आधुनिक ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह सध्या मीन राशीत आहे आणि तो १२ एप्रिलपर्यंत वक्री स्थितीत राहणार आहे. १३ एप्रिल रोजी Shukra मीन राशीत Wakri होईल. शुक्र ग्रह ज्योतिषशास्त्रात सौंदर्य, प्रेम, समृद्धी, वैभव आणि आरामाचा कारक मानला जातो. त्याच्या वक्री गतीमुळे काही राशींवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
शुक्र ग्रहाच्या वक्री अवस्थेचा परिणाम काही राशींवर वाईट होणार आहे. या राशींनी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. चला, तर मग जाणून घेऊया त्या तीन राशींच्या बाबतीत, ज्यांवर शुक्राच्या वक्री होण्याचा परिणाम होईल:
१. मिथुन (Gemini):
मिथुन राशीच्या लोकांच्या दहाव्या घरावर शुक्राच्या वक्री गतीचा प्रभाव पडेल. यामुळे, तुमचे शत्रू सक्रिय होऊ शकतात, बॉस किंवा वरिष्ठांशी वाद होऊ शकतो, आणि पदोन्नती किंवा वेतनवाढीसाठी अडचणी येऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार येऊ शकतो, पण घाईघाईने निर्णय घेणं हानिकारक ठरू शकतं. संयम ठेवणे आवश्यक आहे.
२. सिंह (Leo):
सिंह राशीच्या लोकांच्या आठव्या भावावर शुक्राचा प्रभाव पडेल. अचानक खर्च तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात, तसेच आरोग्य संबंधित समस्याही होऊ शकतात. काही जुने कर्ज त्रास देऊ शकतात आणि प्रेम जीवनात अस्थिरता येऊ शकते. जोडीदाराशी संवाद साधताना शब्द वापरतांना काळजी घ्या.
३. वृश्चिक (Scorpio):
वृश्चिक राशीच्या लोकांना पाचव्या घरात शुक्राच्या वक्री गतीचा परिणाम होईल. प्रेम जीवनात गैरसमज निर्माण होऊ शकतात आणि ब्रेकअपची शक्यता वाढू शकते. विद्यार्थ्यांसाठी मन विचलित होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अभ्यासात अडचणी येऊ शकतात. करिअर मध्ये गोंधळाची स्थिती निर्माण होऊ शकते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)