Cinema वरुन सध्या राजकारणात तापलेलं वातावरण! छगन भुजबळ यांनी ‘काही कर्मठ ब्राह्मण’ असा दिला सडेतोड प्रतिसाद. जाणून घ्या Movie Release Date, Cast & वादाचा Full Update.
Phule Cinema वरुन सध्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर तापलेलं वातावरण पाहायला मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट 11 एप्रिल रोजी म्हणजेच त्यांच्या जयंतीच्या दिवशी प्रदर्शित होणार होता पण सिनेमावर सुरू असलेल्या वादामुळे आता त्याची रिलीज डेट 25 एप्रिल 2025 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
या वादावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया विशेष गाजत आहे. भुजबळ यांनी म्हटलं की फुले सिनेमातील एकही सीन कट करता कामा नये कारण हा सिनेमा सत्यावर आधारित आहे. त्यावेळी सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते. अनेक ब्राह्मणांनी सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंना मदत केली होती. काही कर्मठ ब्राह्मण मात्र फुलेंच्या विचारांच्या विरोधात होते आणि या सगळ्या गोष्टी सिनेमात दाखवल्या आहेत.
भुजबळ यांनी स्पष्ट केलंही आहे की आजच्या ब्राह्मण समाजावर कुठलाही निशाणा साधला गेलेला नाही तर त्या काळच्या सामाजिक परिस्थितीचे चित्रण सिनेमात प्रामाणिकपणे करण्यात आलं आहे.

फुले सिनेमा हा Mahatma Jyotiba Phule यांच्या प्रेरणादायी आणि संघर्षमय आयुष्यावर आधारित असलेला बायोपिक हिंदी चित्रपट आहे. या सिनेमात ज्योतिबा फुलेंची भूमिका अभिनेता प्रतीक गांधी तर सावित्रीबाई फुलेंची भूमिका अभिनेत्री पत्रलेखा यांनी साकारली आहे.
या वादांवर सिनेमाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी देखील स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी सांगितलं की सेन्सॉर बोर्डाने काही सुधारणा सुचवल्या आहेत आणि त्या आम्ही मान्य केल्या आहेत पण सिनेमातील एकही सीन कट करण्यात आलेला नाही. फुले हा एक शैक्षणिक सिनेमा आहे आणि विशेषतः तरुणांनी तो नक्कीच बघावा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
दिग्दर्शक पुढे म्हणाले की काही संघटनांनी सोशल मीडियावर स्वतःचं मत व्यक्त केलं आणि त्यामुळे काही लोकांची दिशाभूल झाली. आम्हाला सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकू द्यायचा नव्हता म्हणून आम्ही प्रदर्शनाची तारीख दोन आठवड्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
फुले सिनेमा हा फक्त मनोरंजनासाठी नसून समाज परिवर्तनाची प्रेरणा देणारा सिनेमा आहे आणि त्यामुळे वादाची छाया दूर करत प्रेक्षकांनी हा सिनेमा मोठ्या प्रमाणात बघावा अशी अपेक्षा सिनेमाच्या टीमने व्यक्त केली आहे.
जर तुम्हाला सामाजिक बदल घडवणाऱ्या आणि सत्य सांगणाऱ्या काही काल्पनिक घटना बघायला पटेल असतील तर Phule Movie बारशी तुमच्या Watchlist मध्ये असली पाहिजे.