Banglore Trending आजच्या बातम्या राष्ट्रीय

HMPV विषाणूची लक्षणं, उपाय आणि तज्ज्ञांची महत्त्वपूर्ण माहिती

HMPV Virus India: करोना विषाणूचा सामना यशस्वीरित्या केल्यानंतर जग पुन्हा एकदा एका नव्या श्वसनविषयक विषाणूचा सामना करत आहे. चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) नावाच्या विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ लागला आहे, ज्यामुळे जगभरातील शासनकर्त्यांमध्ये चिंता वाढली आहे. HMPV विषाणू म्हणजे काय? HMPV (ह्युमन मेटा न्यूमो व्हायरस) हा एक श्वसनविषयक विषाणू आहे, जो मुख्यतः लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, आणि अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींना प्रभावित करतो. सध्या चीनमध्ये या विषाणूमुळे अनेक नागरिक रुग्णालयात दाखल झाले आहेत. HMPV विषाणूची लक्षणं: तज्ज्ञांच्या मते, HMPV विषाणूमुळे पुढील लक्षणं जाणवू शकतात: HMPV विषाणूला घाबरू नका. श्वसनसंस्थेच्या या आजारात सर्दी,खोकला,ताप येतो, तो शिंका- खोकल्यातूनच पसरतो.पण कोरोनाइतका तो घातक नाही. २००१मध्येच त्याला विलग करून त्याचा अभ्यास झालेला आहे. चीन,जपान,अमेरिका,कॅनडामध्ये याचे रुग्ण पूर्वीपासून आढळत आहेत.भारतात याने बाधित रुग्ण आढळले नाहीत. pic.twitter.com/14WZ73rKyN — Avinash Bhondwe (@AvinashBhondwe) January 6, 2025 लागण झाल्यास उपाय: जर तुम्हाला HMPV विषाणूची लक्षणं जाणवत असतील, तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. उपचारांसाठी पुढील गोष्टी महत्त्वाच्या ठरू शकतात: HMPV विषाणूपासून संरक्षण कसं करावं? महाराष्ट्रातील परिस्थिती: सध्या महाराष्ट्रात HMPV विषाणूचा एकही रुग्ण आढळला नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. तरीही, योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Banglore Trending आरोग्य ताज्या बातम्या राष्ट्रीय

बंगळुरू शहरात HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला

भारतामध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) चा पहिला रुग्ण सापडला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या बाळाला या व्हायरसची लागण झाली असून, सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. HMPV व्हायरस म्हणजे काय? HMPV म्हणजे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस. हा एक प्रकारचा श्वसनासंबंधी व्हायरस आहे जो प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि अशक्त प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांवर परिणाम करतो. भारतातील पहिला रुग्ण हा व्हायरस याआधी चीनमध्ये आढळत होता, मात्र आता भारतातही त्याचा पहिला रुग्ण नोंदवला गेला आहे. बंगळुरूमधील आठ महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाली आहे. विशेष बाब म्हणजे, या बाळाने कोणताही प्रवास केलेला नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवरही या व्हायरसच्या प्रसाराची शक्यता नाकारता येत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये या व्हायरसचा धोका लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाने एक विशेष बैठक घेतली होती. भारतातही अशा प्रकारच्या विषाणूंचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचा मंत्रालयाचा दावा आहे. HMPV व्हायरसबाबत अधिक सतर्कता आवश्यक या घटनेने नागरिकांमध्ये चिंता निर्माण केली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. मास्कचा वापर, स्वच्छता राखणे, आणि लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

India आजच्या बातम्या

१० जानेवारी २०२५: सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सोनार समाजासाठी विशेष चर्चासत्रांचे आयोजन

जय मैड – बातमीदार १० जानेवारी २०२५ रोजी सुवर्ण नियंत्रण कायदा दिना निमित्तठिकठिकाणी चर्चासत्राचे आयोजन करण्यात यावेसकल भारतीय सोनार समाज संघटन तर्फे आवाहन येत्या १० जानेवारी २०२५* रोजी महाराष्ट्रात तसेच भारतात जेथे जेथे सर्व शाखीय सोनार समाजाचा अधिवास आहे, तेथे तेथे स्थानिक सर्व शाखीय सोनार समाज संस्था आणि संघटना यांनी सुवर्ण नियंत्रण कायदा दिनानिमित्त सुवर्ण नियंत्रण कायदा आणि सर्व शाखीय सोनार समाजावर झालेले व्यावसायिक परिणाम या विषयावर चर्चासत्र आयोजित करावे, असे आवाहन सकल भारतीय सोनार समाज संघटन चे संस्थापक श्री मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.चर्चासत्रात सुवर्ण नियंत्रण कायदा अस्तित्वात आल्यानंतर सोनार व्यावसायिकांना कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागले, सोनार सराफ आणि सुवर्ण कारागिरी करणाऱ्या सोनार समाज घटकांवर झालेले परिणाम यावर भर देण्यात यावा, असे आवाहन देखील मिलिंद कुमार सोनार यांनी केले आहे.

India ताज्या बातम्या

Pandit Nehru यांनी B.R. Ambedkar यांना Election मध्ये पाडण्यासाठी कट केला होता?

सुरुवातीला अमित शहांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने अमित शहांना धारेवर धरलं, त्यांच्यावर टीका केली. तर या सगळ्या नंतर संध्याकाळी तातडीची पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी काँग्रेस संविधान विरोधी, आरक्षण विरोधी, ओबीसी विरोधी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याच सांगितलं. आणि हे सांगताना त्यांनी अनेक गोष्टींचा दाखला दिला. अमित शहा या पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले की पंडित नेहरूंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा द्वेष सर्व ज्ञात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने कशी सर्व शक्ती वापरली होती हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच खरच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी कट रचला होता का? अमित शहांना या वक्तव्यामधून काय म्हणायचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव झाला होता का? आणि जर झाला तर का झाला? हे सर्व जाणून घेऊयात तस पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीत फारसा फरक नव्हता, परंतु प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीबद्दल आणि त्याबद्दलच्या कल्पनांबाबत दोघांचे विचार अतिशय वेगळे होते. विशेषतः जातीय आरक्षण, हिंदू कायद्याचे संहिताकरण, परराष्ट्र धोरण आणि काश्मीर या मुद्द्यांवरून त्यांचे विचार खूपच वेगळे होते. भारत स्वतंत्र होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले. मंत्रिमंडळातील इतर बहुतेक सदस्यांप्रमाणे, आंबेडकर काँग्रेस पक्षाचा भाग नव्हते, यापूर्वी देखील त्यांचा काँग्रेस सोबत जास्त संबंध आला नव्हता. नेहरू आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर वरिष्ठ नेत्यांनी ज्या मूल्यांवर विश्वास ठेवला होता त्यातही ते फारसे सहभागी नव्हते. तर, कायदे मंत्री म्हणून आंबेडकर हे नेहरूंची निवड नव्हते. “इतर राजकीय विचारसरणीच्या उत्कृष्ट व्यक्तींनाही सरकारचे नेतृत्व करण्यास सांगितले पाहिजे.”असा महात्मा गांधींचा विचार होता म्हणूनच त्यांनी कायदेतज्ञ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कायदे मंत्री पदासाठी सुचवले होते. वास्तविक पाहता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधांबद्दल फारस कोणालाच माहिती नाही. तर , “नेहरू-आंबेडकर संबंध अस्पष्टतेत ढकलले गेले आहेत. त्याबद्दल कोणतेही पुस्तक नाही, किंवा माझ्या माहितीनुसार, एकही चांगला अभ्यासपूर्ण लेख नाही.” असं मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं होत. पण एका निवडणुकीदरम्यान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील संबंध फारसे चांगले नसल्याचं स्प्ष्ट झालं होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश नेहरुंच्या मंत्रिमंडळात जरी असला तरी सुद्धा त्यांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचं कारण होतं नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीमध्ये असलेला फरक. पंडित जवाहरलाल नेहरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा फारशी पटायची नाही. तर संविधानातील कलम 370 वरून या दोघांमध्ये मोठे मतभेद होते आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळातील सदस्य असून देखील त्यांना दुय्यम वागणूक दिली जायची. आणि या सगळ्याला कंटाळून अखेर 27 सप्टेंबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री मंडळातून मधून राजीनामा दिला आणि आगामी काळात येणारे निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची ठरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. कारण एकूणच त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव पाहता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक जिंकले तर ते काँग्रेस विरोधात एक ताकदवान विरोधी पक्ष उभा करू शकतात अशी भीती त्यांना होती. म्हणूनच भविष्यातील हा संभाव्य धोका टाळण्यासाठी काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत एन केन करून हरवण्याचे निश्चित केले होते, असं सांगितलं जातं. काळ होता १९५२ चा भारतात निवडणुका होऊ घातल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्यांना पराभूत करण्यासाठी नेहरूंच्या काँग्रेस पक्षाने आणि कम्युनिस्ट पक्षाने हातमिळवणी केली होती असं म्हंटल जात. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी याकाळात अनेक पत्रके वाटली ज्यात डॉ. आंबेडकरांना उघडपणे देशद्रोही म्हटले होते. विविध ठिकाणी हि पत्रके वाटण्यात आली होती. आणि दरम्यान निवडणूका पार पडल्या. ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला तर काँग्रेस चे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर विजयी झाले होते. १९५२ च्या या निकालाबाबत बोलायचे झाले तर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरीचे आरोप झाले होते. डॉ. आंबेडकरांचा निवडणूकीत सुमारे १४५३७ मतांनी पराभव झाला आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे या निवडणुकीत या जागेवरील ७४३३३ मते रद्द करण्यात आली होती. १९५२ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या या निवडणूक पराभवाचे तपशीलवार वर्णन पद्मभूषण पुरस्कार सन्मानित लेखक धनंजय कीर यांनी केले आहे. धनंजय कीर यांनी त्यांच्या डॉ. बाबा साहेब आंबेडकर जीवन चरित्र या पुस्तकात या सर्व घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. हे पुस्तक डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या सर्वात प्रामाणिक पुस्तकांपैकी एक मानले जात असून डॉ. आंबेडकरांनी स्वतः या पुस्तकाला मान्यता दिली होती. या पुस्तकात धनंजय कीर यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी डॉ. आंबेडकरांविरुद्ध कसे कट रचला याचा उल्लेख केला आहे. ५ जानेवारी १९५२ रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, “मुंबईतील जनतेचा प्रचंड पाठिंबा इतका एकाकी कसा काय नाकारला गेला , हा निवडणूक आयुक्तांच्या चौकशीचा विषय आहे.” पुढे धनंजय कीर यांनी असेही लिहिले आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या विधानात म्हटले होते की, “मुंबईतील लोकांनी मला इतका मोठा पाठिंबा दिला होता पण तो कसा वाया गेला? निवडणूक आयुक्तांनी याची चौकशी करावी” तर केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी देखील त्यांच्या विधानात म्हटले होते की, “डॉ. आंबेडकरांप्रमाणेच मलाही या निवडणूक निकालाबद्दल शंका आहे.” तर कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृता डांगे यांच्या कटामुळे ते हरले, असा विश्वास डॉ. आंबेडकरांचा होता असे धनंजय कीर यांनी लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्याविरुद्धच्या कटांवर मौन राहिले नाही. त्यांनी या निवडणूक फसवणुकीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील निवडणूक घोटाळ्याचे पहिलेच बळी होते. तर डॉ. आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी निवडणूक घोटाळ्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता. तर या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य बनले, तर १९५४ च्या भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले, आणि त्यांना हि निवडणूक जिंकता आली नाही. तर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी पर्यंत त्यांचे निधन झाले होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? यावर तुमचे मत काय? ते कमेंट करून नक्की सांगा

Ladakh आजच्या बातम्या महाराष्ट्र

Ladakh येथील Chhatrapati Shivaji Maharaj Statue वर कोणी घेतला आक्षेप?

पँगॉन्ग तलावावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा: गौरव की वादाचा मुद्दा? २६ डिसेंबर रोजी लडाखमधील भारत-चीन सीमेवर असलेल्या पँगॉन्ग तलाव परिसरात भारतीय लष्कराने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. या कृत्याचे अनेकांनी कौतुक केले, आणि सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व फोटो व्हायरल झाले. मात्र, या पुतळ्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. लष्कराची बदललेली रणनीती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लष्कराच्या नव्या रणनीतीचे प्रतीक मानला जातो. लडाखमध्ये लष्कर जलदगतीने रस्ते, पूल, बंकर यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण करत आहे, जेणेकरून कोणत्याही संकटाला सक्षमपणे सामोरे जाता येईल. पुतळ्यामुळे भारताचे सांस्कृतिक वैभव तर दिसून येतेच, पण त्याचबरोबर सामरिक दृष्टिकोनातूनही हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. पर्यावरणीय चिंता आणि स्थानिकांचा विरोध तथापि, या पुतळ्याबद्दल काही स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चुशुलचे काउन्सिलर कोंचोक स्टॅनजिन यांनी स्थानिकांशी सल्लामसलत न करता पुतळा उभारल्याचा आरोप केला आहे. पर्यावरणीय संवेदनशीलता आणि वन्यजीवांचे रक्षण दुर्लक्षित केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे या निर्णयावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. लष्कराचे स्पष्टीकरण लष्कराच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सने या पुतळ्याला शौर्य, दूरदृष्टी आणि न्यायाचे प्रतीक मानले आहे. पुतळ्याचा उद्देश स्पष्ट करत त्यांनी यावर सविस्तर निवेदन दिले. तुमचे यावर काय मत आहे? कंमेंट करून नक्की कळवा.

Delhi India आजच्या बातम्या ताज्या बातम्या

BJP ने खरंच Manmohan Singh यांचा अपमान केला?

राजघाट नाहीतर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आल्याने अंत्य संस्कारां वेळी भाजप सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजघाट का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. म्हणूनच भाजप सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला का? सरकारच्या कोणत्या कृत्यांमुळे त्यांचा अपमान झाला? आणि यावर भाजपा व काँग्रेसने नेमकी कोणती भूमीका घेतली आहे तेच जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञ व २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते. २८ डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्काराच्या जागेची निवड हि डॉ. मनमोहन सिंग यांचा “अपमान” आहे असं म्हटलंय. “भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देतात, आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अंतिम ‘दर्शन’ घेता येईल आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली वाहता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत. सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता,” असं राहुल गांधी या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होण व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणं अपेक्षित होत, मात्र असं काहीही झालं नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार राजघाट ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले. तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे. यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनी कडून करण्यात आले नव्हते. परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम वागणूक देऊन सरकार ने डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून, या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे. या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत? त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते. काँग्रेसने नरसिंहराव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे? त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा. आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ” असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे. जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले, व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच हि वागणूक अतिशय खेद जनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का? यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा. भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्राद्धांजली.