Abu Azmi Maharashtra Katta
आजच्या बातम्या

Abu Azmi Suspension: महाराष्ट्र विधानसभेत सरकारची मोठी कारवाई!

महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठा भूकंप – समाजवादी पक्षाचे आमदार Abu Azmi यांच्यावर अखेर सरकारने कारवाई केली आहे. औरंगजेबाला “महान राजा” म्हणणाऱ्या आझमींना विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. आझमींच्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठा गदारोळ अबू आझमी यांनी “औरंगजेबने अनेक हिंदू मंदिरे बांधली. तो महान राजा होता. त्याच्या कारकिर्दीत भारत ‘सोने की चिडिया’ होता.” असे विधान केले होते. यावरून विधानसभेत प्रचंड विरोध आणि आक्रोश उमटला. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यापेक्षा कठोर कारवाईची मागणी करत “फक्त अधिवेशनापुरते निलंबन नको, कायमस्वरूपी निलंबन करा” असे स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू आझमींना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला आणि सांगितले,“छत्रपती शिवाजी महाराज हे पूजनीय आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्याला आम्ही माफ करू शकत नाही.” मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार एका आमदाराला एका सत्रापेक्षा जास्त निलंबित करता येत नाही. त्यामुळे सरकार समिती स्थापन करून पुढील कारवाईचा विचार करेल असे पाटील यांनी स्पष्ट केले. अबू आझमींची माघार – व्हिडिओ शेअर करून मागे घेतले विधान सुरुवातीला आपली भूमिका ठाम ठेवणाऱ्या अबू आझमींनी वाढत्या दबावामुळे शेवटी माघार घेतली. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत “मी माझे वक्तव्य मागे घेत आहे” असे जाहीर केले. मात्र, यामुळे संतप्त झालेल्या भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी कायम ठेवली आहे.