Disha Salian Death Case, Mumbai: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे, कारण तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत, सतिश सालियन यांनी दावा केला आहे की, त्यांची मुलगी दिशा सालियनवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तसेच, या प्रकरणावर पुन्हा तपास करावा अशी मागणी केली आहे. याचिकेत दिशा सालियनच्या वडिलांचे वकील निलेश ओझा यांनी गंभीर आरोप केले आहेत. वकील ओझा म्हणाले की, सीबीआयने दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात खोटं क्लीनचीट दिलं आहे. त्यांनी आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि इतरांवर गँगरेप, मर्डर आणि विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. ओझा यांनी दिलेल्या खुलाशात सांगितलं की, आदित्य ठाकरे आणि सूरज पांचोली यांच्याविरोधात पुरावे आहेत आणि त्या दिवशी दिशा सालियानच्या फ्लॅटवर ते उपस्थित होते. तसेच, रिया चक्रवर्ती आणि आदित्य ठाकरे यांच्यात 44 वेळा फोन कॉल्स झाले आहेत. वकिलांनी हे देखील सांगितले की, त्यांच्याकडे त्यांचं खटला जिंकण्यासाठी पुरावे आहेत आणि आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी ते कोर्टाला याचिका दाखल करू इच्छित आहेत. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात काही महत्त्वाचे पुरावे सापडले होते, जे हायकोर्टात सादर करण्याची मागणी वकील निलेश ओझा यांनी केली आहे.
Tag: Disha Salian Death Case
Disha Salian Death Case: आदित्य ठाकरे प्रकरणात किती आहे सत्य? वाचा नवीन याचिकेतील गंभीर आरोप
Disha Salian Death Case: दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनंतर तिच्या पालकांनी पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. विशेषतः, 8 जून 2020 च्या रात्रीच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरे घटनास्थळी उपस्थित होते, असा आरोप विरोधक करत आहेत. याचिकेच्या अनुसार, दिशा सालियनच्या मृत्यूच्या रात्री तिच्या मालवणी येथील घरात एक पार्टी सुरू होती. त्यात आदित्य ठाकरे, सूरज पांचोली आणि दिनो मोर्या यांची उपस्थिती होती, ज्यामुळे पार्टीचा माहोल बदलला आणि दिशा सालियनचे जिवंत राहणे त्रासदायक ठरले, असा आरोप सतीश सालियन यांनी केला आहे. याचिकेत असा देखील आरोप करण्यात आला आहे की, दिशाच्या मृत्यूनंतर अनेक राजकारणी आणि पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले आणि आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्याच वेळी, आदित्य ठाकरेंनी रिया चक्रवर्तीसोबत 44 वेळा फोनवर बोलल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय, दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत सिंह राजपूत याचाही मृत्यू झाला, ज्यामुळे दोन्ही प्रकरणे एकाच कालावधीत आली. दिशा सालियनच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे कुठे होते?2022 मध्ये आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या खुलाशानुसार, दिशा सालियानच्या मृत्यूनंतर ते रुग्णालयात होते आणि त्यांच्या आजोबांवर उपचार सुरू होते. आदित्य ठाकरेंनी यावरून स्पष्ट केले की, कोणत्याही आरोपांपेक्षा सत्य बाहेर येईल. दिशा सालियन प्रकरणामध्ये वाद आणि आरोपांच्या लाटांमुळे पुन्हा एकदा राजकारणात तापले आहे. पुढील तपास आणि न्यायालयाच्या निर्णयावर सर्वांचा लक्ष लागले आहे.