आजवर अनेकांनी बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर भाष्य केले, पण भाजपचे आमदार सुरेश धस यांनी प्रकरणाचा सविस्तर घटनाक्रम उलगडून एक धक्कादायक कहाणी सांगितली. सुरुवातीला सुरेश धस यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू चाटे यांच्या इन्व्हॉल्व्हमेंटबद्दल चर्चा केली. “यांचा मुख्य आका कोण?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी विरोधकांना उत्तर दिले की आम्हीही याचा शोध घेत आहोत. धस यांनी सुदर्शन घुलेवर आरोप करत त्याच्या आर्थिक स्त्रोतांबद्दल शंका उपस्थित केली. त्यांनी सांगितले की या प्रकरणातील आरोपींनी एका मोठ्या कटाची योजना आखली होती. सरपंचांच्या हत्येमागची मन हेलावून टाकणारी कहाणी सरपंचांच्या हत्येने संपूर्ण जिल्हा हादरला असून ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप आहे. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली की पिस्तूल असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून ती काढून घेण्यात यावी. सरपंच संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणातील धक्कादायक खुलासे आणि सुरेश धस यांचे भावनिक भाषण ऐकल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
ताज्या बातम्या
Walmik Karad Connection -Santosh Deshmukh हत्या प्रकरण-Beed
बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोप बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येतील आरोप 3 जानेवारी 2025 | लेखक: Maharashtra Katta बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येत परळीचे आमदार आणि महायुती सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचे मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्या नातेवाईकांचा हात असल्याचे आरोप केले जात आहेत. तर याबाबत बोलताना “वाल्मिक कराड माझे निकटवर्तीय आहेत तर आहेत” असं वक्तव्य धनंजय मुंडेंनी केलंय म्हणूनच धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय व बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराड कोण आहेत? तेच जाणून घेऊयात वाल्मीक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष होते. मागील दहा वर्षांपासून वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या मतदारसंघातील संपूर्ण कारभार वाल्मीक कराडच पाहतात. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मीक कराड नागरिकांच्या समस्या सोडवतात. तर वाल्मिक कराड यांचा इतिहास पाहता यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात वाल्मिक कराड यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात. तर सध्याच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येत असून बीडच्या केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे. जो धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांचा जवळचा मानला जातो. वाल्मीक कराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी सुद्धा त्यांच्यावर राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. तर बीडमध्ये वाल्मिक कराडने शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला घुलेच्या फोनवरून धमकी दिली. तसेच, घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं दोन कोटींची खंडणी मागितली. हाच घुले नामक इसम सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी आहे. मात्र, फक्त वाल्मिक कराड याच्यावर दोन कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला. सरपंचचांच्या हत्या प्रकरणात कराडला का आरोपी केले जात नाही?” असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा संशय तेथील गावकऱ्यांनी देखील व्यक्त केला आहे असं म्हणत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अंबादास दानवे यांनी देखील हे प्रकरण विधिमंडळात उचलून धरले. आणि वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन थेट मंत्री धनंजय मुंडेंकडे बोट दाखवले होते. तर यावर उत्तर देताना “एका तरुण सरपंचाचा खून करण्यात आला हे प्रकरण आम्ही गांभीर्याने घेतलं आहे. याप्रकरणात पीएसआय सस्पेंड आहे. तर, येथील पीआय अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल आहे. आरोपी कुणाशी संबंधित आहे हे न पाहता जो आरोपी आहे, त्याला अटक केली जाईल. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन केली असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. AI टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण या प्रकरणाचा शोध घेत आहोत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी विधानपरिषदेत बोलताना सांगितलं आहे. तर यावेळी आरोपी मंत्र्यांचे जवळचे आहेत, असे बोलणं योग्य नाही असं सांगायला देखील फडणवीस विसरले नाहीत. तर या सगळ्या प्रकरणावर तुमचे मत काय तर कंमेंट करून नक्की सांगा.
राम शिंदे सभापती बनले, BJP-NCP फायदेशीर, SHINDE गट लॉस?
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवड – राम शिंदे यांची उमेदवारी विधान परिषदेच्या सभापती पदाची निवड – राम शिंदे यांची उमेदवारी 3 जानेवारी 2025 | लेखक: आपला नाव विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी भाजपचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री राम शिंदे यांनी विधान परिषदेच्या सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या सोबतच महायुतीचे इतर नेते होते. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची मात्र यावेळी अनुपस्थिती दिसली. त्यामुळे शिवसेना शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. म्हणूनच सभापती पदा मागचं नेमकं राजकारण काय आहे? तेच जाणून घेऊयात मागील महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर सभापती असताना नीलम गोऱ्हे विधान परिषदेच्या उपसभापती होत्या. तर तत्कालीन सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यावर विधान परिषदेमध्ये सभापती नसल्याने नीलम गोऱ्हे सभापती पदाचा अतिरिक्त भार देखील सांभाळत होत्या. शिवसेना फुटी नंतर सुरुवातीला नीलम गोऱ्हे उद्धव ठाकरें सोबत होत्या. तर “फक्त सभापती पदासाठी नीलम गोऱ्हे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.” अशा चर्चा देखील त्यावेळी होत्या. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबतच नीलम गोऱ्हे आता पुढे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. विधानसभेचे अध्यक्ष पद भाजपला मिळाल्या नंतर, विधान परिषदेचे सभापती पद शिवसेनेला मिळावे अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती. “विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांना सभापती पद द्यावे” अशी मागणी सुद्धा शिवसेनेकडून केली जात होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे कानाडोळा करत भाजपने विधान परिषदेचे सभापती पद सुद्धा आपल्याकडेच ठेवल. त्यामुळे मुख्यमंत्री पदानंतर आता सभापती पदासाठी शिंदे व भाजप मध्ये पुन्हा एकदा संघर्ष पहायला मिळाला, आणि या संघर्षात देखील भाजपने स्वतःचं च खरं केलं आहे. आज विधान परिषदेच्या सभापती पदासाठी भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर महाविकास आघाडी कडून अद्याप सभापती पदासाठी कोणीही अर्ज दाखल केला नाहीये. यासोबतच महायुती कडे बहुमत आहे. त्यामुळे आता जवळपास भाजपच्या राम शिंदे यांची निवड झाल्याचं निश्चित असून यासंबंधीची अधिकृत घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या मागणीकडे काना डोळा करत भाजपने राम शिंदे यांनाच सभापती म्हणून का निवडले? ते आता पाहूयात. राम शिंदे यांना सभापती करण्यामागचं सर्वात मुख्य कारण म्हणजे ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. दुसरं कारण म्हणजे राम शिंदे यांच राजकीय पुनर्वसन. राम शिंदे हे 2014 मध्ये कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी त्यांचा पराभव केला होता. 2019 च्या निवडणुकीत पराभूत झाल्या नंतर आठ जुलै 2022 ला राम शिंदे यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं. त्यानंतर आता यंदाच्या २०२४ विधानसभा निवडणुकीत देखील राम शिंदे यांचा पराभव झाला. म्हणून पुन्हा एकदा राम शिंदे यांचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या हेतूने त्यांना सभापतीपद देण्यात आलय. यासोबतच राम शिंदे यांना सभापती पद देण्या मागचं सर्वात मोठ कारण म्हणजे धनगर समाजाचा पाठिंबा मिळवणे. राम शिंदे हे धनगर समाजातून येत असून नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मराठा, ओबीसी, बंजारा, मुस्लिम सारख्या समाजांचे नेते आहेत. त्यामुळे धनगर समाज नाराज होऊ नये यासाठी सोशल इंजीनियरिंग मध्ये एक्सपर्ट असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे निकटवर्तीय राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावली आणि या मधून देवेंद्र फडणवीसांनी एका निशाण्यात दोन लक्ष साधल्याचं बोललं जातंय. “थोडक्यात वाचलास, मी सभा घेतली असती तर” असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवारांचं अनोख्या पद्धतीने निवडणूक जिंकल्यानंतर अभिनंदन केलं होतं. तर यावरून राम शिंदे यांनी “अजित पवारांनी महायुती धर्म पाळला नाही” अशी टीका देखील केली होती. त्यामुळे अजित पवारांवर भाजपचे काही समर्थक नाराज होते. पण आता राम शिंदे यांच्या सभापती पदासाठी अजित पवारांनी त्यांना पाठिंबा दिलाय, शिवाय ते राम शिंदे अर्ज दाखल करताना स्वतः उपास्थित देखील होते. त्यामुळे त्यांच्यावर असलेली भाजपच्या काही समर्थकांची नाराजी कमी होण्यास मदत होईल. राम शिंदे यांची सभापती पदी निवड झाल्याने धनगर समाज, स्वतः राम शिंदे, भाजप कार्यकर्ते व देवेंद्र फडणवीस देखील खुश असतील. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी ची यावर कोणतीही हरकत नसल्याने त्यांनी देखील राम शिंदे यांच्या सभापती पदासाठी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजपा हे पक्ष तर खुश आहेत. पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाराज झाल्याच दिसून येतंय. तर सतत च्या मिळणाऱ्याला दुय्यम वागणुकीमुळे एकनाथ शिंदे व त्यांचा पक्ष पुढे काय भूमिका घेणार? हे पाहणं महत्वाचं असून यावर तुमचे मत काय? राम शिंदे यांची सभापती पदी केलेली ही नेमणूक योग्य आहे का? पुन्हा एकदा शिंदेंना डावलून भाजपा चूक करतीये का? यावर तुम्हाला काय वाटतं? ते कमेंट करून नक्की सांगा.
Beed Santosh Deshmukh हत्याकांड प्रकरण – Suresh Dhas
आजवर अनेकांनी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घटनाक्रम सांगितला, त्याबद्दल भाष्य केलं पण सुरेश धस यांनी बीड हत्या प्रकरणाचा अतिशय तपशीलवार घटनाक्रम सांगून या पूर्ण घटनेची सर्वांना थक्क करून सोडणारी कहाणी सांगितली. त्यामुळे नक्की सुरेश धस त्यांच्या भाषणात काय म्हणालेत तेच पाहुयात. सुरुवातीला सुरेश धस यांनी बीड प्रकरणातील अगदी सुरवातीपासूनचा घटनाक्रम सांगत, विष्णू चाटे याच्या या प्रकरणातील इन्व्हॉल्व्हमेंट बद्दल भाष्य केलं. तर पुढे यांचा कोण आका आहे? असा सवाल देखील उपस्थित केला. तर यावर विरोधकांना उत्तर देत तुमच्याप्रमाणे आम्ही देखील या आकाच्या शोधात आहोत असं सुरेश धस म्हणाले. प्रकरणातील पुढील घटनाक्रम सांगताना सुरेश धस यांनी सुदर्शन घुले नामक इसमावर टीका केली व ज्याचं घर चार-पाच पत्र्याचं आहे तो स्कॉर्पिओ मध्ये कसा काय फिरू शकतो? त्याला स्कॉर्पिओ कोणी दिली हे शोधणं महत्त्वाचं आहे. असं म्हणत प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणाबाबत पुढे बोलत असताना मी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली आहे आणि त्यानुसार या सगळ्यांनी एक प्लॅन केला असं म्हणत सुरेश धस यांनी आरोपींचा काय प्लॅन होता ते सांगितलं. यापुढे सुरेश धस यांनी या प्रकरणातील सर्वांना हादरवून टाकणारी कहानी सांगितली. तर बीड जिल्ह्यातील ज्या ज्या लोकांकडे पिस्तूल आहेत, त्या त्या लोकांचे पिस्तूल आपण काढून घ्यावे यासाठी अध्यक्षांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती केली. सुरेश धस यांनी त्यांच्या भाषणात या प्रकरणावरून ग्रामस्थांचा संताप का झाला, या मागील कारण देखील स्पष्ट केला आहे. अशाप्रकारे सुरेश धस यांनी बीड मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मनाला अतिशय वेदना देणारी कहानी सांगत, भावनिक पद्धतीने भाषण दिले. तर यावर तुमचे मत काय? कमेंट करून नक्की सांगा
Pandit Nehru यांनी B.R. Ambedkar यांना Election मध्ये पाडण्यासाठी कट केला होता?
सुरुवातीला अमित शहांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने अमित शहांना धारेवर धरलं, त्यांच्यावर टीका केली. तर या सगळ्या नंतर संध्याकाळी तातडीची पत्रकार परिषद घेत अमित शहा यांनी काँग्रेस संविधान विरोधी, आरक्षण विरोधी, ओबीसी विरोधी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विरोधी असल्याच सांगितलं. आणि हे सांगताना त्यांनी अनेक गोष्टींचा दाखला दिला. अमित शहा या पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले की पंडित नेहरूंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा द्वेष सर्व ज्ञात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव करण्यासाठी काँग्रेसने कशी सर्व शक्ती वापरली होती हे आपल्याला माहिती आहे. म्हणूनच खरच काँग्रेसने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवडणुकीमध्ये पराभूत करण्यासाठी कट रचला होता का? अमित शहांना या वक्तव्यामधून काय म्हणायचे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव झाला होता का? आणि जर झाला तर का झाला? हे सर्व जाणून घेऊयात तस पाहिलं तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीत फारसा फरक नव्हता, परंतु प्रत्येक गोष्टीच्या अंमलबजावणीबद्दल आणि त्याबद्दलच्या कल्पनांबाबत दोघांचे विचार अतिशय वेगळे होते. विशेषतः जातीय आरक्षण, हिंदू कायद्याचे संहिताकरण, परराष्ट्र धोरण आणि काश्मीर या मुद्द्यांवरून त्यांचे विचार खूपच वेगळे होते. भारत स्वतंत्र होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जवाहरलाल नेहरूंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या नवीन मंत्रिमंडळात कायदे मंत्री म्हणून सामील होण्यासाठी आमंत्रित केले. मंत्रिमंडळातील इतर बहुतेक सदस्यांप्रमाणे, आंबेडकर काँग्रेस पक्षाचा भाग नव्हते, यापूर्वी देखील त्यांचा काँग्रेस सोबत जास्त संबंध आला नव्हता. नेहरू आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील इतर वरिष्ठ नेत्यांनी ज्या मूल्यांवर विश्वास ठेवला होता त्यातही ते फारसे सहभागी नव्हते. तर, कायदे मंत्री म्हणून आंबेडकर हे नेहरूंची निवड नव्हते. “इतर राजकीय विचारसरणीच्या उत्कृष्ट व्यक्तींनाही सरकारचे नेतृत्व करण्यास सांगितले पाहिजे.”असा महात्मा गांधींचा विचार होता म्हणूनच त्यांनी कायदेतज्ञ असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव कायदे मंत्री पदासाठी सुचवले होते. वास्तविक पाहता भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधांबद्दल फारस कोणालाच माहिती नाही. तर , “नेहरू-आंबेडकर संबंध अस्पष्टतेत ढकलले गेले आहेत. त्याबद्दल कोणतेही पुस्तक नाही, किंवा माझ्या माहितीनुसार, एकही चांगला अभ्यासपूर्ण लेख नाही.” असं मत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं होत. पण एका निवडणुकीदरम्यान जवाहरलाल नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील संबंध फारसे चांगले नसल्याचं स्प्ष्ट झालं होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश नेहरुंच्या मंत्रिमंडळात जरी असला तरी सुद्धा त्यांना दुय्यम वागणूक दिली जात होती. त्याचं कारण होतं नेहरू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीमध्ये असलेला फरक. पंडित जवाहरलाल नेहरूंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा फारशी पटायची नाही. तर संविधानातील कलम 370 वरून या दोघांमध्ये मोठे मतभेद होते आणि त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळातील सदस्य असून देखील त्यांना दुय्यम वागणूक दिली जायची. आणि या सगळ्याला कंटाळून अखेर 27 सप्टेंबर 1951 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्री मंडळातून मधून राजीनामा दिला आणि आगामी काळात येणारे निवडणूक स्वतंत्रपणे लढवायची ठरवली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या निर्णयानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. कारण एकूणच त्या काळातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रभाव पाहता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडणूक जिंकले तर ते काँग्रेस विरोधात एक ताकदवान विरोधी पक्ष उभा करू शकतात अशी भीती त्यांना होती. म्हणूनच भविष्यातील हा संभाव्य धोका टाळण्यासाठी काँग्रेसच्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत एन केन करून हरवण्याचे निश्चित केले होते, असं सांगितलं जातं. काळ होता १९५२ चा भारतात निवडणुका होऊ घातल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तर त्यांना पराभूत करण्यासाठी नेहरूंच्या काँग्रेस पक्षाने आणि कम्युनिस्ट पक्षाने हातमिळवणी केली होती असं म्हंटल जात. कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांनी याकाळात अनेक पत्रके वाटली ज्यात डॉ. आंबेडकरांना उघडपणे देशद्रोही म्हटले होते. विविध ठिकाणी हि पत्रके वाटण्यात आली होती. आणि दरम्यान निवडणूका पार पडल्या. ज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव झाला तर काँग्रेस चे उमेदवार नारायण सदोबा काजरोळकर विजयी झाले होते. १९५२ च्या या निकालाबाबत बोलायचे झाले तर या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हेराफेरीचे आरोप झाले होते. डॉ. आंबेडकरांचा निवडणूकीत सुमारे १४५३७ मतांनी पराभव झाला आणि सर्वात आश्चर्यकारक म्हणजे या निवडणुकीत या जागेवरील ७४३३३ मते रद्द करण्यात आली होती. १९५२ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या या निवडणूक पराभवाचे तपशीलवार वर्णन पद्मभूषण पुरस्कार सन्मानित लेखक धनंजय कीर यांनी केले आहे. धनंजय कीर यांनी त्यांच्या डॉ. बाबा साहेब आंबेडकर जीवन चरित्र या पुस्तकात या सर्व घटनांचा तपशीलवार उल्लेख केला आहे. हे पुस्तक डॉ. आंबेडकरांवर लिहिलेल्या सर्वात प्रामाणिक पुस्तकांपैकी एक मानले जात असून डॉ. आंबेडकरांनी स्वतः या पुस्तकाला मान्यता दिली होती. या पुस्तकात धनंजय कीर यांनी काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी डॉ. आंबेडकरांविरुद्ध कसे कट रचला याचा उल्लेख केला आहे. ५ जानेवारी १९५२ रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. आंबेडकर म्हणाले होते की, “मुंबईतील जनतेचा प्रचंड पाठिंबा इतका एकाकी कसा काय नाकारला गेला , हा निवडणूक आयुक्तांच्या चौकशीचा विषय आहे.” पुढे धनंजय कीर यांनी असेही लिहिले आहे की, निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या विधानात म्हटले होते की, “मुंबईतील लोकांनी मला इतका मोठा पाठिंबा दिला होता पण तो कसा वाया गेला? निवडणूक आयुक्तांनी याची चौकशी करावी” तर केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे तर समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनी देखील त्यांच्या विधानात म्हटले होते की, “डॉ. आंबेडकरांप्रमाणेच मलाही या निवडणूक निकालाबद्दल शंका आहे.” तर कम्युनिस्ट नेते श्रीपाद अमृता डांगे यांच्या कटामुळे ते हरले, असा विश्वास डॉ. आंबेडकरांचा होता असे धनंजय कीर यांनी लिहिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्याविरुद्धच्या कटांवर मौन राहिले नाही. त्यांनी या निवडणूक फसवणुकीविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या देशातील निवडणूक घोटाळ्याचे पहिलेच बळी होते. तर डॉ. आंबेडकर हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी निवडणूक घोटाळ्यावर न्यायालयात खटला दाखल केला होता. तर या पराभवानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यसभेचे सदस्य बनले, तर १९५४ च्या भंडारा येथून झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांनी पुन्हा लोकसभेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले, आणि त्यांना हि निवडणूक जिंकता आली नाही. तर १९५७ च्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकी पर्यंत त्यांचे निधन झाले होते. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? यावर तुमचे मत काय? ते कमेंट करून नक्की सांगा
Yogeshwari Devi Story-Beed
देवी योगेश्वरी: कोकण व मराठवाड्याचा अद्वितीय सांस्कृतिक दुवा बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठावर वसलेली आंबाजोगाई नगरी मार्गशीर्ष महिन्यात भक्तांच्या गजबजाटाने फुलून जाते. याचं कारण म्हणजे देवी योगेश्वरी, जी कोकणातील अनेक कुटुंबांची कुलदैवत मानली जाते. बीडच्या भूमीत वसलेल्या या देवीचा कोकणाशी नेमका काय संबंध आहे? देवी योगेश्वरी कोकणातील कुटुंबांची कुलदेवता कशी बनली? चला, जाणून घेऊया. देवी योगेश्वरीची पौराणिक कथा योगेश्वरी देवीला साक्षात आदिमाया आदिशक्तीचे रूप मानले जाते. तिच्या अवतारामागे एक पौराणिक कथा प्रचलित आहे. दांतसूर नावाच्या असुराचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले. दांतसूराचा पराभव केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली. यामुळे या स्थळाला आंबाजोगाई असे नाव मिळाले. दांतसूरावर विजय मिळवल्यामुळे तिला दांतसूरमर्दिनी असेही संबोधले जाते. देवीच्या कुमारिका स्वरूपाची कथा योगेश्वरी देवी कुमारिका असल्याचे सांगितले जाते. परळीच्या वैजनाथांशी तिचा विवाह ठरला होता, पण लग्नाचा मुहूर्त चुकल्याने विवाह होऊ शकला नाही. यामुळे योगेश्वरी देवीने आंबाजोगाईतच वास्तव्य केले. कोकणातील कुलदैवता कशी झाली? भगवान परशुरामांनी कोकण भूमीची निर्मिती केल्यानंतर काही कुटुंबे कोकणात नेली. या कुटुंबांच्या विवाहासाठी त्यांनी अंबाजोगाईच्या मुली निवडल्या. योगेश्वरी देवीने या विवाहासाठी एक अट ठेवली—“या मुलींच्या कुलाची मी कुलदेवता असेन.” त्यामुळे कोकणातील अनेक कुटुंबांची देवी योगेश्वरी कुलदैवता बनली. आजही श्रद्धेचा केंद्रबिंदू देवी योगेश्वरी ही केवळ धार्मिक नाही तर कोकण व मराठवाड्याला सांस्कृतिकदृष्ट्या जोडणारी महत्त्वाची कडी आहे. मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी, गोवा यांसारख्या ठिकाणांहून असंख्य भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात. तुम्ही कधी देवी योगेश्वरीचे दर्शन घेतले आहे का? तुमचे अनुभव आणि विचार आम्हाला कंमेंट करून नक्की सांगा!
