Nilesh Ghayval controversy,
political news महाराष्ट्र

Nilesh Ghayval Case: रोहीत पवार विरुद्ध राम शिंदे संघर्ष

Nilesh Ghayval या एका नावामुळं पुण्यासहीत राज्याचं राजकारण ढवळून निघालं. एक-एक करत सगळ्या पक्षांच्या नेत्यांचा त्याच्याशी कसा संबंध होता. हे आता सगळेजण समोर आणत आहेत. अशात हा विषय पोहचला Rohit Pawar विरुद्ध Ram Shinde आणि या दोघांचा Nilesh Ghayval शी कसा संबंध होता इथपर्यंत. निलेश घायवळ कोण? पुण्यात गोळीबार झाला. सगळ्या मिडीयाने विषय लावून धरल्यावर घायवळ टोळीतील हे गोळीबार करणारे गुंड असल्यामुळे Nilesh Ghayval वर कायरवाईची मागणी वाढली. अशात तो दुसऱ्या देशात गेला तेव्हा त्याला पासपोर्ट कुणी दिला हा प्रश्न समोर आला. रोहीत पवारांनी महायुतीततल्या अनेक नेत्यांचं नाव निलेश घायवळ सोबत जोडलं. सोबतच त्यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या प्रचाराला निलेश घायवळ आला होता. असं वक्तव्य केलं. रोहीत पवारांचे आरोप यानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघातल्या निवडणूकांमध्ये Nilesh Ghayval रोहीत पवारांच्या विरोधात प्रचार करताना आणि राम शिंदे सोबत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. ज्यामध्ये घायवळ भाषण देत रोहीत पवारला निवडून देऊ नका हे सांगत होता. त्यामुळे आधिच राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर शस्त्र परवाना दिल्याचा आरोप झालेला असताना. पुन्हा भाजपच्या सभापतींवर पासपोर्टसाठी मदत केल्याचा आरोप करण्यात आला. आजकाल पत्रकारपरिषदा घेऊन सरकारचे घोटाळे बाहेर काढणाऱ्या रोहीत पवारांनी या प्रकरणावरुनही चांगलंच रान उठवलं. आणि यावेळी टप्यात घेतलं त्यांचे मतदारसंघातील प्रतिस्पर्धी राम शिंदेंना. याच्यावर राम शिंदेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. पण त्याआधी एक व्हिडिओ आणि एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेने या संपुर्ण घटनेला वेगळ वळण मिळालं. सुनंदाताई पवारांचा व्हिडिओ समोर कर्जत-जामखेड मध्ये रोहीत पवार यांच्या आई सुनंदाताई पवार एका कार्यक्रमात निलेश घायवळ यांचं कौतुक करतानाचा हा व्हिडिओ होता. कोरोनामध्ये एका कार्यक्रमात निलेश घायवळकडून शाळेसाठी दिलेल्या वस्तूंच वाटप करताना सुनंदाताई पवार यांनी Nilesh Ghayval चं कौतुक केल्याचा हा व्हिडिओ होता. कर्जत-जामखेडचा राजकीय तणाव यासोबत एक पोस्ट सुद्धा फिरवण्यात आली. ज्यामध्ये सांगण्यात आलं की २०१९ मध्ये रोहीत पवार यांनी त्यांच्या प्रचारासाठी कर्जत-जामखेडच्या बाहेर राहणारे पण कर्जत जामखेडचेच असलेले,अशा सर्वांना आपल्या प्रचारासाठी वापरुन घेतलं. त्यापैकीच एक मुळचा जामखेड तालुक्यातील खर्ड्याच्या जवळच्या गावात राहणारा निलेश घायवळ. यानंतर मिडीयाला Nilesh Ghayval यांचा मामा यांनी प्रतिक्रीया देताना सांगितलं की, २०२० सालीच महाविकास आघाडीचं सरकार असताना निलेश घायवळला पासपोर्ट देण्यासाठी त्यावेळचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना रोहीत पवारांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुनच अनिल देशमुखांनी २०२० मध्ये निलेश घायवळला पासपोर्ट मिळवून दिला. या व्हिडिओ आणि निलेश घायवळच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रियेनंतर राम शिंदे सुद्धा समोर आले आणि या प्रकरणावर त्यांनी त्यांची बाजू मांडली. राम शिंदेंची प्रतिक्रियाराम शिंदे म्हणाले की, निलेश घायवळने २०१९ मध्ये रोहीत पवारांचा प्रचार केला. जामखेडच्या लोकांना पहिल्यांदा कळालं की निलेश घायवळ हा आपल्या भागातला आहे आणि तो पुण्यात राहतो. यांच्या बैठका झाल्या, चर्चा झाल्या. तेव्हा तो यांना सामाजिक कार्यकर्ता वाटत होता. पण नंतर यांचं कशावरुनतरी बिनसलं मंग ते देवाणघेवाणात बिनसलं, का रिअल इस्टेटमध्ये बिनसलं हे त्यांनाच माहीती. महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणामत्यांचे कौटुंबीक संबंधही होते. त्यांचे वडीलही त्यांच्या घरी जाऊन आले. त्यांचं बिनसल्यावर मात्र Nilesh Ghayval रोहीत पवारांना विरोध करण्यासाठी माझ्याबरोबर आले. पण ते ना भाजपचे सदस्य आहेत. ते आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत. महायुती म्हणून ते २०२४ ला रोहीत पवारांच्या विरोधात प्रचार करत होते. त्यांना पासपोर्ट द्यायला रोहीत पवारांनीच मदत केली होती. याची चौकशी लागली आहे. वाचा अजून संबंधित बातम्या- Sunil Anna Shelke news : मावळातल्या राजकारणाचा रक्तरंजीत इतिहास आणि आमदारांच्या हत्येचा कट

Sudhir Mungantiwar political news
political news political news आजच्या बातम्या

Sudhir Mungantiwar News : Devendra Fadnavis साठी कुणाकुणाचा राजकीय बळी?

