×

Dhananjay Munde vs Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंचं चॅलेंज पाटलांनी स्विकारलं, पुढे काय होणार?

Dhananjay Munde-Manoj Jarange Patil

Dhananjay Munde vs Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंचं चॅलेंज पाटलांनी स्विकारलं, पुढे काय होणार?

Spread the love

Dhananjay Munde vs Manoj Jarange Patil :

बीड जिल्हा आता मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा गढ बनला आहे. मनोज जरांगे पाटील विरुद्ध Dhananjay Munde हा त्यातला एक महत्वाचा कोपरा. लोकसभेला पंकजा मुंडेना पाडण्यासाठी जरांगे पाटलांनी आपली ताकद लावली होती तर त्यांना निवडून आणण्यासाठी धनंजय मुंडेंनी. पुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणातही धनंजय मुंडेंना आपलं मंत्रीपद गमवाव लागलं.

महाराष्ट्रातील इतर भागांपेक्षा मराठवाड्याच्या बीड जिल्हात मराठा विरुद्ध ओबीसी आणी त्यातही जरांगे विरुद्ध मुंडे हा संघर्ष टोकाचा बनला आहे. आता मनोज जरांगेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यांना जिवे मारणाचा कट धनंजय मुंडेंनी रचल्याचं सांगितलं. याच्यावर धनंजय मुंडेंनीही उत्तर दिलं. काय आहे हा सगळा विषय Dhananjay Munde वर नेमके आरोप झाले आहेत. आणि त्याच्यारव त्यांनी ब्रेन मॅपींग आणि नार्कोटेस्टची मागणी का केली आहे.

मनोज जरांगे यांनी पत्रकारासमोर दोन कोटींची सुपारी त्यांना जीवे मारण्यासाठी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी जालना स्थानिक गुन्हे शाखेने बीड जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेतल्याच कळतयं. या सगळ्यात या दोन आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कसा संबंध आहेत. शिवाय शुक्रवारच्या त्यांच्या प्रेसमध्ये त्यांनी एक कॉल रेकॉर्डींग सुद्दा ऐकवली.

दोन आरोपींमधली हे रेकॉर्डिंग आहे असं त्यांनी सांगितलं. मराठा समाजाने याच्यावर शांत रहाव याचा तपास करायला याचा पाठपुरावा करायला मी समर्थ आहे असं जरांगेंनी यावेळी बोलताना आवाहन केलं. गुरुवारी त्यांनी Dhananjay Munde च नाव सांगितलं नव्हतं शुक्रवारी मात्र नावानीशी त्यांच्यावर आरोप केले. तु खुप चुकीच्या ठिकाणी हात घातलाय, असे खुप बघितलेत, हे पाऊल तू उचलायला नको होतं, पण आम्ही मराठे आहोत लक्षात ठेव.

या सगळ्यानंतर Dhananjay Munde नी पत्रकारांशी संवाद साधला आणि मंत्री म्हणून मला जेव्हा त्यांचं उपोषण सोडायला लावलं, तेव्हा माझ्या हाताने पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडल्याचं सांगितलं. तुम्ही हाकेंना मारलं.. तुम्ही वाघमारेंना मारलं.. मारामारीची प्रवृत्ती कोणाची आहे? अशी किती उदाहरणं देऊ म्हणत त्यांनी जरांगे पाटलांवर टिका केली. सोबतच मी फार्म हाऊसवर दर सोमवारी बसतो, अनेकजण येतात, भेटतात, बोलतात, भेटल्याने आणि बाजूला जाऊन बोलल्याने यात कट कसला रचला जातोय, हे मला कळत नाही.

अटक झालेले कार्यकर्ते त्यांचेच, बोलणारे कार्यकर्ते त्यांचेच, कबुली जबाब देणारे कार्यकर्ते त्यांचेच, आरोप मात्र माझ्यावर? माझी एक मर्डरर म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे. माझी मागणी आहे या सर्व प्रकरणाची तपासणी सीबीआयने केली पाहीजे. माझ्या मनात काय पाप असेल तर माझं ब्रेन मॅपींग करा. माझ्या बरोबर जरांगेंचही करा. त्याच्यासोबत नार्को टेस्ट करा. निवडणूकीच्या तोंडावर काहीही नावं घ्यायची. असं Dhananjay Munde बोलले. यानंतर जरांगे पाटलांनी हे आव्हान स्विकारत नार्कोटेस्ट करायला तयार असल्याचं म्हटलं. शिवाय जालण्याचे एसपी याचा योग्य तो तपास करतील. असंही ते म्हणाले.

Madhu Limaye – पुण्याचा नेता बिहारचा खासदार | अनोखी स्टोरी

Previous post

Shefali Verma Creates History: फायनल गाजवणाऱ्या २१ वर्षीय Shefali Verma वर्माचा आणि जिवनप्रवास क्रिकेट विश्वातील नवा तारा!

Next post

प्रभाग क्रमांक १५ ब चे काँग्रेस उमेदवार वैभव भंडारी यांना जनतेचा मिळतोय जोरदार प्रतिसाद…

Post Comment

You May Have Missed