देवी योगेश्वरी: कोकण व मराठवाड्याचा अद्वितीय सांस्कृतिक दुवा
बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेली आंबाजोगाई नगरी मार्गशीर्ष महिन्यात भक्तांच्या गजबजाटाने फुलून जाते. याचं कारण म्हणजे देवी योगेश्वरी, जी कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदैवत मानली जाते. बीडच्या भूमीत वसलेल्या या देवीचा कोकणाशी नेमका काय संबंध आहे? देवी योगेश्वरी कोकणातील कुटुंबांची कुलदेवता कशी बनली? चला, जाणून घेऊया.
देवी योगेश्वरीची पौराणिक कथा
योगेश्वरी देवीला साक्षात आदिमाया आदिशक्तीचे रूप मानले जाते. तिच्या अवतारामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. दांतसूर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले. दांतसूराचा पराभव केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली. यामुळे या स्थळाला आंबाजोगाई असे नाव मिळाले. दांतसूरावर विजय मिळवल्यामुळे तिला दांतसूरमर्दिनी असेही संबोधले जाते.
देवीच्या कुमारिका स्वरूपाची कथा
योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचे सांगितले जाते. परळीच्या वैजनाथांशी तिचा विवाह ठरला होता, पण लग्नाचा मुहूर्त चुकल्याने विवाह होऊ शकला नाही. यामुळे योगेश्वरी देवीने आंबाजोगाईतच वास्तव्य केले.
कोकणातील कुलदैवता कशी झाली?
भगवान परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर काही कुटुंबे कोकणात नेली. या कुटुंबांच्या विवाहासाठी त्यांनी अंबाजोगाईच्या मुली निवडल्या. योगेश्वरी देवीने या विवाहासाठी एक अट ठेवली—“या मुलींच्या कुलाची मी कुलदेवता असेन.” त्यामुळे कोकणातील अनेक कुटुंबांची देवी योगेश्वरी कुलदैवता बनली.
आजही श्रद्धेचा केंद्रबिंदू
देवी योगेश्वरी ही केवळ धार्मिक नाही तर कोकण व मराठवाड्याला सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारी महत्त्वाची कडी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, गोवा यांसारख्या ठिकाणांहून असंख्य भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात.
तुम्ही कधी देवी योगेश्वरीचे दर्शन घेतले आहे का?
तुमचे अनुभव आणि विचार आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा!
Spread the loveLipsey Murder Case – A Shocking Twist! आधी डान्स, नंतर डिनर आणि मग अचानक मर्डर! लुधियानामध्ये घडलेल्या Lipsey Murder Case ने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. What started as a romantic evening turned into a horrifying crime scene. The Perfect Date Night की Planed Crime ? रविवारी रात्री 16 जानेवारीला अनोख मित्तल आणि त्याची पत्नी लिप्सी मित्तल एका रिसॉर्टमध्ये डिनरसाठी गेले. They danced, clicked selfies, and shared their happy moments on social media. It looked like a perfect love story! पण काही तासांतच लिप्सीचा मृतदेह सापडला. अनोख मित्तलचा Emotional Drama लिप्सीच्या मृत्यूनंतर अनोख मित्तल खूप दुःखी दिसला. तो रडत होता, मारेकऱ्यांना पकडण्याची मागणी करत होता. मीडियासमोर तो सतत आपल्या पत्नीच्या मारेकऱ्यांना पकडण्याची विनंती करत होता. He even protested outside the hospital, demanding justice for his wife. But then… the real twist unfolded! The Investigation Begins Police ने जब या केस की इन्वेस्टिगेशन शुरू की, they found something shocking! लिप्सीच्या मारेकऱ्यांचा शोध घेत असताना अनोखच्या कॉल डिटेल्स आणि लोकेशनचा अभ्यास करण्यात आला. And that’s when things started getting suspicious. A Single Message Changed Everything! – प्रेम, कट आणि हत्या! हत्येच्या रात्री, अनोखला एका नंबरवरून एक मेसेज आला होता – “Done”. Initially, police thought it was just another lead, but जब उन्होंने डीप इन्वेस्टिगेशन की तो एक जबरदस्त खुलासा हुआ! अनोख मित्तलला एक गर्लफ्रेंड होती, आणि त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं. Lipsey त्याला डिवोर्स देण्यास तयार नव्हती. So, what was the easiest way to get rid of her? Murder! The Crime Was Planned! रिसॉर्टमध्ये डिनर झाल्यानंतर दोघेही गाडीत निघाले. अचानक अनोखने कार थांबवली, आणि काही मिनिटांतच 4-5 हल्लेखोर आले. त्यांनी लिप्सीवर हल्ला केला, तिच्या दागिन्यांसाठी लूटमार केली आणि तिला निर्दयपणे चाकूने भोसकले. अनोखवर मात्र केवळ हलकेसे जखमांचे निशाण होते. How convenient! Police का मास्टरस्ट्रोक! लुधियाना पोलिसांनी जब एक आरोपीला पकडलं, तेव्हा त्याने सगळा प्लॅन उघड केला. It was all a setup! अनोखने आपल्या गर्लफ्रेंडसाठी हा कट रचला होता. पण तो इतका हुशार नव्हता की पोलिसांना फसवू शकेल. Justice for Lipsey! This case is a classic example कि सत्य कितीही लपवायचा प्रयत्न केला, तरी ते बाहेर येतंच! Anokh Mittal planned everything perfectly, but he forgot one thing – Truth Always Wins! ही केस अजूनही चर्चेत आहे, आणि लोक विचार करत आहेत – How can someone be so heartless? तुमचं मत काय? Did you expect this twist? Let us know in the comments! 🔥 Stay tuned for more real crime stories like this! 🔥
