Maharashtra Weather cloud Burst
Mumbai Weather Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

What is Cloud Burst ढगफुटी की अतिवृष्टी? पुराची खरी कारणं

Spread the love

cloud Burst की अतिवृष्टी? महाराष्ट्रातील पुरामागचं खरं कारण

Maharashtra Rain and Cloud Burst
Maharashtra Rain and Cloud Burst
सगळ्यात आधी आपण cloud Burst ची व्याख्या काय आहे पाहु. एका तासात १ ते १० चौरसकिलोमीटर परिसरात १०० मीलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला तर त्याला ढगफुटी म्हणतात. एका दिवसात नाही बरका आपण आजकाल ज्या बातम्या ऐकतो त्या एका दिवसात किती मिलीमीटर पाऊस झाला याच्या ऐकत असतो. त्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं. पण १ तासात एवढ्या कमी भागात १०० मीलीमीटर पाऊस होणं. ही खुप दुर्मीळ घटना आहे. शिवाय तीचे अतिशय गंभिर परिणाम होतात. जगात या घटना खुप कमी प्रमाणात घडतात. जास्त करुन पर्वतरांगात, डोंगराळ भागात त्या घडतात. जर मग त्या इतक्या दुर्मीळ आहेत तर आपण रोज बातम्यात जे ऐकतोय की ढगफुटी सदृश्य पाऊस ते काय आहे. 

परिस्थीती अधिक गंभिर करुण सांगण्यासाठी मिडियाने अलिकडच्या काळात या शब्दाचा वापर अधिक केला आहे. मुळात  cloud Burst सदृश्श असं काही नसतं. रिमझीम, मुसळधार, अतिमुसळधार, अतिवृष्टी असं त्याचं वर्गीकरण त्याच्या तिव्रतेनुसार केलं जातं. याच्यानंतर येते ढगफुटीची घटना जी क्वचितच घडते. आता तुम्ही म्हणाल की पुर कसा आला मगं. पाऊस दरवर्षीपेक्षा जास्त होतोय. मगं याला काय म्हणायचं? तर हो. हे खरं आहे.

नदी, नाले तुडुंब भरले आहेत. पाणी गावांत, शेतात शिरल्यामुळे अतिशय गंभिर परिस्थीती महाराष्ट्राच्या अनेक भागात झाली आहे. पण तरिही त्याला  cloud Burst म्हणणं संयुक्तीक नाही. शास्त्रीय नाही. आपण मुसळधार पाऊसाला इतकं सामान्य केलं आहे की त्या शब्दाचं गांभिर्यय राहिलं नाही. त्यामुळे सर्वांचं लक्ष खेचून घेण्यासाठी हा शब्द वापरतात. मुळात ढगफुटीसद्श्य हा शब्दच अस्तित्वात नाही. आपण ढगफुटीची काही उदाहरणं पाहु म्हणजे आपल्या लक्षात येईल. 

जगात १ मिनिटात ३६ मिमी, ५ मिनिटात ६६ मिमी, १५ मिनिटात २०० मिमी, १ तासात ४०० मिमी, १ दिवसात ११०० मिमी आणि दोन दिवसात १८०० मिमी पावसाचे रेकॉर्ड आहेत. मुंबईचा २६ जुलैचा दिवसभरात पडलेला १००० मिमी पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता. अशा परिस्थितीत १५ किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात. आणि ते इतक्या कमी वेळात कोसळतात की दरड कोसळणे आणि भयंकर पुर येणे या घटना त्यातून घडतात.

आता विषय असा आहे की महाराष्ट्राच्या अनेक भागात जो पुर येतोय तो आधिच धरणं ही भरलेली आहेत. अशात पाण्याचा साठा आणि जमीनीची धारण करण्याची क्षमता संपल्यामुळे होतोय. ते दिवसभरात ५०-६० मिलीमीटर पाऊस झाला तरी होत आहे. खडकवासला सारखं धरण ज्याची क्षमता बाकी धरणांच्या तुलनेत कमी आहेत. शिवाय डोंगरमाथ्याला झालेला पाऊस लगेच धरणात पोहोचतो. त्यामुळे ते लगेच भरत. पण म्हणून त्यातून झालेल्या विसर्गाला ढगफुटी कारणीभुत नसते.

 वातावरणात झालेल्या बदलामुळे आजकाल पावसाची तिव्रता वाढलेली आहे. पण बऱ्याचदा आपण पुणे-मुंबई सारखी शहर पावसाने भरली की त्याला ढगफुटीचं नाव देतो. प्रत्यक्षात तेवढ्या पाण्याचा निचरा करण्याची क्षमता आपली नसल्यामुळे लगेल शहर कमरेपर्यंत भरतात ही प्रशासनाची चुक आहे. नद्यांच्या बाजूला झालेलं अतिक्रमण याला कारणीभुत असतं. मात्र आपण फक्त शब्दाचा बदल करुन निसर्गावर तो ढकलुन देतो. त्यामुळ सरकार, प्रशासन हात वर करायला मोकळं. 

 मुंबईसारख्या शहरात तर दिवसात २०० मीलीमीटर पाऊस सुद्धा सामान्य गोष्ट आहे. तिथे १०० दिडशे मीमी पाऊसानेच मुंबई बुडते हे कुणाचं अपयश आहे. असो यातून सरकार किती चुकीचं किंवा शब्दाचा वापर योग्य व्हावा हा मुद्धा नाहीये. इथं विषय आहे की चुकीच्या शब्दामुळे आपल्यापर्यंत पोहोचणारी माहीती ही चुकीच्या पद्धतीने येते. तिचा चुकीचा अर्थ लावला जातो. सत्य आहे त्यापेक्षा भयंकर करुन दाखवलं जातं. तसं भासवलं जातं. आणि अशा परिस्थीतीत तुम्हाला खरी माहीती देण्यासाठीच हा व्हिडियो. 

अतिवृष्टीमुळे जगात सगळीकडे पूर येतो. यातून अमेरिका, जपान, चीन, युरोप सारखे प्रगत देश सुद्धा सुटलेले नाहीत. पाणी जिरण्याची आणि साठण्याची क्षमता संपली कि पूर येतोच. त्यासाठी cloud Burst ची गरज नाही. आणि म्हणून त्याला ढगफूटीचं नाव देणं हे सुद्धा चुक आहे. 

पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *