सनातन धर्मानुसार, केस आणि दाढी कापण्याचे विशिष्ट दिवस ठरलेले आहेत. वास्तुशास्त्र आणि Astrology नुसार, प्रत्येक वाराचा आपल्या जीवनावर विशिष्ट परिणाम होतो. अनेकदा लोक रविवार किंवा अन्य कोणत्याही दिवशी सलूनमध्ये जाऊन केस कापतात, परंतु काही दिवस हे टाळले पाहिजेत असे मानले जाते. कोणत्या दिवशी केस-दाढी कापणे टाळावे? 🔸 रविवार: सूर्य देवतेचा दिवस मानला जातो. या दिवशी केस आणि दाढी कापल्यास वैभव आणि आरोग्यावर परिणाम होतो.🔸 मंगळवार: मंगळ ग्रहाला ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी केस कापल्याने आयुष्यात अडचणी वाढू शकतात.🔸 गुरुवार: गुरु ग्रह ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या दिवशी केस आणि दाढी कापल्यास आर्थिक संकट येऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार उपाय ✔ सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवार हे दिवस केस आणि दाढी कापण्यासाठी शुभ मानले जातात.✔ शक्यतो ग्रहणाच्या दिवशी हे कार्य टाळावे.✔ केस कापताना आणि दाढी करताना शुभ वेळेचा विचार करावा.