Spread the loveआजवर अनेकांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले, पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम उलगडून एक धक्कादायक कहाणी सांगितली. सुरुवातीला सुरेश धस यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्या इन्व्हॉल्व्हमेंटबद्दल चर्चा केली. “यांचा मुख्य आका कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले की आम्हीही याचा शोध घेत आहोत. धस यांनी सुदर्शन घुलेवर आरोप करत त्याच्या आर्थिक स्त्रोतांबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींनी एका मोठ्या कटाची योजना आखली होती. सरपंचांच्या हत्येमागची मन हेलावून टाकणारी कहाणी सरपंचांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पिस्तूल असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ती काढून घेण्यात यावी. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि सुरेश धस यांचे भावनिक भाषण ऐकल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Spread the loveसुरुवातीला अमित शहांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने अमित शहांना धारेवर धरलं, त्यांच्यावर टीका केली. तर या सगळ्या नंतर संध्याकाळी तातडीची पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी काँग्रेस संविधान विरोधी, आरक्षण विरोधी, ओबीसी विरोधी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याच सांगितलं. आणि हे सांगताना त्यांनी अनेक गोष्टींचा दाखला दिला. अमित शहा या पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले की पंडित नेहरूंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा द्वेष सर्व ज्ञात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने कशी सर्व शक्ती वापरली होती हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच खरच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी कट रचला होता का? अमित शहांना या वक्तव्यामधून काय म्हणायचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव झाला होता का? आणि जर झाला तर का झाला? हे सर्व जाणून घेऊयात तस पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीत फारसा फरक नव्हता, परंतु प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीबद्दल आणि त्याबद्दलच्या कल्पनांबाबत दोघांचे विचार अतिशय वेगळे होते. विशेषतः जातीय आरक्षण, हिंदू कायद्याचे संहिताकरण, परराष्ट्र धोरण आणि काश्मीर या मुद्द्यांवरून त्यांचे विचार खूपच वेगळे होते. भारत स्वतंत्र होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले. मंत्रिमंडळातील इतर बहुतेक सदस्यांप्रमाणे, आंबेडकर काँग्रेस पक्षाचा भाग नव्हते, यापूर्वी देखील त्यांचा काँग्रेस सोबत जास्त संबंध आला नव्हता. नेहरू आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर वरिष्ठ नेत्यांनी ज्या मूल्यांवर विश्वास ठेवला होता त्यातही ते फारसे सहभागी नव्हते. तर, कायदे मंत्री म्हणून आंबेडकर हे नेहरूंची निवड नव्हते. “इतर राजकीय विचारसरणीच्या उत्कृष्ट व्यक्तींनाही सरकारचे नेतृत्व करण्यास सांगितले पाहिजे.”असा महात्मा गांधींचा विचार होता म्हणूनच त्यांनी कायदेतज्ञ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कायदे मंत्री पदासाठी सुचवले होते. वास्तविक पाहता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधांबद्दल फारस कोणालाच माहिती नाही. तर , “नेहरू-आंबेडकर संबंध अस्पष्टतेत ढकलले गेले आहेत. त्याबद्दल कोणतेही पुस्तक नाही, किंवा माझ्या माहितीनुसार, एकही चांगला अभ्यासपूर्ण लेख नाही.” असं मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं होत. पण एका निवडणुकीदरम्यान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील संबंध फारसे चांगले नसल्याचं स्प्ष्ट झालं होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश नेहरुंच्या मंत्रिमंडळात जरी असला तरी सुद्धा त्यांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचं कारण होतं नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीमध्ये असलेला फरक. पंडित जवाहरलाल नेहरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा फारशी पटायची नाही. तर संविधानातील कलम 370 वरून या दोघांमध्ये मोठे मतभेद होते आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळातील सदस्य असून देखील त्यांना दुय्यम वागणूक दिली जायची. आणि या सगळ्याला कंटाळून अखेर 27 सप्टेंबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री मंडळातून मधून राजीनामा दिला आणि आगामी काळात येणारे निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची ठरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. कारण एकूणच त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव पाहता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक जिंकले तर ते काँग्रेस विरोधात एक ताकदवान विरोधी पक्ष उभा करू शकतात अशी भीती त्यांना होती. म्हणूनच भविष्यातील हा संभाव्य धोका टाळण्यासाठी काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत एन केन करून हरवण्याचे निश्चित केले होते, असं सांगितलं जातं. काळ होता १९५२ चा भारतात निवडणुका होऊ घातल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्यांना पराभूत करण्यासाठी नेहरूंच्या काँग्रेस पक्षाने आणि कम्युनिस्ट पक्षाने हातमिळवणी केली होती असं म्हंटल जात. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी याकाळात अनेक पत्रके वाटली ज्यात डॉ. आंबेडकरांना उघडपणे देशद्रोही म्हटले होते. विविध ठिकाणी हि पत्रके वाटण्यात आली होती. आणि दरम्यान निवडणूका पार पडल्या. ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला तर काँग्रेस चे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर विजयी झाले होते. १९५२ च्या या निकालाबाबत बोलायचे झाले तर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरीचे आरोप झाले होते. डॉ. आंबेडकरांचा निवडणूकीत सुमारे १४५३७ मतांनी पराभव झाला आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे या निवडणुकीत या जागेवरील ७४३३३ मते रद्द करण्यात आली होती. १९५२ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या या निवडणूक पराभवाचे तपशीलवार वर्णन पद्मभूषण पुरस्कार सन्मानित लेखक धनंजय कीर यांनी केले आहे. धनंजय कीर यांनी त्यांच्या डॉ. बाबा साहेब आंबेडकर जीवन चरित्र या पुस्तकात या सर्व घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. हे पुस्तक डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या सर्वात प्रामाणिक पुस्तकांपैकी एक मानले जात असून डॉ. आंबेडकरांनी स्वतः या पुस्तकाला मान्यता दिली होती. या पुस्तकात धनंजय कीर यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी डॉ. आंबेडकरांविरुद्ध कसे कट रचला याचा उल्लेख केला आहे. ५ जानेवारी १९५२ रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, “मुंबईतील जनतेचा प्रचंड पाठिंबा इतका एकाकी कसा काय नाकारला गेला , हा निवडणूक आयुक्तांच्या चौकशीचा विषय आहे.” पुढे धनंजय कीर यांनी असेही लिहिले आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या विधानात म्हटले होते की, “मुंबईतील लोकांनी मला इतका मोठा पाठिंबा दिला होता पण तो कसा वाया गेला? निवडणूक आयुक्तांनी याची चौकशी करावी” तर केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी देखील त्यांच्या विधानात म्हटले होते की, “डॉ. आंबेडकरांप्रमाणेच मलाही या निवडणूक निकालाबद्दल शंका आहे.” तर कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृता डांगे यांच्या कटामुळे ते हरले, असा विश्वास डॉ. आंबेडकरांचा होता असे धनंजय कीर यांनी लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्याविरुद्धच्या कटांवर मौन राहिले नाही. त्यांनी या निवडणूक फसवणुकीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील निवडणूक घोटाळ्याचे पहिलेच बळी होते. तर डॉ. आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी निवडणूक घोटाळ्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता. तर या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य बनले, तर १९५४ च्या भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले, आणि त्यांना हि निवडणूक जिंकता आली नाही. तर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी पर्यंत त्यांचे निधन झाले होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? यावर तुमचे मत काय? ते कमेंट करून नक्की सांगा