Eknath shinde live
आजच्या बातम्या महाराष्ट्र

एकनाथ शिंदे यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर थेट निशाणा – “जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा!”

Spread the love

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “औरंगजेब जितका क्रूर होता, तितकेच फडणवीसही क्रूर आहेत” असे विधान केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विधानावर टीका करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपकाळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

शिंदेंचा सपकाळ यांना प्रत्युत्तर:

“ज्या औरंगजेबाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, त्याची तुलना तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी करता? आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून काम करतो. आम्ही राज्यासाठी लोकाभिमुख योजना आणल्या, विकासाची गती वाढवली. आमच्या कार्याची पोचपावती म्हणून जनतेने आम्हाला लँडस्लाईड मँडेट दिले. मुख्यमंत्री म्हणून आता देवेंद्र फडणवीस आणि आम्ही टीम म्हणून काम करत आहोत.

कुठे औरंगजेब आणि कुठे देवेंद्र फडणवीस? अशी तुलना करण्यापूर्वी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगायला हवी होती,” असे शिंदे म्हणाले.

औरंगजेबाच्या उदात्तीकरणावर संताप:

“औरंगजेबाने महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तो देशद्रोही होता. त्याचं समर्थन करणारा कोणताही भारतीय देशभक्त असू शकत नाही. मग काँग्रेस नेते हे समर्थन का करत आहेत? यांचा औरंगजेब कोण लागतो? नातेवाईक आहे का? सगासोयरा आहे का?” असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला.

औरंगजेबाच्या कबरीवरून वाद पेटला:

औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वादंग माजले असून “ही कबर उखडून काढा” अशी मागणी सत्ताधारी गटातून होत आहे. नागपुरात या मुद्यावरून हिंसाचार, दगडफेक आणि पोलिसांवर हल्ला झाला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून प्रशासनाने संचारबंदी लागू केली आहे.

📌 महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या तापलेले असून, हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *