Brace Position-flight emergency
Tips And Tricks आजच्या बातम्या

Brace Brace Brace ऐकल्यावर काय करावं? विमान सुरक्षेचं ज्ञान

Spread the love

विमानप्रवास म्हणजे एक रोमांच असतोच, पण त्याचवेळी थोडीशी भीतीही अनेकांच्या मनात असते. विशेषतः अहमदाबाद विमान अपघातासारख्या घटनांनंतर ही भीती वाढते. पण अशा आपत्कालीन परिस्थितींमध्ये योग्य माहिती आणि कृतीमुळे जीव वाचू शकतो. त्यामुळेच आज आपण जाणून घेणार आहोत ‘Brace Position‘ म्हणजे काय आणि ती कशी घ्यावी.

Brace Position- flight emergency
Brace Position- flight emergency

Brace पोझिशन म्हणजे काय?

आपत्कालीन लँडिंगच्या प्रसंगात विमानातील क्रू सदस्य जेव्हा जोरात ओरडतात, “Brace! Brace! Brace!”, तेव्हा प्रवाशांनी तात्काळ एक विशिष्ट पोझिशन घ्यावी लागते. ही पोझिशन म्हणजेच ‘Brace Position‘. यामध्ये प्रवाशांनी खालीलप्रमाणे कृती करावी:

सीटबेल्ट घट्ट बांधावा।

शरीर पुढे झुकवावं.

डोके गुडघ्यांजवळ आणून हातांनी डोकं झाकावं किंवा सीटसमोरील खुर्ची घट्ट पकडावी.

या पोझिशनमुळे अपघाताच्या वेळी डोकं, मणक्याचा भाग आणि इतर अवयवांना होणारा धक्का कमी होतो.

विमान अपघात दुर्मीळ पण.

कठोर दिसतो, विमान अपघात हे खूप दुर्मीळ असतात. आधुनिक यंत्रणा, वैमानिकांचं कौशल्य, आणि कडक सुरक्षा नियमामुळे हवेतून प्रवास करणं हे खूप सुरक्षित म्हणलं जातं. परंतु कधीकधी इंजिन फेल होणं, बर्ड हिट, हवामान बदल किंवा टेकऑफ-लँडिंगच्या वेळी काही तांत्रिक अडचणीमुळे इमर्जन्सी लँडिंगची वेळ येते.

Brace Position का आवश्यक?

एखाद्या कठीण परिस्थितीत असतानाच्या विमानाला अचानक लँडिंग करावं लागतं. त्या वेळी शरीराला जास्त धक्का बसतो. अशावेळी डोके, मान आणि कंबर हे भाग जास्त धोक्यात असतात. ब्रेस पोझिशन यासाठीच तयार करण्यात आली आहे की, या धक्क्यांमधून शरीराची इजा टाळता यावी.

तसेच, ही पोझिशन आंतरराष्ट्रीय विमान सुरक्षा संस्था (ICAO) आणि अनेक एअरलाइन्सनी मान्य केलेली आहे आणि ट्रेनिंगमध्ये वापरली जाते.

सेफ्टी डेमो म्हणजे फक्त औपचारिकता नाही

प्रत्येक विमान प्रवासाच्या सुरुवातीला जेव्हा एअर होस्टेस सेफ्टी डेमो दाखवतात, तेव्हा अनेक प्रवासी दुर्लक्ष करतात. पण खरंतर, ही माहिती अपघाताच्या वेळी तुमचं प्राण वाचवू शकते. विशेषतः आपत्कालीन एक्झिट कुठे आहे, लाईफ जॅकेट कसं वापरावं, आणि ब्रेस पोझिशन कशी घ्यावी याकडे नीट लक्ष द्या.

काही महत्त्वाच्या टीप्स:

नेहमी सीटबेल्ट बांधलेला ठेवा, विशेषतः टर्ब्युलन्स दरम्यान.

तुमच्या समोरील सीटपाठीमागे असलेलं सेफ्टी कार्ड वाचा.

विमानात चढल्यावर आपत्कालीन एक्झिट कुठे आहे ते लक्षात ठेवा.

क्रू मेम्बर्सच्या नमुन्यांकडे लक्ष द्या. त्यांच्याच मार्गदर्शनामुळेच सुरक्षितता होते.

Brace Position सराव करते गरजेचे नसले तरी ती कशी घ्यावी हे नक्की शिकून ठेवा.

संकट कधीही येऊ शकतं.

विमानप्रवासात आपण आपल्या हातात फार काही नसते, पण माहिती आणि सतर्कता आपल्या हातात असते. त्यामुळेच संकट आलं तर त्याचा धैर्याने आणि योग्य कृतीने सामना करणे हेच शहाणपणाचं लक्षण आहे.

पुढच्यावेळी तुम्ही विमानप्रवास कराल, तेव्हा केवळ खिडकीबाहेर पाहण्यात रमू नका, तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही सजग रहा. ‘ब्रेस’ हा शब्द ऐकला की त्याचा अर्थ समजून योग्य कृती करा, कारण ती कृती कदाचित तुमचा जीव वाचवू शकते.

Plane Accident : Black Box म्हणजे काय? ज्यामुळे Ahmedabad मध्ये विमान अपघात कसा झाला? #blackbox

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *