Pie muffin apple pie cookie. Bear claw cupcake powder bonbon icing tootsie roll sesame snaps. Dessert bear claw lemon drops chocolate cake. Cake croissant cupcake dragée wafer biscuit pudding bonbon.

Spread the love लहान वयातच गुन्हेगारीत शिरलेला बाबू नावाचा पोरगा. त्याच्यावर अनेक केसेस असूनही Nagraj Manjule त्यांच्या Jhund चित्रपटात काम करण्याची संधी दिली. आधिचं जब्याला, परशाला, आर्चीला ह्या मोठ्या पडद्यावर घेऊन आलेले नागराज अण्णा या बाबूलाही संधी देतात. पण पुन्हा त्याच गुन्हेगारी प्रवृत्तीचा आणि व्यसनांचा पिच्छा न सोडलेल्या बाबू छत्री उर्फ प्रियांशु क्षत्रीय याचा त्याच्याच मित्राने चाकू आणि दडगाने ठेचून खून केला. नागराज मंजुळे – झोपडपट्टीतून उगवलेले तारे आयुष्य संधि देतं. त्या संधिचं सोनं करायचं की माती. हा ज्याचा त्याचा प्रश्न. किंवा काही जण म्हणतात तसं हे ज्याचं त्याचं नशिब. हिरोचे फॅन अनेक असतात. पण महाराष्ट्रात एक असा डायरेक्टर आहे. ज्याचं नाव वाचून लोकं चित्रपट पहायला जातात. त्याच्या चित्रपटांनी प्रेक्षकांवर जादू केलेली आहे. त्यांच्या अनेक गोष्टींपैकी एक महत्वाची गोष्ट सगळ्यांना आश्चर्यचकित करते. ती म्हणजे कलाकार निवडतानाची पद्धत. फक्त कुठल्यातरी पिच्चरमध्ये या आधि काम केलयं म्हणून नाही तर चित्रपटातील एखाद्या पात्राला न्याय देऊ शकेल अशी माणसं नागराज शोधून आणतो. फाटकं आयुष्य जगलेल्या नागराच्या चित्रपटातील पात्रही तशीच गरीब, वंचीत, झोपडपट्टीत राहणारी. “झुंड” – अमिताभ बच्चनसोबत झोपडपट्टीतील पोरं त्यामुळे त्याला जब्या कुठं मिळाला? करमाळ्यात एका गावात नागराज मंजुळेचा सत्कार होत होता तेव्हा हलगी वाजवताना दिसलेलं पोगरं त्याने घेतलं आणि त्याला पिच्चरचा हिरो बनवला. असा ओरीजनल रंगाने काळा असलेला हिरो कुणी अजुन पाहिलाच नव्हता. फॅंन्ड्री हा सिनेमा त्याच्या आयुष्यातली आजवरची सगळ्यात छान कलाकृती ठरली. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. तोच पॅटर्न त्याने सैराटमध्ये वापरला. वास्तव डोळ्यासमोर ठेवणारा सैराट हा मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरला. गावातून आलेल्या परशाला, आर्चिला लोकांनी डोक्यावर घेतलं. नंतर योग आला Amitabh Bachchan सोबत काम करण्याचा पण स्टोरी आपली झोपडपट्टीतल्या पोरांचीच. नागपुरच्या झोपडपट्टी भागात राहणारी पोरं यामध्ये घेण्यात आली. त्यातलाच एक प्रियांशु क्षत्रीय म्हणजेच बाबू छत्री. गुन्हेगारीतून पडद्यावरचा प्रवास ज्याने Jhund पाहिला असेल त्याला माहीतीये की हा सिनेमा एक बायोग्राफी होता. ज्यांच्या आयुष्यावर बनला त्या व्यक्तीने नागपूरच्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पोरांना एकत्र करुन त्यांना स्पोर्ट्सच्या माध्यमातून जगण्याचा चांगला पर्याय निवडण्याची संधि दिली होती. यावेळी खऱ्या आयुष्यात स्वतःवर ५ गुन्हेगारी केसेसे असलेला एक तरुण नागराजच्या टिमच्या हाताला लागला. ज्याला पिच्चरमध्ये काम करण्याचा विचार स्वप्नातही येणार नाही अशा बाबू छत्रीला घेतलं गेलं. त्याला वाटत होतं की मला घेऊन जातील आणि किडण्या विकतील. पण शुटींग संपली. पिच्चर रिलिज झाला आणि मुख्य कलाकारांसोबत हा बाबू सुद्धा तेवढाच गाजला. एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात राजीव खांडेकर यांनी या बाबूला विचारलं. आयुष्यात काय करायचं होतं. तेव्हा हा म्हणाला. मेरे को तो डॉन बननेका था. आता काय काम करणार विचारल्यावर तो म्हणाला. जे काही भेटेल ते काम करेल. फक्त एक्टींगच नाही. सगळ्यांनी या गोष्टीचं कौतूक केलं. आणि सिनेमाप्रमाने खऱ्या आयुष्यातही कोणीतरी या गुन्हेगारीच्या आणि व्यसनांच्या दृष्टचक्रातून बाहेर पडलं. याचा आनंद अनेकांना होता. पण शेवटी तो प्रसंग फक्त सिनेमापुरताच खरा ठरला. पुन्हा गुन्हेगारी आणि व्यसनांच्या जाळ्यात Jhund सिनेमा हिट झाल्यानंतरही हा प्रसिद्धी मिळालेला बाबू काही गुन्हेगारी आणि व्यसनांपासून दूर गेला नाही. त्याला एकदा मोबाईल्स चोरीमध्ये अटक झाली होती. त्याच्यावर एकून १५ गुन्हे दाखल असल्याचं सांगण्यात येतय. त्याचा मित्र साहू आणि तो रात्री घराबाहेर पडला एका ठिकाणी त्यांनी पार्टी केली. दारूच्या नशेत दोघांचं कशावरुन तरी भांडण सरु झालं. बाबू छत्रीने त्याच्याकडचा चाकू काढून त्याच्या मित्रावर उगारला. त्याने तो वार हुकवत बाबूच्याच हातातला चाकू हिसकावला आणि बाबू छत्रीचा म्हणजेच प्रियांशू क्षत्रीय याचा गळाच चिरला. तेवढ्यानेही तो मेला नाही म्हणून त्याला दगडाने ठेचून मारला. आणि तिथून पळाला. पोलीसांना घटनेची माहीती मिळताच आरोपीला ६ तासाच्या आत अटक केली. वाचा अजून संबंधित बातम्या- Kerala IT professional found dead; सोशल मिडीयावर पोस्ट करत आयटी इंजीनीअरची माहीती. RSS वर गंभिर आरोप
