IND VS PAK
India International News आजच्या बातम्या आंतरराष्ट्रीय

IND VS PAK भारताचे पाकिस्तानविरोधी निर्णय: Economic Impact  आणि संभाव्य परिणाम

Spread the love

IND VS PAK

भारत आणखी दोन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात एकूण 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. याच भूमिकेतून भारताने पाकिस्तानसोबतचा Indus Water Treaty स्थगित केला आहे. इतरही अनेक निर्णय भारताने घेतले आहेत.

आता भारत आणखी दोन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयांमुळे पाकिस्तानला आणखी मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

भारत नेमके कोणते निर्णय घेण्याची शक्यता?

भारत पाकिस्तासोबतचा व्यापार पूर्णपणे थांबवण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत पाकिस्तानच्या विमानांसाठी आपले airspace बंद करण्याची शक्यता आहे. तसेच, भारत पाकिस्तानच्या जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी घालण्याचीही शक्यता आहे. सरकार त्यावर विचार करत असल्याचं सांगितलं जात आहे.

पाकिस्तानवर नेमका काय परिणाम पडणार?

जर भारताने पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांवर येण्यास बंदी घातली, तर पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. पाकिस्तान त्यांचे सामानाने भरलेले जहाज भारतात आणू शकत नाही. त्यामुळे त्यांनी उत्पादित केलेला माल ते भारतासह इतर देशातही पोहोचवू शकणार नाहीत. Transportation costs वाढतील, आणि पाकिस्तानला संपूर्ण जगात व्यापार करण्यासाठी भारतीय बंदरं फार महत्त्वाची आहेत. मात्र, भारताने पाकिस्तानी जहाजांना बंदरावर येण्यास मनाई केली तर त्याचा चांगलाच फटका पाकिस्तानला बसणार आहे.

भारत पाकिस्तानसाठी हवाईक्षेत्र बंद करण्याची शक्यता ( IND VS PAK )

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने भारताच्या विमानांना त्यांचे हवाईक्षेत्र बंद केले आहे. भारताने पाकिस्तानविरोधात पाच निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता भारतही पाकिस्तानी विमानांना हवाईक्षेत्र बंद करण्याची शक्यता आहे. जर असे झाले, तर पाकिस्तानातील विमान प्रवासाचा खर्च वाढणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *