आजवर अनेकांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घटनाक्रम सांगितला, त्याबद्दल भाष्य केलं पण सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणाचा अतिशय तपशीलवार घटनाक्रम सांगून या पूर्ण घटनेची सर्वांना थक्क करून सोडणारी कहाणी सांगितली. त्यामुळे नक्की सुरेश धस त्यांच्या भाषणात काय म्हणालेत तेच पाहुयात. सुरुवातीला सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील अगदी सुरवातीपासूनचा घटनाक्रम सांगत, विष्णू चाटे याच्या या प्रकरणातील इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल भाष्य केलं. तर पुढे यांचा कोण आका आहे? असा सवाल देखील उपस्थित केला. तर यावर विरोधकांना उत्तर देत तुमच्याप्रमाणे आम्ही देखील या आकाच्या शोधात आहोत असं सुरेश धस म्हणाले. प्रकरणातील पुढील घटनाक्रम सांगताना सुरेश धस यांनी सुदर्शन घुले नामक इसमावर टीका केली व ज्याचं घर चार-पाच पत्र्याचं आहे तो स्कॉर्पिओ मध्ये कसा काय फिरू शकतो? त्याला स्कॉर्पिओ कोणी दिली हे शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाबाबत पुढे बोलत असताना मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार या सगळ्यांनी एक प्लॅन केला असं म्हणत सुरेश धस यांनी आरोपींचा काय प्लॅन होता ते सांगितलं. यापुढे सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्वांना हादरवून टाकणारी कहानी सांगितली. तर बीड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे पिस्तूल आहेत, त्या त्या लोकांचे पिस्तूल आपण काढून घ्यावे यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणात या प्रकरणावरून ग्रामस्थांचा संताप का झाला, या मागील कारण देखील स्पष्ट केला आहे. अशाप्रकारे सुरेश धस यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मनाला अतिशय वेदना देणारी कहानी सांगत, भावनिक पद्धतीने भाषण दिले. तर यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा
Tag: Santosh Deshmukh
Beed प्रकरणाच्या आधीपासून Suresh Dhas विरुद्ध Pankaja व Dhananjay Munde असा संघर्ष कसा चालू झाला?
सध्या महाराष्ट्रात लोक सर्वात जास्त जर कोणत्या बातमीची वाट पाहत असतील तर ती म्हणजे वाल्मिक कराड याच्या अटकेची आणि असच काहीस सध्या झालय. अखेर मस्साजोग प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडला अटक केली आहे. दरम्यान वाल्मिक कराड याच्या अटके मुळे आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुढे काय होणार? धनंजय मुंडेंवर या अटकेचा काय परिणाम होणार ते जाणून घेऊयात वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात आल्याने आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग मिळणार असल्याचं बोललं जात असून, या प्रकरणात अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड कडे एक मुख्य आरोपी आणि सूत्रधार म्हणून बघितलं जात होत, त्यामुळे आता पोलीस चौकशीमध्ये वाल्मिक कराड कोणते नवे खुलासे करणार, वाल्मिक कराडच्या स्टेटमेंट मध्ये कोणती नवी नावे समोर येणार का या कडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहील आहे. दरम्यान वाल्मिक कराड आता पोलिसांच्या ताब्यात असल्याने संतोष देशमुख हत्या प्रकरणाला वेग मिळून लवकरच या हत्या प्रकरणातील खरा आरोपी कोण आहे? संतोष देशमुख यांची हत्या का करण्यात आली? त्यांच्या हत्ये मागील नेमकं काय कारण होत? हे समोर येऊन संतोष देशमुख यांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाल्मिक कराडचा अँगल समोर आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांच्या अतिशय जवळचे मानले जात असल्याने आरोपी वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंची साथ आहे, धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्याने वाल्मिक कराड मोकाट आहे, त्याला अजूनही अटक झालेली नाही असे आरोप देखील धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आले होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजकीय अस्तित्वाव देखील धोक्यात आलं होतं, म्हणूनच याचा धनंजय मुंडेंच्या राजकारणावर काय परिणाम होणार तेही पाहुयात. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड च नाव जोडलं गेल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती, ज्यात महायुतीमधील नेत्यांचा देखील समावेश होता. तसेच “आकाचा आका” म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांचा वाल्मिक कराड वर वरदहस्त असल्याचं देखील सूचित केलं होतं. तर माजलगावचे अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन आरोपींना शिक्षा होई पर्यंत धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. त्यामुळे आता या सगळ्यांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केली जाणारी मागणी बंद होईल आणि धनंजय मुंडे यांना त्यांचं मंत्रिपद कायम ठेवता येईल असं बोललं जातंय. दरम्यान या प्रकरणावरून मराठा विरुद्ध ओबिसि वाद पुन्हा एकदा उफाळला होता. आणि या वादाच्या केंद्रस्थानी धनंजय मुंडे होते. मात्र आता आरोपी वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने बीड मध्ये चालू झालेला हा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष कमी होईल व ओबिसि नेते असणाऱ्या धनंजय मुंडे यांना याची कमी झळ बसण्याची शक्यता आहे. बीड येथील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या प्रमाणे धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांनी घेरलं होत, त्याचप्रमाणे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा लावून धरत महायुतीसरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील विरोधकांकडून घणाघाती टीका करण्यात येत होती. तर महायुती सरकारच्या कार्य क्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. पण आता अखेर वाल्मिक कराड पोलिसांच्या ताब्यात असल्याने महायुतीसरकार वर होणारी हि चिखलफेक कमी होणार असल्याचं दिसतंय. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच वाल्मिक कराड च्या अटकेचा धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा तर तुम्हाला काय वाटतं, वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्याने धनंजय मुंडे यांना फायदा होणार का ते कंमेंट करून नक्की सांगा