शिवसेना (ठाकरे गट) खासदार Sanjay Raut यांनी औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावर भाजपवर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री शेखावत यांना औरंगजेबाच्या कबरीबाबत पत्र लिहिल्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांनी भाजपाला डिवचलं आहे. राऊत म्हणाले, “पत्रबाजी थांबवा आणि थेट कुदळ-फावडं घ्या!” त्यांच्या म्हणण्यानुसार, राज्य आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना केवळ पत्रव्यवहार करण्याची गरज काय? बाबरी मशीद पाडताना परवानगी घेतली नव्हती, मग आता कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुख्य मुद्दे:
Tag: BJP
Santosh Deshmukh Murder Case: सुरेश धस यांच्या निशाण्यावर बीड पोलिस, PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना सहआरोपी करण्याची मागणी
BJP आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच Santosh Deshmukh यांच्या हत्येप्रकरणी कठोर भूमिका घेतली असून, PI प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील यांना बडतर्फ करून सहआरोपी करावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच, फरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी आणि या प्रकरणाचा जलदगती न्यायालयात तपास व्हावा अशीही ठाम मागणी त्यांनी केली आहे. Suresh Dhus यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील प्रमुख मुद्दे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन आणि पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांना सहआरोपी करावे आणि बडतर्फ करावेफरार आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावीवाशी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासावेआरोपींना मदत करणाऱ्यांची सखोल चौकशी करून सहआरोपी म्हणून समावेश करावाया प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावीसंतोष देशमुख हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावेहत्या झाल्यानंतर मृतदेह कळंब दिशेने का नेण्यात आला याची चौकशी करावी ग्रामस्थांचे अन्नत्याग आंदोलनाचा इशारा मस्साजोग गावातील नागरिकांनी पाचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तहसीलदार आणि तालुका दंडाधिकाऱ्यांना निवेदन देत तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कुंभमेळा व्यवस्थेतील गोंधळ: संजय राऊत यांनी सरकारवर चढवले आरोप
प्रयागराजमधील महाकुंभ सोहळा सध्या सुरू आहे, आणि यामध्ये लाखो लोक सहभागी होतात. मात्र, या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची व्यवस्था आणि त्यात घडलेल्या घटनांमुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारच्या राजकीय मार्केटिंगवर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, कुंभ हा एक धार्मिक सोहळा आहे, जो राजकीय प्रचाराचा विषय न होऊन, श्रद्धा आणि भक्तिरसात न्हालेल्या लोकांसाठी असावा, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्याच्या कुंभमेला सोहळ्यात झालेल्या अव्यवस्थेवर राऊत यांनी तीव्र टीका केली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असून, लोकांना 10 ते 15 किलोमीटर चालायला लागते. या सर्व त्रासांमुळे, दुर्दैवाने चेंगराचेंगरीची घटना घडली आहे, ज्यात 10 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो जण जखमी झाले. राऊत यांच्या मते, व्हीआयपींना अधिक महत्त्व देण्याच्या कारणाने लोकांची ही अवस्था झाली. संजय राऊत यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी विचारले, “गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी लक्ष ठेवून काय साधले? प्राण वाचवले का?” ते म्हणाले की, जर प्रशासन श्रद्धाळूंच्या सुरक्षेवर लक्ष देत असते, तर या घटनांना टाळता येऊ शकले असते. राऊत यांनी 1954 च्या कुंभमेलनाची उदाहरण देत, नेहरूंनी त्या वेळी व्यवस्थेची जबाबदारी घेतली होती, आणि कुंभची व्यवस्था उत्तम होती, असे सांगितले. त्याचबरोबर, राऊत यांनी 10 हजार कोटी रुपयांच्या बजेटाच्या बाबतीतही सरकारवर गंभीर आरोप केले. “या पैशांचा उपयोग कुठे झाला?” असे प्रश्न त्यांनी विचारले. कोविड काळातील व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत, राऊत यांनी कुंभमेला येणारे 10 हजार कोटी हसण्याचे कारण बनले आहेत. ते म्हणाले की, या पैशांचा योग्य वापर झाला असता, तर कुंभमेलनात घडलेली चेंगराचेंगरी टळू शकली असती. संजय राऊत यांच्या आरोपांनंतर, यावर चर्चा सुरू झाली आहे. कुंभमेला साठी लागणारी तात्काळ व्यवस्थापन क्षमता आणि अधिक कडक सुरक्षेच्या उपायांवर लक्ष दिले गेले पाहिजे. सरकारच्या भूमिकेवर सवाल उभा केला गेला आहे, आणि भविष्यात अशा प्रकारच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
BJP ने खरंच Manmohan Singh यांचा अपमान केला?
राजघाट नाहीतर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आल्याने अंत्य संस्कारां वेळी भाजप सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजघाट का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. म्हणूनच भाजप सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला का? सरकारच्या कोणत्या कृत्यांमुळे त्यांचा अपमान झाला? आणि यावर भाजपा व काँग्रेसने नेमकी कोणती भूमीका घेतली आहे तेच जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञ व २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते. २८ डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्काराच्या जागेची निवड हि डॉ. मनमोहन सिंग यांचा “अपमान” आहे असं म्हटलंय. “भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देतात, आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अंतिम ‘दर्शन’ घेता येईल आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली वाहता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत. सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता,” असं राहुल गांधी या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होण व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणं अपेक्षित होत, मात्र असं काहीही झालं नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार राजघाट ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले. तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे. यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनी कडून करण्यात आले नव्हते. परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम वागणूक देऊन सरकार ने डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून, या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे. या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत? त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते. काँग्रेसने नरसिंहराव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे? त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा. आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ” असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे. जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले, व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच हि वागणूक अतिशय खेद जनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का? यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा. भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्राद्धांजली.