Apple starts selling
Tech Updates

Apple ने भारतात सुरू केली iPad Air M3 आणि MacBook Air M4 ची विक्री!

Spread the love

Apple ने भारतीय बाजारात आपल्या लेटेस्ट डिव्हाइसेसची विक्री सुरू केली आहे. यामध्ये iPad Air M3, iPad A16, MacBook Air M4 आणि Mac Studio (M3 Ultra आणि M4 Max) यांचा समावेश आहे. हे प्रोडक्ट्स Apple च्या ऑफिशियल स्टोर्स आणि थर्ड-पार्टी रिसेलर्सकडून खरेदी करता येतील.

iPad A16 – सर्वात किफायती पर्याय

Apple ने आपला एंट्री-लेव्हल iPad A16 ₹34,900 मध्ये उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये 128GB स्टोरेज, 11-inch Liquid Retina Display आणि A16 चिपसेट देण्यात आला आहे. यामुळे युजर्सला Apple Pencil आणि Magic Keyboard चा सपोर्ट मिळतो.

iPad Air M3 – दुप्पट परफॉर्मन्स

iPad Air M3 ₹59,900 पासून सुरू होत असून, तो Blue, Purple, Starlight आणि Space Grey कलर्समध्ये उपलब्ध आहे. M3 चिपसेट मुळे iPad Air आता अधिक वेगवान झाला असून, Gaming, Content Creation आणि Editing यांसारखी कामे सहज करता येणार आहेत.

MacBook Air M4 – प्रोफेशनल्ससाठी बेस्ट ऑप्शन

MacBook Air M4 ₹99,900 पासून सुरू होत असून, यात M4 चिपसेट देण्यात आला आहे. यामुळे Multitasking, Photo आणि Video Editing अधिक वेगवान होतील. यामध्ये 12MP Center Stage Camera आहे, जो Auto-Adjusting Feature सह येतो.

Mac Studio M3 Ultra – Apple ची सर्वात महागडी ऑफरिंग

Apple च्या Mac Studio ची किंमत ₹14,39,900 आहे. M3 Ultra चिपसेट आणि प्रीमियम फीचर्समुळे हे Apple चे सर्वात पॉवरफुल डिव्हाईस मानले जाते.

Apple च्या नव्या प्रोडक्ट्ससाठी कोणता डिव्हाइस बेस्ट?

Budget Friendly: iPad A16
Performance आणि Gaming: iPad Air M3
Professional Work: MacBook Air M4
High-End Users: Mac Studio M3 Ultra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *