Maharashtra farmers : farmers tax भरत नाहीत. भरला तर थोडेच भरत असतील. यांना फक्त अनुदान पाहिजेत. शेती न केलेल्या शहरी मध्यमवर्गीयांची हिच समजूत असते. आज जेव्हा महाराष्ट्र सरकार ३१ हजार कोटींच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा करतयं. तेव्हा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या असतील. पण त्यातली त्या शेतकऱ्यापर्यंत खरी मदत कीती पोहचणार हा मोठा प्रश्न आहे. त्याबदल्यात सरकारची मदत किती तुटपुंजी आहे. दुष्काळ पडला, शेतकऱ्याला मदत. गारपीट झाली मदत, अतिवृष्टी झाली मदत. रोगराई पसरली मदत. लाईट बील माफ, वेगवेगळी अुनदानं, कर्जमाफ्या. अरे बापरे सरकार शेतकऱ्यांसाठी कीती करतं. तुम्हाला पण असचं वाटतं का? विलास शिंदे हे समुह शेतीच्या माध्यमातून नाशिक मध्ये सह्याद्री फार्म नावाची कंपनी चावलतात. त्यांनी आकडेवारीसहीत सरकार कसं शेतकऱ्याकडून tax च्या स्वरुपात ४ रुपये घेतं आणि त्यातलाच १ रुपया. टुकड्या-टुकड्यात देतं असं सांगितलं. त्यांनी सांगितलेलं हे गणित आपले डोळे उडणारं आहे. एकट्या सह्याद्री फार्मने जी जवळपास १० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा समुह आहे. मागच्या १४ वर्षात सरकारला टॅक्सच्या माध्यमातून २१८ कोटी रुपये दिले आहेत. त्यात वेगवेगळ्या अनुदान योजनांमधुन त्यांना ५४ कोटी मिळाले. म्हणूनच ते म्हणतात की farmers कर भरत नाही असं कोण म्हणतं? Goverment आम्हाला त्यांना आम्ही दिलेल्या ४ रुपयातला १ रुपया देतं. बऱ्याचजनांना वाटेल समुह शेतीमुळे आणि दुसऱ्या देशात विकलेल्या शेतीमालामुळे ही शेतकऱ्यांची कंपनी पैसा कमवत असेल. त्यामध्ये काही प्रणामात तथ्य पण आहे. पण सामान्य farmers सुद्धा Goverment च्या तिजोरीत किती पैसा वर्षाला जमा करतो याचं त्यांनी एक उदाहरण दिलं. एक एकर द्राक्षबागेला लागणाऱ्या गोष्टी. जसंकी तार, स्टिल अजूनही इतर गोष्टी याला जो खर्च येतो. त्यातला ३६ हजार रुपये नुसता टॅक्सच जातो. आणि हा दरवर्षी जोतो. महाराष्ट्रातलं एकूण द्राक्ष पिकाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा विचार केला तर जीएसटीतून तो १२ हजार कोटी रुपये भरतो. बरं हे फक्त द्राक्ष वाल्यांचं. सगळ्या शेतकऱ्यांचा विचार केला तर महाराष्ट्रात शेतकरी करत असलेल्या शेतीमालाची उलाढाल आहे ४ लाख कोटी रुपये. त्यातला सर्वसाधारण जीएसटीचा स्लॅब आजवर लागत होता त्या हिशोबाने विचार केला तर वर्षाला याच्यातून सरकारला मिळणारा tax आहे ७० ते ८० हजार कोटी. जे म्हणतात की शेतकरी agricultural tax भरत नाही. त्यांना हा आकडा दाखवा. Vilas Shinde नी साध्या पद्धतीने सांगीतलं. शेतीला तुम्ही व्यवसाय म्हणून बघा. आता सरकार काय करतं. एखादा उद्योग राज्यात आणण्यासाठी त्याच्यात एकप्रकारे गुंतवणूकच करत असतं. त्या उद्योगांना कवडीमोल भावाने जमीनी उपलब्ध करुन दिल्या जातात. तुम्ही ऐकलं असेल १ रुपया एकर या भावाने जमीनी उद्योगासाठी दिली. त्या उद्योगासाठी पाण्याची सोय करतं. एमआयडीसीत २४ तास विज असते. सुरवातीला tax मद्ये त्याला स्थिरस्थावर होईपर्यंत सुट दिली जाते. अनेक सबसीडीज असतात. हे सरकार का करतं. तर भविष्यात त्यांना त्यातून चांगला परतावा मिळणार असतो. जर ७० हजार कोटी पेक्षा जास्त शेतीसाठी लागणाऱ्या आणि शेतीमालामुळे सरकारला मिळत असतील तर त्याच्या भविष्यासाठी सरकारने त्याला जमीनीची सोडा. पण मुबलक पाण्याची. २४ तास विजेची. वेगवेगळ्या सबसीडीजची सोय करायला नको. सरकार काय करतं. ठिबकवर सबसीडी. ते पैसै कुणाला? ठिबक कंपनीला. थेट मदत का करत नाही. थेट मदत कीती करतं. वर्षाला १२ हजार रुपये. किसान सन्मान योजनेचे. अहो खतावर लागणार tax कमी करा. त्याला सगळं कळतयं. हा पैसा कुठं जातोय ते. असं तुकड्यातुकड्यात का देता. वर्षााल ७० हजार कोटीचा tax देणाऱ्या शेतकऱ्याला ३१ हजार कोटीच्या पॅकेजची घोषणा झाल्यावर ते सगळ्यांना जास्त वाटतं असतील. पण ते सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी खुप मोठा संघर्ष आहे. Goa Protest : गोव्यातले लोकं रस्तावर का उतरले? CM, पोलीस आणि भाजप यांच्या कार्यालयावरही मोर्चा
Updates
Beed Railway धावणार! अमोल गलधरांच्या संघर्षाला सलाम
१७ सप्टेंबरला Beed Railway रेल्वे धावणार. देशाचे पंतप्रधान मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिवशी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत या बीडकरांच्या स्वप्नांना हिरवा कंदिल दाखवणार. पण बीडमध्ये रेल्वे येणार म्हटल्यावर अनेक राजकीय नावांसोबत एक नाव जोमाने पुढे येत. ते म्हणजे Amol Galdhar यांचं. बीड मधल्या प्रत्येकाला हे नाव परिचित आहे. Beed रेल्वेसाठी संघर्ष बीड मधल्या प्रत्येकानेच केला. अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत प्रत्येक लोकप्रतिनीधी यासाठी प्रयत्नशील राहीला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याचं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. अशात एका नावाचा उल्लेख सर्वजण करत आहेत. ते म्हणजे स्व. अमोल गलधर ज्यांचं २०१० मध्ये एका अपघातात निधन झालं. बीड च्या कानाकोपऱ्यातून त्यांनी लोकांना रेल्वेच्या प्रश्नासाठी एकत्र केलं होतं. त्यांना रेल्वेप्रवासाचं महत्व पटवून दिलं. इतकच नाही तर लोकांना आंदोलनासाठी सुद्धा त्यांनी एकत्र केलं. महाराष्ट्रभरातून बीडच्या तरुणांना एकत्र करुन त्यांनी रेल्वे मिळण्यासाठीच्या आंदोलनाला एकत्र आणलं. शेतकरी कुटुंबातला तरुण तडफदार नेता ज्याने त्या काळातील रेल्वे मंत्र्यांनाही सोडलं नाही. प्रत्येकाला भेटून त्यांनी याचं निवेदन दिलं होतं. मगं त्या ममता बॅनर्जी असुद्या नाहीतर मगं लालूप्रसाद यादव. अतिशय आक्रमक आंदोलनासाठी अमोल गलधर हे ओळखले जाऊ लागले होते. एकदा तर त्यांनी ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांचा पुतळा जाळून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवली होती. Beed मधल्या आधार प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. तरीही त्यांच्या रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत एकत्र यायचे. एका आंदोलनादरम्यान अशी परिस्थिती तयार झाली होती की, त्यावेळचे पोलीस अधिक्षख सुवेझ हक यांनी अमोल गलधर यांना अटक केली. त्यांची लोकप्रियता इतकी झाली होती की, अटकेची बातमी ऐकून Beed मध्ये परिस्थीती हाताबाहेर जाऊ लागली होती. त्यांचे कार्यकर्ते सार्वजनीक ठिकाणी दगडफेक करु लागले होते. संपुर्ण बीड बंद होण्याची परिस्थीती झाल्यामुळे शेवटी पोलीसांना अमोल गलधर यांना सगळ्यांसमोर आणावं लागलं. तेव्हा कुठे जाऊन सर्वजण शांत झाले होते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .
Weekly Horoscope 2025: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन
Weekly Horoscope: तूळ ते मीन राशींसाठी ऑक्टोबर नशीब Horoscope नुसार, सप्टेंबरचा शेवटचा आठवडा संपताच ऑक्टोबर महिना सुरू होणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत, तसेच शारदीय नवरात्र आणि दसरा उत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे ऑक्टोबरचा हा आठवडा अनेक राशींसाठी महत्वाचा ठरणार आहे. तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या आठवड्यात कशी असेल, ते जाणून घेऊया. तूळ रास (Libra Weekly Horoscope) तूळ राशीसाठी आठवड्याची सुरुवात काही संघर्षांमुळे मंदावलेली असली, तरी स्थिती हळूहळू सुधारेल. वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope) वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात काही गोंधळाने होईल, परंतु मध्य आठवड्यात गोष्टी स्पष्ट होतील. धनु रास (Sagittarius Weekly Horoscope) धनु राशीसाठी हा आठवडा नशीब पालटण्याचा संकेत देतो. मकर रास (Capricorn Weekly Horoscope) मकर राशीसाठी आठवडा जबाबदारी, शिस्त आणि ध्येयावर लक्ष केंद्रित करण्याचा असेल. कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope) कुंभ राशीसाठी आठवडा नवीन विचार, सामाजिक संवाद आणि आत्मनिरीक्षणाचा असेल. मीन रास (Pisces Weekly Horoscope) मीन राशीसाठी आठवडा बुद्धिमत्ता, आत्मनिरीक्षण आणि उर्जेने भरलेला असेल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तूळ ते मीन राशींसाठी व्यवसाय, आर्थिक, आरोग्य आणि नातेसंबंधांमध्ये नवीन संधी व सकारात्मक बदल दिसून येणार आहेत. ऑक्टोबरचा हा आठवडा प्रत्येक राशीसाठी नवीन ऊर्जा आणि नवे अनुभव घेऊन येणार आहे. Kerala Brain Eating Amoeba : केरळमध्ये थैमान घातलेल्या मेंदु खाणाऱ्या अमिबाची संपुर्ण माहीती.
Marathwada Flood: शेतकऱ्यांसाठी एकनाथ खडसेंची मागणी
मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे Marathwada Flood परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री Eknath Khadse यांनी तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांचे आदेश एकनाथ खडसे म्हणतात की, निवडणूक काळात ज्या पद्धतीने ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत शासकीय मदत दिली गेली, त्याच पद्धतीने आता पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही कोणतेही निकष लावले न जाता, पंचनामे न करता त्वरित Farmer Assistance दिली जावी. शेतकऱ्यांना विविध निकषांखाली त्रास दिला जात असल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणले. राज्यातील अनेक भागांमध्ये ओले दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे, असेही खडसे म्हणाले. आर्थिक संकटामुळे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पुरेशी मदत उपलब्ध नाही, त्यामुळे केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन मदत करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. Marathwada Flood शासकीय दुर्बलता आणि पाहणी खडसे म्हणाले, “सध्याचे सरकार संवेदनाहीन असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सूचना द्यावी लागतात. यावरून शेतकऱ्यांसाठी सरकारची खरी चिंता काय आहे हे स्पष्ट होते.” शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर त्यांचे कर्ज भरण्याची क्षमता राहणार नाही. म्हणून राज्य सरकारने त्वरित कर्जमाफीसाठी घोषणा करावी अशी मागणी खडसे यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. काही महिलांकडून निवेदन स्वीकारण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की कोणतेही अतिरिक्त निकष लावले जाणार नाहीत आणि आवश्यक असल्यास निकष शिथील करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंगोलीतील पीक नुकसान आणि विमा समस्या हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पीक अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर निर्माण झाला असून शेतातील पीक वाहून गेल्याची नोंद आहे. या परिस्थितीत पीक विमा कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला. विमाधारकांनी कार्यालयात जाब विचारण्यासाठी भेट दिली, परंतु तिथे आक्रमक होऊन कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्याची तोडफोड केली गेली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. सरकारकडे मागणी एकनाथ खडसे यांनी सरकारकडे तातडीने पुढाकार घेण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे निकष लावू नये असे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्हींकडून त्वरित पावले उचलली जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने स्पष्ट धोरण तयार करावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी पुढील उपाय शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी तातडीने योजना राबविणे आवश्यक आहे. पीक विमा कंपन्यांनीही या परिस्थितीत सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांच्या कर्जावर ताबडतोब सवलत मिळावी, हाच सरकारचा प्राथमिक हेतू असावा. या सर्व घटनांवरून स्पष्ट होते की राज्य आणि केंद्र सरकारला Government Relief, Farmer Assistance, आणि Flood Relief योजना त्वरित अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी Farmer Help मिळाल्यासच आर्थिक नुकसान कमी होऊ शकते. What is Cloud Burst? महाराष्ट्रात आलेल्या पुराला ढगफुटी कारणीभुत आहे का? सविस्तर माहीत..
Navratri कलशावर नारळ ठेवण्यामागचं रहस्य
Navratri Kalash with Coconut हा हिंदू धर्मातील सर्वात पूजनीय विधींमधील एक मानला जातो. नवरात्री हा देवी शक्तीच्या उपासनेचा उत्सव असून, या काळात प्रत्येक घरात Kalash Sthapana केली जाते. देवीचे स्वागत करताना कलशावर नारळ ठेवणे हे एक अनिवार्य अंग मानले जाते. पण हा विधी फक्त परंपरेपुरता नाही, तर त्यामागे खोल धार्मिक, आध्यात्मिक आणि शास्त्रीय कारणं दडलेली आहेत. नवरात्रीत कलशस्थापनेचं महत्त्व Navratri देवीला घरात आमंत्रित करण्यासाठी कलशाची स्थापना केली जाते. Kalash हे विश्वाचे प्रतीक मानले जाते, तर त्यावर ठेवलेला Coconut हा समृद्धी, शक्ती आणि पावित्र्याचा द्योतक आहे. नारळाचं धार्मिक महत्त्व Coconut ला ‘श्रीफळ’ असंही म्हटलं जातं. ‘नारळ’ हा शब्द ‘नर’ व ‘अळ’ यांचं मिश्रण मानला जातो, ज्याचा अर्थ मानवाचं जीवन. देवीला नारळ अर्पण करणं म्हणजे स्वतःचं जीवन देवीच्या चरणी अर्पण करणं होय. कलशावर नारळ ठेवण्याचे नियम कलशस्थापना करताना काही विशेष नियम पाळले जातात. शास्त्रानुसार हे नियम पाळल्यास देवीची कृपा मिळते. नारळ बसवण्याची पद्धत नारळ स्थापनेमागचं गूढ Coconut फक्त एक फळ नाही, तर ते जीवनाचं प्रतीक आहे. त्याच्या कठीण कवचामध्ये दडलेलं पाणी म्हणजे जीवनातील अमृतसार. म्हणूनच नारळ देवीला अर्पण करणं म्हणजे अहंकार, माया व देहभाव त्यागून आत्म्याचं शुद्ध रूप देवीसमोर समर्पित करणं होय. नवरात्रीतील आध्यात्मिक लाभ Kalash with Coconut या विधीमुळे मिळणारे आध्यात्मिक लाभ असे आहेत – ही परंपरा विशेष का आहे? Navratri दरम्यान कलशस्थापना व नारळ अर्पण यामुळे घरात नऊ देवींचं आगमन होतं, असं मानलं जातं. यामुळे कुटुंबातील अडचणी दूर होतात आणि आनंद नांदतो. ही परंपरा केवळ धार्मिकच नाही, तर मानसिक समाधान देणारी आहे. भक्तीभावाने केलेल्या या विधीमुळे मन, घर आणि जीवन शुद्ध होतं. Navratri : घटस्थापना आणि शेतीचा शोध लावणारी ‘ती’ यांच्यातला दुवा सांगणारा इतिहास
Ladki Bahin Yojana- १.२५ लाख लाभार्थी वगळले
Ladki Bahin Yojana धक्कादायक गैरप्रकार महाराष्ट्र सरकारच्या महत्वाकांक्षी “मुख्यमंत्री Ladki Bahin Yojana” मध्ये मोठा गैरप्रकार समोर आला आहे. राज्यभरातून सुमारे १ लाख २५ हजार महिलांचा लाभ थांबवण्यात येणार असल्याची माहिती उजेडात आली आहे. या महिलांनी चुकीच्या पद्धतीने, निकषांच्या बाहेर जाऊन, योजनेचा फायदा घेतल्याचे तपासणीत आढळले आहे. योजना काय आहे? “Ladki Bahin Yojana ” जुलै २०२४ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेचा उद्देश होता राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना दरमहा ₹१५०० आर्थिक मदत देणे. यामागे विचार होता महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा. पात्रता निकष: कोणते गैरप्रकार झाले? अंगणवाडी सेविकांनी केलेल्या सर्वेक्षणातून खालील गोष्टी समोर आल्या: या सर्व प्रकरणांमुळे योजनेच्या विश्वसनीयतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे. सरकारची कारवाई या गैरप्रकारांमुळे सरकारने खालील निर्णय घेतले आहेत: आकडेवारी ( अंदाजे ) प्रकार संख्यात्मक विवरण एकाच घरातील एकापेक्षा जास्त लाभार्थी 50,000+ ६५ वर्षांवरील लाभार्थी 30,000+ सरकारी कर्मचारी लाभार्थी 2,000+ पुरुष लाभार्थी (फसवणूक) 14,000+ एकूण वगळण्यात येणारे अर्ज 1,25,000+ चुकीचे काय झाले? जनतेची प्रतिक्रिया या निर्णयामुळे अनेक पात्र महिलाही चिंतेत आहेत. सरकार चुकीच्या अर्जदारांवर कारवाई करत आहे, हे जरी योग्य असले तरी खऱ्या लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. पुढील उपाय योजना “Ladki Bahin Yojana” ही चांगल्या हेतूने सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे. पण योजना यशस्वी होण्यासाठी केवळ आर्थिक निधी पुरेसा नाही — पारदर्शकता, अचूक पात्रता आणि कडक अंमलबजावणी या गोष्टी आवश्यक आहेत. जर सरकारने या चुका सुधारल्या, तर ही योजना महिलांच्या सक्षमीकरणात एक क्रांती घडवू शकते. पण सध्याच्या घडामोडींमुळे सरकार आणि महिलांमध्ये विश्वासाचं नातं टिकवून ठेवणं हे मोठं आव्हान ठरणार आहे. How Twins are Born? : काही महिलांना एकावेळी इतकी मुलं कशी होतात? सविस्तर वैद्यकीय विश्लेषण.
Govind Barge Murder Case: ‘पिंजरा’ कुणामुळे तयार झाला?
Govind Barge मृत्यू प्रकरण : ‘पिंजरा’ कसा तयार झाला? पूजाचा खेळ तेव्हाच समजायला हवा होता! बीड जिल्हा, गेवराई तालुका, लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर-बार्शी मार्गावरील एका गावात, काळ्या रंगाच्या कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती. या घटनेला सुरुवातीला आत्महत्या मानलं जात होतं, पण तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसं हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं. Govind Barge आणि पूजाची ‘कथा’ गोविंद बर्गे हे विवाहित असूनही त्यांचे संबंध पूजा गायकवाड नामक महिलेसोबत होते, असा तपासात उघड झाला आहे. पूजासोबतच्या या संबंधांमध्ये बऱ्याच वादावादी घडत होती, आणि गोविंदवर मानसिक तणाव वाढत होता. तपासादरम्यान फोन कॉल डिटेल्स आणि चॅट्स तपासण्यात आले, ज्यातून असे समजले की गोविंदने पूजाला आत्महत्येची धमकी दिली होती. पण पूजाने ही धमकी गांभीर्याने घेतली नाही. याच ठिकाणी, गोविंदरावांचा ‘पिंजरा’ तयार झाला, असं त्यांचे नातेवाईक म्हणतात. पोलिसांचा तपास आणि पूजाची अटक पोलिसांनी या प्रकरणात पूजा गायकवाडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली असून तपास सुरु आहे. पोलिसांनी उघड केलं की पूजाच्या मोबाईलमधून काही अशा मेसेजेस सापडले, जे मानसिक त्रास देणारे होते. त्यात प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्यासाठी दबाव, मानसिक छळ, आणि नकारात्मक भावनिक दडपण याचा समावेश होता. Govind Barge ची चूक कुठे झाली? गोविंद बर्गे हे एक प्रतिष्ठित पदाधिकारी होते. पण वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांनी गंभीर चुका केल्या, असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. हे सगळं एकत्रितपणे त्यांना मानसिक दृष्टिकोनातून कमजोर करत होतं, ज्याचा शेवट भयानक ठरला. आत्महत्या की घातपात? गोविंद बर्गेंचा मृतदेह पूजाच्या घराजवळच एका कारमध्ये सापडला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज होता, पण कुटुंबीय आणि नातेवाईक यांना घातपाताचा संशय आहे. “गोविंद कधीही आत्महत्या करणारा माणूस नव्हता,” असं त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी एफएसएल रिपोर्ट, फिंगरप्रिंट तपासणी, आणि सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ‘पिंजरा’ सिनेमाची आठवण या प्रकरणामुळे अनेकांना जुना मराठी चित्रपट ‘पिंजरा’ आठवला. समाजासाठी आदर्श मानला जाणारा एक व्यक्ती, एका स्त्रीच्या मोहात फसतो आणि शेवटी त्याचा विनाश होतो — Govind Barge चं आयुष्य तसंच काहीसं वळलं. जनतेत संताप आणि चर्चेला उधाण या प्रकरणावरून सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या गेवराईच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येचे संपूर्ण प्रकरण…
Bacchu Kadu चं आंदोलन स्थगित, सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ..
अमरावती येथील मोझरी गावात चालू असलेलं प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष Bacchu Kadu यांचं अन्नत्याग आंदोलन अखेर सातव्या दिवशी स्थगित करण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी मानधन वाढवण्याच्या मागण्या घेऊन Bacchu Kadu यांनी हे आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनात त्यांच्यासह ५० पेक्षा जास्त कार्यकर्ते सहभागी झाले होते. उपोषणाची ७ दिवसे सुरू असताना Bacchu Kadu यांची प्रकृती खालावली. रक्ताच्या उलट्यामुळे चिंतेचे वातावरण तयार झाले. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यांनी नकार दिला. सरकारद्वारे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नंतरच्या मंत्री उदय सामंत यांनी भेट घेऊन आश्वासन दिले. उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी पाणी पिऊन आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. या पत्रात सरकारने त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र Bacchu Kadu यांनी स्पष्ट केलं की आंदोलन पूर्णपणे मागे घेतलेलं नसून, ते 2 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. जर तोपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल. “उदय सामंतजी, जर विश्वासघात केला तर तुमच्या घरासमोर आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला. या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रभरातून पाठिंबा मिळत होता. मनोज जरांगे पाटील, राजू शेट्टी यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी या आंदोलनाचं समर्थन केलं होतं. नायना कडू या पत्नीनेही भावनिक समर्थन दिलं होतं. या पार्श्वभूमीवर,Bacchu Kaduनी उद्या 15 जून रोजी राज्यभर नियोजित असलेलं रास्ता रोको आंदोलन देखील मागे घेण्याची घोषणा केली. “रास्ता रोको होणार नाही, पण सरकारने धोका दिल्यास रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. आता सरकारने पुढे काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी आणि दिव्यांगांच्या हितासाठीच्या या आंदोलनामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय आंदोलनांची हवा तयार झाली आहे. Bachchu Kadu यांचे अन्नत्याग आंदोलन। म्हणाले, अंत्ययात्रा निघाली तरी चालेल! पण मागण्या काय आहेत ?
NEET UG 2025 निकाल जाहीर, टॉपर्स यादी देखील जाहीर
NEET UG 2025: देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. National Testing Agency (NTA) ने NEET UG Result 2025 अधिकृतपणे प्रसिद्ध केला असून, या परीक्षेत बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. NEET परीक्षा ही देशभरातील MBBS, BDS, BAMS, BHMS आणि अन्य वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश मिळविण्याचा मुख्य मार्ग आहे. चला तर पाहूया यंदाच्या निकालात काय घडले आहे, कोण टॉपर ठरले, आणि निकाल कसा पाहायचा याबद्दल सविस्तर माहिती. निकाल कसा पाहाल? NEET UG 2025 चा निकाल पाहण्यासाठी उमेदवारांना खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील: सर्वप्रथम https://neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जा.होमपेजवर “NEET UG 2025 Result” या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आपले लॉगिन क्रेडेंशियल्स – ॲडमिट कार्ड नंबर, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा. सबमिट केल्यानंतर निकाल स्क्रीनवर दिसेल. तो डाउनलोड करून प्रिंटही काढता येईल. यंदाचा टॉपर कोण? NEET UG 2025 मध्ये कित्येक विद्यार्थ्यांनी उज्ज्वल प्रदर्शन केले आहे. यंदाच्या परीक्षेतील टॉपर्सची यादी जाहीर करण्यात आली असून, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्लीसह विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी टॉप रँक मिळवले आहेत. कित्येक विद्यार्थ्यांना 700 पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, जे अत्यंत उल्लेखनीय आहे. मागील वर्षाचा टॉपर – रूपायन मंडल NEET UG 2024 मध्ये पश्चिम बंगालच्या जिल्ह्यातील मुर्शिदाबाद मधील रूपायन मंडल याने 720 मधील 720 गुण मिळवून देशात विजयी ठरला होता. त्याची तयारी नववीपासून झाली होती. त्याच्या वडिलांनी फिजिक्सच्या क्षेत्रात विशेष मार्गदर्शन केल्यामुळेच त्याला लाभ झाला होता. त्याने ऑनलाइन आणि ऑफलाइन कोचिंग एकत्रितपणे घेतले होते. हे यश नियोजन, सातत्य आणि अभ्यासावर आधारित होते. यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्ये यंदाच्या NEET UG परीक्षेत सहसा 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांचे स्कोअरकार्ड, कटऑफ, आणि रँक यादी वेबसाइटवर पाहता येथे आहे. NEET UG 2025 च्या उत्तरतालिका आणि अंतिम उत्तरपत्रिका आधीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यंदाचा कटऑफ गेल्या वर्षांच्या तुलनेत किंचित वाढलेला आहे. पुढील टप्पे – काउंसिलिंग प्रक्रिया NEET UG चा निकाल लागल्यानंतर आता नंतरचा टप्पा म्हणजे काउंसिलिंग. MCC (Medical Counselling Committee) तर्फे All India Quota (AIQ) अंतर्गत होणारी काउंसिलिंग प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. राज्यस्तरीय काउंसिलिंग प्रक्रिया स्वतंत्रपणे सुरू होईल. विद्यार्थ्यांनी संबंधित अधिकृत वेबसाइटवर नियमित अपडेट तपासणे गरजेचे आहे. NEET चा अभ्यास करणाऱ्यांसाठी टिप्स: वेळेचे योग्य नियोजन करा. NTA च्या अधिकृत अभ्यासक्रमानुसार तयारी करा. मागील वर्षांचे पेपर्स आणि मॉक टेस्ट्सचा सराव करा. तणाव न घेता सातत्याने अभ्यास करत रहा. बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्सवर समसमान भर द्या. Auto Driver Story: महिन्याला 8 लाख कमावणारा मुंबईचा Viral रिक्षावाला | कसे मिळतात पैसे? सत्य काय?
Personal Loan की PF विड्रॉ? योग्य पर्याय कोणता जाणून घ्या
पैशांची गरज भासल्यास काय कराल? पर्सनल लोन की PF विड्रॉ? आजकाल आर्थिक गरज केव्हा आणि कशी उद्भवेल हे सांगता येत नाही. लग्न, आजारपण, शिक्षण, घराची डागडुजी, किंवा इतर कोणतीही कारणं असू शकतात ज्यासाठी आपल्याला मोठ्या रकमेची आवश्यकता भासते. अशा वेळी बँकेकडून personal loan घ्यावे की आपल्या Provident Fund (PF) खात्यातून पैसे काढावेत, हा मोठा प्रश्न असतो. या लेखात आपण दोन्ही पर्यायांचे फायदे, तोटे, आणि आर्थिक परिणाम यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. personal loan म्हणजे काय?personal loan हा एक ऐसा कर्ज हो जो बँका किंवा वित्तसंस्था कोणत्याही तारणाशिवाय ग्राहकाला देतात. एखाद्या कर्ज घेण्यासाठी केवळ तुमचा क्रेडिट स्कोअर आणि उत्पन्नाचा पुरावा पुरेसा असतो. फायदे: कागदपत्रं कमी लागतात. त्वरित मंजुरी मिळते (कधी कधी 24 तासात). निधी थेट बँक खात्यात मिळतो. तोटे: व्याजदर खूप जास्त (10% ते 18% पर्यंत). लोन फेडण्याचा कालावधी मर्यादित (3 ते 5 वर्षे). EMI चा बोजा दरमहा वाढतो. उदाहरण:जर एखाद्या व्यक्तीने 5 लाखांचे personal loan 13% व्याजदराने 5 वर्षांसाठी घेतले, तर त्याला दरमहा ₹11,377 EMI भरावी लागेल आणि एकूण ₹1.82 लाख फक्त व्याज भरावे लागेल. PF मधून पैसे काढणे – कायद्याने परवानगी?EPF (Employees Provident Fund) हा एक निवृत्ती निधी आहे जो तुमच्या सेवायोजनात दरमहा जमा होतो. EPFO च्या नियमांनुसार, काही खास परिस्थितीत तुम्ही अंशतः पैसे काढू शकता. अटी: PF खात्यात 5 वर्षे सेवा पूर्ण असावी. वैवाहिक कारणे, घर बांधकाम/खरेदी, शिक्षण, आजारपण, कर्ज फेड, इत्यादी कारणे मान्य. रक्कम मर्यादित असते (उदा. घरासाठी एकूण बॅलन्सचा 90%). फायदे: कोणतेही व्याज भरावे लागत नाही. तुमचाच जमा झालेला पैसा. EMI चा बोजा नाही. तोटे: रिटायरमेंटसाठी असलेला निधी कमी होतो. कंपाउंडिंग व्याज गमावलं जातं. परत जमा करण्याची संधी नाही. उदाहरण:जर तुम्ही 5 लाख रुपये PF मधून काढले, तर 8.25% व्याजदराने पुढील 5 वर्षात तुमचे सुमारे ₹2.45 लाख व्याज गमावले जाईल. कोणता पर्याय निवडावा?कधी PF विड्रॉ योग्य आहे? जेव्हा तुम्हाला कर्ज परत फेडण्याची क्षमता नाही. जेव्हा आर्थिक गरज अत्यावश्यक आणि तातडीची आहे. जेव्हा तुमच्याकडे पुरेसा PF बॅलन्स आहे. कधी personal loan योग्य आहे? जेव्हा PF खात्याला हात लावायचा नसेल. जेव्हा EMI भरण्याची क्षमता आहे. जेव्हा तुम्हाला मोठी रक्कम लगेच लागते. काही विशेष मुद्दे EMI आणि मासिक खर्च:personal loan घेतल्यावर तुमच्या मासिक खर्चात भर पडते. त्यामुळे योग्य बजेटिंग आवश्यक आहे. PF वर मिळणारं व्याजPF हे 8.25% व्याजाने आणि टॅक्स फ्री असते. त्यामुळे त्यातली रक्कम जितकी जास्त तितकं फायदेशीर. टॅक्स परिणाम:PF मधून पैसे काढल्यास काही विशेष स्थितीत TDS लागू होतो. तर पर्सनल लोन वर टॅक्स सवलत नाही. Auto Driver Story: महिन्याला 8 लाख कमावणारा मुंबईचा Viral रिक्षावाला | कसे मिळतात पैसे? सत्य काय?