satish bhosale home bangala
Beed Uncategorized आजच्या बातम्या महाराष्ट्र

तो बंगला खोक्याचा? सतीश भोसलेच्या पत्नीने स्पष्ट केलं सत्य

तो बंगला खोक्याचा? तेजू भोसलेने दिली स्पष्टीकरणात्मक प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटद्वारे एका बंगल्याचा फोटो पोस्ट करून तो सतीश उर्फ खोक्या भोसलेचा आहे का? असा सवाल उपस्थित केला होता. या दाव्यावर सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसले यांनी खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणाल्या तेजू भोसले? तेजू भोसले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, “तो बंगला आमचा नाही, तो माझ्या चुलत दिराचा आहे. जर आमच्याकडे असं मोठं घर असतं, तर आम्ही वनविभागाच्या जागेत का राहिलो असतो? उन्हात लहान मुलांना घेऊन का बसलो असतो?” प्रकरण नेमकं काय आहे? राजकीय वातावरण तापलं! या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. वनविभागाच्या कारवाईवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून टीका आणि समर्थन दोन्ही सुरू आहेत. 👉 तुमच्या मते, वनविभागाची कारवाई योग्य होती का? तुमचं मत कमेंटमध्ये सांगा!