भारतीय वंशाच्या अंतराळवीर Sunita Williams ने अंतराळात नऊ महिने (287 दिवस) घालवले. तिच्या या अविस्मरणीय प्रवासामुळे तिच्या पगाराबद्दल आणि ओव्हरटाईमबद्दल चर्चा सुरू झाली आहे. पण, सुनीता विल्यम्सला अंतराळ मिशनसाठी किती पगार मिळत होता आणि ओव्हरटाईम किती मिळाले? चला, जाणून घेऊयात. नासाच्या वेतन नियमांनुसार, सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विलोमर हे GS-15 रँकचे कर्मचारी आहेत. हे रँक अमेरिकन सरकारच्या जनरल पे स्केलपेक्षा जास्त आहे. त्यांचा वार्षिक पगार $125,133 ते $162,672 (₹1.08 कोटी ते ₹1.41 कोटी) दरम्यान असतो. 287 दिवसांच्या मिशनसाठी त्यांचा अंदाजे पगार $93,850 ते $122,004 (₹81 लाख ते ₹1.05 कोटी) होता. आता ओव्हरटाईमबद्दल बोलायचं तर, NASA अंतराळवीरांना कोणताही ओव्हरटाईम देत नाही. त्यांना फक्त ठराविक दैनंदिन भत्ता मिळतो. सुनीता विल्यम्स आणि बुच विलोमर यांना त्यांच्या 287 दिवसांच्या मिशनसाठी $1,148 (₹95,400) चा अतिरिक्त भत्ता मिळाला. अंतराळवीरांना प्रशिक्षणापासून ते मिशनपर्यंत अत्यंत कठीण आणि धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागतो. 9 महिने मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये राहणे, अंतराळ स्थानकावर संशोधन करणे आणि शारीरिक-मानसिक आव्हानांना सामोरे जाणे सोपे नाही. त्यामुळे त्यांना दिला जाणारा पगार आणि भत्ता त्यांच्या मेहनतीला पुरेसा आहे.
Tag: space exploration
Sunita Williams 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परत! पुनर्वसन किती दिवस चालेल?
Sunita Williams & Butch Wilmore’s Space Journey :भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे नऊ महिने अंतराळात अडकले होते. त्यांच्या स्टारलाइनर अंतराळयानातील बिघाडामुळे त्यांना पृथ्वीवर परत येण्यास विलंब झाला. अखेर, 19 मार्च 2025 रोजी स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम कॅप्सूलच्या मदतीने ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षित उतरले. पृथ्वीवर परतल्यानंतर कोणत्या अडचणी येणार? अंतराळात प्रदीर्घ काळ राहिल्यामुळे स्नायू आणि हाडे कमजोर होतात. यामुळे परतल्यानंतर चालणे आणि फिरणे कठीण होते. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले आणि वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. तज्ज्ञांच्या मते, पूर्णपणे सावरायला १.५ ते २ महिने लागतील. शरीर पूर्ववत करण्यासाठी विशेष उपचार सुनीता विल्यम्स – अंतराळ क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व NASA ने 1998 मध्ये सुनीता विल्यम्स यांची अंतराळवीर म्हणून निवड केली. त्या 2006 आणि 2012 मध्ये दोन अंतराळ मोहिमांचा भाग होत्या. आतापर्यंत त्या 321 दिवस अंतराळात घालवले आहेत. त्यांचे अनुभव भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.