या दिवाळीत Gold खरेदी करणं योग्य का धोकादायक?

Gold Prices : सोन्याचे दिवस आले का हे माहीत नाही. पण सोन्याला दिवस आले हे नक्की. सोन्याने ऐन सनासुदिला घेतलेली भरारी. त्यामुळे आता ते प्रतितोळा ३ लाखापर्यंतही जाऊ शकतं किंवा पुन्हा घसरुन ८० हजारावरही येऊ शकतं. असे दोन्ही अंदाज वर्तेवले जात आहेत. सोनं प्रतितोळा ₹3 लाखांपर्यंत जाण्याची चर्चा आहे, तर काही तज्ज्ञ 80 हजारांपर्यंत घसरण्याचं भाकीत करत आहेत. मग प्रश्न असा — या दिवाळीत सोनं खरेदी करणं योग्य का धोकादायक?
आता Gold Rate किती चाललाय हे काही मी तुम्हाला सांगत नाही. एव्हाणा तुमच्यापर्यंत त्याची चर्चा पोहचलीच असेल. पण आता कुणी म्हणतय की प्रतितोळा भाव ३ लाखापर्यंत जाऊ शकतो. कुणी म्हणतयं ते पुन्हा ८० हजारावर पण येऊ शकतं. हे सगळं कशाच्या आधारावर बोललं जातयं. कोणत्या गोष्टी सोन्याच्या भावावर परिणाम करत आहेत. आणि त्यामुळे दिवाळीत आपण सोनं खरेदी करावी का? याची माहीती आपण घेऊया.
भारतीयांनी तर सोन्यात गुंतवणूक करण्याला नेहमीच प्राधान्य दिलं आहे. पण जागतीक पातळीवर पाहता चांगला परतावा म्हणून बाकीच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक झालेली पहायला मिळते. जसेकी अमेरिकन डॉलर. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आडमुठ्या धोरणांमुळे त्याचा परिणाम डॉलरवर झाल्याचं पहायला मिळतं. डॉलरचं मुल्य घसरु लागल्याने जगातील गुंतवणूकदारांनी आता सोन्यामध्ये गुंतवणूक करायला सुरवात केली आहे.
अमेरिकेमुळे, russia ukraine संघर्षामुळे आमि अनेक इतर कारणांमुळे सध्या जगावर आर्थिक मंदिचं संकट आहे. अशात सेफ इन्वेस्टमेंट म्हणून अशा काळात सोन्याला प्राधान्य दिलं जातं. अमेरिकेच्या धोरणांना भिवूनच किंवा सावधपणाची भुमिका म्हणून आपला देश भारत आणि चिन हे दोन्ही देश सोन्यात खुप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अमेरिका त्यांच्या डॉलर या चलणाचा कधिही चुकिचा वापर करुन आपल्याला अडचणीत आणू शकतो.
अगदी तसच तुर्की देश सुद्धा करत आहे. आता ऐवढे मोठे श्रीमंत देश ही खरेदी करत असतील तर मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे Gold Rate गगनाला भिडले आहेत. हे मंदिचं संकट असच मोठं होत राहिलं किंवा अमेरिका आणि चीन किंवा भारत हा संघर्ष वाढत गेला तर हे भाव असेच वाढत राहण्याची शक्यता आहे. म्हणूनच सोनं प्रतिग्रॅम ३ लाखापर्यंतही जाऊ शकतं असं म्हटलं जातय. पण हे सावट कमी झालं.
या जगातल्या मोठ्या राष्ट्रांतील वाद निवळला तर गुंतवणूकदार पुन्हा आपल्या सोन्यातल्या गुंतवणुकी डॉलरमध्ये किंवा मार्केटमध्ये आणतील. तेव्हा मात्र हे Gold Rate पुन्हा एकदा कोसळतली. मग ते लाखावर थांबतील का ८० हजारावर सांगता येत नाही. आता हे जगावरचं जागतीक मंदिचं संकट कधी दुर होईल? त्याची भविष्यवाणी कुणीच नाही करु शकत. मंग प्रश्न पडतो की दिवाळीला सोनं खरेदी करावं का?
अशात वातावरणात गुंतवणूक म्हणूण कोणत्याही गोष्टीकडे सावध पद्धतीने पाहावं. जे जितक्या लवकर वरती जातं. खालीही तितक्याच वेगाने येण्याची शक्यता असते. असं असलं तरिही सोन्याकडे एक सुरुक्षीत गुंतवणूक म्हणूनच पाहिलं जातं. हजारो वर्षांपासून ते एक महत्वाचं चलन राहिलं आहे. अशात ज्याला कुणाला आपल्या आर्थिक सुरक्षीततेसाठी गुंतवणूक करायची असले. तर सोन्यातील गुंतवणूक चांगला पर्याय आहे. इतक्या वाढलेल्या बाजारभावातही.
पहा अजून संबंधित बातम्या-