Devendra Fadnavis शी वाकडं म्हणजे मसनात लाकडं. एकदम परफेक्ट मॅच होत नाही म्हणा. पण भाजप म्हणजे सबकुछ Devendra Fadnavis. हे तर सगळ्यांना माहीतचं आहे. सध्या भाजपमधला एक नावं असंच अज्ञातवासात टाकलं जाातयं. त्याचं नाव आहे Sudhir Mungantiwar. काही महिन्यांपुर्वी भाजपाचा एक आमदार कार्यक्रम आयोजित करतो, या कार्यक्रमात काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांना कार्यक्रम अध्यक्षांचा सन्मान दिला जातो. तर भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळख असणाऱ्या Sudhir Mungantiwar यांचं निमंत्रण पत्रिकेत सगळ्यात शेवटी नाव असतं. आणि मंग सुरू होतं ते कार्यक्रमाच राजकारण. तर हे राजकारण अखेर येऊन ठेपतं ते सुधीर मुनगंटीवार यांच्या भोवती. चंद्रपूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कर्मवीर कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सव सोहळ्या दरम्यानची ही घटना. पण प्रश्न फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये तर मागील अनेक वेळा मुनगंटीवारांना डावललं गेल्याचं पहायला मिळालंय म्हणूनच खरंच सुधीर मुनगंटीवार यांना डावललं का ? डावललं तर कोणी डावललं. जोरगेवारांनी कि भाजपने की फडणवीसांनी. पण प्रश्न हा फक्त एका कार्यक्रमाचा नाहीये, लोकसभेवेळी Sudhir Mungantiwar नी त्यांची लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचं स्पष्ट केलं होतं. तरी सुद्धा पक्षाने त्यांना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिलं, त्यावेळी Sudhir Mungantiwar राज्यात कोणाला नकोसे झाले आहेत? अशा चर्चा देखील रंगल्या होत्या. तर त्यानंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील मुनगंटीवार यांना भाजपाकडून तिकीट मिळेल का नाही यावर साशंकता व्यक्त केली जात होती. अश्यातच मुंडेंना तिकीट मिळालं ते विजयी देखील झाले मात्र भाजपचे ज्येष्ठ नेते असून देखील त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. आणि आता हा कार्यक्रम. त्यामुळे भाजपा कुठेतरी सुधीर मुनगंटीवार यांना संपवू पाहतेय अशा चर्चा देखील जोर धरत आहेत मात्र याचं काय कारण असू शकत ते पाहूया. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचाच भाग असून देखील अनेकदा त्यांनी कोणत्याही घटनेवर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे तर त्यांच्या या भूमिकांमुळे भाजपा पक्षाला किंवा भाजपच्या नेतृत्वावर त्याचा विपरीत परिणाम हॊईल का नाही याचा देखील विचार करत नव्हते. खास करून 2019 मध्ये भाजपा-सेना युती तुटल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे या बाबत नाराजी व्यक्त केली होती. आणि सुधीर मुनगंटीवार यांचा हाच स्पष्ट वक्तेपणा भाजपला अडचणीत आणू शकतो म्हणून पक्षाकडून येथूनच त्यांना दुय्यम वागणूक देण्यास सुरुवात झाली असं बोललं जात. दरम्यानच्या काही काळात Sudhir Mungantiwar हे सक्रिय राजकारणातून बाहेर असल्याच पाहायला मिळालं. तर मागील महायुती सरकारमध्ये देखील त्यांना मंत्रिमंडळात कोणतेही महत्त्वाचं मंत्रिपद देण्यात आल नव्हत. आणि लोकसभेला झालेल्या पराभवानंतर Sudhir Mungantiwar हे अजूनच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडत गेले आणि हे सगळं भाजपाकडून जाणीवपूर्वक केलं गेलं, ज्या मागे हेतू एकच होता तो म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचा राजकारणातील हस्तक्षेप कमी करणे. एकंदरीत काय तर महाराष्ट्रात Devendra Fadnavis ना कुणीही पर्याय झालेला खुद्द त्यांना किंवा कदाचीत दिल्लीतल्या भाजप नेत्यांनाही चालत नाहीये. यासाठी विनोद तावडेंना केंद्रात पाठवण्यात आलं. या विधानसभेच्या आदल्या दिवशी त्यांना पैशासहित पकडल्याच्या बातम्यांनी त्यांची महाराष्ट्रातली घरवापसीही कायमची रद्द झाली. पंकजा मुंडे इतक्या दिवस शांत बसुन कमबॅक करण्याची वाट पाहत होत्या. त्यात विधानसभेतील पराभव, लोकसभेतील पराभव तरीही मंत्रीमंडळातील संधी यामुळे बॅकफुटवर गेलेल्या मंत्रीमंडळातील संधीमुळे थोड्या स्थिरस्थावर झाल्या. मात्र फडणवीसांना शह देतील अशी परिस्थिती त्यांची सध्यातरी नाहीये. यानंतर येतं सर्वांना माहीत असलेलं एकनाथ खडसेंच नाव. भावी मुख्यमंत्री म्हणून बघीतलं गेलेल्या या नेत्याचा अक्षरशः बाजार उठवला गेला. जेवढी हेळसांड विरोधी पक्षात असताना झाली नव्हती तेवढी भाजप सत्तेत आल्यापासून झाली. कारण एकचं देवेंद्र फडणवीस. वाचा अजून संबंधित बातम्या-Narendra Modi यांच्या हातून सत्ता जाण्याचे संकेत : Chandrababu Naydu यांच्या नावाची चर्चा

OBC Reservation 1994 GR
आजच्या बातम्या महाराष्ट्र

OBC च्या १६ टक्के आरक्षणवाढीचा १९९४ चा GR काय आहे?

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलननांतर काढलेल्या हैदराबाद गॅझेटच्या जीआरवर अनेकजण शंका उपस्थित करत आहेत. छगन भुजबळ याविरोधात कोर्टातही जाणार आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना जरांगे पाटलांनी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलात, तर OBC आरक्षणात १९९४ साली घुसखोरी केलेल्या १६ टक्केवाल्यांच्या विरोधात आम्ही जाऊ. सन १९७९ मध्ये मोरारजी देसाई सरकारच्या काळात बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना झाली. त्यालाच मंडल आयोग म्हणतात. १९८० साली या आयोगाने दिलेल्या अहवालात देशात ३ हजार ७४३ जाती ओबींसींमध्ये असल्याचा आणि त्यांचं लोकसंख्येतली प्रमाण हे ५२ टक्के असल्याचा अहवाल दिला. ज्यामध्ये या इतर मागास वर्ग घटकाला २७ टक्के आरक्षण द्यावे ही शिफारस केली. १९८० ते १९९० या दहा वर्षात कॉंग्रेस सरकारने या शिफारसी लागू करण्यास टाळाटाळ केली. परंतु १९९० साली सत्तेवर आलेल्या जनता दलाचे पंतप्रधान व्ही.पी.सिंह आयोगाची अंमलबजावणी केली. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांनी याला विरोध केला. मात्र हळूहळू सर्वांचा विरोध मावळला. शेवटी सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसी आरक्षणावर मोहोर लावली. देशातीली सर्व राज्यांना मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने दिले. महाराष्ट्र हे पहिले राज्य होते ज्याने मंडळ आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी केली. आता येऊया २३ मार्च १९९४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासनाने काढलेल्या जीआर वर. त्यावेळी मुख्यमंत्री होते Sharad Pawar. या GR मध्ये राज्यात असलेलं एकूण ३४ टक्के आरक्षण १६ टक्क्याने वाढवण्यात आल्याचा निर्णय होता. यामुळे राज्यात असलेल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पुर्ण झाली. आता टिकणारं आरक्षण मराठा समजाला द्यायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागेल. त्यामुळे अनेकजण तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवारांवर मराठा समाजाचा विचार न करता त्यांनी आरक्षण १६ टक्क्यांनी वाढवलं अशी टिका करतात. भाजपही Sharad Pawar, वर टिका करताना याचाच आधार घेतं. “पण प्रत्यक्षात पवारांनी २७ टक्के असणाऱ्या मंडल आयोगाच्या शिफारसीची अंमलबजावणी केली आहे. त्यांच्या हातात अंमलबजावणी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता” असं मत Chhagan Bhujbal यांनी एका मुलाखतीत मांडलं. आता हा GR लागू होण्यापुर्वी राज्यात असणारं आरक्षण किती होतं? आणि नंतर किती झालं? यावर एक नजर टाकूया. २३ मार्च १९९४ चा हा जीआर लागू होण्यापुर्वी राज्यात अनुसुचीत जाती म्हणजे एससीसाठी होतं. 13 टक्के आरक्षण. अनुसुचीत जमाती म्हणजे एसटीसाठी होतं ७ टक्के आरक्षण. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींना होतं ४ टक्के आरक्षण आणि इतर मागास वर्ग म्हणजेचं ओबीसींना होतं १० टक्के आरक्षण. म्हणजेचं एकूण ३४ टक्के. हा २३ मार्च १९९४ चा GR लागू झाल्यानंतर एससी आणि एसटीचं असणारं १३ आणि ७ टक्के आरक्षण तसचं राहिलं. पण भटक्या विमुक्त जाती-जमाती आणि ओबीसी यांचं मिळून असणारं १४ टक्के आरक्षण वाढून झालं ३० टक्के. म्हणजेच १६ टक्के आरक्षणात वाढ करण्यात आली. यामुळेच एकूण ३४ टक्के असणारं आरक्षण आता झालं ५० टक्के. मनोज जरांगे पाटील यांच्यामते १९९४ सालच्या या वाढलेल्या जीआर मुळेच मराठ्यांवर अन्याय झाला. तथापी त्यांनी भाजप किंवा इतरांसारखी शरद पवारांवर टिका नाही केली. पण जर कोणी मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेलं तर ह्या ओबीसी आरक्षणात वाढवलेल्या १६ टक्के आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जाण्याच्या इशारा त्यांनी दिला. दरम्यान मध्यंतरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने राज्यात मंडल यात्रा काढल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. भाजपचा डीएनए हा ओबसी आहे असं सांगणाऱ्या भाजपला किंबहुना त्याच्या ओबीसी वोटरला चुचकारण्याचा प्रयत्न यावेळी शरद पवारांनी केला होता. या यात्रेत त्यांनी कशाप्रकारे मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रात लागू केल्या. आणि ओबसींना एकूण ३० टक्के आरक्षण मिळवून दिल्याने त्यांना शिक्षणात आणि नोकरीत कसा फायदा झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. सोबतच जेव्हा मंडळ आयोगासाठी आंदोलन होत होतं त्याच्या विरोधात भाजप कमंडल यात्रा काढत होतं. आणि OBC आरक्षण तसेच मंडळ आयोगाला विरोध करत होतं. हे ही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी या यात्रेतुन केला होता. मराठा आरक्षणाच्या मुंबई आंदोलनात यावेळी त्यांच्या या मंडल यात्रेवरही सोशल मिडियावर टिका होताना पहायला मिळाली. कारण होतं त्यांच्या मुख्यंमंत्रीपदाच्या कार्यकाळात निघालेला हा OBC च्या १६ टक्के आरक्षण वाढीचा जीआर. Maharashtra Flood Relief : ३१ हजार कोटींची मदत ; पण पदरात पडणार किती? ___

Solapur Collector Kumar Ashirwad
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Who is Kumar Ashirwad? : शिंदे-पवारांना न जुमानणारा कलेक्टर

सोलापुरच्या पुरग्रस्थ गावात जाऊन चमकोगीरीचा प्रयत्न शिंदे गटाच्या नेत्या ज्योती वाघमारेंना चांगलाच भोवला. Solapur Collector Kumar Ashirwad यांनी वाघमारेंना चांगलचं धारेवरं धरलं. त्याचा व्हिडिओ व्हायरलं झाला. आणि नेटकर्यांनी त्यांच्यावर तोंडसुखही घेतलं. शिंदे गटाच्या प्रवक्त्या असणाऱ्या आणि सभा गाजवणाऱ्या ज्योती वाघमारेंना नडणारे आणि उलट सवाल करणारे जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याविषयीची माहीती आपण घेणार आहोत. हे तेच कलेक्टर आहेत ज्यांनी अजित दादा आणि एका महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या सोलापुर जिल्हात झालेल्या कॉलनंतर मुरुम उपसा करणाऱ्या गावकऱ्यांवर खटला दाखल केला होता. इतकचं नाही तर विरोधी पक्षाला सुद्धा त्यांनी थेट नडायला मागेपुढे पाहिलं नाही. कुमार आशिर्वाद. ३७ वर्ष वयाचा तरुण अधिकारी गेल्या २ वर्षांपासून सोलापूरचा जिल्हाधिकारी म्हणून काम पाहतोय. मुळचे झारखंडचे असणारे Kumar Ashirwad यांचं शालेय शिक्षण दार्जीलींग आणि जमशेदपुरला त्यांचं शालेय शिक्षण पुर्ण केलं. त्यांचं गाव इतक्या दुर्गम भागात होतं की चुकुन एखाद्या घरी लाईटची सोय होती. अशात टिव्ही, इंटरनेट लांबची गोष्ट. पुढे जाऊन आयआयटी खरगपुर मधून त्यांनी बीटेक इंजीनीअरींग पुर्ण केली. २०११ पासून प्रशासकीय सेवेत रुजु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सुरवातील सलग ४ वेळा युपीएसी मध्ये अपयश आलं. अखेर २०१६ मध्ये संपुर्ण देशात ३५ वी रॅंक मिळवत कलेक्टर होण्याचं स्वप्न साकार केलं. सोलापूर मद्ये ते २०२३ मध्ये कलेक्टर म्हणून रुजु झाले आहेत. पण त्यापूर्वी महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्हात त्यांच पोस्टींग होतं. जिल्हा परिषदेचे सिईओ म्हणून त्यांनी काम पाहिलं. सोलापुरचे कलेक्टर झाल्यापासून अनेक कामांमुळे त्यांचं कौतूक झालं. त्यामद्ये पर्यटनाला चालणा देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न असोत नाहीतर मंग सोलापूर मध्ये विमानसेवा सुरु होण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न यामुळे त्यांचं नेहमीच कौतुक झालं आहे. आत्ता सध्या ज्यावेळी इतिहासात पहिल्यांदा सोलापुरमध्ये नदीला पुर आलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांनी केलेल्या नियोजनामुळेच लोकांचा जीव वाचू शकला असं सर्वांचं मत आहे. त्यांच्या कार्यापद्धतीचं सगळीकडेच कौतुक होतं आहे. पण या सगळ्यात राजकीय नेत्यांचा अडसर नाही झाला किंवा अधिकारी असुन नेत्यांनी दमदाटी नाही केली तर नवलच. त्यामुळेच त्यांचं नाव चर्चेत आलं आहे. एक नाही तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे नडण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झालेला आहे. काय आहेत हे दोन्ही विषय चला समजून घेऊया. मागच्या काही दिवसात उपमुख्यमंत्री Ajit Pawar नी केलेला महिला पोलीस अधिकाऱ्याला कॉल चांगलाच व्हायरलं झाला होता. त्यामध्ये अवैध मुरुमउपशावरची कारवाई थांबवण्याची सुचना अजित पवार यांनी त्या अधिकाऱ्याला दिली होती. मिडीयाने हा विषय लावून धरल्यावर त्याचा तपास जिल्हाधिकारी Kumar Ashirwad यांच्याकडे गेला. आएएस अंजली कृष्णा यांनी दादांच्या फोन नंतर कारवाई थांबवलीही होती. मात्र यानंतर तपासात जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी हा मुरुम उपसा अवैध असल्याचच सांगीतलं. आणि याच्यामुळेच गावकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एकप्रकारे दादांनी केलेला फोन आणि कारवाई थांबवण्याच्या सुचना गैर असल्याचं यातून समोर येत होतं. म्हणजे आपल्या प्रशासकीय ताकदीचा वापर करुन इथे अजित दादांना अप्रत्यक्षपणे नडण्याचाच प्रयत्न याठिकाणी त्यांनी केला होता. अशात आता सोलापूर मद्ये पुराने थैमान घातल्यानंतर परिस्थिती हाताळताना त्यांना राजकीय नेंत्यांच्या दबावालाही सामोरं जावं लागत होतं. अशात जिल्हाचे पालकमंत्री भरणे मामांनीही उंदरगावच्या लोकांना सुविधा कसकाय पोहोचल्या नाहीत म्हणून मिडीयासमोर कॉल करुन त्यांना झापलं. त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एका पुरग्रस्त गावात २०० किटचं वाटप करण्यासाठी आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या यांनी कलेक्टर कुमार आशिर्वाद यांना सर्वांसमोर फोन लावला, तो स्पिकर वर ठेवला आणि त्याची व्हिडिओही रेकॉर्डींग सुरु होती. तुम्ही लोकांना जास्त पैशाची मदत द्या. लगेच जेवण पोहोच करा. असं सांगणाऱ्या वाघमारेंना तुम्ही तुमच्या पक्षाकडून मदत का करत नाही. आम्ही इथं काम करत आहोत. तुमचं राजकारण मध्ये आणु नका. २०० किटने काय होतं. तिथं लोकं किती आहेत. असा प्रतिसवालच त्यांनी केला. सहसा कोणत्याही अधिकाऱ्याकडून अशी भाषा कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांसाठी वापरली जात नाही. मात्र मी कलेक्टर आहे माझं तुम्ही ऐकुन घ्या म्हणत कुमार आशिर्वाद यांनी ज्याोती वाघमारेंची बोलतीच बंद केल्याचं व्हिडिओत दिसुन येत आहे. या व्हिडिओमुळे त्या इतक्या ट्रोल झाल्या की त्याच्यावर एक दुसरा व्हिडिओ बनवून त्यांना पोस्ट करावा लागला. माध्यमांनी चमकोगीरी करणाऱ्या वाघमारेंना कलेक्टरांचे खडेबोल अशा मथळ्याच्या बातम्या पोस्ट केल्या. थोडक्यात काय तर अजित दादांची राष्ट्ववादी असो नाहीतर शिंदेंची शिवसेना या कलेक्टर साहेबांनी कुणालाच सुट्टी दिली नाही. एवढंच काय विधानसभेनंतर ज्या मारकडवाडीचं प्रकरण मतचोरी झाली म्हणून विरोधीपक्षाने उचलुन धरलं होतं. तेव्हा कलेक्टर असणाऱ्या Kumar Ashirwad यांनी पत्रकार परिषद घेऊन. तुम्हाला आक्षेप होता तर तुमचे निवडणून प्रतिनिधी मतदान केंद्रावर मोजणीच्या वेळी असताना तुम्ही का नाही घेतला. शिवाय तुम्हाला मोजणीवर आक्षेप घेण्याचा अधिकार आहे पण बॅलेट पेपर किंवा कशीही निवडणूक घेण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहे. असं स्पष्टपणे सुनावत, तुमच्याकडे पुरावे असले तर आणा. असा दावाही त्यांनी केला होता. Jyoti Waghmare Viral Video : ज्योती वाघमारे बरोबर की सोलापुरचे कलेक्टर Kumar Ashirwad

Supriya Sule
आजच्या बातम्या महाराष्ट्र

Supriya Sule On Reservation : जातीय की आर्थिक आरक्षण?

आर्थिक निषकावर आधारीत जर आपण सर्वांना सवलती देण्याचा विचार केला तर मग लोक आपली स्वतःची जात शोधण्याचा प्रयत्न करणार नाहीत. हे वक्तव्य आहे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचं. गोपीनाथ मुंडेंसमोर त्यांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य अजुनही लोकांच्या स्मरणात आहे. अशात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष महाराष्ट्रात उभा राहिलेला असताना बारामतीच्या खासदार Supriya Sule च्या एका इंग्रीज मुलाखती मुळे पुन्हा एकदा चर्चांना पेव फुटलं आहे. आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या घटकाचं काय मत आहे आणि संविधानात यासाठी काय तरतुद आहे. Reservation : १० वर्षांच्या आरक्षणाची खरी गोष्ट

Maharashtra Weather cloud Burst
Mumbai Weather Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

What is Cloud Burst ढगफुटी की अतिवृष्टी? पुराची खरी कारणं

cloud Burst की अतिवृष्टी? महाराष्ट्रातील पुरामागचं खरं कारण जगात १ मिनिटात ३६ मिमी, ५ मिनिटात ६६ मिमी, १५ मिनिटात २०० मिमी, १ तासात ४०० मिमी, १ दिवसात ११०० मिमी आणि दोन दिवसात १८०० मिमी पावसाचे रेकॉर्ड आहेत. मुंबईचा २६ जुलैचा दिवसभरात पडलेला १००० मिमी पाऊस सुद्धा ढगफुटीचा प्रकार होता. अशा परिस्थितीत १५ किलोमीटर उंचीचे ढग तयार होतात. आणि ते इतक्या कमी वेळात कोसळतात की दरड कोसळणे आणि भयंकर पुर येणे या घटना त्यातून घडतात. आता विषय असा आहे की महाराष्ट्राच्या अनेक भागात जो पुर येतोय तो आधिच धरणं ही भरलेली आहेत. अशात पाण्याचा साठा आणि जमीनीची धारण करण्याची क्षमता संपल्यामुळे होतोय. ते दिवसभरात ५०-६० मिलीमीटर पाऊस झाला तरी होत आहे. खडकवासला सारखं धरण ज्याची क्षमता बाकी धरणांच्या तुलनेत कमी आहेत. शिवाय डोंगरमाथ्याला झालेला पाऊस लगेच धरणात पोहोचतो. त्यामुळे ते लगेच भरत. पण म्हणून त्यातून झालेल्या विसर्गाला ढगफुटी कारणीभुत नसते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .

Beed Train Updates
Beed Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

Beed Railway धावणार! अमोल गलधरांच्या संघर्षाला सलाम

१७ सप्टेंबरला Beed Railway रेल्वे धावणार. देशाचे पंतप्रधान मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा दिवशी ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवत या बीडकरांच्या स्वप्नांना हिरवा कंदिल दाखवणार. पण बीडमध्ये रेल्वे येणार म्हटल्यावर अनेक राजकीय नावांसोबत एक नाव जोमाने पुढे येत. ते म्हणजे Amol Galdhar यांचं. बीड मधल्या प्रत्येकाला हे नाव परिचित आहे. Beed रेल्वेसाठी संघर्ष बीड मधल्या प्रत्येकानेच केला. अनेक राजकीय पुढाऱ्यांसोबत प्रत्येक लोकप्रतिनीधी यासाठी प्रयत्नशील राहीला. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष याचं श्रेय घेण्यासाठी पुढे येत आहेत. अशात एका नावाचा उल्लेख सर्वजण करत आहेत. ते म्हणजे स्व. अमोल गलधर ज्यांचं २०१० मध्ये एका अपघातात निधन झालं. बीड च्या कानाकोपऱ्यातून त्यांनी लोकांना रेल्वेच्या प्रश्नासाठी एकत्र केलं होतं. त्यांना रेल्वेप्रवासाचं महत्व पटवून दिलं. इतकच नाही तर लोकांना आंदोलनासाठी सुद्धा त्यांनी एकत्र केलं. महाराष्ट्रभरातून बीडच्या तरुणांना एकत्र करुन त्यांनी रेल्वे मिळण्यासाठीच्या आंदोलनाला एकत्र आणलं. शेतकरी कुटुंबातला तरुण तडफदार नेता ज्याने त्या काळातील रेल्वे मंत्र्यांनाही सोडलं नाही. प्रत्येकाला भेटून त्यांनी याचं निवेदन दिलं होतं. मगं त्या ममता बॅनर्जी असुद्या नाहीतर मगं लालूप्रसाद यादव. अतिशय आक्रमक आंदोलनासाठी अमोल गलधर हे ओळखले जाऊ लागले होते. एकदा तर त्यांनी ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असताना त्यांचा पुतळा जाळून त्याची राख शासकीय कार्यालयात पाठवली होती. Beed मधल्या आधार प्रतिष्ठानचे ते संस्थापक होते सोबतच राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचं प्रदेश उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे होतं. तरीही त्यांच्या रेल्वेसाठी केलेल्या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत एकत्र यायचे. एका आंदोलनादरम्यान अशी परिस्थिती तयार झाली होती की, त्यावेळचे पोलीस अधिक्षख सुवेझ हक यांनी अमोल गलधर यांना अटक केली. त्यांची लोकप्रियता इतकी झाली होती की, अटकेची बातमी ऐकून Beed मध्ये परिस्थीती हाताबाहेर जाऊ लागली होती. त्यांचे कार्यकर्ते सार्वजनीक ठिकाणी दगडफेक करु लागले होते. संपुर्ण बीड बंद होण्याची परिस्थीती झाल्यामुळे शेवटी पोलीसांना अमोल गलधर यांना सगळ्यांसमोर आणावं लागलं. तेव्हा कुठे जाऊन सर्वजण शांत झाले होते. पोखर्णी गावातील परंपरेचा शेकडो वर्षांचा इतिहास | Historic village Pokharni .

Marathwada Flood: Eknath Khadse-Devendra Fadnavis
Updates आजच्या बातम्या महाराष्ट्र

