Sunita Williams, the Indian-American astronaut, has made history with her extraordinary space missions. NASA ने १९९८ मध्ये त्यांची निवड केली, आणि त्या वेळेपासूनच तिने अंतराळ संशोधनात आपली छाप सोडली. तिच्या कार्याने अनेक नवोदित वैज्ञानिक आणि अंतराळवीरांना प्रेरणा दिली आहे. Sunita Williams चा प्रारंभ:सुनिता विलियम्स यांचा जन्म १९६५ मध्ये अमेरिकेतील ओहायो राज्यात झाला. तिचे वडील दीपक पंड्या हे गुजरात, अहमदाबादचे होते. शिक्षणाच्या बाबतीत देखील तिने अत्यंत उच्च दर्जा प्राप्त केला. शालेय शिक्षण घेतल्यानंतर, तिने अमेरिकन नौसेना अकादमीतून शारीरिक विज्ञानामध्ये पदवी प्राप्त केली. १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून अभियांत्रिकी व्यवस्थापनात मास्टर डिग्री घेतली. नौसेनेत करिअर:सुनिता विलियम्स ने १९८७ मध्ये अमेरिकन नौसेनेत कमिशन घेतला आणि हेलिकॉप्टर पायलट म्हणून प्रशिक्षण घेतले. पर्शियन गल्फ वॉर आणि इराकच्या मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्या आपल्या कौशल्यांमुळे NASA च्या लक्षात आल्या आणि १९९८ मध्ये त्यांची निवड झाली. NASA मध्ये निवड होण्यासाठी महत्त्वाचे निकष: सुनिता विलियम्स चा अंतराळ प्रवास:सुनिता विलियम्सने आपल्या करिअरमध्ये 9 स्पेसवॉक पूर्ण केले आहेत. २८६ दिवस अंतराळात राहण्याचा विक्रम त्यांनी केला, आणि ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तिच्या आधी क्रिस्टीना कोच आणि पेगी व्हिटसन यांनी अधिक काळ अंतराळात राहण्याचा विक्रम केला आहे. सुनिता विलियम्स यांच्या कर्तृत्वामुळे अंतराळ विज्ञानात महिलांचा महत्त्वपूर्ण ठसा पडला आहे. त्या आजही अनेकांना प्रेरणा देत आहेत.
Tag: NASA Mission
Sunita Williams : अंतराळातून लवकरच घरवापसीची चांगली बातमी!
Sunita Williams आणि Buch Willmore मागील आठ महिन्यांपासून International Space Station मध्ये होते. अखेर त्यांची पृथ्वीवर परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. NASA आणि SpaceX यांनी त्यांच्या मिशनमध्ये बदल करत नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. NASA च्या Commercial Crew Program च्या मॅनेजर Steve Stich यांनी सांगितले की, “Human Space Mission अनेक आव्हानांनी भरलेली असते.” Boeing च्या Starliner Capsule मध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्यामुळे ही मोहीम रखडली होती. त्यामुळे रिकामी कॅप्सूल पृथ्वीवर परतवण्याचा निर्णय घेतला गेला आणि SpaceX वर विल्यम्स व विल्मोर यांना परत आणण्याची जबाबदारी सोपवली गेली. SpaceX आता नवीन Capsule च्या प्रतिक्षा करण्याऐवजी पूर्वीच्या Capsule चाच वापर करणार आहे. त्यामुळे 12 मार्च 2025 पर्यंत हे Mission Launch होण्याची शक्यता आहे. आधी या Capsule चा वापर पोलंड, हंगेरी आणि भारताच्या अंतराळवीरांसाठी करण्यात येणार होता, पण आता त्यांचे Mission पुढे ढकलण्यात आले आहे. त्यामुळे Sunita Williams आणि Buch Willmore लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत!