Virat Kohli and RCB's winning math of number 18!
Cricket Sport

Virat Kohli आणि RCB चं 18 नंबरचं जिंकणारं गणित!

Virat कोहलीच्या Royal Challengers Bangalore(RCB) क्रिकेट संघाचा 3 जून ला 18 वर्षांचा वनवास संपला. आणि विराटला IPL 2025 ची ट्रॉफी  उचलण्याचा मान मिळाला. आरसीबीच्या वाट्याला गेली 17 वर्षे निराशा आली होती. पण तुम्हाला माहिती आहे का ? आरसीबीचा या वर्षीचा विजय  होणारच होता. टीम IPL जिंकणार हे आधीपासूनच ठरलेलं होत.. IPL आणि 18 वर्षांची प्रतीक्षातुम्हाला तर माहितच आहे कि विराट कोहलीचा जर्सी नंबर 18 आहे, आरसीबीला IPL मध्ये 18 व्या वर्षी मिळालय…आता हे गणित फक्त इथपर्यंत मर्यादित नाही तर याचा थेट ज्ञानेश्वरीच्या १८ अध्यायांशी संबंध आहे. तुम्ही म्हणाल कि कस शक्य आहे ?पण हे शक्य झालंय.. परंतु विराट कोहलीच्या जिंकण्याशी ज्ञानेश्वरीचा काय संबंध आहे ? आरसीबीच्या बाबतीत १८ च गणित नेमकं काय आहे! 3 जून 2025 पंजाब विरुद्ध (RCB)रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे झाला.या सामन्यात आरसीबीने धडाकेबाज कामगिरी केली. आणि चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. 17 वर्षे अपयशाचा सामना केल्यानंतर, अखेर आरसीबीच्या वाट्याला आयपीएलची चॅम्पियनशीप आली. या शेवटच्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करून IPL 2025 च्या ट्रॉफीचा ताबा मिळवला आणि लाखो करोडो चाहत्यांचे स्वप्न पुर्ण केलें. विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी आयपीएलची चमकदार ट्रॉफी उंचावत जल्लोष स्टेडियम मध्दे जल्लोष केला. विजयात दुःखाची किनार तारीख होती ३ जून आयपीएलच्या अंतिम सामन्यात आरसीबीचा विजय झाला होता. आरसीबीला १८ वर्षांनी हा विजय मिळाल्याने कर्नाटकातील बंगळुरु या ठिकाणी रस्त्यांवर रात्रीपासूनच सेलिब्रेशन सुरु झालं होतं. चाहत्यांचा जल्लोष एवढा मोठा होता कि चक्क चेंगराचेंगरी झाली. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला आणि त्याची मोठ्या प्रमाणावर चर्चा होऊ लागली आहे. विराटने आपल्या विजय चाहत्यांना समर्पित केला होता आणि त्यानंतर अशी घटना घडली. विराट कोहली आणि RCB क्रिकेट संघाने INSTAGRAM वर पोस्ट टाकत याचे दुःख व्यक्त केले आहे.पण दुसरीकडे मात्र १८ क्रमांकाची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते आहे ? आणि ह्या चर्चेचं कारण काही नवीन नाही! विराट कोहली आणि 18 क्रमांकाचं नातं विराट कोहली १८ क्रमांकाची जर्शी वापरतो. हे आपण गेली अनेक वर्षे बघत आलोय.. जेव्हा पहिल्यांदा विराट कोहलीची भारतीय अंडर – 19 संघात निवड झाली तेव्हा त्याला मिळालेल्या जर्सीवर 18 क्रमांक होता. हा नंबर त्याने स्वतः निवडलेला नव्हता, तर तो त्याला देण्यात आला होता. पण जर्सीवरील हा नंबर हळूहळू त्याच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग बनला. तुम्ही म्हणाल कसा? तर विराटच्या आयुष्यात 18 तारखेला दोन मोठ्या घटना घडल्या होत्या. पहिली घटना 18 ऑगस्ट 2008 या दिवशी घडली, विराटने भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला होता. आणि दुसरी म्हणजे 18 डिसेंबर 2006 या तारखेला विराटचे वडिल  प्रेम कोहली यांचे निधन झाले होते. त्याच दिवशी विराट दिल्लीकडून रणजी सामना खेळत होता. वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्याच दिवशी विराट फलंदाजीसाठी आला आणि त्याने ९० धावांची धाडसी खेळी केली होती. त्यानंतर त्याने वडिलांचे अंतिम संस्कार केले होते. पण या घटनेनंतर विराटला स्वः ची जाणीव झाली, त्याचा स्वतःवरचा विश्वास वाढला…आणि तेव्हापासूनच, त्याने वडिलांच्या आठवणीत १८ क्रमांकाची जर्सी जवळ केली. इतकी जवळ केली की पुढे कधीच बदलली नाही. कालांतराने, हा जर्सी नंबर.. फक्त नंबर राहिला नाही तर तो किंग कोहलीची ओळख झाला. विराटच्या आयपीएल मधील (RCB)रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीवरही हाच क्रमांक आहे. त्याच्या कारची नंबर प्लेट, त्याचे रेस्टॉरंट आणि जवळपास सगळ्याच व्यवसायांमध्ये कोणत्या ना कोणत्या स्वरूपात १८ क्रमांक वापरला जातोच.एका मुलाखतीमध्ये बोलताना विराटने सांगितले की, “मी कधीही 18 हा जर्सी क्रमांक मागितला नव्हता, पण माझ्या करिअरची सुरुवात आणि माझ्या वडिलांचे निधन या दोन्ही महत्त्वाच्या घटना १८ तारखेला घडल्या होत्या. त्यामुळे हा नंबर माझ्या आयुष्याचा भाग बनला आहे.” आता जरी आरसीबीच्या वाट्याला IPL ट्रॉफी आली असली तरीही त्यांच्या वाट्याला 17 वर्षांचा वनवास कशामुळे आला ? त्यामागे बरीचशी कारण आहेत!आणि त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे संपूर्ण टीम फक्त मोजक्या खेळाडूंवर अवलंबून होती. क्रिस गेल, A B डिव्हिलियर्स, विराट कोहली अशा तगड्या खेळाडूंनी वैयक्तिक प्रदर्शन केल पण हे संघातल्या इतर खेळाडूंकडूनही अपेक्षित होतं पण ते मिळालं नाही त्यामुळे आरसीबीला अपयश येत राहिले! संघात झालेले बदल आणि विराटचा फोकस दुसरं म्हणजे  RCB ची बॉलिंग ही नेहमीच त्यांची कमकुवत बाजू असल्याचं पाहायला मिळत होत. चांगल्या चांगल्या मॅचेस फक्तं बॉलिंगमुळे हातातून गेल्या आणि डेथ ओव्हर्समध्ये देखील अनेकदा मोठ्या धावा दिल्या. विराट कोहली 2013 पासून ते 21 पर्यंत RCB संघाचा कॅप्टन राहिला. पण कॅप्टन आणि टॉप बॅट्समन आसल्यामुळे पूर्ण दबाव त्याच्यावरच असायचा.. परंतु यावेळी अनेक अनुभवी आणि युवा खेळाडूंचा टीम मद्धे समावेश होता त्यामुळे तोडीस तोड टीम तयार झाली होती. Jorsh हेजलहूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार आणि कृणाल पांड्या यांच्यासारख्या दमदार खेळाडूंमुळे टीमच्या बॉलिंगमध्ये सुधारणा झाली. समतोल राहिल्याने टीमचा कॉन्फिडन्स आणि मानसिक ताकद वाढली.टीम मधील बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही बाजू समतोल झाल्या, टीमचे नेतृत्व बदलल्याने विराटला स्वतःचा गेम आणि टीम मॅनेजमेंटवर FOCUS करता आला. ज्ञानेश्वरी आणि 18 अध्याय – एक आध्यात्मिक समांतर बॉलिंग बरोबरच तुमचा एकूण performance चांगला झाला होता आणि यामुळेच आरसीबीचा १७ वर्षांचा वनवास संपवून संघाने ट्रॉफी आपल्या नावावर केली!पण आता आरसीबीच्या विजेयामागे 18 क्रमांकाचं गणित नेमकं काय आहे?तर हे गणित असं आहे कि, ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय आहेत आणि पूर्ण ज्ञानेश्वरी कळण्यासाठी 18 अध्यांयाचे अध्ययन म्हणजेच अभ्यास करावा लागतो. तेंव्हा कुठे पुढे ज्ञानेश्वरीचा खरा अर्थ समजू लागतो. अगदी याप्रमाणेच आरसीबीने 17 वर्षांच्या परिश्रमातून झालेल्या चुका सुधारत, संघात बदल करत.. आठरा वर्षे अभ्यास करत 2025 चा सिझन जिंकला आहे. याच्यामागे नंबरच एक गणित लपलेलं आहे. 18 अंकाचे ज्योतिषशास्त्रीय आणि मानसिक महत्त्व 18 ची बेरीज 9 होते आणि 9 हा अंक मंगळ रेप्रेझेन्ट करतो. मंगल असलेल्या व्यक्तिमध्ये कष्टाळूपणा जास्त असतो. हेच विराट कोहली बद्दल बोलायचं झालं तर तो  खूप passionate आणि अग्रेसिव्ह आहे. त्याच्या स्वभावात  रागीटपणा म्हणजेच अग्नी तत्व जास्त दिसते.  अशी मानस दुसऱ्यांच्या दुबळेपणाचा त्रास करू घेतात. कप्तान म्हणून काम पाहताना टीमच्या प्रदर्शनाचा विराटला त्रास होत होता. त्यामुळे त्याने कॅप्टन्सी सोडली आणि त्याला लीडरशिप करताना होणारा त्रास कमी झाला. भारतीय मानसशास्त्रानुसार थंड डोक्याने घेतलेले निर्णय योग्य ठरतात असे सांगितले जाते. यामुळेच कदाचित विराटाचे यावर्षीचे सगळे निर्णय योग्य ठरत गेले. तर हे होत विराट कोहली आणि RCB च्या विजयामागील 18 नंबरचे गणित…. यामुळे Virat Kohli ने कसोटी cricket मधून निवृत्ती घेतली? | Virat Kohli Retirement Reason Explained