RSS चे बौद्धिक काय असत? NCP चे MLA व Ajit Pawar Mahayuti Boudhik ला का उपस्थित नव्हते?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक: नेमकं काय आणि का? महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरच्या रेशीमबाग येथील कार्यालयात बौद्धिक सत्राचे आयोजन करण्यात आले. भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी या सत्राला हजेरी लावली, तर अजित पवार आणि त्यांच्या गटातील आमदारांनी अनुपस्थिती दर्शवली. यामुळे या बौद्धिक सत्राची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बौद्धिक म्हणजे काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्ती विकासाद्वारे राष्ट्र विकासावर भर देतो. यासाठी शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास हा त्रिस्तरीय दृष्टिकोन अवलंबला जातो. शाखांमध्ये शारीरिक व मानसिक कसरतींवर लक्ष केंद्रित केले जाते, तर बौद्धिक सत्रांद्वारे संघाचे विचार, राष्ट्रनिर्मितीचे योगदान आणि हिंदू विचारसरणीवर भाष्य केले जाते. बौद्धिक सत्रातील प्रमुख मुद्दे अजित पवारांचा अनुपस्थितीचा निर्णय राजकीय विश्लेषकांच्या मते, अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनी या सत्राला जाण्याचे टाळले कारण त्यांच्या मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लक्षात घेता, संघाच्या विचारधारेशी भिन्न असलेल्या मतदारांचा रोष ओढवण्याची शक्यता असल्याने पवार गटाने बौद्धिक सत्राला दांडी मारली. निष्कर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बौद्धिक सत्र हे विचारमंथनासाठीचे व्यासपीठ आहे, जे महायुतीतील काही आमदारांसाठी महत्त्वाचे वाटले, तर काहींनी राजकीय धोरण म्हणून दूर राहणे पसंत केले. तुमचे यावर काय मत आहे? कंमेंट करून नक्की सांगा!
पालिकेच्या जागेचा फलक पण नेमकी जागा कुठे ? कोथरूड-
कोथरूडमधील अमेनिटी स्पेस: विकासाच्या प्रतिक्षेत की अतिक्रमणाच्या विळख्यात? कोथरूडमधील भुसारी कॉलनी येथील इशना सोसायटी परिसरात असलेल्या सर्व्हे नं. ७७/२ वरील १०७१.७७ चौ. मीटर अमेनिटी स्पेसवर अतिक्रमण झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये नाराजी आहे. महापालिकेच्या ताब्यात असूनही सदर जागेचा योग्य विकास न झाल्याने अतिक्रमणाला चालना मिळाली आहे. पालिकेचा फलक पण जागा अदृश्य पालिकेने जागेवर ताबा असल्याचे दर्शवणारा फलक उभारला आहे. मात्र, जागेभोवती सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नसल्याने त्या जागेवर वाहने पार्किंग केली जातात. यामुळे नागरिकांना जागेची नेमकी हद्द समजत नाही. अतिक्रमणाचे वाढते प्रमाण सदर जागेच्या मागील बाजूस उभारलेल्या पत्र्यांविषयी स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या पत्र्यांमुळे जागेवर अनधिकृत बांधकाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जागा पडीक असल्याने ती हळूहळू व्यावसायिक ताब्यात जाण्याची भीती आहे. नागरिकांची मागणी आणि प्रशासनाचे पाऊल नागरिकांनी जागेचा विकास करून लोकाभिमुख प्रकल्प उभारण्याची मागणी केली आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपअभियंता राजेश थोरात यांनी जागेची पाहणी केल्याचे सांगितले. संबंधित अतिक्रमणकर्त्यांना लवकरच नोटीस पाठवून कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्याचा सवाल पालिकेच्या दुर्लक्षामुळे मोक्याची जागा हातातून जाण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे. जर प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर ही महत्त्वाची जागा कायमची गमावण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तुम्हाला काय वाटते? अशा आरक्षित भूखंडांचा विकास त्वरित व्हावा का? कंमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा!
BJP ने खरंच Manmohan Singh यांचा अपमान केला?
राजघाट नाहीतर निगमबोध घाटावर भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आल्याने अंत्य संस्कारां वेळी भाजप सरकारकडून त्यांचा अपमान करण्यात आला असे आरोप होत असताना डॉक्टर मनमोहन सिंग यांना राजघाट का नाकारण्यात आला असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे. म्हणूनच भाजप सरकारने खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला का? सरकारच्या कोणत्या कृत्यांमुळे त्यांचा अपमान झाला? आणि यावर भाजपा व काँग्रेसने नेमकी कोणती भूमीका घेतली आहे तेच जाणून घेऊयात अर्थतज्ज्ञ व २००४ ते २०१४ पर्यंत भारताचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी २६ डिसेंबर २०२४ रोजी उशिरा रात्री दिल्लीतील एम्स येथे निधन झाले होते. २८ डिसेंबरला निगमबोध घाटावर पूर्ण सन्मानाने, शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आल्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी अंत्यसंस्काराच्या जागेची निवड हि डॉ. मनमोहन सिंग यांचा “अपमान” आहे असं म्हटलंय. “भारतमातेचे महान सुपुत्र आणि शीख समुदायाचे पहिले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करून सध्याच्या सरकारने त्यांचा पूर्णपणे अपमान केला आहे. ते एक दशक भारताचे पंतप्रधान होते, त्यांच्या कार्यकाळात देश आर्थिक महासत्ता बनला आणि त्यांची धोरणे अजूनही देशातील गरीब आणि मागासवर्गीयांना आधार देतात, आजपर्यंत, सर्व माजी पंतप्रधानांच्या प्रतिष्ठेचा आदर करून, त्यांचे अंत्यसंस्कार राजघाट येथे करण्यात आले जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला अंतिम ‘दर्शन’ घेता येईल आणि कोणत्याही गैरसोयीशिवाय श्रद्धांजली वाहता येईल. डॉ. मनमोहन सिंग हे आपल्या सर्वोच्च आदराचे आणि स्मारकाचे पात्र आहेत. सरकारने देशाच्या या महान सुपुत्राचा आणि त्यांच्या अभिमानी समुदायाचा आदर करायला हवा होता,” असं राहुल गांधी या प्रकाराबाबत बोलताना म्हणाले. डॉक्टर मनमोहन सिंग हे भारताचे माजी पंतप्रधान होते. त्याप्रमाणे त्यांचे अंत्यसंस्कार दिल्लीतील राजघाट येथे होण व त्यासोबतच राजघाट येथे अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं स्मारक उभारणं अपेक्षित होत, मात्र असं काहीही झालं नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे अंत्यसंस्कार राजघाट ऐवजी निगमबोध घाटावर करण्यात आले. तर त्यांच्या स्मारकासाठी कोणतीही जागा तातडीने उपलब्ध करून न देता, दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी योग्य जागा शोधण्यात येईल व तेथे त्यांचे स्मारक उभारले जाईल असं सरकारने म्हटले आहे. यासोबतच मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारांचे थेट प्रक्षेपण देखील कोणत्याही शासकीय वाहिनी कडून करण्यात आले नव्हते. परिणामी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांना या प्रकारची दुय्यम वागणूक देऊन सरकार ने डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान केला आहे असा आरोप अनेक जण करत असून, या मुद्द्यावरून अनेकांनी सरकारवर टीका देखील केली आहे. या सगळ्या आरोपांनंतर भाजपची बाजू मांडताना गौरव भाटिया यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. “भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचे अंत्यसंस्कार दिल्लीत का झाले नाहीत? त्यांचे अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ शहरात करण्यास कोणी सांगितले होते. काँग्रेसने नरसिंहराव यांच्यासाठी नेमके कुठे स्मारक बांधले आहे? त्या स्मारकाचा पत्ता कृपा करून आम्हाला द्यावा. आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी एकत्र तिथे जाऊ” असं म्हणत काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्यावर झालेल्या अन्यायाचा दाखला देत डॉक्टर मनमोहन सिंग यांना दिलेल्या वागणुकीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न गौरव भाटिया यांनी केला आहे. जवळपास एक दशक भारताचे पंतप्रधान राहिलेले, व शीख समुदायाचे एकमेव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना मिळालेली एकूणच हि वागणूक अतिशय खेद जनक असून यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, खरंच डॉक्टर मनमोहन सिंग यांचा अपमान झाला का? यावर तुमचे मत काय ते कंमेंट करून नक्की सांगा. भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांना महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीम कडून भावपूर्ण श्राद्धांजली.
Photography With Brand New DSLR
I am so happy, my dear friend, so absorbed in the exquisite sense of mere tranquil existence, that I neglect my talents. I should be incapable of drawing a single stroke at the present moment