Mumbai Indians’ young pacer Ashwani Kumar is the new star in town! आपल्या दमदार कामगिरीने त्याने KKR विरुद्धच्या सामन्यात 4 बळी घेतले आणि संपूर्ण क्रिकेट जगताचे लक्ष वेधून घेतले. IPL म्हणजेच talent meets opportunity, आणि Ashwani ने त्याच्या संधीचं सोनं केलंय.
गावातून Wankhede पर्यंतचा प्रवास
Ashwani च्या यशामागे त्याच्या कठोर परिश्रमांची गोष्ट आहे. त्याचे वडील, जे गावात सव्वा एकर जमीन सांभाळतात, त्यांनी सांगितलं की Ashwani रोज INR 30 घेऊन घरून स्टेडियमपर्यंत प्रवास करत असे. लहानपणापासून क्रिकेटची आवड असलेल्या या युवा खेळाडूने अनेक अडचणींवर मात करत आपलं स्थान पक्क केलंय.
PCA Academy आणि रणजी प्रवास
अनेकांना ठाऊक नसेल, पण Ashwani ने PCA Academy मध्ये Abhishek Sharma आणि Arshdeep Singh सोबत ट्रेनिंग केलंय. त्याने 2019 मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे, तो KKR च्या Ramandeep Singh बरोबरही सराव करत असे. तसेच, 2023 मध्ये Sher-E-Punjab T20 Cup जिंकणाऱ्या BRV Blasters संघाचाही तो भाग होता.
गावातील आठवणी
Ashwani चा भाऊ Shiv Rana सांगतो, “तो आम्हा गावकऱ्यांना रोज सकाळी लवकर मैदानात यायला सांगायचा, आणि आम्ही त्याच्यासमोर फलंदाजी करायचो.” त्याच्या मेहनतीचे फळ आता मुंबई इंडियन्सला मिळताना दिसत आहे.
पुढील लक्ष्य – IPL 2025 स्टारडम!
Ashwani Kumar च्या दमदार कामगिरीमुळे तो पुढच्या सामन्यांमध्येही MI साठी एक game-changer ठरू शकतो. त्याच्या वेगवान माऱ्याने IPL 2025 मध्ये अजून कोणते चमत्कार घडतात ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल.