Supriya Sule
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Supriya Sule On Reservation : जातीय की आर्थिक आरक्षण?

Spread the love

आर्थिक निषकावर आधारीत जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. हे वक्तव्य आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं. गोपीनाथ मुंडेंसमोर त्यांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहे. अशात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिलेला असताना बारामतीच्या खासदार Supriya Sule च्या एका इंग्रीज मुलाखती मुळे पुन्हा एकदा चर्चांना पेव फुटलं आहे. आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या घटकाचं काय मत आहे आणि संविधानात यासाठी काय तरतुद आहे.

Supriya Sule On Reservation
Supriya Sule On Reservation
सर्वात आधि हे समजून घेऊ की Supriya Sule च वक्तव्य काय आहे ज्यामुळे हा विषय चर्चत आला आहे. एनडीटीव्ही युवा या कार्यक्रमात त्यांची मुलाखत सुरु होती. अनेक प्रश्नानंतर त्यांना मराठा-ओबीसी आरक्षणावर प्रश्न विचारण्यात आला. त्याला त्यांनी स्वतःचं उदाहरण देत माझ्यासारख्यांना आरक्षणाची गरज नाही. पण गरजूंना ते मिळायला हवं. असं उत्तर दिलं. त्यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यांच नाव घेत त्यांना यासंबंधी बोलायला वेळ नाही असं सांगून टाळण्याचा प्रयत्न केला. पण महिला पत्रकाराने थेट मुद्दावर येत त्यांना प्रश्न केला की जातीय आरक्षण नष्ट करुन ते आर्थिक निकषांवर असायला हवं का यावर प्रश्न विचारला. 

Supriya Sule नी सांगीतलं ते दोन्हीचं कॉम्बीनेशन असायला हवं. हे फार महत्वाच आहे. कारण त्यांनी जातीय आरक्षण नष्ट करावं किंवा आर्थिक निकषावर आरक्षण असावं अस कुठेचं या संपुर्ण मुलाखतीत म्हटलेलं नाही. पण त्यांनी सांगतलं की लोकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि इथे सुद्दा तरुणांचा म्हणजे जेन्झीचा पोल घ्यायला पाहिजे. त्यावर त्या महिला पत्रकाराने काही मुद्यांवर प्रेक्षकांचं मत जाणून घेतलं. त्यातला शेवटचा प्रश्न होता. की जातनिहाय आरक्षण संपायला हवं असं किती जणांना वाटतं. त्यावर बहुतेकांनी हात उंचावला. पत्रकार खुप खुश झाली. त्यांनी Supriya Sule कडे पाहुन याच्यावर प्रतिक्रीय मागीतली. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, थॅंक गॉड आय फील सो कनेक्टेड विद झेन्झी. मी तुम्हाला हे इंग्रजीत का सांगतोय. कारण हा संपुर्ण कार्यक्रम इंग्रजीत होता. आणि सुळेंच्या याच वक्तव्यावर आत्ता सध्या चर्चा होतेय. 

आता विषय येतो की आपल्याला माहीती असावं की आरक्षणाची तरतुद संविधानात सामाजीक मागासलेपणावर आहे. तिथे कुठेही आर्थिक आरक्षणाचा विषय नाही. दुसरं म्हणजे आर्थिक निकषावर असणारं आरक्षण केंद्र सरकारने संपुर्ण देशात लागू केलेलं आहे. जे दहा टक्के आहे. ज्याला आपण इडब्लूएस म्हणजे इकॉनॉमीकली बॅकवर्ड सेक्टरचं आरक्षण म्हणतो. आता जर आर्थिक निकषांवर असणारं हे आरक्षण आधिच आहे तर सुप्रिया सुळे ह्या कोणत्या वेगळ्या आर्थिक निकषांवरच्या आरक्षणाची मागणी करत आहेत? असा प्रश्न त्यांना विचारला जातोय. 

दुसरीकडे जातीय आरक्षण नष्ट व्हाव असं त्यांचं मत आहे का? यावरुनही राजकीय वातावरण तापलं आहे. यावर सर्वात आधि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचा फोटो शेअर करत लिहलं. 'बाबासाहेब के दिए हुए आरक्षण का आधार आर्थिक नहीं, बल्कि जातिगत भेदभाव हैं! जब तक देश में जाति-आधारित भेदभाव रहेगा, तब तक देश में जाति-आधारित आरक्षण जारी रहेगा। वंचितचेच नेते आणि प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर म्हणाले, आरक्षण ही काही गरीबी हटाव ची मोहीम नाही, या ट्विटमध्ये डिअर सुप्रिया सुळे ताई, असा उल्लेख करत त्यांनी पोस्टची सुरवात केली. आणि सांगितलं की तुम्ही ज्या एनडीटीव्ही म्हणजे अदानीच्या न्युजरुममध्ये बसुन इंग्रजी बोलणाऱ्या इलिट क्लासचा पोल घेतला. 

म्हणजे संपुर्ण देशाचं मत नाही. हे म्हणजे १० टक्के लोकांनाच मतदानाचा अधिकार द्यावा असं झालं. शेवटी सुजात आंबेडकर यांनी लिहलं की जर तुमचा जातीय आरक्षणाला विरोध आहे तर तुमचे वडील शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी मंडल यात्रा का सुरु केली होती? अशाच वेगवेगळ्या प्रितिक्रीया सर्व स्तरातून येत आहेत. पत्रकार प्रशांत कदम यांनी आरक्षणावर सुप्रिया सुळे संघाचा विचार मांडतायत का? असा मथळ्याचा व्हिडियो त्यांच्या युट्युबवर पोस्ट केला. 

मंडळी Supriya Sule आणि त्यांच्या विधानावर आलेल्या प्रतिक्रिया याची माहीती आपण घेतली. आता आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी काय आहे हे समजून घेऊ. ही मागणी अनेकांची असली तरीही महाराष्ट्रात विलासराव देशमुखांनी यावर गोपीनाथ मुंडे स्टेजवर असताना दिलेली प्रतिक्रीया अनेकजण आधार म्हणून देतात. आणि जातीय आरक्षण नको अशी मागणी केली जाते. त्या वक्तव्यात स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी राष्ट्रीय पक्षांनी याच्यावर मतैक्य करुन मार्ग काढायला हवा नाहीतर भविष्यातला जातीय संघर्ष अटळ आहे अशी काहीशी भविष्यवाणीच केली होती. तोच संघर्ष आज महाराष्ट्र पहातोय असं काहीजण म्हणत आहेत. 

दुसरीकडे मात्र जातीय आरक्षणाच्या बाजून बोलणारे उच्चभ्रु समाजातला व्यक्ती गरीब झाला म्हणून त्याचा बहिष्कार टाकला जात नाही. तिथे आजच्या घडीला सुद्धा एखाद्या गावकुसाबाहेर राहणाऱ्या व्यक्तीला किंवा गावगाड्याचा भाग नसणार्या भटक्या विमुक्त आणि आदिवासी जातींना सामाजीक बहिष्काराला सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, प्रबुद्ध भारत च्या फुसबुक अकाऊंटवर आज एक पोस्ट करण्यात आली ज्यामध्ये पारधी समाजाच्या एका महिलेचा अहिल्यानगर जिल्हाच्या कर्जत तालुक्यातील पाटेवाडी गावात अंत्यविधी करण्यास नकार देण्यात आला. तो समाज अजुनही महाराष्ट्रात भटक्या विमुक्त आणि देशात ओबीसी मध्ये मोडतो. तो केवळ गरीब आहे म्हणून त्याच्यावर ही परिस्थीत नाही आली. तर तो विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. असं त्यामध्ये म्हटलं आहे. 

शिवाय आर्थिक निषकांचा विचार करता OBC,आरक्षणात क्रिमीलीअरची अट आहे. म्हणजे कोणताही आर्थिक उत्पन्न जास्त असणाऱ्या ओबीसी व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे इथे आर्थिक निकष वापरले जातात. असा तर्क दिला जातो. मात्र तरिही जातीय आरक्षण संपावे आणि सर्वजण समान मानून केवळ गरीबांनाच प्रोत्साहन मिळावे अशीही भावना अनेकांची असल्याचं पाहायला मिळत. त्यावेळी आमच्यावर झालेल्या हजारो वर्षांच्या अन्यायामुळे आम्ही सामाजीक आणि आर्थिक परिस्थिती अशी झाली आहे. असा तर्क दिला जातो. जोपर्यंत देशातली जातीच्या आधारावर होणारा भेदभाव संपणार नाही तोपर्यंत देशात जातीवर आधारित आरक्षण संपणार नाही ही भुमिका आरक्षणाच्या बाजूने असणाऱ्या घटकाकडून घेतली जाते.

Reservation : १० वर्षांच्या आरक्षणाची खरी गोष्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *