हिंजवडीत टेम्पोला आग, चौघांचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी फेज वन येथे आज सकाळी 8 वाजता एका टेम्पोला अचानक आग लागली, यात चौघांचा होरपळून मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेले सर्वजण व्योमा ग्राफिक्स कंपनीचे कर्मचारी होते.
घटना कशी घडली?
- टेम्पो MH14 CW 3548 मध्ये एकूण 12 कर्मचारी प्रवास करत होते.
- चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली, त्यामुळे चालक आणि काही जण तातडीने उतरले.
- मात्र, मागच्या बाजूचा दरवाजा लॉक झाल्याने काही जण आतच अडकले.
- यात चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी आहेत.
मृतांची नावे:
- सुभाष भोसले (वय 42)
- शंकर शिंदे (वय 60)
- गुरुदास लोकरे (वय 40)
- राजू चव्हाण (वय 40)
जखमींवर उपचार सुरू
जखमींना रुबी हॉल क्लिनिक, पुणे येथे दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोर, आणि टेम्पो चालक जनार्दन हंबारिडकर यांचा समावेश आहे.
पोलिस तपास सुरू
हिंजवडी पोलीस ठाण्यात घटनेचा तपास सुरू आहे. टेम्पोच्या दरवाजाची यंत्रणा फेल झाली का? वाहन सुरक्षिततेच्या निकषांचे पालन झाले होते का? याचा शोध घेतला जात आहे.
👉 या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नोंदवा.