उष्णतेचा तडाखा – पुणे आणि मुंबईतील हवामानाचा अंदाज उन्हाळा आता तोंडावर आला असून हळूहळू उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत. उन्हाच्या तडाख्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आता एरवी तुलनेने थंड असलेल्या पुण्यातही उन्हाचा कडाका वाढला आहे. पुण्यात उष्णतेचा पारा 40 अंशांवर पोहोचला आहे, तर मुंबईत उष्णतेचा प्रभाव कायम आहे. पुण्यात तापमान वाढले पुणे शहर आणि जिल्ह्यात कमाल तापमान वाढताना दिसत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर येथे 40°c नोंदले गेले आहे. तसेच, कोरेगाव पार्क परिसरातही 40°c तापमान आहे. पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात तापमान 41 अंशांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे वाढत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे. मुंबईतील उष्णता आणि दमट हवामान मुंबईमध्ये कमाल तापमान स्थिर असले तरी उष्णता आणि दमट वातावरणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. हवामान विभागाच्या अहवालानुसार, कुलाबा येथे कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ येथे ३४.५ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. मुंबईत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीव्र उकाडा जाणवत असून, पुढील काही दिवस अशाच प्रकारचे हवामान राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गंभीर परिणाम टाळण्यासाठी काय करावे?