Spread the loveदक्षिण भारतीय सिनेमा इंडस्ट्रीतील एक प्रमुख अभिनेता Prabhas, ज्याने बाहुबली आणि साहो सारख्या चित्रपटांतून आपली अमिट छाप सोडली आहे, आता लग्नाच्या तयारीत आहे. प्रभासच्या चाहत्यांची त्याच्या लग्नाबद्दलची उत्सुकता काही थांबली नाही, परंतु आता एका मोठ्या आनंदाच्या बातमीची घोषणा केली आहे. प्रभास वयाच्या 45 व्या वर्षी लग्न करण्याच्या तयारीत आहे, आणि याबाबत त्याच्या कुटुंबाने तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की प्रभास त्याच्या बाहुबली चित्रपटातील सहकलाकार अनुष्का शेट्टीसोबत लग्न करणार आहे, पण ही बातमी खोटी ठरली आहे. प्रभासच्या कुटुंबाने त्याच्यासाठी एक वधू शोधली आहे, ज्याच्याशी तो लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. या मुलीचे वडील हैदराबादचे एक मोठे व्यावसायिक आहेत. तसेच, या लग्नाच्या तयारीमध्ये प्रभासची मावशी, श्यामला देवी देखील सहभागी आहे. प्रभासच्या कामाबद्दल प्रभासच्या आगामी चित्रपटांचीही चर्चा सुरु आहे. 2024 मध्ये कलकी 2898 एडी चित्रपटाने धुमाकूळ घातला होता, ज्यामध्ये अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण यांसारखे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाने 1100 कोटींहून अधिक कमाई केली. त्यानंतर, प्रभास द राजा साब आणि फौजी या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. आणि स्पिरिट या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच प्रारंभ होणार आहे, जो संदीप रेड्डी दिग्दर्शित करणार आहे. याशिवाय, प्रभास 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या कन्नप्पा या चित्रपटात छोट्या भूमिकेत दिसणार आहे.
Spread the loveबॉलिवूडच्या गोंडस अभिनेत्री तमन्ना भाटिया यांची भव्यता आणि सौंदर्य नेहमीच चर्चेचा विषय ठरलेली आहे. एक-दोन नाही तर अनेक सिनेमांमध्ये आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांचे हृदय जिंकणारी तमन्ना आता एक नवीन लूक घेऊन चर्चेत आली आहे. तिच्या नुकत्याच सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती एका सुंदर लाल ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामुळे तिचं सौंदर्य आणखी खुललं आहे. लाल ड्रेसमध्ये राजकुमारीसारखी दिसणारी तमन्ना: तमन्नाने या फोटोशूटमध्ये लाल रंगाचा एक आकर्षक ड्रेस परिधान केला आहे, ज्यामुळे तिचे सौंदर्य आणखी एक पाऊल पुढे गेलं आहे. तिच्या स्टाईल, मेकअप आणि गजबजलेल्या चोळीने तिला अगदी राजकुमारीसारखं सुंदर आणि गोंडस बनवलं आहे. तिच्या चेहऱ्यावर असलेली ताजेपणाची झलक आणि लाल ड्रेसचे आकर्षण यामुळे तिच्या चाहत्यांना त्याच्यासाठी वेगळी ओळख मिळाली आहे. द्रुतशीत सौंदर्य आणि नवा अवतार: तमन्नाने तिच्या लुकमध्ये एक नवा आणि ताजं अवतार घेतला आहे. ती नेहमीच आपल्या ड्रेसिंग सेंस आणि लुकसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या लाल ड्रेसमधील शाही आणि ग्लॅमरस दिसण्यामुळे तिचं सौंदर्य आणि कॅरेक्टर आणखी खुलले आहे. या नवे लूकने तिच्या फॅन्सला आश्चर्यचकित केले आहे. सोशल मीडियावर हॉट ट्रेंड: तिच्या फोटोंवर तिच्या फॅन्सने भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे. सोशल मीडियावर तिचे हे फोटो वेगवेगळ्या चर्चांचे कारण बनले आहेत. त्यातील प्रत्येक फोटो आणि शैली प्रेक्षकांना आकर्षित करतात आणि तिच्या सौंदर्याची प्रशंसा करतात. तमन्ना भाटिया केवळ अभिनेत्रीसोबत एक ट्रेंड सेट करणारी व्यक्तिमत्त्व बनली आहे. अशा प्रकारे तमन्ना भाटियाच्या या लाल ड्रेसमधील लूकने तिचे सौंदर्य अधिकच खुलवलं आहे. तिच्या फॅन्स आणि चाहत्यांमध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.