकवाडी यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आणि थेट इशारा दिला: “जर अजितदादांवर पुन्हा बोललात, तर आमचे कार्यकर्ते तुमची जीभ हासडून टाकतील.” ते पुढे म्हणाले: “लोक ज्याला भोंगा म्हणतात, त्याचा आवाज अलीकडे थांबला होता. पण आता पुन्हा खालच्या पातळीवर बोलायला सुरुवात केली आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभणारी नाही.” 🧬 “संजय राऊत यांची डीएनए चाचणी करावी” इद्रिस नायकवाडी यांनी पुढे जाऊन व्यक्तिशः टीका करत म्हटलं: “नेत्याच्या अंगात अमुक रक्त आहे, असं बोलणं अशोभनीय आहे. मग आता Sanjay Raut यांची डीएनए चाचणी करण्याची गरज आहे. आमच्याकडे त्यांचे काही रिपोर्ट्स आहेत, पण आम्ही संयम पाळतो.” 🙅 जातपात आणि धर्मावरून राजकारण नको इद्रिस नायकवाडी यांनी स्पष्ट केलं की अजित पवार यांनी कधीही जात, धर्म किंवा प्रांताच्या आधारे राजकारण केलेलं नाही. “अजितदादा हे सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. जर ते मुख्यमंत्री झाले, तर आम्हाला आनंद होईल. त्यांच्यात ती क्षमता आहे.” 📉 संजय राऊत यांना मोठी किंमत मोजावी लागेल इद्रिस नायकवाडी यांनी पुढे इशारा दिला: “जर Sanjay Raut यांनी हा धंदा थांबवला नाही, तर त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागेल. आमचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत.” ⚖️ राजकारणात वैचारिक लढाई असावी, वैयक्तिक नव्हे या वादामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खालच्या पातळीवरची टीका, व्यक्तिगत आरोप आणि धमकीचं राजकारण पुढे आलं आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, पण त्याची अभिव्यक्ती सभ्य भाषेत होणं गरजेचं आहे. या वादाचे संभाव्य परिणाम Chagan Bhujbal यांचा A टू Z राजकीय प्रवास : शिवसेनेतील दिवस, समता परिषद ते आजचा ओबीसीचा चेहरा.