Marathwada Flood: शेतकऱ्यांसाठी एकनाथ खडसेंची मागणी

मराठवाड्यातील अनेक भागांत मुसळधार पावसामुळे Marathwada Flood परिस्थिती निर्माण झाली आहे. या पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी मंत्री Eknath Khadse यांनी तातडीने शेतकऱ्यांसाठी मदत देण्याची मागणी केली आहे. एकनाथ खडसे यांचे आदेश एकनाथ खडसे म्हणतात की, निवडणूक काळात ज्या पद्धतीने ‘लाडकी बहीण योजना’ अंतर्गत शासकीय मदत दिली गेली, त्याच पद्धतीने आता पूरग्रस्त शेतकऱ्यांनाही कोणतेही निकष लावले न जाता, पंचनामे न करता त्वरित Farmer Assistance दिली जावी. शेतकऱ्यांना विविध निकषांखाली त्रास दिला जात असल्याचे खडसे यांनी निदर्शनास आणले. राज्यातील अनेक भागांमध्ये ओले दुष्काळ जाहीर करणे आवश्यक आहे, असेही खडसे म्हणाले. आर्थिक संकटामुळे राज्य सरकारकडे शेतकऱ्यांसाठी पुरेशी मदत उपलब्ध नाही, त्यामुळे केंद्राने स्वतः पुढाकार घेऊन मदत करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. Marathwada Flood शासकीय दुर्बलता आणि पाहणी खडसे म्हणाले, “सध्याचे सरकार संवेदनाहीन असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना सूचना द्यावी लागतात. यावरून शेतकऱ्यांसाठी सरकारची खरी चिंता काय आहे हे स्पष्ट होते.” शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही तर त्यांचे कर्ज भरण्याची क्षमता राहणार नाही. म्हणून राज्य सरकारने त्वरित कर्जमाफीसाठी घोषणा करावी अशी मागणी खडसे यांनी केली. मुख्यमंत्र्यांचे आश्वासन सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी पूरग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. काही महिलांकडून निवेदन स्वीकारण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की कोणतेही अतिरिक्त निकष लावले जाणार नाहीत आणि आवश्यक असल्यास निकष शिथील करून शेतकऱ्यांना मदत केली जाईल. दिवाळीपूर्वीच पावसामुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना मदत केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हिंगोलीतील पीक नुकसान आणि विमा समस्या हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पीक अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पूर निर्माण झाला असून शेतातील पीक वाहून गेल्याची नोंद आहे. या परिस्थितीत पीक विमा कंपनीकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केला. विमाधारकांनी कार्यालयात जाब विचारण्यासाठी भेट दिली, परंतु तिथे आक्रमक होऊन कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्याची तोडफोड केली गेली. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची अवस्था आणखी गंभीर झाली आहे. सरकारकडे मागणी एकनाथ खडसे यांनी सरकारकडे तातडीने पुढाकार घेण्याची मागणी केली असून शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे निकष लावू नये असे निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. राज्यातील शेतकऱ्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आणि त्यांचे नुकसान भरपाई मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार दोन्हींकडून त्वरित पावले उचलली जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने स्पष्ट धोरण तयार करावे, अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांसाठी पुढील उपाय शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी तातडीने योजना राबविणे आवश्यक आहे. पीक विमा कंपन्यांनीही या परिस्थितीत सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांच्या कर्जावर ताबडतोब सवलत मिळावी, हाच सरकारचा प्राथमिक हेतू असावा. या सर्व घटनांवरून स्पष्ट होते की राज्य आणि केंद्र सरकारला Government Relief, Farmer Assistance, आणि Flood Relief योजना त्वरित अंमलात आणणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांना योग्य वेळी Farmer Help मिळाल्यासच आर्थिक नुकसान कमी होऊ शकते. What is Cloud Burst? महाराष्ट्रात आलेल्या पुराला ढगफुटी कारणीभुत आहे का? सविस्तर माहीत..

Gopichand Padalkar
आजच्या बातम्या ताज्या बातम्या महाराष्ट्र

Padalkar Statement : सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया

भाजप आमदार Gopichand Padalkar यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पडळकरांनी राजारामबापू पाटील यांच्या औलाद असल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले. यावर त्यांच्या जिवलग मित्र आमदार Sadabhau Khot यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आपली लढाई राजारामबापूंच्या वारसांशी आहे, व्यक्तीशी नाही. त्यांनी पडळकरांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे मान्य करतानाच, त्यांना भविष्यात जपून बोलण्याचा सल्ला दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याची निंदा केली असून, पडळकरांना समज दिल्याचे सांगितले. मात्र, या संपूर्ण घडामोडीतून सांगली जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. BJP आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला असून, जाती-पातीचा राजकारणात मुद्दा पुढे सरकवला जात असल्याचा आरोपही करण्यात येत आह Gopichand Padalkar वादग्रस्त वक्तव्य आणि राजकीय वाद महाराष्ट्रातील राजकारणात वारंवार वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यातून निर्माण होणारे वाद ही नवी बाब नाही. मात्र, अलीकडेच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील राजकारणावर दीर्घकाळ वर्चस्व असलेले आणि अनुभवी नेते म्हणून प्रसिद्ध असलेल्या जयंत पाटील यांच्यावर पडळकरांनी व्यक्तिगत आणि पातळी सोडून टीका केली. Gopichand Padalkar यांनी जयंत पाटील यांना ‘बिनडोक माणूस’ असे संबोधत त्यांच्याकडे अक्कल नाही असे कठोर शब्द वापरले. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औलाद असल्यासारखे वाटत नाही, असे अपमानास्पद वक्तव्य केले. या विधानामुळे राजकारणात मोठी चर्चा सुरु झाली असून, पडळकरांवर टीकेची झोड उठली आहे. Maharashtra Debt Crisis : लाडकी बहिण योजना राज्याच्या आंगलट आलीय का? संपुर्ण आकडेवारी. सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया पडळकरांचे जिवलग मित्र आणि शेतकरी संघटनेतून आलेले आमदार सदाभाऊ खोत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट सांगितले की, आपली लढाई राजारामबापू पाटील यांच्याबरोबर नसून त्यांच्या वारसांशी आहे. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करणं अयोग्य आहे. त्यांनी मित्र म्हणून पडळकरांना जपून बोलण्याचा सल्ला दिला. त्याचबरोबर सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी जाती-पातीचे बी शोधण्याचे काम शरद पवार यांनीच केल्याचे सांगितले. जातीनिहाय दरी निर्माण करण्याचे पेटंट त्यांच्याकडेच आहे, असा खोचक टोला त्यांनी लगावला. भाजपमधील पडळकरांची प्रतिमा Gopichand Padalkar हे प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा स्पष्टवक्तेपणा दाखवला आहे. मात्र, त्यांचा हा स्पष्टवक्तेपणा वारंवार वादग्रस्त ठरतो. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनाही त्यांच्यावर वेळोवेळी नाराजी व्यक्त करावी लागली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, पडळकरांचे वक्तव्य चुकीचे आहे आणि त्यांना समज दिली आहे. फडणवीस म्हणाले की, पडळकर हे तरुण नेते आहेत, भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते. त्यामुळे त्यांनी जपून बोलले पाहिजे. जयंत पाटील यांची राजकीय पार्श्वभूमी Jayant Patil हे राज्यात अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून काम केले आहे. सांगली जिल्ह्यातील त्यांचे वर्चस्व एकेकाळी निर्विवाद होते. मात्र, अलीकडच्या काळात त्यांना राजकीय आव्हानांचा सामना करावा लागला आहे. भाजप नेते गोपीचंद पडळकर हे त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी ठरले आहेत. राजकारणातील पातळीवरचा प्रश्न पडळकरांचे वक्तव्य हे केवळ वैयक्तिक पातळीवर न थांबता राजारामबापूंसारख्या थोर नेत्यांचा उल्लेख करून केल्याने त्यावर अधिकच संताप व्यक्त केला जात आहे. राजकारणात मतभेद असणे साहजिक असले तरी पातळी सोडून केलेली वक्तव्ये केवळ व्यक्तीच नव्हे तर समाजातील मोठ्या गटाचा अपमान करतात. Sharad Pawar आणि Devendra Fadnavis हे दोन नेते एकत्र येण्याच्या चर्चा कशामुळे?

Govind Barge Murder Case
Beed Updates महाराष्ट्र

Govind Barge Murder Case: ‘पिंजरा’ कुणामुळे तयार झाला?

Govind Barge मृत्यू प्रकरण : ‘पिंजरा’ कसा तयार झाला? पूजाचा खेळ तेव्हाच समजायला हवा होता! बीड जिल्हा, गेवराई तालुका, लुखामसला गावाचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोलापूर-बार्शी मार्गावरील एका गावात, काळ्या रंगाच्या कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह आढळून आला होता. त्यांच्या डोक्यात गोळी लागलेली होती. या घटनेला सुरुवातीला आत्महत्या मानलं जात होतं, पण तपास जसजसा पुढे सरकत गेला, तसं हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं. Govind Barge आणि पूजाची ‘कथा’ गोविंद बर्गे हे विवाहित असूनही त्यांचे संबंध पूजा गायकवाड नामक महिलेसोबत होते, असा तपासात उघड झाला आहे. पूजासोबतच्या या संबंधांमध्ये बऱ्याच वादावादी घडत होती, आणि गोविंदवर मानसिक तणाव वाढत होता. तपासादरम्यान फोन कॉल डिटेल्स आणि चॅट्स तपासण्यात आले, ज्यातून असे समजले की गोविंदने पूजाला आत्महत्येची धमकी दिली होती. पण पूजाने ही धमकी गांभीर्याने घेतली नाही. याच ठिकाणी, गोविंदरावांचा ‘पिंजरा’ तयार झाला, असं त्यांचे नातेवाईक म्हणतात. पोलिसांचा तपास आणि पूजाची अटक पोलिसांनी या प्रकरणात पूजा गायकवाडला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. तिची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली असून तपास सुरु आहे. पोलिसांनी उघड केलं की पूजाच्या मोबाईलमधून काही अशा मेसेजेस सापडले, जे मानसिक त्रास देणारे होते. त्यात प्रॉपर्टी तिच्या नावावर करण्यासाठी दबाव, मानसिक छळ, आणि नकारात्मक भावनिक दडपण याचा समावेश होता. Govind Barge ची चूक कुठे झाली? गोविंद बर्गे हे एक प्रतिष्ठित पदाधिकारी होते. पण वैयक्तिक आयुष्यातील निर्णयांमध्ये त्यांनी गंभीर चुका केल्या, असं त्यांच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे. हे सगळं एकत्रितपणे त्यांना मानसिक दृष्टिकोनातून कमजोर करत होतं, ज्याचा शेवट भयानक ठरला. आत्महत्या की घातपात? गोविंद बर्गेंचा मृतदेह पूजाच्या घराजवळच एका कारमध्ये सापडला. त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याचा प्राथमिक अंदाज होता, पण कुटुंबीय आणि नातेवाईक यांना घातपाताचा संशय आहे. “गोविंद कधीही आत्महत्या करणारा माणूस नव्हता,” असं त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं. या प्रकरणात पोलिसांनी एफएसएल रिपोर्ट, फिंगरप्रिंट तपासणी, आणि सीसीटीव्ही फुटेज आदी पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ‘पिंजरा’ सिनेमाची आठवण या प्रकरणामुळे अनेकांना जुना मराठी चित्रपट ‘पिंजरा’ आठवला. समाजासाठी आदर्श मानला जाणारा एक व्यक्ती, एका स्त्रीच्या मोहात फसतो आणि शेवटी त्याचा विनाश होतो — Govind Barge चं आयुष्य तसंच काहीसं वळलं. जनतेत संताप आणि चर्चेला उधाण या प्रकरणावरून सोशल मीडियावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या गेवराईच्या माजी उपसरपंचाच्या आत्महत्येचे संपूर्ण प्रकरण…